अजित पवारांचा घातच झाला ?
अजित पवारांचा घातच झाला ? ० रोहीत पवारांनी केले अपघाताचे पोस्टमार्टेम ० अजित पवारांना विमानाने जाण्यासाठी भाग पाडणारे ते दोन नेते कोण ? ० दादा गेले काही दिवस प्लास्टिक एवेजी काचेच्या बाटलीतून…
Maharashtra News
अजित पवारांचा घातच झाला ? ० रोहीत पवारांनी केले अपघाताचे पोस्टमार्टेम ० अजित पवारांना विमानाने जाण्यासाठी भाग पाडणारे ते दोन नेते कोण ? ० दादा गेले काही दिवस प्लास्टिक एवेजी काचेच्या बाटलीतून…
महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ कर्मचारी कुलगुरु टी-२० क्रिकेट स्पर्धेत आरोग्य विद्यापीठाची उत्तम कामगिरी नाशिक : महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ कर्मचारी कुलगुरु चषक २०२६ क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या संघाने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तृतीय क्रमांकांचे पारितोषिक पटकावले आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या उपांत्य फेरीत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरविरुध्द झुंज देत असताना नाशिकच्या संघाने स्पर्धेत आपले वेगळे स्थान निर्माण केले. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संघाने आक्रमक पवित्रा घेतला होता. पहिला सामन्यात गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली विरुध्द ८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात योगेश राऊत ’मॅन ऑफ द मॅच’ ठरले. दुसऱ्या सामन्यात यजमान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठावर २६ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात संदीप चौधरी ’मॅन ऑफ द मॅच’ ठरले. तिसऱ्या सामन्यात कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेकचा ९ गडी राखून पराभव केला. या सामन्यात पुष्कर तऱ्हाळ ’मॅन ऑफ द मॅच’ ठरले. उपांत्य फेरीतील अटीतटीच्या लढतीत साखळी फेरीतील अजेय घोडदौड नंतर आरोग्य विद्यापीठाचा सामना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर विरुध्द झाला. नाशिकच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १५७ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले होते. कोल्हापूरच्या संघाने हे लक्ष्य १९.५ षटकांत ८ बाद १५८ धावा करत गाठले. केवळ २ गडयांनी विजय मिळवत कोल्हापूरने अंतिम फेरीत प्रवेश केला, तर नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. विद्यापीठाच्या संघातील पुष्कर तऱ्हाळ यांना मालिकेतील ’सर्वोत्तम गोलंदाज’ म्हणून गौरविण्यात आले. या स्पर्धेतील येशात गोलंदाजीचा मोलाचा वाटा आहे. पुष्कर तऱ्हाळ यांनी आपल्या अचूक आणि भेदक गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल त्यांना स्पर्धेतील ’बेस्ट बॉलर ऑफ टूर्नामेंट’ (सर्वोत्तम गोलंदाज) या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाच्या क्रिकेट संघात संघव्यवस्थापक राजेश पाटील व कर्णधार योगेश राऊत यांच्या नेतृत्वाखाली पुष्कर तऱ्हाळ, संदीप चौधरी, पवन गोलवाल, राजेंद्र दिवे, प्रविण जगताप, महेंद्रनाथ चौधरी, नंदकिशोर ठाकरे, नंदकिशोर वाघ, विजय कुरकुरे, संतोष जढाळ, बबन कांगणे, सचिन शिराळ, मुकुंद मुळे आदी खेळाडू आहेत. या क्रिकेट स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंचे विद्यापीठ परिवारातर्फे अभिनंदन करण्यात आले.
कुंभमेळ्यासाठी नाशिक होणार प्रकाशमान! सिन्नरच्या बंद वीज प्रकल्पातून पुन्हा सुरू होणार वीज निर्मिती हरिभाऊ लाखे नाशिक – सिन्नर येथील खासगी औष्णिक वीज प्रकल्प सर्वाधिक बोली लावून ताब्यात घेतल्यानंतर महाजनकोने आता २७० मेगावॉट वीज निर्मिती क्षमतेची दोन संयंत्रे पुन्हा सुरू करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. या माध्यमातून सुरुवातीला ५२० मेगावॉट इतकी वीज निर्मिती होईल. सिंहस्थ कुंभमेळ्यात विजेची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी ही वीज निर्मिती महत्वाची ठरणार आहे. सि्न्नर तालुक्यातील हा औष्णिक वीज प्रकल्प पूर्वी बहुचर्चित इंडिया बुल्स कंपनीचा होता. विभाजनानंतर तो रतन इंडिया पॉवर कंपनीकडे गेला. १३५० मेगावॉट क्षमतेचा हा प्रकल्प आहे. पहिल्या टप्प्याचे बांधकाम झाल्यानंतर थकबाकी न भरल्यामुळे दिवाळखोरीत निघाला. लिलाव प्रक्रियेत महाराष्ट्र सरकारच्या मालकीची वीज निर्मिती कंपनी महाजनको आणि सार्वजनिक क्षेत्रातील नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनने (एनटीपीसी) यांनी एकत्रितपणे ३८०० रुपयांची सर्वाधिक बोली लावली. फेब्रुवारी अखेरपर्यंत या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण होऊन प्रकल्पावर पूर्णत: नियंत्रण मिळणार आहे. या माध्यमातून रतन पॉवरच्या प्रकल्पाचा हिश्याचा भाग आणि ‘नॉन प्रोसेसिंग क्षेत्र’ ताब्यात येईल. या भागातील उर्वरित मोकळ्या जागेशी महाजनकोचा कुठलाही संबंध नसल्याचे सांगितले जाते. आता महाजनकोने बंद पडलेला औष्णिक वीज प्रकल्प नव्याने सुरू करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. सिन्नर येथील हा प्रकल्प १३५० मेगावॉट क्षमतेचा आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येकी २७० मेगावॉटचे दोन संयंत्र (युनिट) सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. हे काम पुढील सहा ते आठ महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे महाजनकोचे संचालक (प्रकल्प) अतुल सोनजे यांनी सांगितले. नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी नाशिकला वीज पुरवठ्याचा एक शाश्वत स्त्रोत उपलब्ध करून देणे हे महाजनकोचे मुख्य उद्दिष्ट आहे. एक मार्चपासून सिन्नर येथील प्रकल्पावर कर्मचारी नियुक्ती आणि इतर प्राथमिक कामांना वेगाने सुरुवात होणार असल्याचे सोनजे यांनी नमूद केले. तूर्तास रस्ते मार्गाने कोळसा वाहतूक सिन्नरचा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी कोळसा वाहतुकीसाठी एकलहरे ते सिन्नर असा रेल्वे मार्ग टाकण्यासाठी महाजनकोने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. जोपर्यंत रेल्वे मार्ग तयार होत नाही, तोपर्यंत एकलहरे येथील प्रकल्पात कोळसा उतरवला जाईल.आणि तेथून रस्ते मार्गाने तो सिन्नरला नेला जाणार आहे. प्रारंभी कार्यान्वित केल्या जाणाऱ्या दोन संयंत्रांसाठी दररोज आठ हजार टन कोळसा लागणार आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रेल्वे मार्गातील काही क्षेत्राचे भूसंपादन होणे बाकी आहे. रेल्वेमार्ग कार्यान्वित झाल्यानंतर सिन्नरचा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे सुलभ होणार असल्याचे सांगितले जाते.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर महायुतीचे वर्चस्व…! उबाठा सेनेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह ? महायुतीच्या विरोधात बंडखोरी करणारे ७ अपक्ष विजयी. राजन चव्हाण सिंधुदुर्ग : तब्बल नऊ वर्षांनी होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत…
१२ पैकी सात जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची एकहाती सत्ता रत्नागिरीत एकनाथ शिंदेंची शिवसेना सत्ता सांगलीत महाविकास आघाडी सत्तेत मुंबई : बुहप्रतिक्षित १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या निकालात…
शरद पवारांची प्रकृती बिघडली, पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने बारामतीहून पुण्यातील रूबी रूग्णालयात हलवण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे…
बारावीची परीक्षा आजपासून पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे उद्या मंगळवार दिनांक १० फेब्रुवारी पासून राज्यभरात बारावीची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेसाठी १० हजार ६६४ शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांतील १५ लाख ३२ हजार ४८७…
महाराष्ट्राच्या क्रीडा क्रांतीचा महामेरू हरपला पुण्यात खो-खो परिवारातर्फे स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली क्रीडा विश्वावर दुःखाचा डोंगर पुणे : महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे लाडके लोकनेते व उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण क्रीडा क्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. क्रीडा क्रांतीचा महामेरू हरपल्याची भावना प्रत्येक मैदानातून व्यक्त होत असून, खो-खो परिवाराने पुण्यात आयोजित केलेल्या शोकसभेत ही हानी शब्दातीत असल्याचे भावनिक चित्र पाहायला मिळाले. भावपूर्ण शोकसभा : आठवणींनी दाटलेले क्षण पुण्यात पार पडलेल्या या विशेष शोकसभेत राज्यभरातून आलेले क्रीडा संघटक, प्रशिक्षक, पंच, खेळाडू व पदाधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला दोन मिनिटे मौन पाळून स्व. अजितदादांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी दादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. खेळाडूंचे कैवारी, शिस्तप्रिय नेतृत्व मनोगत व्यक्त करताना वक्त्यांनी दादांची खेळाप्रती असलेली ओढ, शिस्तप्रिय कार्यपद्धती आणि निर्णयक्षमता अधोरेखित केली. “दादा शब्दाला जागणारे होते; एकदा शब्द दिला की काम पूर्ण,” असा अनुभव अनेकांनी सांगितला. खो-खो खेळाला आधुनिक स्वरूप देत त्याला व्यावसायिक उंचीवर नेण्यात दादांचा सिंहाचा वाटा असल्याचे नमूद झाले. निधी, सुविधा आणि थेट संवाद राज्यातील क्रीडा संकुले, मैदाने, स्पर्धा व खेळाडूंसाठी निधी उपलब्ध करून देताना दादांनी कधीही आखडता हात घेतला नाही. सोलापूर, नाशिक, सांगली, कोल्हापूर, रायगड आदी जिल्ह्यांतील प्रतिनिधींनी अडचणीच्या काळात दादांनी मोठ्या भावाप्रमाणे मदतीचा हात दिल्याच्या आठवणी सांगितल्या. मैदानावर थेट येऊन खेळाडूंशी संवाद साधण्याची त्यांची शैली सर्वांच्या मनात कोरली गेली. महिला खेळाडूंना बळ महिला खेळाडूंना संधी, सन्मान आणि नेतृत्वाच्या पातळीवर पुढे आणण्यात दादांचे योगदान मोलाचे असल्याचे रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनच्या प्रतिनिधींनी नमूद केले. “महिलांना विश्वासाने पुढे नेणारा नेता आज आपल्यात नाही,” ही भावना सर्वत्र उमटली. न भरून निघणारी हानी…
नाशिकमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला हरताळ संरक्षित वृक्षांची सर्रास कत्तल सुरूच हरिभाऊ लाखे नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने पिंपळ, वड, औदुंबर या वृक्षांना संरक्षित दर्जा देताना, तोडण्यास सक्त मनाई केल्यानंतरही निसर्गसाखळीतील अत्यंत…
प्रस्तावित वैनगंगा, नळगंगा प्रकल्पात दुष्काळी भागावरील अन्याय टाळा… जल अभ्यासक डॉ. प्रवीण महाजन यांची मागणी राजेंद्र साळसकर नागपूर : वैनगंगा, नळगंगा नदीजोड प्रकल्पांतर्गत गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प ते नळगंगा प्रकल्प पाणी वहन करताना पहिल्या टप्प्यात गरज नसतानाही ८३६ दशलक्ष घनमीटर पाणी देण्यात आले आहे, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात तिथे दुष्काळी भाग असतानाही पाणी कमी देण्यात आले आहे. याकडे जल अभ्यासक आणि वैनगंगा, नळगंगा नदीजोड प्रकल्पाची प्रथम मागणी करणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रवीण महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या एका पत्रात त्यांनी याबाबत फेरविचार करून दुष्काळी भागावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी केली आहे. या पत्रात डॉ. महाजन यांनी नमूद केले आहे की, गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प वैनगंगा नदी ते नळगंगा प्रकल्प इथे १८०४.७८ दशलक्ष घनमीटर पाणी वहन प्रस्तावित आहे. हे पाणी विदर्भातील नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सिंचन, घरगुती आणि औद्योगिक पाणीपुरवठ्यासाठी प्रस्तावित आहे. या योजनेमुळे ४०४२८१ हेक्टर क्षेत्रास सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहेत. ही विदर्भासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. गोसीखुर्द ते निम्न वर्धा प्रकल्प असा या योजनेतील पहिला टप्पा हा असून दुसरा टप्पा निम्न वर्धा प्रकल्प ते काटेपूर्णा प्रकल्प असा आहे. तिसरा टप्पा हा नियमबाह्य बाबी टाळण्यात याव्यात. आतापर्यंतच्या अनेक कागदपत्रांवरून आपल्या लक्षात येईल की, या प्रकल्पासाठी खूपच घाई करण्यात येत आहे आणि या प्रकल्पात रोज नवनवीन कागदपत्रांचा खेळ खेळला जात आहे. तिथे अनेक बाबी महत्त्वाच्या असून भविष्यात जेव्हा हा प्रकल्प महाराष्ट्रातून केंद्रीय जल आयोगाकडे जाईल, त्यावेळी या आकड्यांच्या खेळावर बोट ठेवले जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही, अशी भीतीही या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे आणि असे होऊ नये यासाठी नियमात्मक बाबी स्विकाराव्या. नियमबाह्य बाबी टाळण्यात याव्या, अशी सूचनाही केली आहे. त्यामुळेच वैनगंगा, नळगंगा नदीजोड प्रकल्पाला कुठल्याही प्रकारचे गालबोट न लागता हा प्रकल्प आपल्या मार्गदर्शनात पुढे जावा, अशी अपेक्षा या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.