Category: होम

‘आंबेघोसाळे तलाव परिसरातील कामे जलद पूर्ण होतील’

महापालिका आयुक्त सौरभ राव यांची ग्वाही उथळसर प्रभागात सर्वंकष स्वच्छता मोहिमेचे आयोजन ठाणे : आंबे घोसाळे तलाव परिसरातील सर्व कामे जलद गतीने पूर्ण होतील. तसेच, ज्येष्ठ नागरिकांनी मांडलेल्या सूचनांचा विचार करुन प्रशासन आवश्यक कार्यवाही करेल, अशी ग्वाही ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली. शनिवारी सकाळी ७.०० वाजता उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात सर्वंकष स्वच्छता मोहिमेस आरंभ झाला. आंबेघोसाळे तलाव, मीनाताई ठाकरे चौक परिसर, के व्हीला, राबोडी, ऋतू पार्क आदी भागात या मोहिमेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यात, रोटरी क्लब, शिवशांती प्रतिष्ठान, स्थानिक नागरिक, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले. या मोहिमे दरम्यान आयुक्त राव यांनी आंबे घोसाळे तलाव परिसराची पाहणी केली. त्यावेळी, स्थानिक नागरिक, ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी यांच्याशी आयुक्तांनी संवाद साधला. शौचालयातील पाण्याची समस्या, स्वच्छता, परिसरात टाकला जाणारा कचरा याविषयी नागरिकांनी माहिती दिली. तसेच, सौंदर्यीकरण कामाबाबत सूचनाही केल्या. या तळ्याला लागून असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याच्या परिसर, मीनाताई ठाकरे चौक परिसर यांचीही आयुक्तांनी पाहणी केली. ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या सूचनांचा पूर्ण विचार करून त्यानुसार कार्यवाही केली जाईल. या परिसरात नागरिकांना अधिकाधिक स्वच्छ आणि सुंदर वातावरण कसे मिळेल या दृष्टीने महापालिका प्रयत्न करेल, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. या वेळी, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरीक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, मनीष जोशी, जी. जी. गोदेपुरे, दिनेश तायडे, अनघा कदम, सचिन पवार, सहायक आयुक्त महेश आहेर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, उप नगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, गुणवंत झांब्रे, कार्यकारी अभियंता संजय कदम, मोहन कलाल, वृक्ष अधिकारी केदार पाटील आदी उपस्थित होते. नालेसफाईचा आढावा उथळसर मधील मुख्य नाल्याच्या सफाईचा आढावा यावेळी आयुक्त राव यांनी घेतला. नाले सफाई वेळेत पूर्ण करण्यावर विभागाने लक्ष ठेवावे, असे निर्देश आयुक्तांनी पाहणी नंतर दिले.

नागरिकांनी मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन ठाणे : लोकसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी नागरिकांनीही सक्रिय पुढाकार घ्यावा, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिकांनी यात मोलाची भूमिका बजावावी असेही आवाहन आयुक्तांनी केले आहे. उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात शनिवारी राबविलेल्या सर्वंकष स्वच्छता अभियानात, आंबेघोसाळे तलाव येथे मतदानाची जनजागृती करणारे फलक लावून नागरिकांना मतदानाचे आवाहन करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरीक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, मनीष जोशी, जी. जी. गोदेपुरे, दिनेश तायडे, अनघा कदम, सचिन पवार, सहायक आयुक्त महेश आहेर आदी उपस्थित होते. रोटरी क्लब, शिवशांती प्रतिष्ठान, ज्येष्ठ नागरिक संघ यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून येत्या २० मे २०२४ ही तारीख लक्षात ठेवून सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा. जोडून आलेल्या सुटीच्या मोहात न पडता मतदानाच्या कर्तव्याला प्राथमिकता द्यावी, असेही आवाहन आयुक्त राव यांनी केले. जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभागी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनेही जाहिराती, बॅनर्स, सोशल मिडिया, आशा सेविका तसेच महापालिकेच्या विविध उपक्रमातंर्गत मतदान जनजागृती करण्यात येत आहे. महापालिकेने मतदान यंत्रांची प्रतिकृती असलेला मॅस्कॉटही तयार केलेला आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता अवकाश व्यापतेय…

खास बात मेधा इनामदार एव्हाना जगभरात एआयची वाटचाल खर्‍या अर्थाने सुरु झाली आहे. लवकरच एआय आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग होणार आहे. भविष्यात रोबोट्स आपल्यासोबत आपले सहकारी म्हणून काम करतील, अशीही…

चौथ्या टप्प्यातला कॅन्सर असतानाही…

जगात अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या आपल्या कर्मचार्‍यांना चांगल्या पगारासह इतर अनेक सुविधा देतात; पण अशा अनेक कंपन्या आहेत जिथे बॉस प्रकृती अस्वास्थ्य असतानाही रजा देत नाहीत. कर्मचार्‍यांनाही कार्यालयात यावे…

ठाण्यात मुख्यमंत्र्यांचे शक्तीप्रदर्शन

नरेश म्हस्केंनी भरला उमेदवारी अर्ज भरला अनिल ठाणेकर ठाणे : ठाण्यासहीत शिवसेना कुणाची याचा फैसला करणाऱ्या ठाणे लोकसभा मतदार संघात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करीत महायुतीचे शिवसेना पक्षाचे उमेदवार…

केजरीवालांना निवडणूकीसाठी अंतरिम जामीन मिळणार ?

आता ७ मेला सर्वोच्च सुनावणी नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी अशीच सुरु राहीली तर सध्या सुरु असलेल्या लोकसभेच्या पार्श्वभुमीवर त्यांना अंतरीम जामीन मंजुर करता येऊ शकतो असे सुचक…

मोदींकडून शेतकऱ्यांचे हाल होतायेत-शरद पवार

नीरा : शेतमाल पिकवणारा शेतकरी टिकला पाहिजे, त्याच्या मालाला योग्य तो भाव मिळायला हवा; मात्र सध्याचे मोदी सरकार शेतमाल पिकवणाऱ्याला महत्त्व देत नाही, तर फक्त खाणाऱ्यांना महत्त्व देते. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्यासाठी शेतकऱ्याला महत्त्व देऊन त्याच्या मालाला चांगला भाव देणाऱ्या लोकांना निवडून द्या, असे आवाहन माजी कृषिमंत्री खा. शरद पवार यांनी केले आहे. पुरंदर तालुक्यातील नीरा येथे गुरुवारी  सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रचारासाठी झालेल्या सभेमध्ये पवार यांनी मोदी सरकारवर आणि त्यांनी राबविलेल्या धोरणांवर सडकून टीका केली. जे काम करतात त्यांना प्रोत्साहन देणे ही जबाबदारी आपली आहे. ते काम तुम्ही करा. त्यांना पुन्हा संसदेत पाठवणे हे आपले कर्तव्य आहे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांना मत देण्याचे आवाहन पवारांनी केले. सुप्रिया सुळे यांनीदेखील सरकारच्या धोरणांवर टीका केली.  इथेनॉलबाबत जे धोरण राबवले त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला ३०० रुपयांनी कमी भाव मिळाल्याचे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली, तर यापुढे सर्व निवडणुका सर्व ताकदीनिशी लढवल्या जातील. ग्रामपंचायतीपासून विधानसभा त्याचबरोबर सहकारातील साखर कारखाने व जिल्हा बँकेची निवडणूकदेखील आपण लढवणार असल्याचे म्हणत त्यांनी अजित पवार यांना आव्हान दिले. लोकांनी कोणाच्या धमक्यांना घाबरू नये. जे धमक्या देतात त्यांना सांगा, विधानसभा लांब नाही. तिथे दाखवून देऊ, असे म्हणत त्यांनी अजित पवार यांना टोला लगावला.

आधी आमदारकीचा राजीनामा द्या, मगच भाजपचा प्रचार करा’

महाजनांनी पुन्हा खडसेंना डिवचले नगर : मनाने भाजपात पुन्हा दाखल झालेल्या एकनाथ खडसेंना त्यांचे राजकीय विरोधक भाजपाच्याच गिरीष महाजन यांनी पुन्हा एकदा डिवचले आहे. खडेसे यांनी एन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला. मात्र अजून त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेला नाही. त्यातच एकनाथ खडसे यांनी त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांचा प्रचार रावेर लोकसभा मतदारसंघात सुरु केला आहे. यावरून मंत्री गिरीश यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे. गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत. खडसे यांनी अगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा. त्यानंतर त्यांनी भाजपचे काम करावे. लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतोय. कधी म्हणतात मी राष्ट्रवादीचा तर कधी म्हणतात मी भाजपचा आहे. विधानसभेला मुलगी तुतारी घेऊन उभे राहण्याच्या तयारीत आहे. खडसे यांची भूमिका संधीसाधूपणाची आहे. घरात सगळेच पक्ष ठेवायचे, असे त्यांचे सुरु आहे. त्यांनी आमदारकी आणि खासदारकीसाठी सगळ्यांचे काम करायचे. लोकांना असे राजकारण आवडत नाही, त्यामुळे त्यांनी एक भूमिका घेतली पाहिजे, अशी टीका गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर केली आहे. महायुती जागावाटपाबाबत विचाले असता गिरीश महाजन म्हणाले की, महायुतीचे जागा वाटप पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यासाठी उशीर झाला आहे. मात्र नाशिक, ठाणे या सर्व जागा महायुतीच जिंकणार आहे. मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचंय हे लोकांनी ठरवलंय, असे त्यांनी म्हटलंय.

ठाकरे कधीही भाजपासोबत जातील- प्रकाश आंबेडकर

पाचोरा :  भाजपासारकेच महाविकास आघाडीतील नेतेही जातीयवादी आहेत.  ते पक्षाची भूमिका मांडत नाहीत. उद्धव ठाकरे हे कधीही भाजपशी हातमिळवणी करतील म्हणूनच मुस्लिमांनी महाविकास आघाडीच्या भूलथापांना बळी पडू नये, असे वंचित…

उद्धव ठाकरे शत्रू नव्हते मग त्यांचा पक्ष का फोडला ?

जयंत पाटलांची मोदींवर टीका मुंबई : “मोदींनी दहा वर्षात मराठी चॅनेलच्या संपादकांना कधी मुलाखत दिली नाही. आता निवडणुकीत महाराष्ट्र आपल्या हातातून गेला हे लक्षात आल्यावर मुलाखत देण्याची पाळी आली. यातच शरद पवार यांचा…