Category: होम

मध्य रेल्वेत नॅशनल रेल्वे मजदूर युनियनला मिळाली मान्यता !

एनआरएमयुचा हा ऐतिहासिक विजय रेल्वे कामगारांना समर्पित – वेणू नायर अनिल ठाणेकर ठाणे : भारतीय रेल्वेत ४ ते ६ डिसेंबरला रेल्वे कामगार युनियनच्या मान्यतेची निवडणूक झाली. या निवडणुकीत वेगळ्या संघटनांनी भाग घेतला होता. त्यामुळे ही निवडणूक नॅशनल रेल्वे मजदूर युनियनला आव्हानात्मक होती. नॅशनल रेल्वे मजदूर युनियन मात्र कामगारांच्या विश्वासावर एकटी मान्यतेसाठी निवडणूक रिंगणात होती. कामगारांनी या निवडणुकीत आव्हानाला सडेतोड उत्तर देऊन आपला विश्वास,  सर्वधर्म समभाव असलेली व कामगारांचे खरे प्रतिनिधित्व करणाऱ्या सरचिटणीस वेणू नायर यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल रेल्वे मजदूर युनियनला विजय मिळवून दिला.रेल्वे कामगारांचा हा ऐतिहासिक विजय असून, हा विजय आम्ही रेल्वे कामगारांना समर्पित करीत आहोत, अशी प्रतिक्रीया नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे सरचिटणीस वेणू नायर यांनी दिल्याचे कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी सांगितले. नॅशनल रेल्वे फेडरेशन ऑफ इंडिया ला संलग्न असलेली सेंट्रल रेल्वे मंजूर संघटना या संघटनेने आपला संपूर्ण जीव ओतून अनेक राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखाली असलेल्या कामगार संघटनाला सोबत घेऊन: मान्यता मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. नॅशनल रेल्वे मजदूर युनियन ला मान्यता मिळू नये म्हणूनसर्व संघटना बरोबर हातमिळवणी केली. परंतु कामगारांच्या मनात रुजलेली, भ्रष्टाचारी नसलेली शंभर वर्षाची परंपरा असलेल्या नॅशनल रेल्वे मजदूर युनियनला ४१.५८ टक्के मतदान करून मध्य रेल्वेच्या कामगारांनी मोठे योगदान देऊन विरोधी संघटनांना त्यांची जागा दाखवून दिली. या निवडणुकीत रेल्वे कामगारानी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनवर विश्वास ठेवून आपले बहुमूल्य मतदान केले. त्याबद्दल युनियनचे जनरल सेक्रेटरी वेणू नायर यांनी कामगारांना धन्यवाद देऊन सांगितले की.  रेल्वे कामगारांचा ऐतिहासिक विजय असून, हा विजय  आम्ही रेल्वे कामगारांना समर्पित करीत आहोत यबद्दल. . या निवडणुकीत कामगारांची एकता,  प्रगतीची दिशा दिसून आली. या निवडणुकीत प्रत्येक शाखा, मंडळ,  मुख्यालय व प्रत्येक सदस्यांनी मनापासून काम केले,  त्याचीच ही पोहचपावती आहे. रेल्वे कामगारांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे १६ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता मिरवणूक काढून मध्य रेल्वेत नॅशनल रेल्वे मजदूर युनियनला मिळालेल्या मान्यतेचा हा ऐतिहासिक विजयी सोहळा साजरा करण्यात आला. अशाच प्रकारे विविध ठिकाणी मोर्चे काढून विजय सोहळा, मंडळ व डेपोमधील कार्यकर्त्यांनी साजरा केला.

भाजप सरकारचा फायदा गरिबांना नाही तर मुठभर श्रीमंतानाच-वर्षा गायकवाड

मुंबई : संविधान बदलाचे रक्त काँग्रेसच्या तोंडाला लागले आहे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा खासदार वर्षा गायकवाड यांनी खरपूस समाचार घेतला. काँग्रेसचे रक्त देशाची एकता व अखंडतेसाठी या मातीत…

– वैभव, ओम साईश्वर, सरस्वती, विद्यार्थीची विजयी घोडदौड

किशोर-किशोरी मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा   मुंबई, मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने महाराष्ट्र अॅमॅच्युअर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे १४ वर्षांखालील किशोर-किशोरी (सब ज्युनिअर) मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिर, माटुंगा (प.), मुंबई येथे सुरु आहे. आज झालेल्या किशोरांच्या सामन्यात वैभव स्पोर्ट्स क्लब, ओम साईश्वर सेवा मंडळ, सरस्वती स्पोर्ट्स क्लब, विद्यार्थी क्रीडा केंद्राने विजयी घोडदौड सुरु केली आहे. किशोर गटाच्या उपांत्य फेरीमध्ये ओम साईश्वर सेवा मंडळ विरुद्ध वैभव स्पोर्ट्स क्लब व सरस्वती स्पोर्ट्स क्लब विरुद्ध विद्यार्थी क्रीडा केंद्र असा सामना रंगणार आहे किशोर गटाच्या पहिल्या सामन्यात वैभव स्पोर्ट्स क्लबने सरस्वती मंदिर हायस्कूलचा (६-२-३-३) ९-५ असा ४ गुणांनी पराभव केला. वैभवतर्फे यश यादवने नाबाद ५ मि. संरक्षण करुन आक्रमणात २ गडी बाद केले. सिधांश सावंतने १:३०, २:३० मि. संरक्षण करुन आक्रमणात १ गडी बाद केला. शुभम माळीने १:३० मि. संरक्षण करुन आक्रमणात ४ गडी बाद केले. सरस्वतीतर्फे हार्दिक कारंडेने ३ मि. संरक्षण केले. सार्थक बटावलेने ३:२० मि. संरक्षण केले. किशोर गटाच्या दुसऱ्या सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने स्टुडंट स्पोर्ट्स क्लबचा ८-१ असा १ डाव ७ गुणांनी पराभव केला. ओम साईश्वरतर्फे श्राथिक गामीने नाबाद ७ मि. संरक्षण करुन आक्रमणात २ गडी बाद केले. आरव साठमने ४:३० मि. संरक्षण केले. अदिराज गुरवने आक्रमणात २ गडी बाद केले. स्टुडंटतर्फे दिवेक सिंगने २:१० मि. संरक्षण केले. किशोर गटाच्या तिसऱ्या सामन्यात सरस्वती स्पोर्ट्स क्लबने ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिराचा (१०-२-६) १०-८ असा १ डाव २ गुणांनी पराभव केला. सरस्वती तर्फे महेक अडवडेने ३:३० मि. संरक्षण करुन आक्रमणात ४ गडी बाद केले. शिवम झाने  ३ मॉनिट संरक्षण करुन आक्रमणात १ गडी बाद केला. प्रथमेश तर्पेने २ मि. संरक्षण करुन आक्रमणात २ गडी बाद केले. ॐ समर्थतर्फे निहाल शिंदेने २:३० मि. संरक्षण करुन आक्रमणात ३ गडी बाद केले. देवेंद्र शिंदेने १:३० मि. संरक्षण करुन करुन आक्रमणात २ गडी बाद केले. किशोर गटाच्या चौथ्या सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्रने श्री समर्थ व्यायाम मंदिराचा (२१-१-४) २१-५ असा १ डाव १६ गुणांनी पराभव केला. विद्यार्थी तर्फे अपसर शेखने नाबाद ४:३० मि. संरक्षण करुन आक्रमणात १ गडी बाद केला. आयुष नवलेने २:३० मि. संरक्षण करुन आक्रमणात २ गडी बाद केले. विराज वाघमारेने आक्रमणात ४ गडी बाद केले. श्री समर्थ तर्फे कृशल वाघधरे आक्रमणात ३ गडी बाद केले. किशोर गटाच्या पाचव्या सामन्यात वैभव स्पोर्ट्स क्लबने अमर हिंद मंडळाचा (२-२-६-५) ८-७ असा चुरशीच्या सामन्यात १ गुणाने पराभव केला. वैभवतर्फे यश जाधवने नाबाद ४:२०, नाबाद ३:५० मि. संरक्षण करुन आक्रमणात २ गडी बाद केले. शुभम माळीने १:२०, १:२० मि. संरक्षण करुन आक्रमणात ४ गडी बाद केले. सोहम नार्वेकरने ६:३०, ३,५० मि. संरक्षण करुन आक्रमणात १ गडी बाद केला. संतोष केवटने आक्रमणात २ गडी बाद केले. 00000

डॉ. किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र मोहिमेचा शुभारंभ

अशोक गायकवाड अलिबाग‌ : रायगड जिल्ह्यात कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्या हस्ते सोमवारी अलिबाग तालुक्यातील वरसोली येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. सदर मोहीम १६ डिसेंबर ते २० डिसेंबर दरम्यान राबविण्यात येणारं असून, या मोहिमेतंर्गत वीटभट्टी, खाणकामगार, स्थलांतरित व्यक्ती, कारागृहातील कैदी, वृध्दाथम, अनाथाश्रम, वसतिगृहातील विद्यार्थी इत्यादींची तपासणी केली जाणार आहे.जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात येणार आहे. कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र मोहिमेतंर्गत नियमित सर्वेक्षणामध्ये कुष्ठरोगाच्या तपासणीपासून वंचित राहिलेल्या घटकांचे सर्वेक्षण, जनजागृती करुन, नवीन कुष्ठरुग्ण शोधून, मोफत बहुविध औषधोपचारांद्वारे संसर्गाची साखळी खंडीत करणे, हा उद्देश ठेवण्यात आला आहे. जिल्हाभरात ३७ हजार ५६८ इतक्या लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये वीटभट्टी, खाणकामगार, स्थलांतरित व्यक्ती, कारागृहातील कैदी, वृध्दाथम, अनाथाश्रम, वसतिगृहातील विद्यार्थी इत्यादींची तपासणी केली जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात येणार आहे. सदर मोहिमेचि शुभारंभ वरसोली येथे करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे, डॉ. प्राची नेहूलकर, डॉ. सचिन संकपाळ, डॉ. अश्विनी सकपाळ उपस्थित होते. 0000

माजी विश्व् विजेत्या प्रशांत आणि योगेशला पराभवाचा धक्का                   

२री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी स्पर्धा मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत दुसऱ्या महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत महाराष्ट्राच्या सुपेश कामतेकरने महाराष्ट्राच्या माजी विश्व् विजेत्या प्रशांत मोरेवर २२-१८, ५-२३, २०-१२ असा चुरशीचा विजय मिळवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तर दुसरीकडे मध्य प्रदेशच्या महम्मद साजिदने महाराष्ट्राच्या माजी विश्व् विजेत्या योगेश परदेशीवर ३-१६, १९-१३, १५-१० असा खळबळजनक विजय मिळवून आगेकूच केली. एका वेळी २४ सिस्का कॅरमवर खेळविण्यात येणाऱ्या एकंदर १० लाखाची बक्षिसे असलेल्या या स्पर्धेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तर मालदीवज, श्रीलंका व अमेरिकेच्या खेळाडूंच्या सहभागाने हि स्पर्धा अधिक रंगतदार झाली आहे. पुरुष एकेरी तिसऱ्या फेरीचे निकाल पुढील प्रमाणे. संदीप सावंत ( महाराष्ट्र ) वि वि सलमान खान ( महाराष्ट्र ) ११-८, १४-१५, १७-३ अभिषेक भारंबे ( महाराष्ट्र ) वि वि तुलसीदास हळर्णेकर ( गोवा ) २३-११, ७-२५, २३-१ जलालुद्दीन मुल्ला ( महाराष्ट्र ) वि वि नवीन चीकलापुडी ( अमेरिका ) २५-१३, १६-१७, १९-५ संतोष डोखे ( महाराष्ट्र ) वि वि सचिन बांदल ( महाराष्ट्र ) ८-९, २२-१, २५-१४ राजेश गोहिल ( महाराष्ट्र ( वि वि एस ए. इकबाल ( मध्य प्रदेश ) २५-४, २०-८ संजय मणियार ( महाराष्ट्र ) वि वि यमान जलील (  मालदिवज ) १५-२, १८-८ जुगल किशोर दत्ता ( आसाम ) वि वि प्रफुल रसाळ ( महाराष्ट्र ) ११-५. १६-४ एस के महम्मद ( तेलंगणा ) वि वि प्रकाश दुधाळे (  महाराष्ट्र ) १६-१०, २१-४ हारून शेख ( महाराष्ट्र ) वि वि गिहन चमारा ( श्रीलंका ) ६-१९, २०-२, २५-९ महम्मद अहमद ( तेलंगणा ) वि वि शरद मोरे ( महाराष्ट्र ) १५-०, १७-१० अनिल मुंढे ( महाराष्ट्र ) वि वि तैमूर अश्रफ ( दिल्ली ) ७-१५, २३-६, २३-०

रेरा घोटाळ्यात फसवणूक झालेल्या कल्याण-डोंबिवलीतील ग्राहकांना न्याय द्यावा

 भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांची विधान परिषदेत `पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’द्वारे मागणी   ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील काही इमारतींमधील रेरा नोंदणी घोटाळ्यात सामान्य ग्राहकांची फसवणूक करण्यात आली. आता या इमारती जमीनदोस्त करण्यासाठी महापालिकेने नोटीस बजाविल्यानंतर रहिवाशी हवालदिल झाले आहेत. या रहिवाशांना महापालिकेने दिलासा देण्यासाठी निर्देश द्यावेत. तसेच संबंधित बिल्डरांविरोधात मोक्का कायद्यान्वये कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत `पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’द्वारे केली. घरग्राहकांच्या संरक्षणासाठी असलेल्या रेरा कायद्यांतर्गतची नोंदणी व बिल्डरने कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर अनेक राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंकांकडून मंजूर झालेल्या कर्जातून कल्याण-डोंबिवलीतील ५८ इमारतींमध्ये शेकडो रहिवाशांनी घरे घेतली असून, सहा हजार नागरिक राहत आहेत. कालांतराने रेरा कायद्याअंतर्गत मंजुरी मिळविण्यासाठी बिल्डरांनी महापालिकेकडे बनावट कागदपत्रे सादर केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर महापालिकेने संबंधित इमारती जमीनदोस्त करण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. या प्रकारामुळे रहिवाशी हवालदिल झाले आहेत. या रहिवाशांची व्यथा आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत आज मांडली. या प्रकरणाची राज्य सरकारने दखल घ्यावी. तसेच सामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेला निर्देश द्यावेत. तसेच या प्रकरणी बिल्डरांवर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली. 0000

 रस्त्यावरील अतिक्रमणाविरोधात मोहीम

 मेनरोड, शालिमार भागात कारवाई   नाशिक : शहराची मुख्य बाजारपेठ असलेला मेनरोड, शालिमार आणि सराफ बाजार परिसरात सोमवारी सायंकाळी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने मोहीम राबवण्यात आली. यामुळे व्यावसायिकांसह परिसरात आलेल्या ग्राहकांची धावपळ उडाली. सायंकाळी उशीरापर्यंत ही मोहीम सुरू होती. गर्दीच्या वेळी काही काळ का होईना रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. अशीच परिस्थिती कायम ठेवावी, अशी अपेक्षा ग्राहकांनी व्यक्त केली. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोड, शालिमार परिसरात लहान व्यावसायिकांनी बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यांवर आपले बस्तान बसवले आहे. यामुळे पायी चालणाऱ्यांसह वाहनचालकांनाही कसरत करावी लागते. शालिमार परिसरात सध्या हिवाळा असल्याने लहान मुलांच्या उबदार कपड्यांपासून सर्व वयोगटाच्या लोकांसाठी स्वेटर, कानटोपी, मोजे, विविध प्रकारचे स्कार्फ, महिला वर्गासाठी आभुषणे, पर्स, वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख, पादत्राणे, चादर, ब्लँकेट आदींची विक्री रस्त्यावर करण्यात येत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिक थेट रस्त्यावर उतरत असल्याने वाहतूक कोंडीला मदत होत आहे. त्यातच हातगाड्यावाल्यांची भर पडते. शालिमार परिसरात संदर्भ सेवा रुग्णालय तसेच नाशिकरोड, इंदिरानगर, देवळालीकडे जाण्यासाठी वाहन व्यवस्था आहे. शहर बससेवेचा थांबाही आहे. अडथळ्यांची ही शर्यत पार करत वाहनचालक किंवा पादचाऱ्यांना बाहेर पडावे लागते. व्यावसायिकांनी या सर्व जागेवर अतिक्रमण करुन ग्राहकांची लुटमार सुरू केली आहे. हे विक्रेते पोलिसांनाही जुमानत नसल्याचे वारंवार उघड झाले आहे. मागील आठवड्यात एका विक्रेत्याने महिला आणि बरोबर असलेल्या पोलिसाला मारहाण केली होती. अशीच परिस्थिती मेनरोड तसेच सराफ बाजारात आहे. लहान विक्रेत्यांची गर्दी तर असतेच. शिवाय, मोठ्या दुकानदारांकडून सेलच्या नावाखाली काही सामान बाहेर विकण्यासाठी काढले जाते. भाजी विक्रेते, फुल विक्रेते यांची त्यात भर पडते. गर्दीमुळे बऱ्याचदा वादाचे प्रसंग उद्भवतात. कधी कधी हे प्रकरण हाणामारीपर्यंत जाते. या पार्श्वभूमीवर कोंडलेल्या रस्त्यांनी मोकळा श्वास घ्यावा, ही या परिसरात येणाऱ्या ग्राहकांची अपेक्षा असते. संबंधित परिसराला पडलेला अतिक्रमणाचा विळखा पाहता, सुस्तावतेल्या नाशिक महापालिकेला अखेर सोमवारी जाग आली. सोमवारी सायंकाळी शालिमार, मेनरोड, सराफ बाजार परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली. या कारवाईची पूर्वसूचना नसल्याने व्यावसायिकांची धावपळ उडाली. मोहिमेतून माल वाचावा, यासाठी विक्रेत्यांची पळापळ सुरू झाली. काहींनी पुढे जात अन्य लोकांना मोहिमेची पूर्वकल्पना दिली. या धावपळीत बांबुवरील कपडे किंवा अन्य सामान काढताना बांबु रस्त्यात पडले, सामान रस्त्यावरच पडल्याने ग्राहकांना रस्त्याने मार्ग काढणे कठीण झाले. कारवाईत सातत्याचा अभाव शहरातील शालिमार, मेनरोड या परिसरात महापालिकेकडून अधूनमधून अतिक्रमण निर्मूलन कारवाई केली जाते. परंतु, पथकाची गाडी पुढे गेली की लगेचच मागे परिस्थिती पूर्ववत होते. महापालिकेकडून सातत्याने कारवाई करण्यात येत नसल्याने अतिक्रमणधारकांचे चांगलेच फावते. शालिमार परिसरात फळविक्रेते, कपडे विक्रेते यांच्या अतिक्रमणामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असतानाही पोलिसांकडून सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात येते. 0000

विधानसभा निवडणुकीतील अपयशामुळे ब.रि.सो.पार्टीची कमिटी बरखास्त

अशोक गायकवाड मुंबई : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ला अपेक्षित यश न आल्याने संघटनात्मक बांधणी नव्याने करण्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्यामहाराष्ट्र राज्य व विदर्भ कमिटी बरखास्त करण्यात आल्याची माहिती बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष, ॲड. (डॉ.) सुरेश माने यांनी दिली आहे. दिनांक १३ डिसेंबर २०२४ व १५ डिसेंबर २०२४, नागपूर व पूणे या पक्षाच्या आढावा बैठकीत कार्यकत्र्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ला अपेक्षित यश न आल्याने संघटनात्मक बांधणी नव्याने करण्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या महाराष्ट्र राज्य व विदर्भ प्रदेश स्तरीय प्रदेश व जिल्हा कमेट्या बरखास्त करून पक्ष-सदस्यता व संगठनबांधनीचा निर्णय घेतलेला असून त्यासाठी काही विशेष पदाधिकारी यांची हंगामी पदाधिकारी म्हणून नियुक्त्या केल्या आहेत. यापुढे पक्षाची पक्षबांधनी, सदस्यता मोहिम, कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे व जन आंदोलन या चार कलमी कार्यक्रमाअंतर्गत सर्वांना पक्षबांधनीचे आदेश दिले आहेत.राज्यातील सामाजिक असंतोष-परभणी, बीड सारख्या घटनांनी महाराष्ट्र ढवळून निघाला असून राज्यात नवीन स्थापन झालेल्या सरकारसमोर सुध्दा नवीन आव्हाणे उभे केली आहेत त्यांची राज्य सरकारने गंभीर दखल घ्यावी व योग्य कारवाई करावी असेही ठराव या बैठकीत पास करण्यात आले. त्याशिवाय निवडणूकीत ईव्हीएम चा गैरवापर, काळ्या पैशाचा गैरवापर, शासन-प्रशासनाचा गैरवापर, आर्थिक घोटाळे व आश्वासने आणि वन नेशन वन इलेक्शन यामुद्द्यावर भविष्यातही बीआरएसपी सातत्याने सुधारणासाठी व बदलासाठी प्रयत्नशील राहील असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. असेहीबहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे, संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष, ॲड. (डॉ.) सुरेश माने यांनी सांगितले.

जवाहर नवोदय विद्यालयासाठी १८ जानेवारी रोजी प्रवेश परीक्षा – मनोज राऊत

 अशोक गायकवाड रायगड :निजामपूर ता.माणगाव येथील पीएमसी स्कूल जवाहर नवोदय विद्यालयाची इयत्ता सहावी साठी प्रवेश परीक्षा १८ जानेवारी २०२५ रोजी रायगड जिल्ह्यातील एकूण १५ तालुक्यातील परीक्षा केंद्रावर होणार आहे. त्यासाठीचे प्रवेश पत्र https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard व https:// navodaya.gov.i वेबसाईटवरून संबंधित उमेदवारांनी डाउनलोड करून घ्यावेत अशी माहिती विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य मनोज राऊत यांनी दिली आहे.* जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील परीक्षा केंद्रावर एकूण २ हजार ३७४ विद्यार्थी यावेळी इयत्ता सहावी वर्ग पात्रता परीक्षेसाठी बसत आहेत. एकूण ८० जागांसाठी यातून विद्यार्थी निवडले जाणार असून परीक्षा पात्र विद्यार्थ्यांची नावे आणि त्यांच्या रजिस्ट्रेशन क्रमांक परीक्षा ओळखपत्रे या https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard व https:// navodaya.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विद्यार्थी रजिस्ट्रेशन क्रमांक आणि विद्यार्थी जन्मतारीख हे ओळखपत्राचे पासवर्ड असणार आहेत सर्व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी दि. १८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. विद्यार्थी आणि पालकांना याबाबत काही माहिती हवी असेल तर त्यांनी संतोष चिंचकर ९८८१३५१६०१ ,अर्जुन गायकवाड ९८६२७९३६४०, वर्षा सावंत ७२७६००८३९९ यांना संपर्क साधावा.

सत्तरीतील सेल्फी”: लेखक आणि प्रकाशकाचे मोठे धाडसच  -सुधीर गाडगीळ

मुंबई  :  ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, अशा व्यक्तींविषयी आणि इतर मान्यवर व्यक्तींच्या अज्ञात बाबींविषयी धैर्याने पुस्तक लिहिणे आणि ते छापल्याबद्दल “सत्तरीतील सेल्फी” या पुस्तकाचे लेखक  चंद्रकांत बर्वे आणि प्रकाशक अलका भुजबळ या…