बनोटी परिसरात मुसळधार
वीज कोसळून दोन ठार, आठ शेळ्या ही ठार सोयगाव- बनोटी परिसरात सोमवारी दुपारी तीन वाजता सुरू झालेल्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला असून सायंकाळी चार वाजेच्या सुमारास झालेल्या विजांच्या कडकडाटात…
वीज कोसळून दोन ठार, आठ शेळ्या ही ठार सोयगाव- बनोटी परिसरात सोमवारी दुपारी तीन वाजता सुरू झालेल्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला असून सायंकाळी चार वाजेच्या सुमारास झालेल्या विजांच्या कडकडाटात…
राजेंद्र साळसकर मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघांच्या अध्यक्षपदी आमदार सचिनभाऊ अहिर,तर सरचिटणीसपदी गोविंदराव मोहिते या नेतृत्वाची फेरनिवड झाली आहे.राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या पंचवार्षिक नवनियुक्त संयुक्त प्रतिनिधी मंडळाची सभा मनोहर फाळके सभागृहात पार पडली. या सभेत एकमुखी ठरावाद्वारे अध्यक्ष व सरचिटणीसपदाची घटनेप्रमाणे आणि लोकशाहीप्रणालीनुसार निवडणूक पार पडली. मुंबईत आज आपले अस्तित्व टिकवून असलेल्या (१)टाटा (२)इं.यु.मि.क्र.५,(३)पोद्दार (४)दिग्विजय आणि (५ ) न्यू ग्रेट या गिरण्यांतील कामगारांमधून प्रतिनिधी म्हणून बिनविरोध निवडून आलेल्या प्रतिनिधींनी सभेत स्विकृत सदस्यांची निवड केली. निवडून आलेल्यांमध्ये महिला प्रतिनिधींचाही समावेश आहे. निवडून आलेले प्रतिनिधी आणि स्विकृत सदस्य यांच्या संयुक्त प्रतिनिधी मंडळाची सभा मनोहर फाळके सभागृहात पार पडली.या सभेत वरील प्रमाणे संघटना नेतृत्वाची निवड करण्यात आली आहे.या पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम ११ ते २१ ऑक्टोबरपर्यंत जाहीर करण्यात आला होता. निवडणूक प्रमुख म्हणून बजरंग चव्हाण यांनी काम पाहिले. सभेला निवृत्ती देसाई,अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर, शिवाजी काळे या माजी पदाधिका-यांची सदस्य म्हणून निवड झाली.नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे अधिकार अध्यक्ष आणि सरचिटणीस यांना सभेत ठरावाद्वारे देण्यात आले होते. लवकरच पदाधिकाऱ्यांची निवड रितसर जाहीर करण्यात येईल. नवनियू्क्त अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनी सर्व नवनियुक्त प्रतिनिधींचे स्वागत करताना म्हटले आहे, लोकशाहीची थोर परंपरा लाभलेल्या देशाच्या निवडणुकी पासून कामगार चळवळीतील कामगार संघटनांच्या संघटनात्मक निवडणुकीच्या इतिहासाची जेव्हा – जेव्हा चर्चा होईल, तेव्हा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलेले असेल.सन १९९६-९७ पासूनच्या गेल्या २८ वर्षांच्या आपल्या यशस्वी कारकीर्दीचा उल्लेख करून,सचिन अहिर आपल्या भाषणात पुढे म्हणाले, केंद्रसरकारने चार संसदीय विधेयके संमत केली.त्यामुळे कामगार चळवळीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांचेही त्यावेळी भाषण झाले. आभार बजरंग चव्हाण यांनी मानले. ठरावाना अनुमोदन प्रतिनिधी दीपक राणे,नामदेव झेंडे, सुभाष नारकर यांनी केले.महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे उपाध्यक्ष राजन लाड, सुनिल अहिर यांनी नव्या नेतृत्वाचे पूष्पगुच्छाने स्वागत केले.राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या नवनियुक्त नेतृत्वाचे गिरणगावात जोरदार स्वागत होत आहे، 0000
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशनच्या गोरेगाव विभागातर्फे नुकतेच प्रबोधन क्रीडा भवनातील सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले हाेते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री सुभाष देसाई आणि बृहन्मुंबई महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकर क्षीरसागर उपस्थित होते. जुनी पेन्शन आणि नवीन पेन्शनमधील फरक समजावून सांगून महापालिका कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजनेसाठी प्रयत्नशील असल्याचे देसाई यांनी सभासदांना सांगितले. या वेळी संघटनेच्या नीता मांजरेकर, राजश्री श्रोत्रिय, ललिता भट, संजय भातखंडे, गौरी वंदना, राजन नाईक, अजित कदम यांनी सुमधुर गाणी म्हणत श्रोत्यांचे मनोरंजन केले. आनंद पुरंदरे यांनी कवितांचे वाचन करीत सर्वांना आनंद दिला. या कार्यक्रमासाठी संजय मोरे, बळीराम कदम, ज्ञानदेव कदम, आनंद पुरंदरे, भुवड , बंगेरा, जगदाळे, सुनील माने, पडवळ, स्वरदा दाते, निलिमा जवंजाळ, प्रबोधन क्रीडा भवनाचे प्रमुख कार्यवाह गोविंद उर्फ विजू गावडे यांचे सहकार्य लाभले.
सभा, बॅनर, रॅलीसाठी नाशिक महापालिकेचे दरपत्रक जाहीर हरिभाऊ लाखे नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी महापालिका हद्दीत होणाऱ्या चौक सभा, जाहीर सभांसाठी भाडे निश्चित करून पालिकेच्या विविध विभागाने प्रचारफेऱ्या, सभांसाठीचे झेंडे, बॅनर्सकरिता दरपत्रक (रेटकार्ड) जाहीर केले आहे. प्रचार रॅली, जाहीर सभा, चौकसभा, पथनाट्य, प्रचार वाहन व प्रचार कार्यालयाच्या ठिकाणावर लहान पोस्टर्स, बॅनर्स, झेंडे, चिन्ह, मफलर, टोपी आदींकरिता प्रतिदिन प्रतिनग १२ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. अनंत कान्हेरे मैदानासाठी राजकीय पक्षांना एका सभेसाठी ३५ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांसाठी यंदाची निवडणूक खर्चिक होणार असली तरी महापालिकेची मात्र चांदी होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. त्यासाठी २२ ऑक्टोबरपासून प्रशासकीय प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज माघारीनंतर निवडणुकीच्या प्रचाराला वेग येणार आहे. यंदा दिवाळीनंतरच निवडणुकीचा माहोल तयार होणार असल्याचे चित्र आहे. विधानसभेसाठी राज्यात एकच टप्प्यात मतदान होणार असल्यामुळे राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या सभा, रॅलीवर नियंत्रण राखण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार महापालिकेच्या विविध कर विभागाने दरपत्रक निश्चित केले आहे. सदर शुल्क अदा केल्यानंतरच संबंधित राजकीय पक्ष तसेच उमेदवारांना परवानगी मिळू शकणार आहे. या दरपत्रकानुसार चौकसभांकरिता प्रत्येकी २५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. खासगी मालमत्ता तसेच प्रचार कार्यालयांच्या ठिकाणी ५० चौरस फुटांपर्यंत कापडी बॅनर्सकरिता प्रतिदिन १५० रुपये, तर १०० चौरस फुटांच्या कापडी बॅनर्सकरिता ३०० रुपये प्रतिदिन शुल्क आकारले जाणार आहे. जाहीर सभा व चौक सभेच्या ठिकाणी १०० चौरस फुटांपर्यंतच्या बॅनर्सकरिता प्रति सभा प्रति नग ३०० रुपये, तर लहान फलकासाठी १५० रुपये प्रति दिन, प्रति नग शुल्क आकारले जाणार आहे. ईदगाह मैदान व राजे संभाजी स्टेडियमवर हेलिपॅड तयार करण्यासाठी एक दिवसाकरिता ७०० रुपये, अधिक १८ टक्के जीएसटी आकारला जाईल. डिजिटलसाठीही मोजा पैसे खासगी जागेतील भित्तिचित्राकरिता सात रुपये प्रतिचौरस फूट मासिक, तर डिजिटल बोर्ड, एलइडी, एलसीडी बॅकलाइट बोर्ड, निऑन बोर्ड, इलेक्ट्रॉनिक, व्हिडीओ डिस्प्ले, लेझर शो व देखाव्यांकरिता ‘अ’ वर्गवारीकरिता ८.४० रुपये प्रतिचौरस फूट मासिक दर असेल. ‘ब’ वर्गाकरिता ६.६० रुपये प्रतिचौरस फूट मासिक दर निश्चित करण्यात आले आहेत. वाहनावरील स्टिकर (अप्रकाशित) करिता प्रतिचौरस फुटास ५.५० रुपये प्रतिदिन, तर प्रकाशितकरिता ६.५० रुपये प्रतिदिन शुल्क आकारले जाईल. बूथसाठी ९०० रुपये दर मतदान केंद्राबाहेर लावल्या जाणाऱ्या ५ बाय ५ चौ. फूट आकारच्या बूथकरिता १५०, तर १० बाय १० आकाराच्या बूथकरिता ९०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. प्रचार वाहनावरील कापडी बॅनरीकरिता २५० रुपये, तर स्टिकरसाठी ६.५० रुपये प्रतिदिन, प्रतिचौरस फूट दर आकारला जाणार आहे. प्रचाररॅली, जाहीर सभा, चौकसभा, पथनाट्य, प्रचार वाहन व प्रचार कार्यालयाच्या ठिकाणावर लहान पोस्टर्स, बॅनर्स, झेंडे, चिन्ह, मफलर, टोपी आदींकरिता प्रति दिन, प्रति नग १२ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. जाहीर सभांकरिता मैदानांचे दर – ईदगाह व अनंत कान्हेरे मैदान : २८,८७५ अधिक १८ टक्के जीएसटी – ३५,००० अनामत – पवननगर मैदान, नवीन नाशिक : ३,८१८ अधिक १८ टक्के जीएसटी – ५,००० अनामत – पाटीलनगर, नवीन नाशिक : ६,९६६ अधिक १८ टक्के जीएसटी – १०,००० अनामत – शिवाजी चौक भाजी मार्केट : ४,९७८ अधिक १८ टक्के जीएसटी – ७,००० अनामत – यशवंत महाराज पटांगण : २,८०० अधिक टक्के जीएसटी – ५,००० अनामत – राजे संभाजी स्टेडियम : २१,९८० अधिक १८ टक्के जीएसटी – २५,००० अनामत – शिखरेवाडी मैदान, नाशिकरोड : १३,२६० अधिक १८ टक्के जीएसटी – २०,००० अनामत – मुक्तिधाममागे शाळा क्रमांक १२५ : ८९५७ अधिक १८ टक्के जीएसटी – १५,००० अनामत – सातपूर क्लब हाऊस मैदान : १८,०८४ अधिक १८ टक्के जीएसटी – २०,००० अनामत ०००००
शरद पवारांची ताकद असलेल्या मतदारसंघातून उमेदवारीसाठी आग्रही मुंबई : अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी बरेच जण इच्छुक आहेत. पक्षातच असलेल्या अनेक कार्यकर्त्यांचे आता आमदारकीसाठी प्रयत्न करतायत. यामध्ये कलाकारही कुठे मागे नसल्याचं चित्र सध्या आहेत. काही दिवसांपूर्वीच सयाजी शिंदे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आलेली आहे. आनंद शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली असून आनंद शिंदे त्यांचा मुलगा उत्कर्ष शिंदेच्या उमेदवारीसाठी आग्रह असल्यच्या चर्चा सध्या सुरु आहेत. त्याचप्रमाणे आनंद शिंदे यांनी मोहोळ, शिर्डी किंवा दक्षिण सोलापुरमध्ये उमेदवारीसाठी आग्रही भूमिका घेतली असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. त्यामुळे आता शिंदे घराणं जर राजकारणाच्या वर्तुळात आलं तर निवडणुकीच्या रिंगणात स्वत: आनंद शिंदे उतरणार की उत्कर्षसाठी आग्रह धरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष दरम्यान आनंद शिंदे आग्रही असलेल्या मतदारसंघामध्ये शरद पवारांची ताकद आहे. त्यामुळे मोहोळ, शिर्डी आणि दक्षिण सोलापूर या मतदारसंघातून आनंद शिंदे हे विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं म्हटलं जातंय. यावर आता शरद पवार काय भूमिका घेणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं मागच्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेल्या घडामोडींमुळे यंदाची विधानसभा निवडणुक ही अनेकांसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरली आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून 23 नोव्हेंबर निकाल लागणार आहे. दरम्यान सध्या प्रत्येक राजकीय पक्षाकडून आता सर्वतोपरी प्रयत्न सुरु असून जोरदार प्रचार देखील सुरु झालाय. नुकतीच भाजपने त्यांच्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून आता कोणत्या उमेदवारांना यंदाच्या विधानसभेसाठी संधी मिळणार याची उत्सुकता आहे.
अशोक गायकवाड मुंबई : फ्रांस – भारत व्यापार संबंध दृढ होण्यासाठी भारत व युरोपिअन महासंघामध्ये मुक्त व्यापार करार होणे आवश्यक आहे असे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितले. भारत…
ठाणे : जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू असून मतदारांना साद घालण्यात येत आहे. तर, दुसरीकडे जिल्हा प्रशासनाकडून विधानसभा मतदारसंघनिहाय तरुण मतदारांची…
स्ट्राँग रूम, मतमोजणी कक्ष, नामनिर्देशनबाबतच्या तयारीचा घेतला आढावा ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे आणि पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी…
माथेरान : माथेरान मध्ये चिक्की चपला प्रसिद्ध आहेत पण त्याचबरोबर इथले खास आकर्षण म्हणजे इथली माकडे आहेत. माथेरान मध्ये कुठेही गेल्यास माकडांच्या टोळ्या गटागटाने दिसतात.प्रत्येक पॉईंट्स वर ही माकडे आपल्या…