Category: महाराष्ट्र

Maharashtra News

दरकपातीवरून आरबीआय, केंद्र सरकारमध्ये मतभेद

नवी दिल्ली : महागाई निश्चित करणे आणि व्याजदर ठरविणे यांबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकार यांच्यातील मतभेद प्रकर्षाने समोर आले आहेत. मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्ववरन मंगळवारी म्हणाले की, किरकोळ महागाई ही प्रामुख्याने टोमॅटो, कांदा, बटाटा, सोने आणि चांदी या उत्पादनांच्या…

महिला वाहकांच्या सतर्कतेमुळे चोर जाळ्यात

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाची कळवण आगाराची बस गुरूवारी कळवण-नाशिक मार्गावर धावत असताना वाहक सुनीता पवार यांना बसमधील महिला प्रवाशाचे पाकिट चोरीस गेल्याचे कळले. त्यांनी सतर्कता बाळगत बस पोलीस ठाण्यात नेत चोरांना पकडून दिले. त्यांच्या या सतर्कतेचा सन्मान महामंडळाच्या वतीने करण्यात आला. कळवण-नाशिक बसमधून दोन महिला लहान मुलांसह प्रवास करत होत्या. बसमध्ये ७० ते ८० प्रवासी होते. वाहक सुनीता पवार यांना सदर महिला संशयास्पद हालचाल करत असल्याचे जाणवले. संबंधित महिला दिंडोरी स्थानकात उतरल्या. वाहक पवार यांनी पाठीमागून नाशिक मार्गावर धावणाऱ्या कळवण आगाराच्या बसवरील वाहक वैशाली सहारेयांना दिंडोरी स्थानकात दोन संशयित महिला लहान मुलांसह असल्याचे कळविले. त्या बसमध्ये बसल्यास नजर ठेवण्याची सूचना केली. दिंडोरी बस स्थानकात संशयित महिला आणि त्यांच्या बरोबर असलेली लहान मुले वाहक सहारे यांच्या बसमध्ये बसल्या. बस सुरु झाल्यानंतर एका महिला प्रवाशाने पाकीट चोरीला गेल्याची तक्रार केली. वाहक सहारे यांनी पवार यांना बसमध्ये चोरी झाल्याचे कळविले असता पवार यांनी बस पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यास सुचविले. त्यानुसार वाहक सहारे या बस म्हसरूळ पोलीस ठाण्यात घेऊन गेल्या. पोलिसांनी गाडीतील प्रवाशांची तपासणी केली असता संशयित महिलांकडे चोरी झालेले पाकीट आढळून आले. पवार आणि सहारे या कळवण आगाराच्या दोन्ही महिला वाहकांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे महिला प्रवाशाचे चोरी झालेले पाकीट परत मिळाले. दोन महिला चोर पोलिसांना सापडले. दोन्ही महिला वाहकांनी आपल्या कामात दाखविलेल्या तत्परतेबद्दल नाशिक विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले यांनी पवार यांचा सत्कार केला.  

पारा घसरल्याने उरणमध्ये शेकोट्यांचा आनंद

उरण – उरण परिसरात नोव्हेंबर महिन्यात पारा घसरू लागल्याने रात्रीच्या व पहाटेच्या वेळी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवणे सुरू झाले आहे. सध्या तालुक्‍यात गुलाबी थंडीचे रूपांतर बोचऱ्या थंडीमध्ये झाल्यामुळे उरणकरांना हुडहुडी भरत…

जव्हारची आरोग्य सेवा ऐरणीवर

  जव्हार : जव्हार तालुका हा ग्रामीण आणि दुर्गम भाग आहे. येथे आरोग्य सेवा हा मुद्दा नेहमीच ऐरणीवर असतो. जव्हार शहरातील १०० खाटांचे पतंग शाह उपजिल्हा रुग्णालयावर मोखाडा, विक्रमगड, वाडा हे तालुके; तसेच डहाणू तालुक्यातील काही भाग अवलंबून आहे. शिवाय, याच उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मराड यांची वर्णी पालघर येथील जिल्हा शल्यचिकित्सक पदी लागल्याने येथे पूर्ण वेळ वैद्यकीय अधीक्षकसह २७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर रुग्ण सेवा देताना अतिरिक्त कामाचा ताण येऊन आरोग्य सेवेवरही परिणाम होत आहे. पतंग शहा उपजिल्हा रुग्णालयाचे कामकाज चालवताना वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशातच या रुग्णालयात प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ, सर्जन, फिजीशियन, अस्थिरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, सोनोग्राफी तज्ज्ञ; तसेच भूलतज्ज्ञ आणि दंतरोग तज्ज्ञ ही पदे रिक्त असल्याने रुग्ण सेवा देताना मर्यादा येत आहेत. परिणामी, रुग्णांना पुढील उपचारासाठी नाशिक, सेलवास, ठाणे येथे पाठवले जाते. या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यांना सेवा देण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी असणे गरजेचे असताना वर्षाहून अधिक काळापासून पुरेसे कर्मचारी उपलब्ध होऊ शकलेले नाही. सध्या उपजिल्हा रुग्णालयाकडे १०७ मंजूर पदांपैकी २७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवरच अतिरिक्त कामाचा ताण येत आहे.  त्याचा रुणसेवेवरही परिणाम होऊ लागला आहे. दर महिन्याला अहवाल अलीकडच्या काही वर्षांत आरोग्य विभागाने उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्षच केले आहे. त्याचा मोठा फटका रुग्ण सेवेला बसत आहे. डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा अहवाल दर महिन्याला उपजिल्हा रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांना पाठवला जातो. मध्यंतरी काही पदे भरली आहेत. गेल्या काही वर्षांत रिक्त पदे पूर्णपणे भरलेलीच नाहीत. त्याचबरोबर वयोमानानुसार कर्मचारीही सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी नवीन पदे तातडीने भरली जात नाहीत. आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेची घडी विस्कटण्याच्या मार्गावर आली आहे. अनेक वर्षे पदे रिक्तच सरकारकडून आरोग्य सेवेतील पदांची भरती केली जात नाही. मध्यंतरी भरती प्रक्रिया पार पडली; मात्र त्यात पुरेसी पदे भरली नाहीत. अनेक वर्षांपासून उपजिल्हा रुग्णालयाला रिक्त पदांचे ग्रहणच लागले आहे. उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने यापूर्वी कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात डॉक्टर व काही कर्मचारी सेवेसाठी घेतले होते. मात्र, तरी अतिरिक्त कामाचा ताण त्यांच्यावर पडत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने याचा विचार करून पदे भरती करणे गरजेचे आहे. कोट जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात एकूण १०७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २७ पदे रिक्त आहेत. या पदांचा अहवाल दर महिन्याला वरिष्ठ कार्यालयाला पाठवला जातो. मंजूर असलेली पूर्ण पदे भरलेली नाहीत. उपलब्ध कर्मचारी आणि काही कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कामकाज सुरू आहे. – डॉ. भरतकुमार महाले, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय जव्हार

 कोणाला बसणार धक्का? कोणाला होणार फायदा ?

नाशिक जिल्ह्यातील मतदारसंघांत मतदानाचा टक्का वाढला हरिभाऊ लाखे नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी संपूर्ण जिल्ह्यात अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडले. त्यात निफाड आणि नाशिक पश्चिम वगळता सर्वच तालुक्यात मतदानाच्या टक्केवारीत…

नाशिक-बोरिवली विद्युत बससेवा प्रारंभ

हरिभाऊ लाखे नाशिक : महाराष्ट्र ई वाहन धोरणानुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागात नाशिक-बोरिवली मार्गावर १२ मीटरच्या ई बस चालविण्यास बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी या सेवेस प्रवाशांचा प्रतिसाद लाभला. मतदानाचा दिवस असल्याने अनेकांनी मतदानानंतर बाहेर प्रवास करण्यास पसंती दिली. राज्य परिवहन महामंडळाकडून ई वाहन धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याअंतर्गत महामंडळाच्या नाशिक विभागात नाशिक, बोरिवली, कसारा, सप्तश्रृंगी गड या मार्गांवर ई बससेवा सुरू आहे. सद्यस्थितीत नाशिक-बोरिवली मार्गावर धावणाऱ्या नऊ मीटर ई बस या सप्तश्रृंगी गड, नाशिक- कसारा आणि नाशिक- पिंपळगाव मार्गावर धावत आहेत. त्यामुळे नाशिक -सप्तश्रृंगी गड मार्गावर सहा तर नाशिक कसारा मार्गावर दोन अतिरिक्त फेऱ्या बुधवारपासून सुरू झाल्या. मुंबई नाका परिसरातील महामार्ग ब स्थानकात ज्येष्ठ नागरिक सुभाष कुलकर्णी यांच्या हस्ते तसेच विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले, आगार व्यवस्थापक रोहिणी ठाकरे, प्रताप राजपूत आणि पर्यवेक्षक यांच्या उपस्थितीत नाशिक- बोरिवली शिवाई बसचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रवाशांना पेढे तसेच गुलाबपुष्प देत त्यांचे स्वागत करण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या साधारण बस या मतदान प्रक्रियेत कार्यरत होत्या. यामुळे शिवशाही, शिवनेरी, शिवाई या बससेवेच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या. प्रवाशांचा या बससेवेस चांगला प्रतिसाद राहिला. 0000

निवडणूक प्रक्रियेत हलगर्जीपणा- नऊ शिक्षकां विरुद्ध गुन्हा

हरिभाऊ लाखे नाशिक   दिंडोरी येथे निवडणूक मतदान प्रक्रियेत गैरहजर राहिलेल्या नऊ शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिंडोरी येथे निवडणूकविषयक प्रशिक्षणासह कामास नऊ शिक्षक गैरहजर राहिले. याबाबत दिंडोरीचे तहसीलदार वसंत धुमसे…

नाशिक बाजार समिती आज राहणार बंद

शेतमाल विक्रीसाठी न आणण्याचे शेतकऱ्यांना आवाहन हरिभाऊ लाखे नाशिक : राज्यात विधानसभा निवडणुकीचे बुधवारी (दि. २०) मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.…

११० पोलीस वाहनांवर सीसीटीव्ही कॅमेरे

अवैध व्यवसायांविरोधात व्यापक कारवाई  मद्य, गुटखा, शस्त्रास्त्रे जप्त हरिभाऊ लाखे नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीसांकडून अवैध व्यवसायांविरोधात जिल्ह्यात व्यापक स्वरूपात कारवाई करण्यात येत आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाकडून निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ११० पोलीस वाहनांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून ड्रोनचाही वापर करण्यात येणार आहे. आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४८ सराईत गुन्हेगार हद्दपार करण्यात आले असून एमपीडीए कायद्यान्वये दोन सराईत स्थानबध्द आहेत. १४ देशी बंदुका, ३७ जिवंत काडतुस, ४३ तलवारी, नऊ कोयते चॉपर,…

कॉ. जे. पी. गावीत यांच्या प्रचारासाठी कळवणमध्ये शरद पवार मैदानात

कळवण : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सात वेळा आमदार राहिलेले कॉम्रेड जे पी गावित यांच्या निवडणूक प्रचारासाठी नुकतीच कळवण विधानसभा मतदारसंघात मोठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली.  या बैठकीला राजकीय नेते आणि सामान्य जनतेने मोठा प्रतिसाद दिला.या सभेचे प्रमुख वक्ते राष्ट्रवादीचे (शप गट) अध्यक्ष शरद पवार होते. त्यांनी जे पी गावीत यांच्या विजयाचे ठोस आवाहन करत जमावाला संबोधित केले. त्यांनी मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आणि आगामी निवडणुकीत शेतकरी नेते जे.पी.गावित विजयी होणे का गरजेचे आहे हे सांगितले. महाविकास आघाडी सरकार निवडून आल्यास, शेतकऱ्यांचे कल्याण, महिला सुरक्षा, रोजगार हा मुख्य धोरणाच्या अजेंडा असेल,असे शरद पवार यांनी सांगितले. महाविकास आघाडीतील इतर अनेक प्रमुख नेत्यांनीही सभेला संबोधित केले. सीपीआय(एम) चे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी राज्याची राजकीय व आर्थिक चौकट मजबूत करण्याच्या पक्षाच्या बांधिलकीबद्दल सांगितले. स्थानिक मविआ खासदार भास्कर भगरे, शिवसेना (उबाठा) नेते मोहन गांगुर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) नेते रविबाबा देवरे आणि काँग्रेस नेते शैलेश पवार या सर्वांनी गावित यांना पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडीचे ऐक्य आणि राज्यासाठीचे सामायिक धोरण अधोरेखित केले.या मेळाव्यात माकपचे प्रमुख नेते राज्य सचिवमंडळ सदस्य सुनील मालुसरे, सुभाष चौधरी व इतर राज्य समिती सदस्य, मविआ नेते आणि समर्थक उपस्थित होते. या सर्वांनी गावित यांच्यासोबत एकजूट व्यक्त केली. सर्व स्थानिक मतदार आणि प्रादेशिक नेत्यांच्या अतुलनीय पाठिंब्याने, या सभेने निवडणूक प्रचारासाठी जोरदार वातावरण तयार केले. मविआच्या नेतृत्वाखाली प्रगतिशील, सुरक्षित आणि समृद्ध महाराष्ट्र बनवण्याचा स्पष्ट संदेश या सभेने दिला.