Category: महाराष्ट्र

Maharashtra News

रामदास कदमांना नजरकैदेत ठेवा; स्थानिक भाजप नेत्यांची मागणी

गुहागर : “शिवसेनेच्या नेत्यांनी रामदास कदम यांना नजरकैदेत ठेवावे किंवा मनोरुग्णालयात ठेवावे”, अशी मागणी भाजपच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांकडे केली आहे. ऐन निवडणूक काळात गुहागरमध्ये महायुतीमध्ये पुन्हा एकदा नाराजी नाट्य बघायला मिळत आहे.…

 महापालिकेतून थेट आमदारकीचे वेध

 नाशिकचे अकरा माजी नगरसेवक उतरले रिंगणात   हरिभाऊ लाखे नाशिक : राज्याच्या जाण्यासाठी विधिमंडळात महापालिकेतील नगरसेवकपद ही पहिली पायरी समजली जाते. त्यामुळे ही पायरी उत्तीर्ण झालेले अनेक नगरसेवक सध्या आमदारकीच्या रिंगणात उतरले आहेत. महापालिका हद्दीत चार विधानसभा मतदारसंघ येत असल्यामुळे महापालिका क्षेत्रातील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह माजी नगरसेवकांमध्येही आमदार होण्यासाठी स्पर्धा आहे. शहरातील चारही मतदारसंघाचे विधिमंडळात नेतृत्व करणाऱ्या आमदारांचा राजकीय प्रवास ‘व्हाया नगरसेवक आमदार असा राहिला आहे. त्यामुळे आताही चार मतदारसंघांत तब्बल अकरा माजी नगरसेवक आमदारकीसाठी आपले नशीब आजमावत आहेत. नाशिक महापालिका क्षेत्रात नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम या तीन विधानसभा मतदारसंघांसह देवळाली मतदारसंघाचा अर्धा भाग येतो. त्यामुळे या तीनही मतदारसंघांवर शहरी प्रभाव आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातून रोजगारासाठी स्थायिक झालेल्यांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे या तीन मतदारसंघांसाठी होणाऱ्या बहुतांश आमदारांचा प्रवास हा व्हाया नगरपालिका, महापालिका असा झालेला आहे. नगरसेवक म्हणून राजकीय कारकीर्द गाजवल्यानंतर आणि लोकांशी संपर्क वाढल्यानंतर थेट आमदारकीवरच दावा केला जातो. महापालिकेचा प्रभाग मोठा असल्यामुळे येथून जनसंपर्क वाढवून पदाधिकारी आमदारकीसाठी निवडणुकीच्या रिंगणात पोहचतात. चार सदस्यीय प्रभाग हा मिनी विधानसभेचाच मतदारसंघ होतो. त्यामुळे विधानसभेत जाण्यासाठी नगरसेवक ही आता पहिली पायरी बनली आहे. विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून, प्रचाराला जोर आला आहे. येत्या २० तारखेला मतदान होत असून, त्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यंदा या चार मतदारसंघांमध्ये पालिकेत काम केलेले नगरसेवकच प्रचारात दिसत आहेत. शहरातील चारही मतदारसंघांमध्ये दहा माजी नगरसेवक आमदार होण्यासाठी प्रचारात फिरत आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील लढती चुरशीच्या बनल्या आहेत. वावरे, काठे, ढिकले, बच्छावही होते नगरसेवक नाशिक महापालिकेत नगरसेवक, पदाधिकारी म्हणून काम केलेल्या अनेक दिग्गजांनीही नगरसेवकांनंतर आमदारकी, खासदारकी आणि मंत्रीपदावर काम केलेले आहे. चांदवडचे विद्यमान आमदार व उमेदवार डॉ. राहूल आहेर यांनीदेखील नाशिक महापालिकेत नगरसेवक म्हणून उमेद्वारी केल्यानंतरच ते आमदार झाले. शांतारामबापू वावरे, अॅड. उत्तमराव ढिकले, गणपतराव काठे, डॉ. शोभा बच्छाव यांनीही नगरसेवक पदापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. शांताराम बापू वावरे यांनी तर नगरपालिकेत नगरसेवक झाल्यानंतर प्रथम आमदार व नंतर महापौरपदही भूषविले. गणपतराव काठेदेखील नगरसेवक झाल्यानंतर आमदार अन् पुन्हा महापालिकेत नगरसेवक झाले. अड. उत्तमराव ढिकलेची राजकीय कारकिर्द तर लक्षवेधक ठरली आहे. भूतपूर्व नाशिक नगरपालिकेचे नगराध्यक्ष, महापालिकेत नगरसेवक, महापौरपद भूषविल्यानंतर थेट लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर आमदारकीसाठी नशीच आजमावत निवडूनही आले. धुळ्याच्या विद्यमान खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा राजकीय प्रवासदेखील नगरसेवक, महापौर, आमदार आणि त्यानंतर राज्यमंत्रिपदापर्यंत राहिला आहे. बाळासाहेब सानप यांनी नगरसेवक, उपमहापौर व महापौर व आमदार अशी चढत्या भाजणीची पदे भूषविली आहेत. डॉ. हेमलता पाटील, रामदास उर्फ बाबा सदाफुले, शशी जाधव, अशोक दिवे, शाहू खैरे, अजय बोरस्ते, विनायक खैरे, पंडितराव खैरे आदी अनेक नगरसेवकांनीही प्रसंगोपात आमदार व्हायचे स्वप्न बघितले; परंतु त्यांना यशाने हुलकावणी दिली. पैकी अशोक दिवे व पंडितराव खैरे यांनी तर महापौरपदही भूषविलेले आहे. मतदारसंघनिहाय उमेदवार… नाशिक पश्चिम: सवांधिक चार माजी नगरसेवक शिवसेना ठाकरे गट: सुधाकर बडगुजर (माजी सभागृहनेते) भाजप: सीमा हिरे (विद्यमान आमदार, माजी नगरसेविका) मनसे: दिनकर पाटील (माजी सभागृहनेते) स्वराज्य पक्ष: दशरथ पाटील (माजी महापौर) नाशिक मध्य मतदारसंघ एक महापौर आणि उपमहापौर समोरासमोर भाजप: प्रा. देवयानी फरांदे (विद्यमान आमदार, माजी उपमहापौर) ठाकरे गट: वसंत गिते (नगरसेवक, माजी महापौर व माजी आमदार) समाजवादी पक्ष मुशीर सैय्यद (माजी नगरसेवक) नाशिक पूर्व नगरसेवक, स्थायी समिती सभापतीत सामना भाजप: अॅड. राहुल ढिकले (विद्यमान आमदार, माजी नगरसेवक, माजी सभापती) राशप: गणेश गिते (स्थायी समिती माजी सभापती) देवळाली: राष्ट्रवादी अजित पवार सरोज अहिरे (विद्यमान आमदार, माजी नगरसेवक) ०००००

माझी बॅग तुझ्याकडेच देतो, मात्र त्यातील कपडे चोरू नको

उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला धाराशिव : आज सलग दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंची बॅग औसा येथे हेलिपॅडवर तपासणी करण्यात आली. याचा संताप उद्धव ठाकरेंनी लोहारा येथील प्रचार सभेत एकनाथ शिंदेंवर जहरी टीका करीत…

मविआ देणार महिलांना खटाखट दरमहा ३ हजार

राहुल गांधींचे गोंदीयात वचन गोंदिया : देशातील काही उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्जमाफ करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ११ वर्षांत एकाही शेतकऱ्याची कर्जमाफी का केला नाही? मोदी हे अदानी-अंबानींचे आहेत, ते अंबानीच्या…

महाविकास आघाडी म्हणजे भ्रष्ट्राचाराचे खिलाडी- मोदी

चंद्रपुर : महाविकास आघाडी हा भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा खिलाडी आहे असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शरद पवार यांचा पक्ष महाराष्ट्राच्या विकासात अडथळा आणत असल्याचा आरोपही…

एकनाथ शिंदेंची राणा दाम्पत्याला ताकीद

महायुतीत राहून विरोधात काम करु नका अमरावती : अमरावतीमधल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी खासदार नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्याला सक्त ताकीद दिली. ऐन निवडणुकीत राणा दाम्पत्य आणि विरोधकांमधील वाद उफाळून आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

नाशिक, मालेगावातील १६७६ मतदान केंद्रांवरील घडामोडींचे थेट प्रक्षेपण

हरिभाऊ लाखे नाशिक : नाशिक आणि मालेगाव महापालिका हद्दीतील सर्व १६७६ मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करून घडामोडींचे थेट प्रक्षेपण (वेबकास्ट) करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सहा संवेदनशील तसेच पोलीस आणि प्रत्येक विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी जी केंद्रे संवेदनशील म्हणून निश्चित करतील, तिथेही व्यवस्था केली जाणार आहे. ग्रामीण भागातील निम्म्या मतदारसंघात सीसी टीव्ही यंत्रणा असणार आहे. १५ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला जिल्ह्यातील ४९२६ केंद्रांवर मतदान होणार आहे. निवडणूक यंत्रणेने तयारीला वेग दिला आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, शौचालय, वाहनतळ, खुर्ची आदींची व्यवस्था करण्याची सूचना जिल्हा परिषद व महापालिकेला करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून मतदान केंद्रांवर लक्ष ठेवले जाणार आहे. नाशिक शहरात ११७९ मतदान केंद्रे असून मालेगाव शहरात ही संख्या ४९७ इतकी आहे. शहरी भागातील सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसविली जाईल. येथील घडामोडींचे थेट प्रक्षेपण होणार असल्याने प्रत्येक मतदारसंघातील मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून नजर ठेवली जाईल. ग्रामीण भागातील ५० टक्के मतदान केंद्रात ही व्यवस्था कार्यान्वित केली जाईल, असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांंनी नमूद केले. ग्रामीण भागात १६२६ केंद्रांवर सीसी टीव्ही बसवून थेट. प्रक्षेपणाचे नियोजन करण्यात येणार आहे. मतदारसंघनिहाय केंद्र नांदगाव (१७२), मालेगाव मध्य (३४४), मालेगाव बाह्य (२५३), बागलाण (१४४), कळवण (१७४), चांदवड (१५३), येवला (१६४), सिन्नर (१६९), निफाड (१३९), दिंडोरी (१८७), नाशिक पूर्व (३३१), नाशिक मध्य (३०३), नाशिक पश्चिम (४१३), देवळाली (२०६), इगतपुरी (१५०) या केंदांवरील घडामोडींचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

एक लाख मराठ्यांसह जरांगे उपोषण करणार

बीड: मराठा समाजाने आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना निवडणुकीत पाडावे, असा आदेश जरांगे पाटील यांनी दिल्यानंतर आज त्यांनी आता एक मराठा लाख मराठा सिध्द करण्यासाठी एक लाख मराठ्यांसह आरक्षणासह उपोषण करणार असल्याची घोषणा केली…

शिवरायांचा भगवा दरोडेखोरांच्या हाती शोभून दिसत नाही – उद्धव ठाकरे

बुलढाणा : ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी निष्ठावान मावळे तयार केले. शिवरायांनी त्यांच्या हाती निष्ठेचा भगवा झेंडा दिला, भगवा हा निष्ठेचा प्रतिक आहे,तो मावळ्यांच्या हातात शोभून दिसतो, दरोडेखोरांच्या हातात नाही. चाळीस जणांची टोळी आली अन् आपल्या पक्षावर…

उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत आग लावणारी : एकनाथ शिंदे

धाराशिव : ‘धनुष्यबाण आमचा आहे, असं म्हणणाऱ्यांनी आपली मशालसुद्धा आता दुसऱ्याच्या हातात देऊन टाकली आहे. ठाकरेंची मशाल ही क्रांतीची मशाल नाही, तर ती घराघरात आणि समाजासमाजात आग लावणारी मशाल आहे. गेल्या अडीच अडीच वर्षांच्या काळातील…