पोर्ट ट्रस्ट कामगार दिवाळी विशेषांकासाठी साहित्य पाठवा – मारुती विश्वासराव
ठाणे : अखिल भारतीय बंदर व गोदी उद्योगात जुनी असलेली मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनला १०४ वर्ष झाली असून, या युनियनचे ” पोर्ट ट्रस्ट कामगार ” या दिवाळी…
ठाणे : अखिल भारतीय बंदर व गोदी उद्योगात जुनी असलेली मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनला १०४ वर्ष झाली असून, या युनियनचे ” पोर्ट ट्रस्ट कामगार ” या दिवाळी…
ठाणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबरला स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने, १७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात ‘स्वच्छता ही सेवा २०२४’ मोहीम…
ठाणे : रायगड जिल्ह्यातील साने गुरुजी स्मारक वडघर येथे नुकत्याच आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये प्रा प्रवीण देशमुख यांना ज्येष्ठ कवयित्री निरजा यांच्या हस्ते आधारस्तंभ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त…
ठाणे : ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणानंतर प्रवाशांची जितकी म्हणून अडचण होईल, तितक्या प्रमाणात अडथळे निर्माण करण्याचा विडा मध्य रेल्वे प्रशासनाने उचलल्याचे दिसत आहे. सर्वात आधी रुंदीकरणासाठी घेतलेल्या मेगाब्लॉकमुळे…
डोंबिवली : पुणे येथील गोखले अर्थशास्त्र-राज्यशास्त्र संस्थेच्या कुलगुरू पदावरून विख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे यांना हटविल्याने देशभरातील विद्वतजन, अर्थतज्ज्ञांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. त्याच बरोबर डोंबिवलीतील विविध क्षेत्रातील…
मतांच्या राजकारणात माथेरान विकासात्मक दृष्ट्या पिछाडीवर माथेरान : माथेरान या नगावाला विकसनशील क्षेत्र बनण्यासाठी नेहमीच संघर्ष करावा लागला आहे आणि यापुढेही भावी पिढीला आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करावा लागू नये यासाठी येथील आशावादी भूमिपुत्रांना आजही स्वप्नवत जीवन जगावे लागत आहे.इथली काही मोजकीच राजकीय पक्षांची मंडळी ज्यांना खरोखरच या गावासाठी काहीतरी नवीन करण्याची मनीषा आहे त्यांनाही त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून कामे करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही तोपर्यंत आटोकाट प्रयत्न करावे लागत आहेत.इथल्या एखाद्या पक्षाचे नेतृत्व विकासाची गंगा आणण्यासाठी कार्यक्षम असले तरीसुद्धा मुख्यमंत्री असोत किंवा अन्य खात्याच्या मंत्र्यांना ह्या गावाची कैफियत अथवा गार्हाणी कथन करावयाची झाल्यास तालुक्यातील आमदार किंवा जिल्ह्यातील खासदार याना विश्वासात घेऊन जाणे क्रमप्राप्तच आहे अन्यथा होणाऱ्या कामास देखील हेतूपूर्वक खोडा आणून कोणतीही विकास कामे पूर्णत्वास जाऊच शकत नाही याचा प्रत्यक्ष अनुभव स्थानिकांना आलेला आहे आणि ही येथील वस्तुस्थिती असल्याचेही स्थानिकांमधून बोलले जात आहे. काही दिवसांनी विधानसभा निवडणूका होणार असल्याने कर्जत खालापूर मतदार संघात उमेदवारीसाठी प्रत्येक पक्षात चढाओढ सुरू असून तालुक्यातील गल्लीबोळात प्रचाराची धामधूम सुरूच आहे, प्रत्येक पक्षात पक्षप्रवेश त्याचप्रमाणे मतदारांच्या भेटीगाठी सुरू असून जल्लोषात वाढदिवस आणि उत्सव साजरे होताना शक्तिप्रदर्शन जोरात सुरू आहे. आपली बाजू भक्कम असल्याचा अविर्भाव इच्छुक उमेदवार आणताना दिसत आहेत. तालुक्यातील आदिवासी वाड्या असोत किंवा अन्य अडगळीच्या ठिकाणी कधी नव्हे ते तिथे जाऊन त्या भागातील लोकांची विचारपूस,त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, नादुरुस्त रस्ते, वीज,पाणी समस्या याबाबत जातीने लक्ष केंद्रित करत आहेत. याच मतदार संघात जेमतेम तीन हजारांच्या आसपास मताधिक्य असलेले माथेरान हे पर्यटनस्थळ सुध्दा समाविष्ट आहे. परंतु आजतागायत या स्थळाकडे संबंधित निवडून येणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी आजवर कानाडोळाच केलेला दिसत आहे.आपल्या पक्षाला साधारणपणे माथेरान मधून एक हजारांच्या आसपास मते मिळणार आहेत त्यामुळे निवडणूक काळात इकडे विधानसभा असो किंवा लोकसभा निवडणूक असो सहसा कुणीही उमेदवार वेळ वाया घालवत नाहीत आपल्या काही कार्यकर्त्यांना पाठवून जे काही निवडणुकीचे मतांबाबतचे व्यवहार आहेत ते पूर्ण केले जातात.जणू काही या उमेदवारांना इथल्या मतांचे काहीएक स्वारस्य नसल्याप्रमाणे वागतात. आश्वासने ही नेहमीप्रमाणे दिली जातात पण मतांच्या राजकारणामुळे अल्प मतदान असल्याने इथली विकास कामे पूर्ण करण्याची विधानसभा उमेदवारांना माथेरानच्या विकासाबाबत इच्छाशक्ती नाही.निवडुन आल्यावर सुध्दा इकडे फारसे फिरकत नाहीत. माथेरान करांची काही मोठी मागणी नाही.फक्त याठिकाणी पर्यटन वाढीसाठी त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी अन्य ठिकाणी जाण्यासाठी उत्तम प्रकारे पर्यायी व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी फिनिक्युलर रेल्वे,प्रलंबित असणारा रोपवे प्रकल्प तसेच चौक येथून मोटार वाहन रस्ता थेट रामबाग पॉईंट पर्यंत उपलब्ध होऊ शकतो ही होणारी कामे असून त्यासाठी निवडून येणाऱ्या आमदारांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून कामे पूर्ण करणे बाकी आमची काहीच मागणी नाही असे जाणकार जेष्ठ मंडळी बोलत आहेत. स्वातंत्र्यानंतर सुध्दा आपल्या न्यायहक्कासाठी माथेरान सारख्या दुर्गम परंतु जगप्रसिद्ध पर्यटनस्थळी पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असलेल्या भूमिपुत्रांना संघर्षमय जीवन जगावे लागत आहे. काही प्रश्न असल्यास शासन दरबारी खेटे मारून कामे कशीबशी पूर्ण करून घ्यावी लागत आहेत आणि जी काही अशक्यप्राय कामे आहेत ती पूर्ण करण्यासाठी आमदार, खासदार यांना विनवण्या करून आशेवर राहावे लागत आहे मतांच्या राजकारणात माथेरान पिछाडीवर पडले आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजे इथली अल्प मतदार संख्या त्यामुळे भविष्यात सुध्दा भूमिपुत्रांचे संघर्षमय जीवन राहणार की काय असा प्रश्न स्थानिक भूमिपुत्र उपस्थित करत आहेत.यासाठी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवारांसाठी किती धावपळ करावी हे त्यांनी स्वतःहून जाणले पाहिजे. 0000
विरार : विरार मध्ये गणपती विसर्जन करताना, गणेश भक्ताचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विरार पूर्व तोटले तलावात आज बुधवार ता 18 रोजी पहाटे साडे साडे तीन वाजता ही दुर्दैवी…
पालघरः वर्गात चार भिंतीच्या आत आणि शाळेच्या वेळेत केवळ पुस्तक घेऊन ज्ञानदान करणं म्हणजे शिक्षण नव्हे आणि असं काम करणारा शिक्षकही नव्हे, तर शिक्षणाची व्याख्या फार विस्तृत आहे. भारताचे दुसरे…
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा एक व टप्पा दोन अंतर्गत गृहप्रवेश चावी वाटपाचा कार्यक्रम व मंजुरी पत्रक वितरण ठाणे : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत सन २०२४-२५ मधील मंजूर लाभार्थ्यांना मंजूरी पत्रांचे वितरण जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन, ठाणे येथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत सन २०२४-२५ मधील जिल्ह्यातील १४ मंजूर लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात घरकुल मंजूर पत्रक वितरण वितरण करण्यात आले तसेच प्रधानमंत्री आवास योजना टप्पा एक अंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुल दोन लाभार्थ्यांना गृहप्रवेशाची चावी व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत तीन लाभार्थी यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गृहप्रवेशाची चावी देण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-१ अंतर्गत सन २०२३-२४ व २०२४-२५ मध्ये आतापर्यंत पूर्ण झालेल्या दोन घरकुलांचे गृहप्रवेश करण्यात आले असून प्रशस्तीपत्र देऊन लाभार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी घरकुल बांधकाम करताना येणाऱ्या अडचणींवर चर्चा केली. ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे घरकुल वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन मार्गदर्शन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत २४-२५ करिता ७ हजार १४१ उद्दिष्ट प्राप्त झाले आहे त्यापैकी सद्यस्थितीला ३ हजार ५५६ लाभार्थींना मंजुरी देण्यात आली असून २ हजार ६०१ पहिला हप्ता वितरण करण्यासाठी FTO जनरेट करण्यात आलेले आहेत अशी माहिती प्रास्ताविक करताना प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ठाणे छायादेवी शिसोदे यांनी माहिती दिली. यावेळी आयुक्त नगरपरिषद संचालनालय, नवी मुंबई मनोज रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी ठाणे संदीप माने, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन हरीश पाटील, मुख्याधिकारी कुळगाव बदलापूर मारुती गायकवाड, अतिरिक्त मुख्य अधिकारी अंबरनाथ अभिषेक पराडकर, सर्व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभारी सहायक प्रकल्प संचालक संतोष पांडे यांनी केले.
पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांचे प्रतिपादन मुंबई : ‘जयवंत दळवी हे मला मित्र म्हणून नव्हे, तर स्पर्धक म्हणून भेटले. मात्र स्पर्धा बाजूला राहिली आणि स्नेह वृद्धिंगत झाला. साहित्यिकाकडे नम्रता असली पाहिजे, अहंकार नको,’ असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक स्वर्गीय जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई जिल्हा आणि बोरिवली शाखेच्या वतीने बोरीवली येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. १६ सप्टेंबर रोजी आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षपद कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, तर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आमदार मनीषाताई चौधरी होत्या. प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ नाटककार, अभिनेते अशोक समेळ होते आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर आणि केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बोरीवली शाखेचे अध्यक्ष जगदीश भोवड यांनी केले. त्यानंतर बोलताना प्रा. ढवळ यांनी जयवंत दळवी यांच्या पहिल्या भेटीची अनोखी आठवण सांगितली. या शताब्दी वर्षात आणखी भव्य प्रमाणात कार्यक्रम घेण्याचा मानस व्यक्त केला. आपले मनोगत व्यक्त करताना नमिता कीर यांनी जयवंत दळवींच्या नाट्य आणि साहित्याची एकूणच संशोधनात्मक माहिती सादर केली. याप्रसंगी जयवंत दळवी यांचे चिरंजीव गिरीश दळवी यांनी अतिशय हळवी अशी बाबांविषयीची आठवण सांगितली. ज्येष्ठ नाटककार अभिनेते अशोक समेळ यांनी दळवींच्या अनेक नाटकांविषयी साभिनय विवेचन केले. मधुभाई आणि दळवी आपली दैवते असल्याचे सांगितले. कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉ. मनोज वराडे यांनी त्यांच्या मनोगतामध्ये दळवींच्या कादंबऱ्यांतील बारकाव्यांचे वर्णन करताना त्यांच्या ओघवत्या शैलीचे वैशिष्ट्य सांगितले. शेवटी मार्गदर्शन करताना मधुभाईंनी परममित्र दळवींच्या सोबत घालवलेल्या अनेक आठवणींना उजाळा दिला. त्याचप्रमाणे कोकण मराठी साहित्य परिषद हा एक परिवार असून त्या परिवाराने केशवसुतांचे स्मारक बांधल्याचा आवर्जून उल्लेख केला. तसेच श्री.ना. पेंडसे यांना पालखीतून गारंबी येथे नेल्याची आठवण सांगितली. बोरीवली शाखेच्या माजी अध्यक्षा अनुराधा नेरुरकर यांनी खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि दादर शाखेच्या अध्यक्ष विद्या प्रभू यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. ००००