अशोक गायकवाड
रायगड अलिबाग :सन २०२४-२५ या वर्षापासून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना https://hmas.mahait.org, या पोर्टलवर ऑनलाईन करण्यात आली आहे. त्यानुसार सन २०२५-२६ या वर्षात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत ऑनलाईन सादर केलेल्या अर्जामधील काही अर्ज त्रुटी पुर्ततेकरीता परत पाठविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी अर्ज आपले लॉगिन आयडी तपासून त्यामध्ये दर्शविण्यांत आलेल्या त्रुटींची पूर्तता करुन येत्या ०७ दिवसांत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन फेर सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सुनिल जाधव यांनी केले आहे.
