भोंदूबाबा अशोक खरातचा नवा कारनामा
३२ बनावट खाती उघडून ५७ लाखांचा गंडा, सिन्नरमध्ये गुन्हा दाखल! हरिभाऊ लाखे नाशिक : अशोक खरातची वेगवेगळी गैरकृत्ये उघड होत असून त्याच्याविरुध्द सिन्नर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात…
Maharashtra News
३२ बनावट खाती उघडून ५७ लाखांचा गंडा, सिन्नरमध्ये गुन्हा दाखल! हरिभाऊ लाखे नाशिक : अशोक खरातची वेगवेगळी गैरकृत्ये उघड होत असून त्याच्याविरुध्द सिन्नर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात…
प्रशासनाचे मौन कायम मुकुंद रांजाणे (माथेरान) माथेरान मध्ये मागील काही वर्षांपासून जुने बंगले खरेदी करून त्याजागी आलिशान हॉटेल्स उभी रहात आहेत. या हॉटेलमध्ये रूम्स बांधताना अडसर ठरणारी झाडे मुळासहित छाटली…
राजू शेट्टी यांचे प्रतिपादन रत्नागिरी (प्रतिनिधी )– कोकणातील आंबा आणि काजू बागायतदार शेतकऱ्यांना मागणी केल्याप्रमाणे येत्या १५ मे पर्यंत नुकसान भरपाई न मिळाल्यास हजारो शेतकरी आणि बागायतदार मुंबईतील ‘वर्षा’ बंगल्यावर धडक देतील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. बालाजी मंगल कार्यालयात आयोजित शेतकरी एल्गार मेळाव्यात शेट्टी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ‘उबाठा’ सेनेचे माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार बाळ माने,जिल्हाप्रमुख दत्ता कदम, बाबा साळवी,नेहा माने आदी अनेक नेते उपस्थित होते. कोकणातील आंबा -काजू उत्पादक शेतकरी आणि बागायतदार निसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.असे असताना सरकारकडून जाहीर झालेली मदत ही शेतकऱ्यांचा घोर अपमान करणारी आहे आणि म्हणूनच आता ‘वर्षा’वर धडक दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. शेतकऱ्याल नुकसान भरपाई म्हणून प्रति झाड २५० रुपये देणे ही क्रूर थट्टा आहे. त्यांना प्रति झाड पाच हजार रुपये नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे या मागणीवर भर देऊन, प्रत्यक्षात मागितलेली मदत मिळेपर्यंत हा लढा चालूच राहील असे शेट्टी यांनी स्पष्ट केले. कोकणच्या हापूसला जागतिक स्तरावर ‘जीआय’ टॅग मिळाला असला तरी हवामान बदलाच्या संकटामुळे हापूसचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. मागील दोन- तीन वर्षापासून सातत्याने बदलणाऱ्या हवामानामुळे बागायतदारांचा उत्पादन खर्चही प्रचंड वाढला असून हा खर्च भरून निघणे अवघड झाले आहे. तेव्हा शेतकरी -बागायतदारांनी आता जागे व्हावे आणि १५, मे च्या या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. मेळाव्याला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी आणि आंबा बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी खासदार विनायक राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी सरकारकडे पैसा आहे मात्र कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या आंबा -काजू उत्पादकांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार तिजोरी का उघडत नाही असा सवाल करून १५, मे च्या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. यंदा उत्पादन अत्यल्प झाल्यामुळे शेतकरी- बागायतदार आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशावेळी खते आणि कीटकनाशके विकणाऱ्या कंपन्यांनी शेतकऱ्यांकडे वसुलीसाठी तगादा लावला आहे तो त्यांनी लावू नये अन्यथा आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल असा इशाराही यावेळी देण्यात आला. वाशी मार्केट मधील दलाल आणि अडत्यांनी संगनमत करून दर पाडू नयेत जेणेकरून शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळतील अशी अपेक्षाही राऊत यांनी यावेळी व्यक्त केली.
घटनेचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारावरसुद्धा या गुंडांचा हल्ला मिरा -भाईंदर / अरविंद जोशी रविवारी अजय प्रताप यांच्या घरी प्रार्थना सभेसाठी सुमारे २०-२५ लोक जमले होते. दरम्यान, धर्मांतराचा आरोप करत बजरंग दलाचे काही गुंड घरात घुसले. बजरंग दलाच्या या सदस्यांनी घरात घुसून महिलांवर हल्ला केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या एका पत्रकारावर पोलीस ठाण्याबाहेर बजरंग दलाच्या गुंडांनी हल्ला केला, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे लोक नेहरू नगरमधील बबली यांच्या घरात जबरदस्तीने घुसले. घरातील महिलांवर हल्ला करून त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. नंतर काही लोकांना चौकशीसाठी भाईंदर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. रात्री सुमारे साडेआठ वाजता, घटनेचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकार केतन बरिया यांच्यावर पोलीस ठाण्याबाहेर जमावाने हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, ते घटनास्थळाचे चित्रीकरण करत असताना, आपण पत्रकार असल्याचे सांगूनही जमावाने त्यांना घेरले आणि मारहाण केली. सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेले केतन बरिया म्हणाले, “मी पत्रकार आहे आणि माझे काम करत आहे, हे मी वारंवार सांगितले, पण कोणीही ऐकले नाही. त्यांनी मला घेरले आणि विनाकारण मारहाण करण्यास सुरुवात केली.” बरिया यांना जखमी अवस्थेत भारतरत्न पंडित भीमसेन जोशी (टेंभा) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलीस ठाण्याजवळ पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा पत्रकार संघटना आणि वृत्तसंस्थांनी तीव्र निषेध केला आहे. त्यांनी या घटनेला पत्रकार स्वातंत्र्यावरील गंभीर हल्ला म्हटले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी धर्माच्या नावाखाली होणाऱ्या जमाव हिंसाचाराच्या वाढत्या प्रवृत्तीबद्दल चिंता व्यक्त केली असून, अशा घटनांमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेसमोर गंभीर आव्हान उभे राहिले आहे, असे म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणात अजूनही कोणाला अटक केलेली नाही.
मुकुंद रांजाणे (माथेरान) माथेरान नगरपरिषदे च्या शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण समितीची सभा सोमवारी नगरपालिकेच्या स्व.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहात आयोजित बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून बुधवार दि २२ रोजी अंगणवाडी व माथेरान मधील तिन्ही शाळांच्या पालकांसाठी कार्यशाळा आयोजित केली आहे. सुप्रसिद्ध मनसोपचार तज्ञ् प्राजक्ता गांगल या मार्गदर्शन करणार आहेत. मुलांच्या सर्वांगीण विकासात पालकांची भूमिका व मोबाईल पासून मुलांना कसे दूर ठेवता येईल. या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. तरुणांमध्ये खेळाची आवड जोपासली जावी यासाठी प्रभाग क्र ६ व ९ येथे इंडोर गेम झोन सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे या मध्ये टेबल टेनिस, दोन कॅरम बोर्ड, बॅडमिंटन व बुद्धिबळ याचा समावेश असेल. तसेच वीर हुतात्मा भाई कोतवाल शाळेच्या पत्र्यांना रंग लावणे कामाला देखील मंजुरी देण्यात आली. शिक्षण समितीचे सभापती सुनिल शिंदे, समिती सदस्य प्रतिभा घावरे, केतन रामाने व सुरेखा साळूंखे यांच्या सह नगरपरिषदेचे समीर दळवी यांनी सभेचे कामकाज पाहिले.
जाळीच्या कंपाऊंडमुळे वन्यजीव अडचणीत; प्राणीमित्र संतप्त मुकुंद रांजाणे ( माथेरान ) माथेरानच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर डोंगरदऱ्यांनी व्यापलेला असून घनदाट वनराई अशी ख्याती असलेल्या माथेरान मध्ये पूर्वीपासून जंगलात मुक्या प्राण्यांचा वावर होता तो आजही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.परंतु सद्यस्थितीत येथील जुन्या बंगल्यांची विक्री होत गेल्याने काही नवीन मालकांनी बंगल्याच्या भोवती संपूर्ण भागात जाळीचे कंपाऊंड टाकण्यास सुरुवात केल्यामुळे जंगल भागातील मुक्या प्राण्यांच्या अधिवासावर निर्बंध आले आहेत. त्यामुळे साहजिकच आगामी काळात ह्या प्राण्यांच्या संख्येत घट होणार असून त्यांचा मुक्तसंचार लुप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येथील एल्फिन्स्टन बंगल्याच्या नवीन मालकाने जवळपास ३६ एकरांवर असणाऱ्या या बंगल्याच्या सभोवताली जाळीचे कंपाऊंड करत असल्याने हे केलेले कंपाउंड योग्य नसून मुक्या प्राण्यांच्या मुक्तसंचारावर गदा येत आहे.या बंगल्याच्या जवळच मंकी पॉईंट आणि मॅलेट स्प्रिंग हे पाण्याचे स्त्रोत असल्याने याठिकाणी जंगली प्राणी आपली पाण्याची तहान भागवत असतात. परंतु येथील घनदाट जंगलात असणाऱ्या एल्फिन्स्टन बंगल्याच्या नवीन मालकाने बंगल्याच्या सभोवताली तारेचे कंपाउंड केल्याने मुक्या प्राण्यांच्या अधिवासावर गदा आली आहे. यासाठी हे कंपाऊंड ताबडतोब काढून टाकण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी अनेक दिवसांपासून केलेली असून याबाबत लेखी पत्र व्यवहार संबंधित विभागाकडे केलेला असताना देखील अद्यापही याबाबत ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने प्रशासनाच्या गलथान कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.नगरपरिषदेच्या सहायक रचनाकार करुणा बांगर यांनी एक दिवस या भागात येऊन हे कंपाऊंड काढायला हवे असा दिखावा केला होता परंतु काहीच योग्य कारवाई करण्यात आलेली नाही. वनखात्याचे वनपाल यांनीही फक्त एक दिवस नाममात्र पाहणी केली होती.त्यानंतर याभागात कुणीही प्रशासकीय अधिकारी वर्ग फिरकलेले नाहीत त्यामुळे निश्चितच यामागे राजकीय वरदहस्ताने मोठे अर्थकारण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ———————————— माथेरान स्थळासाठी वेगळी नियमावली असून जंगल भाग असल्याने मुक्या प्राण्यांच्या अधिवासाकरिता कोणत्याही वास्तूला कंपाऊंड करता येत नाही.आम्ही लेखी निवेदने देऊनही नाममात्र चार ते पाच जाळ्या काढण्याचा दिखावा नगरपरिषदेच्या सहायक रचनाकार करुणा बांगर यांनी केलेला आहे.बाकी सर्व जाळ्या आजही तशाच आहेत. वनखात्याचे अधिकारी सुध्दा मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यांनाही आपल्या कर्तव्याची जाण नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. संतोष शिंदे—उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माथेरान
आपत्ती आराखडा अद्ययावत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश सिंधुदुर्गनगरी: आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवू नये आणि नागरिकांना तात्काळ व प्रभावी मदत मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज मान्सूनपूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेतला. सर्व संबंधित विभागांना मान्सूनपूर्व कामे १५ मेपूर्वी पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. तसेच जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी समन्वय साधून सज्ज राहण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली मान्सुनपूर्व तयारी आढावा बैठक संपन्न झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, पोलिस उपअधीक्षक श्वेता खाडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत तसेच महसूल, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, आरोग्य, वीज वितरण, ग्रामविकास, नगरपरिषद तसेच पोलीस विभाग यांचा सहभाग होता. प्रत्येक विभागाने आपापल्या तयारीचा आढावा सादर करताना संभाव्य अडचणी व उपाययोजना मांडल्या. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी धोकादायक झाडे व जीर्ण इमारतींचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. पूरप्रवण क्षेत्रांची अचूक नोंद करून तेथे विशेष दक्षता घेण्यास सांगितले. रस्ते व पुलांची दुरुस्ती वेळेत पूर्ण करून वाहतूक सुरळीत ठेवण्यावर भर देण्यात आला असून वीजपुरवठा अखंडित राहण्यासाठी आवश्यक साहित्यसाठा व मनुष्यबळ तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले. आरोग्य विभागाला संभाव्य साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसा औषधसाठा, वैद्यकीय पथके आणि आपत्कालीन सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. ग्रामपातळीवर आपत्ती व्यवस्थापन समित्या सक्रिय करून जनजागृती मोहीम राबविण्यावर विशेष भर देण्यात यावा, मान्सून काळात उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला त्वरित प्रतिसाद देण्यासाठी नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्याचे आदेश देताना, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा व प्रशासनाशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दामिनी, सचेत आणि भूकंप या ॲप विषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, हे तीनही ॲप्स आपत्ती व्यवस्थापन आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. दामिनी हे ॲप विजेच्या कडकडाट (Lightning) बाबत पूर्वसूचना देते. आपल्या परिसरात पुढील काही मिनिटांत वीज पडण्याची शक्यता असल्यास अलर्ट मिळतो. सचेत ॲपद्वारे पूर, चक्रीवादळ, भूकंप, त्सुनामी इत्यादी आपत्तींबाबत वेळेवर सूचना मिळते तर भूकंप हे ॲप भूकंपाच्या धक्क्यांची माहिती आणि अलर्ट मिळण्यासाठी वापरले जाते. तरी नागरिकांनी हे ॲप डाऊनलोड करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
नामवंत पत्रकार अशोक वानखेडे, दिवाकर शेजवळ, संविधानतज्ज्ञ ॲड. जयमंगल धनराज मार्गदर्शक नांदेड (२० एप्रिल २०२६) – नांदेड जिल्ह्यातील आंबेडकरवादी लोक मंचातर्फे भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती महोत्सव नांदेड शहरात येत्या रविवारी २६ एप्रिल २०२६ रोजी दणक्यात साजरा करण्यात येणार आहे. त्यात संध्याकाळी ४ वाजता शंकरराव चव्हाण सभागृहात ‘ धर्मनिरपेक्ष भारताचे भवितव्य ‘ या विषयावर मराठवाड्यातील ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते सुरेशदादा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली प्रबोधन महासभा ‘ आयोजित करण्यात आली आहे. खासदार रवींद्र चव्हाण आणि आमदार प्रतापराव चिखलीकर हे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या महासभेत राजधानी दिल्लीतील नामवंत पत्रकार अशोक वानखेडे, मुंबईतील डॉ. आंबेडकर लॉ कॉलेजचे माजी प्राचार्य, बहुजन समाज पार्टीचे मुंबई – कोकण क्षेत्राचे प्रभारी ॲड. जयमंगल धनराज, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ हे प्रमुख मार्गदर्शक आहेत, अशी माहिती आंबेडकरवादी लोक मंचाचे महासचिव देविदास मनोहरे आणि पी. एस गवळे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. यंदाचे वर्ष हे महाडच्या चौदार तळ्यावरील समता संगराच्या शताब्दीचे आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांची जन्म द्विशताब्दीही राज्यात सुरू झाली आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवात यावर्षी दलित – बहुजन समाजात मोठा जोश आणि चैतन्य संचारले आहे, असे आंबेडकरवादी लोक मंचाचे संस्थापक – अध्यक्ष सुरेशदादा गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे निर्देश रत्नागिरी : (अशोक गायकवाड )—कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी पात्रतेच्या निकषांची पडताळणी करुन पुढील कार्यवाही करावी असे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले. कुवारबाव ग्रामपंचायत सभागृहात पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, तहसिलदार राजाराम म्हात्रे, नगरपरिषद मुख्याधिकारी वैभव गारवे, नगरसेविका वर्षा ढेकणे, नगरसेवक बंड्या साळवी, पंचायत समिती उपसभापती गजानन धनावडे, जि.प.सदस्य प्रकाश रसाळ, कुवारबाव ग्रामपंचायत प्रशासक तळेकर आदी उपस्थित होते. गेली अनेक वर्षे कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. याबाबतची योजना रहिवाशांना समजावून सांगणे आवश्यक आहे. गरीब लोकांना घरे देवून त्यांची जीवनशैली सुधारण्यास यामुळे मदत होणार आहे. याकरिता पात्रता पडताळणी करणे आवश्यक आहे. याबाबतच्या शासन निर्णयाबाबत अफवा पसरविल्या जात आहेत त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन पालकमंत्री सामंत यांनी उपस्थितांना केले. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना शिकण्यासाठी, खेळण्यासाठी जागा, अंगणवाडी, बालवाडी एकाच आवारात उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यामुळे कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात उत्तम प्रकल्प होणार आहे, असेही पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.
– जेष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुकुंद रांजाणे (माथेरान)जेष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात एसटी महामंडळ बसेसची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी माथेरान मध्ये एम.एस.आर.टी.सी.( कर्जत ) आणि माथेरान जेष्ठ नागरिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट कार्ड शिबिराचे आयोजन श्रीराम चौकातील गेम झोन याठिकाणी करण्यात आले. यावेळी जेष्ठ नागरिकांनी या शिबिरास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. माथेरान शहरातील १८ वर्षावरील सर्व महिला,६५ वर्षावरील सर्व जेष्ठ नागरिक, ७५ वर्षावरील सर्व जेष्ठ नागरीक या सर्वांकरिता महाराष्ट्र राज्यात सवलतीच्या दरात एसटी बसने प्रवास करताना स्मार्ट कार्डाचा वापर करता येणार आहे.हे कार्ड बनविण्यासाठी जेष्ठ नागरिकांना कर्जत आगारात जाणे शक्य नसल्याने कर्जत आगार प्रमुख महादेव पालवे यांच्या सहकार्याने आणि माथेरान जेष्ठ नागरिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट कार्ड शिबिराचे आयोजन दि.१९ रोजी अक्षयतृतीयाच्या शुभ मुहूर्तावर सकाळी १० ते सायंकाळी चार वाजेपर्यंत करण्यात आले. जवळपास नव्वद जेष्ठ नागरिकांनी या शिबिरात आपला सहभाग नोंदवला.या शिबिराला विद्यमान नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी भेट देऊन जेष्ठ नागरिकांशी संवाद साधताना नगर परिषदेच्या माध्यमातून जे काही सहकार्य आवश्यक आहे ते निश्चितच केले जाईल असे सांगितले.यावेळी नगरपरिषदेचे नगरसेवक, नगरसेविका, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.स्मार्ट कार्ड बनविण्यासाठी कर्जतचे अक्षय म्हसे, गीता शहा यांनी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. हा महत्वपूर्ण शिबिराचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष अब्दुल रहिमान शेख,उपाध्यक्ष अरविंद रांजाणे, सचिव अनंत शेलार, खजिनदार रजनी (बीना) कदम, सल्लागार चंद्रकांत जाधव, प्रकाश (अण्णा) सुतार,दत्ता सनगरे, वासंती जांभळे, कांचन केतकर, जयश्री रामाणे, सुहासिनी शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. 00000000