Category: महाराष्ट्र

Maharashtra News

नाशिक मनपाचा ‘बड्या’ थकबाकीदारांना दणका!

नाशिक मनपाचा ‘बड्या’ थकबाकीदारांना दणका! उद्यापासून वाजणार घरासमोर ढोल, जप्तीची कारवाई सुरू हरिभाऊ लाखे नाशिक : घरपट्टीच्या साडेसातशे कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने सुरू केलेल्या अभय योजना टप्पा २ ची मुदत गुरुवारी संपुष्टात येत आहे. या मुदतीतही थकबाकी न भरणाऱ्या बड्या थकबाकीदारांविरोधात महापालिकेने धडक कारवाईची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येकी विभागातील पाचशे या प्रमाणे तीन हजार बड्या थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली असून, या सर्व थकबाकीदारांना शुक्रवारपासून जप्ती वॉरंट बजावण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे वसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरांसमोर ढोल वादन केले जाणार आहे. महापालिकेच्या घरपट्टीच्या थकबाकीचा डोंगर ७५२ कोटींवर गेला आहे. या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान अभय योजना लागू केली होती. ही मुदत संपुष्टात आल्यानंतर महापालिकेने थकबाकीदारांविरोधात कारवाईला सुरुवात केली होती. प्रत्येक विभागातील दोनशे याप्रमाणे १,२०० बड्या थकबाकीदारांना जप्ती वॉरंटही बजावण्यात आले होते. थकबाकी वसुलीसाठी विभागीय कार्यालयांच्या स्तरावर सायकल रॅली, मोटारसायकल रॅलीचे आयोजनही करण्यात आले. महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्याच महासभेत घरपट्टीच्या थकबाकीदारांसाठी अभय २ योजना राबविण्याचे आदेश देण्यात आले. या योजनेची मुदत गुरुवारी संपुष्टात येत आहे. आतापर्यंत २५० कोटींची घरपट्टी वसूल झाली आहे. त्यात चालू आर्थिक वर्षात घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट हे २६० कोटींचे देण्यात आले होते. त्यापैकी १३१ कोटींची वसुली झाली आहे. तर ७५२ कोटींच्या थकबाकी पैकी जेमतेम ११९ कोटींची थकबाकी वसूल झाली आहे. त्यामुळे थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उभारला जाणार आहे. मनपाने उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी नगररचना विभागाने भोगवटा दाखला दिलेल्या; परंतु पालिकेच्या कर विभागाच्या दप्तरी नोंद नसलेल्या मालमत्तांचाही शोध घेण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात २३ हजार २३३ नव्या मिळकतींची कर विभागाच्या दप्तरी नोंद होऊन त्यांना घरपट्टी लागू करण्यात आली आहे. या नवीन मालमत्तांच्या दंड आणि कर आकारणीतून मनपाचे चालू आर्थिक वर्षात ४६ कोटी ३७ लाखांचे उत्पन्न वाढले आहे.

लोकशाही दिनातील अर्ज लवकरात लवकर मार्गी लावावेत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

लोकशाही दिनातील अर्ज लवकरात लवकर मार्गी लावावेत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश अशोक गायकवाड रत्नागिरी : लोकशाही दिनातील प्रलंबित अर्ज लवकरात लवकर मार्गी लावावेत तसेच कार्यालयात येणाऱ्या दिव्यांग, ज्येष्ठ, नागरिक…

 सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सतर्क:१०२ नागरिकांची माहिती संकलित….!

आखाती देशात युद्धजन्य परिस्थिती..! सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सतर्क:१०२ नागरिकांची माहिती संकलित….! सिंधुदुर्ग : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांची माहिती तातडीने संकलित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी महसूल व पोलिस विभागाला दिले आहेत. त्यानुसार तालुका व जिल्हास्तरावर माहिती संकलनाचे काम युद्धपातळीवर सुरू असून संकलित माहिती राज्य शासनाकडे सादर करण्यात आलेली आहे. जिल्हा प्रशासनाकडे आतापर्यंत एकूण १०२ नागरिकांची माहिती प्राप्त झाली आहे. त्यापैकी ११ नागरिकांना तातडीच्या मदतीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले असून त्यांच्या नावांची यादी राज्य शासनाला पाठविण्यात आलेली आहे. नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे (०२३६२) २२८८४७ / १०७७ तसेच पोलिस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग येथे (०२३६२) २२८६१४ या क्रमांकांवर नियंत्रण कक्ष कार्यरत आहेत. संबंधितांनी अधिक माहितीसाठी या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आखाती देशांतील परिस्थितीवर जिल्हा प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून असून केंद्र व राज्य शासनाशी सातत्याने समन्वय साधला जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाशी संपर्क ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी  धोडमिसे यांनी केले आहे.

रंगांची उधळण… आठवणींचा ठेवा अन् भयमुक्तीचा चेहरा

रंगांची उधळण… आठवणींचा ठेवा अन् भयमुक्तीचा चेहरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्षा निवासस्थानी नैसर्गिक रंगांसहीत सहकुटुंब धुळीवंदन करीत महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीचे रंग सदैव खुलत राहो अशा शुभेच्छा दिल्या…तर ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

 कुंभमेळ्याचा डोलारा आणि कर्जाचा डोंगर

कुंभमेळ्याचा डोलारा आणि कर्जाचा डोंगर नाशिक मनपाचे ३०१० कोटींचे बजेट म्युनिसिपल बाँड्सद्वारे ४०० कोटींची उभारणी; शेअर बाजारात नाशिकचा डंका हरिभाऊ लाखे नाशिक: पुढील वर्षी गोदा काठावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे शिवधनुष्य पेलताना महापालिकेच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडला आहे. शासनाने भरीव निधी दिला असला तरी एकाचवेळी रस्ते, पुलांसह विविध प्रकारची पायाभूत सुविधांची कामे हाती घेतली गेली. त्यासाठी मनपाला स्वनिधी द्यावा लागत आहे. प्रगतीपथावरील कामांचे १३२५ कोटींचे दायित्व आहे. ४०६ कोटींच्या ठेवी मोडल्या गेल्या. गोदावरी स्वच्छतेसाठी स्वच्छ गोदावरी आणि पाणी पुरवठा योजना विस्तारासाठी हरित म्युनिसिपल बाँड याद्वारे ४०० कोटींचा उभारणी तसेच खासगी-भागिदारी तत्वावरील मलनिस्सारण प्रकल्पात ठेकेदाराने ४४४.४८ कोटींची केलेली गुंतवणूक या जवळपास ८४५ कोटींच्या दायित्वाची परतफेड पुढील पाच ते २५ वर्षात व्याजासह करावी लागणार आहे. जवळपास चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी स्थायी समितीला २०२६-२७ या वर्षासाठी कुठलीही करवाढ नसलेले ३०१० कोटींचे अंदाजपत्रक सादर केले. या वर्षात पालिकेला जीएसटी अनुदान, स्थानिक संस्था कर व एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभार, मालमत्ता, नगरनियोजन, पाणीपट्टी, मिळकत कर, परिवहन सेवा उत्पन्न याद्वारे ३०११.८५ कोटी रुपये उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. कुंभमेळ्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात कामे हाती घेतली गेली आहेत. शहरातील २८ प्रमुख रस्ते व आठ पुलांची कामे, पंचवटीतील रुग्णालय नुतनीकरण, सिंहस्थ आराखड्यानुसार मंजूर कामांसाठी चालू वर्षात ६०० कोटींचा स्वनिधी, मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे, राम काल पथ अंतर्गत सुशोभिकरण, बालाजी कोट ते गणेशवाडी पर्यंत रामझुला पादचारी पूल, मुकणे धरण पाणी पुरवठा योजनेची क्षमता वाढ आदी कामांचा अंतर्भाव आहे. आगामी वर्षात तीन नवीन अग्निशमन केंद्र, खत प्रकल्पाची क्षमता वाढ, नगरसेवकांना प्रत्येकी ८० लाखाचा निधी, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात अद्ययावत डायलिसिस केंद्र व चार नवीन शस्त्रक्रियागृह, साधुग्राममध्ये् नेत्र रुग्णालय आदींचा उल्ले्ख अर्थसंकल्पात आहे. कुंभमेळ्याच्या दृष्टीकोनातून निधी उभारणीचे नियोजन आहे. शासनाकडून मंजूर होणाऱ्या आराखड्यात मनपा हिस्सा म्हणून २०२४ ते २०२६ या दोन वर्षात महापालिकेने एकूण ४२५ कोटींची तरतूद केली. स्वच्छ गोदावरी म्युनिसिपल बाँडद्वारे २०० कोटींचा निधी उभारल्याने केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत २६ कोटी प्रोत्साहनपर अनुदान तसेच अर्बन चॅलेंज फंडमधून प्रकल्पाच्या २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदानास पात्र होता येईल. पाणी पुरवठा विस्तार योजनेसाठी हरित म्युनिसिपल बाँडद्वारे २०० कोटींचा निधी उभारला जात आहे. त्यास अमृत योजनेतून २० कोटी आणि अर्बन चॅलेंज फंडमधून २५ टक्के अनुदानास पात्र होता येईल असे प्रशासनाकडून सांगितले जाते. प्रोत्साहनपर अनुदान मिळाल्यास व्याजाचा कुठलाही भार पडणार नसल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. एकाच वर्षात दोन बाँड्द्वारे निधी उभारून मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजारात सूचीबद्ध होणारी नाशिक ही महाराष्ट्रातील पहिली महापालिका ठरल्याचे अर्थसंकल्पात म्हटले आहे. याबद्दल स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत काही सदस्यांनी प्रशासनाचे कौतुकही केले. मात्र, कुंभमेळ्यामुळे मनपा तिजोरीवर मोठा भार पडल्याचे दिसत आहे.

नागपूरमध्ये दारूगोळा कंपनीतील स्फोटात १७ कामगारांच्या मृत्यू

नागपूर: नागपरूमधील राऊळगाव जवळील ‘एवनीरा’ परिसरातल्या एस.बी.एल. एनर्जी लिमिटेड या दारुगोळा बनवणऱ्या डिटोनेटर कंपनीत रविवारी सकाळी भीषण साखळी स्फोट झाले. यात १७ कामगारांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये १४ महिलांसह ३ पुरुष कामगारांचा समावेश…

अवघ्या ६ तासात चाकरमनी मुंबईतून कोकणात इलो….

सावंतवाडी: मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या मुंबई-विजयदुर्ग रो-पॅक्स जलवाहतूक सेवेचा आज थाटात शुभारंभ झाला आणि चाकरमनी अवघ्या ६ तासात मुंबईतून कोकणात इलो. मुंबईतील भाऊचा धक्का येथून मंत्री नितेश…

 विज्ञान, वाणिज्य शाखेसाठीही लवकरच मराठीतून पुस्तके

विज्ञान, वाणिज्य शाखेसाठीही लवकरच मराठीतून पुस्तके विश्व मराठी संमलेनातील परिसंवादात दावा हरिभाऊ लाखे नाशिक : राष्ट्रीय शिक्षण धोरणातंर्गत मातृभाषेतील ज्ञानाने आत्मविश्वास विकसित करणे तसेच मातृभाषेचा अभिमान बाळगणे आवश्यक आहे. शिक्षणाचे मूळ संस्कृतीत आहे. लवकरच पदवीसाठी विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील पुस्तके मराठीत आणण्यात येणार असल्याची माहिती अभ्यासक्रमातील मराठी भाषा या विषयावरील परिसंवादात देण्यात आली. येथील के. टी. एच. एम. महाविद्यालयाच्या आवारात आयोजित विश्व मराठी संमेलनात परिसंवाद झाला. उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणककर , कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी परिसंवादात सहभाग घेतला. डॉ. देवळाणकर यांनी, शिक्षणाचे महत्व कमी होत असल्याचे सांगितले. शुल्क किंवा अन्य गोष्टींवर चर्चा होत असतांना परदेशात मात्र शिक्षण आणि शिक्षकाला महत्व आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे मातृभाषेला महत्व देण्यावर भर दिला जात असल्याचे नमूद केले. डॉ. सोनवणे यांनी अभ्यासक्रम आणि मराठी या गोष्टींचा विचार करायला हवा. मराठी भाषा आत्मविश्वास निर्माण करते. भाषेमध्ये आपण आशयाचा आधार घेतो. मराठी समृद्धीसाठी भाषा समकेंद्री , शब्द संपदा, व्याकरण यांचा विचार व्हायला हवा. मराठी भाषा तंत्रस्नेही होणे आवश्यक असल्याचे मांडले. डॉ.आवलगावकर यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असला तरी शैक्षणिक पातळीवर भाषेचा व्यापार, व्यवहार यामध्ये कितपत उपयोग होतो, हे पाहणे गरजेचे असल्याचे मांडले. शैक्षणिक पातळीवर या अनुषंगाने विविध अभ्यासक्रम मराठीत तयार करण्यात येत आहेत. त्यामध्ये उच्चारण आणि लेखन यावर भर देणे आवश्यक आहे. भाषेशी असणारी आपली नाळ तुटता कामा नये, याची काळजी घ्यायला हवी, असे त्यांनी सांगितले. डॉ. कुलकर्णी यांनी शब्दकोशाच्या बाबतीत आपल्याकडे फारसे काम झाले नसल्याची खंत व्यक्त केली. डॉ. गोसावी यांनी कला, विज्ञान, वाणिज्य शाखेतील अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीत येत असून पुढील वर्षापासून ती मिळतील. विज्ञान आणि भाषा एकत्र आणण्याचे काम होणे गरजेचे आहे. बोलीभाषाही तितकीच महत्वाची असल्याचे मांडले.

कणकवलीतील ‘मेगा स्पेशालिटी आरोग्य शिबीर’ यशस्वी…!

कणकवलीतील ‘मेगा स्पेशालिटी आरोग्य शिबीर’ यशस्वी…! पालकमंत्री नितेश राणे यांची संकल्पना….! कणकवली : कणकवली शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘मेगा स्पेशालिटी आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तालुक्यातील ग्रामस्थ आणि रुंग्णांनी आपला…

कालिदास नाट्यगृहात ‘मराठी बोलींचा उत्सव’ संपन्न

कालिदास नाट्यगृहात ‘मराठी बोलींचा उत्सव’ संपन्न हरिभाऊ लाखे नाशिक : मराठी बोलींचा महोत्सवाचे उद्घाटन मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी आणि मधु मंगेश कर्णिक, डॉ. सदानंद मोरे,…