कुर्ल्यात फिटनेस आणि एकतेचा उत्साह
५वी मायकेलाइट मॅरेथॉन कुर्ला पश्चिम येथील सिईएस माइकल हाय स्कूल द्वारा आयोजित ५वी मायकेलाइट मॅरेथॉन मोठ्या उत्साहात पार पडली. या उपक्रमाने कुर्ला परिसरातील नागरिकांना एकत्र आणत एकता आणि उत्साहाची भावना…
Maharashtra News
५वी मायकेलाइट मॅरेथॉन कुर्ला पश्चिम येथील सिईएस माइकल हाय स्कूल द्वारा आयोजित ५वी मायकेलाइट मॅरेथॉन मोठ्या उत्साहात पार पडली. या उपक्रमाने कुर्ला परिसरातील नागरिकांना एकत्र आणत एकता आणि उत्साहाची भावना…
– राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे प्रतिपादन पालघर : (अशोक गायकवाड )—भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करताना समाजातील अंतिम घटकाचा विकास करणे व त्या घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. पालघरच्या सर्वांगीण विकासाशिवाय विकसित भारताचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी डहाणू येथे केले. मार्च २०२६ मध्ये राज्याच्या राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राज्यपालांचा हा पहिलाच पालघर जिल्हा दौरा असल्याने पालघरवासियांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. अक्षय्य तृतीया आणि भगवान श्री परशुराम जयंतीच्या शुभ मुहूर्तावर डहाणू तालुक्यातील ओसरविरा येथे वनबंधू ट्रस्ट आणि भारत विकास संगम यांच्याद्वारे पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये फिरते दवाखाने आणि रुग्णवाहिका सेवांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भारत विकास संगमचे संरक्षक संजय पटेल, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड, पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, वनबंधू ट्रस्टचे अध्यक्ष आणि विश्वस्त लाडूलाल सोनी, योगायतन ग्रुपचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रताप सिंह, ज्येष्ठ समाजसेवक सुशील सिंघानिया आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आपल्या भाषणाची सुरुवात ‘सर्वे भवन्तु निरामय:’ या मंत्राचा उल्लेख करीत त्यांनी केली व आरोग्य सुविधा केवळ शहरांपुरत्याच मर्यादित न राहता त्या दुर्गम भागात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे, हा आपला मुख्य संकल्प आहे. पालघर जिल्ह्यासारख्या आदिवासीबहुल क्षेत्रात रोजगार, आरोग्य आणि पिण्याच्या पाण्याची समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि पालघरमध्ये एक ‘आदर्श गाव’ संकल्पना राबविण्यासाठी लोकभवन स्तरावर नियोजन सुरू असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. यासाठी लवकरच जिल्हा प्रशासन आणि संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन एक सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्यात येईल, अशी महत्त्वाची घोषणाही त्यांनी यावेळी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास’ या भूमिकेचा संदर्भ देत, राज्यपाल म्हणाले की, विकासाच्या प्रक्रियेत ‘अंत्योदय’ म्हणजेच रांगेतील शेवटच्या माणसाला प्राधान्य देणे आमचे कर्तव्य आहे. वन बंधू ट्रस्टच्या माध्यमातून दुर्गम भागात फिरता दवाखाना, रुग्णवाहिका आणि डॉक्टर उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. चांगले इंजिनिअर, तंत्रज्ञ किंवा सनदी लेखापाल होणे ही चांगली गोष्ट आहे. पण त्यापेक्षा समाजात चांगला नागरिक म्हणून कार्य करणे ही त्याहून मोठी गोष्ट असल्याचे सांगून पीडितांची सेवा करणे हाच खरा स्वर्ग असल्याचे राज्यपालांनी नमूद केले. या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून दुर्गम भागातील पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. आदिवासी बांधवांच्या प्रगतीसाठी लोकभवनाचे दरवाजे सदैव उघडे राहतील आणि पालघरच्या विकासासाठी स्वतः जातीने लक्ष घालणार असल्याची ग्वाही दिली. वन बंधू ट्रस्टचे अध्यक्ष लाडू लाल सोनी यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी ट्रस्टच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या आरोग्य प्रकल्पांची माहिती देऊन आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांना तातडीची वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी ट्रस्ट कटिबद्ध असल्याचे सांगितले. राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रशासकीय आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून दुर्गम भागाचे चित्र कसे बदलता येईल, यावर प्रकाश टाकला. पालघरच्या जिल्हाधिकारी श्रीमती इंदुराणी जाखड यांनी आपल्या मनोगतात जिल्ह्यातील आरोग्य सद्यस्थिती आणि राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांविषयी माहिती दिली. तसेच, राज्यपालांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन अधिक वेगाने कार्य करेल, अशी ग्वाही दिली. 0000000000
मुकुंद रांजाणे (माथेरान) नगरपरिषदेच्या निवडणुका पार पडल्यानंतर सत्तेत विराजमान होणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून दर पाच वर्षांनी वन समितीच्या नवीन कार्यकारणीची घोषणा करण्यात येते. परंतु या वेळेस सत्ताधारी सभागृहात विराजमान होऊन चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे तरीसुध्दा अद्याप वनसमितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आलेली नसल्याने इच्छुकांचा भ्रमनिरास होताना दिसून येत आहे. या समितीच्या अध्यक्षपदासाठी अंतर्गत सुप्त संघर्ष सुरू असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.लवकरच ह्या समितीची कार्यकारिणी जाहीर केली नाही तर कदाचित या चार महिन्यांच्या कालावधीत प्रमुख आर्थिक स्त्रोत असणाऱ्या दस्तुरी नाक्यावरील वाहन कराच्या उत्पन्नाचे जमा खर्च बाबतीत हिशोब करणे अवघड होऊ शकते. या कामी कार्यक्षम व्यक्तींना यामध्ये समाविष्ट करून जे खरोखरच आपल्या पदाला न्याय देऊ शकतात या समितीसाठी वेळ देऊ शकतात, माथेरानची वनराई टिकविण्यासाठी आणि इथले पर्यटन वाढविण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जे खरोखरच योगदान देऊ शकतात अशा पदाधिकारी आणि सदस्यांची या समितीवर वर्णी लावावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. दस्तुरी नाक्यावरील वाहन कराच्या माध्यमातून दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न या समितीला मिळते या पैशाचा सदुपयोग गावाच्या हितासाठी, पर्यटन वाढीसाठी आणि स्वच्छतेवर भर देण्यासाठी केल्यास खरोखरच या ठिकाणी पर्यटन क्रांती घडू शकते असे जाणकार मंडळी बोलत आहेत. विशेष म्हणजे निवडणुका पार पडल्यानंतर जो तो वन समितीतील सदस्यत्व घेण्यासाठी इच्छुक दिसत आहेत त्यामुळे या समितीत नेमकं काय दडलं आहे ? वर्षाकाठी भरमसाठ उत्पन्न मिळवून देणाऱ्या या समितीच्या आर्थिक लोण्यावर बहुतांश नवोदित कार्यकर्त्यांचा डोळा आहे की काय ? असे अनेक तर्कवितर्क या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत. सध्या नगरपरिषदेच्या तिजोरीत पैशाचा खळखळाट असल्याने कामे होत नाहीत परंतु सदर वनसमीतीत जमा असलेल्या सत्तर लाख रुपयांच्या मोठया निधीतून पर्यटन,पर्यावरणाचे,माथेरानच्या विकासासाठी मोठे काम उभे राहू शकते असेही बोलले जात आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी ज्यांनी निवडणूक काळात प्रत्यक्षपणे काम केलेले आहे आणि निवडणूक पूर्व काळात पक्षात प्रवेश केलेले आहेत अशांनाच यावेळी समितीमध्ये संधी देण्यात यावी अन्यथा जुन्या जाणत्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची नाराजी ओढवुन घ्यावी लागेल यात शंका नाही असेही बोलले जात आहे.
पोलिसांनी आश्वस्त केल्याने पीडितांकडून प्रतिसाद हरिभाऊ लाखे नाशिक –हाराष्ट्रासह दिल्लीपर्यंत चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात दररोज धक्कादायक माहती पुढे येत आहे. विशेष तपास पथकाकडून या प्रकरणाचा तसेच खरातच्या आर्थिक व्यवहारांचा ईडीकडून…
दा. कृ. सोमण यांचा निसर्ग संवर्धनाचा संदेश देत कळवा – निसर्ग, आकाश आणि वन्यजीव यांच्यातील नातं अधिक संवेदनशीलतेने जपण्याची गरज अधोरेखित करत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी उपस्थितांना विचारप्रवृत्त…
एका रात्रीत १५ वाहनांवर कारवाई सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारींची गंभीर दखल घेत काल जिल्हाधिकारी स्वतः मैदानात उतरल्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत बेकायदा वाळू वाहतूक करणारे 1५ डंपर पकडण्यात आले. हे ऑपरेशन काल एका रात्रीत पार पडले. काल रात्रीपासून सुरु झालेली ही धडक मोहीम पहाटेपर्यंत सुरु होती. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि निवासी उप -जिल्हाधिकारी मच्छिन्द्र सुकटे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने समन्वय साधत ही व्यापक मोहीम राबवली. जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट निर्देशानुसार त्या त्या तालुक्यांतील तहसिलदारांनी संयुक्त पथके तयार करून अवैध वाळू वाहतुकीवर एकाचवेळी अनेक ठिकाणी धडक कारवाई केली. या मोहिमेत सावंतवाडीचे तहसिलदार श्रीधर पाटील, वैभववाडीचे तहसिलदार सूर्यकांत पाटील, कणकवलीचे तहसिलदार दीक्षांत देशपांडे, मालवणचे तहसिलदार गणेश लव्हे, वेंगुर्ल्याचे तहसिलदार ओंकार ओतारी तसेच कुडाळचे तहसिलदार सचिन पाटील यांचा सक्रिय सहभाग होता. कारवाई दरम्यान विविध मार्गांवर वेगवेगळ्या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत अवैध वाहतुकीला आळा घातला. आचरा–कणकवली मार्गावर वैभववाडी पथकाने २ वाहने ताब्यात घेतली, तर देवलीमार्गे परुळे दिशेने जाणाऱ्या ३ वाहनांवर वेंगुर्ल्याच्या पथकाने कारवाई केली. कुंभारमाठ येथे कणकवली पथकाने ३ वाहने पकडली, तोंडवली येथे सावंतवाडी पथकाने ३ वाहनांवर कारवाई केली, तर कुडाळ परिसरात कुडाळ पथकाने ४ वाहने ताब्यात घेतली. अशा प्रकारे विविध ठिकाणी समन्वयाने करण्यात आलेल्या कारवाईत एकूण १५ वाहने जप्त करण्यात आली असून ती संबंधित तहसील कार्यालयांच्या आवारात ठेवण्यात आली आहेत. संबंधितांवर पुढील दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी रात्री झाराप परिसरात भेट देत कारवाईचा आढावा घेतला.रात्रभर चाललेल्या या मोहिमेत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.अचानक झालेल्या या धडक कारवाईमुळे अनेक अवैध वाळू व्यावसायिकांना आपल्या वाहनातील वाळू टाकून पळ काढावा लागला, तर काहींच्या बोटी खाडी पात्रातच अडकून पडल्या. प्रशासनाच्या या निर्णायक पावलामुळे अवैध वाळू उपसा व वाहतुकीला कायम स्वरूपी आळा बसेल की ही कारवाई एक उपचार ठरते हे आता पहावे लागेल.
ईडी चौकशीच्या तिसऱ्यादिवशी भोंदुबाबा खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू हरिभाऊ लाखे नाशिक : नाशिकमधील भोंदू आणि महिलांवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अशोक खरातचे (Ashok kharat) निकटवर्तीय जितेंद्र शेळकें यांची तीन दिवसापुर्वीच ईडीकडून चौकशी…
उल्हासनगर दि.१७ ( सुनिल इंगळे ) : डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाडीच्या पाण्यात अर्धवट सडलेल्या अवस्थेत एका बेवारस अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगत असताना पोलिसांना मिळून आला आहे. त्या इसमाची…
अरविंद जोशी मिरा -भाईंदर : शिंदे गटातील शिवसेनेच्या एका अधिकाऱ्याने भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर असभ्य टिप्पणी करत आणि त्यांना शिवीगाळ करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या…
मंत्री नितेश राणे यांचे मोठे विधान हरिभाऊ लाखे नाशिक –महाराष्ट्रातील भाजपमधील हिंदुत्ववादी आक्रमक चेहरा म्हणून ओळख निर्माण करणारे मंत्री नितेश राणे हे कायमच वादग्रस्त ठरत आले आहेत. हिंदू राष्ट्र म्हणून एक…