Category: महाराष्ट्र

Maharashtra News

भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन

अहिल्यादेवी नगर : भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन झाले आहे. ते ८४ वर्षांचे होते. नाशिक येथील ९ प्लस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मग भाजप असा त्यांचा प्रवास होता. १९८० ते…

आंबोली – मांगेली वन पट्ट्यात आढळले ८ पट्टेरी वाघ…!

 वन विभागाकडून विविध उपाययोजना सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात आंबोली – मांगेली या सह्याद्रीच्या पट्ट्यात तब्बल आठ पट्टेरी वाघ असल्याची नोंद झाली आहे. राज्याचा वनविभाग,सह्याद्री रिझर्व्ह फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ कंझरवेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त माध्यमातून जानेवारी ते मे (२०२४) दरम्यान ‘सह्याद्री टायगर रिझर्व्ह ‘आणि  कर्नाटकातल्या ‘काली टायगर रिझर्व्ह’ या दोन्ही ठिकाणी हे सर्वेक्षण हाती घेण्यात आले असता सिंधुदुर्गातील आंबोली – मांगेली या कॉरिडॉर मध्ये ही नोंद झाली आहे. या वाघांमध्ये ५ मादी व ३ नर वाघांचा समावेश असून  वनखात्याने वेगवेगळ्या ठिकाणी बसविलेल्या कॅमेऱ्यात हे सर्व वाघ आणि वाघिणी कैद झाल्या आहेत.या आधी सुद्धा झालेल्या सर्वेक्षणात या पट्ट्यात वाघांचे वास्तव्य असल्याचे समोर आले होते.काही स्वयंसेवी सेवी संस्थानी ठिकठिकाणी लावलेल्या कॅमेरा ट्रॅप मध्ये या परिसरात वाघांचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले होते.दोन वर्षापूर्वी आंबोली वनक्षेत्र  परिसरात वाघ एका गाईला खात असल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते.मात्र वन विभागाकडून वाघांचे अस्तित्व या परिसरात असल्याचे नाकारण्यात आले होते.काही महिन्यापूर्वी दोडामार्ग तालुक्यात भेकुर्ली परिसरात दिवसाढवळ्या वाघ वावरत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. वनशक्ती फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने आंबोली – मांगेली हा ‘व्याघ्र कॉरिडॉर ‘ म्हणून संरक्षित व्हावा यासाठी उच्च न्यायालयात एक सार्वजनिक हिताची याचिका दाखल केली होती व या परिसरात वाघांचे सर्वेक्षण करावे अशी मागणी लावून धरली होती. संस्थेचे प्रमुख दयानंद स्टॅलिन यांनी या पट्ट्यात तब्बल ५० वाघांचा वावर असल्याचा दावा केला होता.अन्य एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात हे समोर आल्याचेही म्हटले होते. वनखात्याने सर्वेक्षण केल्यानंतर या पट्ट्यात वाघांचे अस्तित्व असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. वन विभागाच्या सर्वेक्षणात वाघांचे वास्तव्य समोर आल्याने आणि इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने वाघांचे अस्तित्व असल्याची नोंद झाल्याने वनविभाग आता सतर्क झाला आहे. या परिसरात वाघांचे वास्तव्य लक्षात घेता त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वनखात्यामार्फत अनेक उपाययोजना करण्यात येणार आहेत.रात्रीची गस्त वाढविण्यात येणार असून कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून शिकारी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या दोन तालुक्यातील ज्या गावांमध्ये या वाघांचे वास्तव्य आढळून आले आहे ती सह्याद्रीच्या रांगांमध्ये असलेली २५ गावे ही ‘ ईको सेन्सिटिव्ह ‘ म्हणून घोषित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीच राज्य शासनाला दिले आहेत.

नाशिक शहरासाठी ६२०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची गरज,

 गतवर्षीच्या वापरापेक्षा ५३२ दशलक्ष घनफूट अधिक   हरिभाऊ लाखे नाशिक : जलशुध्दीकरण केंद्रात स्वच्छतेसाठी वापरले जाणारे पाणी, वाहिन्यांमधील गळती, पाणी चोरी, अनधिकृत जोडण्या, पाणी मापनासाठी मीटर नसणे वा संथ चालणे आदी कारणांस्तव ४३ टक्के पाणी महसूल नसणारे आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा सुरळीत राखण्यासाठी विहित मापदंडापेक्षा जादा पाण्याची आवश्यकता भासते. याकडे लक्ष वेधत शहरासाठी २०२४-२५ या वर्षात ६२०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्याची मागणी महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे केली आहे. महापालिकेला गतवर्षी ऑक्टोबर २०२३ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत ५३१४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केले होते. दुष्काळी स्थितीत अतिरिक्त ४०० दशलक्ष घनफूट पाणी उचलण्याची मुभा दिली गेली होती. या काळात महापालिकेने प्रत्यक्षात अधिक म्हणजे ५६६८ दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर केला. आता आगामी वर्षात म्हणजे १५ ऑक्टोबर २०२४ ते ३१ जुलै २०२५ या २९० दिवसांसाठी गंगापूर, दारणा धरण (चेहेडी बंधारा) आणि मुकणे या धरणांमधून एकूण ६२०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी करण्यात आली आहे. गतवर्षी वापरलेल्या पाण्यापेक्षा हे प्रमाण ५३२ दशलक्ष घनफुटने जास्त आहे. शासन निकषानुसार शहरात प्रतिमाणसी प्रतिदिन १३५ लिटर पाणी वापर गृहीत धरला जातो. या सुत्रानुसार एकूण लोकसंख्येला लागणारे पाणी लक्षात घेऊन पाणी आरक्षित केले जाते. उपरोक्त निकषापेक्षा अधिक प्रमाणात प्रतिमाणसी पाणी वापर होत आहे. मागील दुष्काळी वर्षात राजकीय दबावामुळे मनपाने अखेरपर्यंत पाणी कपातीचे धारिष्ट्य दाखवले नव्हते. वाढीव पाणी आरक्षणाचा निर्णय पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील आकस्मित पाणी आरक्षण समितीकडून घेतले जातात. एरवी पावसाळा संपताच या अनुषंगाने बैठक पार पडली. त्यासाठी १५ ऑक्टोबर रोजीच्या धरणांतील जलसाठ्यांचा आधार घेतला जातो. आचारसंहिता व नवीन सरकार स्थापन होत असल्याने ही प्रक्रिया थांबलेली आहे. पालकमंत्री नियुक्तीनंतर या विषयावर अंतिम निर्णय होईल, असे सांगितले जाते. २६ लाख लोकसंख्या गृहित पिण्याच्या पाण्याकरिता २०२४-२५ वर्षासाठी मागणी नोंदविताना महापालिकेने २३ लाख निवासी आणि तीन लाख तरती अशी एकूण २६ लाख लोकसंख्या गृहीत धरली आहे. बिगर निवासी वापरात शासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालये, रेल्वे स्थानक, शैक्षणिक संस्था, वसतिगृहे, शासकीय व खासगी रुग्णालये, तरण तलाव, अग्निशमन दल यांची गरजही समाविष्ट आहे. शहरात दोन लाख पशूधन असल्याचा अंदाज आहे. कोणत्या धरणातून, किती मागणी ? गंगापूर धरण समूह – ४५०० दशलक्ष घनफूट दारणा धरण (चेहेडी बंधारा) – २०० दशलक्ष घनफूट मुकणे धरण – १५०० दशलक्ष घनफूट

मुंबई विभागाचे घवघवीत यश

आंतर शालेय राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत मुंबई : बोरीवली (पश्चिम) येथे जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर, मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा परिषद, मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना आणि बीमानगर एज्युकेशन सोसायटी यांच्या…

MG स्पोर्ट्स क्लब पुणे टुर्नामेंटमध्ये उपविजेते

पुणे : कॅप्टन साहिल कोचरेकर यांच्या नेतृत्वाखाली, MG स्पोर्ट्स क्लबने पुणे टुर्नामेंटमध्ये अपूर्व कामगिरी केली आणि उपविजेते म्हणून स्पर्धा संपवली, ज्यामध्ये त्यांच्या चिकाटी आणि कौशल्याचे दर्शन झाले. टुर्नामेंटमध्ये एक उत्तम…

गृहनिर्माण आणि नगर विकास खात्याच्या बैठकीत खासदार नरेश म्हस्के यांच्या महत्वपूर्ण सूचना

नवी दिल्ली : गृहनिर्माण आणि नगर विकास खात्याच्या स्थायी समितीची बैठक आज संसदभवन, दिल्ली येथे संपन्न झाली. यावेळी ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय निधीचे योग्य नियोजन करणे, विकासकामांवर देखरेख…

निवडणुकीनंतर रस्त्यांवरील खड्डे पुन्हा ऐरणीवर मनसेने इशारा देताच मनपाची तक्रार निवारण यंत्रणा

हरिभाऊ लाखे नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत काहीसा बाजूला पडलेला शहरातील खड्ड्यांचा विषय मनसेने पुन्हा ऐरणीवर आणला आहे. पावसाळा संपुष्टात येऊन एक, दीड महिना उलटूनही शहरातील रस्त्यांची दुर्दशा दूर…

महायुतीत ‘गृह’कलह

शिंदे ठाण्यात, अजित पवार दिल्लीत स्वाती घोसाळकर मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेत एतिहासिक विजय मिळवून १० दिवस उलटल्यानंतरही महायुती अजूनही सत्ता स्थापन करू शकलेले नाही. आधी मुख्यमंत्रीपदावरून आणि आता गृह खात्यावरून महायुतीत कलह…

ईव्हिएम विरोधात वंचितचा एल्गार

अकोला : वंचित बहुजन आघाडीनेही आता  इव्हीएमविरोधात राज्यभरात एल्गार पुकारला आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्या टप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात…

मारकडवाडीमध्ये मतपत्रिकेवर प्रतिकात्मक मतदान होणारच

सोलापूर: माळशिरसमधील मारकडवाडी गावात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. आज, सोमवारपासून ते 5 डिसेंबरपर्यंत मारकडवाडीमध्ये जमावबंदी लागू करण्यात आले आहेत. असे असले तरी ईव्हिएमचा झोल उघड करण्यासाठी मतदानपत्रिकेवर प्रतिकात्मक मतदान मारकवाडीत घेतले जाणार असल्याचे गावकऱ्यांनी…