Category: महाराष्ट्र

Maharashtra News

अब्दुल सत्तारांच्या मंदिरप्रवेशावर वाद

अब्दुल सत्तारांच्या मंदिरप्रवेशावर वाद भाजपा समर्थक तरुणांनी मंदीर गोमुत्रांनी शुद्ध केले सत्तांरांनी हवं तर धर्मांतर करून हिंदू व्हावे भाजपाची मागणी सिल्लोड : शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी महाशिवरात्रीला शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन…

 नाशिकमध्ये भाजप बंडखोर आणि मनसेला सत्तेची लॉटरी

नाशिकमध्ये भाजप बंडखोर आणि मनसेला सत्तेची लॉटरी स्थायी समितीत मिळाले स्थान! हरिभाऊ लाखे नाशिक: महापालिकेच्या तिजोरीची चावी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीत सोमवारी राजकीय पक्ष व आघाडीच्या तौलानिक बळानुसार १६ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. भाजपने महापौर व उपमहापौरपदाच्या स्पर्धेतील काहींना स्थायीवर संधी दिली. अपक्ष विजयी झालेल्या मुकेश शहाणे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाशी आघाडी करीत तर, मनसेच्या एकमेव नगरसेविका मयुरी पवार यांनी शिवसेना शिंदे गटाशी आघाडी करीत स्थायीत प्रवेश मिळवला. महापालिका निवडणूक शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्रित लढले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट त्यांच्याबरोबर होता. निकालानंतर मनसे शिवसेना शिंदे गटाशी हातमिळवणी करीत एकप्रकारे सत्तेत सहभागी झाली. तर भाजपचे बंडखोर मुकेश शहाणे हे अजित पवार गटाने आधीच दिलेल्या पाठिंब्यामुळे अप्रत्यक्षपणे सत्तेत सहभागी झाले. या समीकरणांनी बहुमतात असणाऱ्या भाजपला स्थायीत अधिक बळ मिळणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यामुळे महापौर, उपमहापौरांबरोबर स्थायी समिती व सभापतीला विशेष महत्व आले आहे. सदस्य पदांसाठी सत्ताधारी भाजपमध्ये मोठी स्पर्धा होती. महापौर व उपमहापौर निवडणूक झाल्यानंतर सर्वांचे लक्ष स्थायी सभापतीपदाकडे आहे. २२ सदस्यांच्या पालिकेत ७२ जागा मिळवणाऱ्या भाजपकडे पूर्ण बहुमत आहे. अखेरच्या क्षणी राज्यातील मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटाला भाजपने उपमहापौरपद देत बरोबर घेतले. राष्ट्रवादी अजित पवार गटाने भाजपला यापूर्वीच पाठिंबा दिलेला आहे. पालिकेत शिवसेना शिंदे गट (२६), राष्ट्रवादी अजित पवार गट (चार), ठाकरे गट (१५), काँग्रेस (तीन), मनसे आणि अपक्ष प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे. विविध समित्यामध्ये अधिकतम प्रतिनिधित्व मिळविण्यासाठी अन्य राजकीय पक्षांनी समीकरणे जुळवली. महापालिकेत ७२ जागा मिळवणाऱ्या भाजपचे नऊ, शिवसेना शिंदे गट मनसेच्या गटाला चार, शिवसेना ठाकरे गट- काँग्रेस आघाडीला दोन, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि् अपक्ष आघाडीच्या एका सदस्याला संधी मिळाली. महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडून पक्षनिहाय सदस्यांची नावे जाहीर झाली. भाजपने महापौर पदाच्या स्पर्धेतील माधुरी बोलकर आणि दीपाली कुलकर्णी तसेच उपमहापौर पदाच्या निवडणुकीत ऐनवेळी माघार घ्यावे लागलेले मच्छिंद्र सानप यांच्यासह नितीन निगळ, पल्लवी गणोरे, इंदुबाई खेताडे, आदिती पांडे, सरिता सोनवणे, जयश्री गायकवाड यांची स्थायीवर नियुक्ती केली. शिवसेना शिंदे गट-मनसे आघाडीकडून मनसेच्या मयुरी पवार, शिंदे गटाच्या किरणताई गामणे, राहुल दिवे आणि रंजना बोराडे, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस आघाडीच्या भारती ताजनपुरे आणि योगेश गाडेकर तसेच राष्ट्रवादी अजित पवार गट आणि अपक्ष आघाडीचे मुकेश शहाणे यांची अशा एकूण १६ जणांची स्थायी समितीत सदस्य म्हणून नियुक्ती झाली. आघाडी केल्यामुळे अपक्ष निवडून आलेल्या मुकेश शहाणे यांची लॉटरी लागली. अजित पवार गटाने आधीच भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. मनसेही सत्तेत सहभागी महापालिका निवडणूक शिवसेना ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसने एकत्रित लढली होती. ठाकरे गटाला १५ तर मनसेला एक जागा मिळाली. निकालानंतर समीकरणे बदलली. शिवसेना शिंदे गटाने मनसेला सोबत घेऊन पालिकेत गट स्थापन केला. भाजपने मित्रपक्ष शिंदे गटाला सत्तेत बरोबर घेतले. विलास शिंदे उपमहापौर होऊन शिंदे गट सत्तेत सहभागी झाला. दुसरीकडे शिंदे गट आणि मनसेची आघाडी आहे. शिंदे गटाने या पक्षाच्या नगरसेविका मयुरी पवार यांना स्थायीत संधी दिली. या राजकीय समीकरणांनी नाशिक पालिकेत भाजप-शिवसेना शिंदे गटाबरोबर एकप्रकारे मनसेचाही समावेश झाला आहे. एकत्रित निवडणूक लढणाऱ्या ठाकरे गटाने मनसे व काँग्रेसला सोबत घेऊन एकत्रित आघाडी स्थापन करण्याचा आग्रह धरला होता. परंतु, मनसेने शिंदे गटासोबत आघाडी केली. या संदर्भात वरिष्ठ नेत्यांना आधीच माहिती दिल्याचे ठाकरे गटातील पदाधिकारी सांगतात. तर मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी स्थानिक पातळीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे.

 सिंधुदुर्गात ७० ग्रामपंचायतींवर आता प्रशासक…!

सिंधुदुर्गात ७० ग्रामपंचायतींवर आता प्रशासक…! मुदत संपली, निवडणुकीची प्रतिक्षा.! सिंधुदुर्ग – राजन चव्हाण जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने आता त्यावर प्रशासक नेमण्यात आले आहे. १० व ११ फेब्रुवारी रोजी या ग्रामपंचायतीची…

टिपू सुलतानवरून पुण्यात भाजपा-काँग्रेसचा राडा

टिपू सुलतानवरून पुण्यात भाजपा-काँग्रेसचा राडा दगडफेकीत एकमेकांची डोकी फोडली पुणे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर तुलना करणारे वक्तव्य केल्यानंतर राज्यभर भाजपाने जोरदार…

  राष्ट्रीय रोइंग स्पर्धेत ‘एमआयटी एडीटी’च्या भाग्यश्री घुलेची सुवर्ण कमाई

राष्ट्रीय रोइंग स्पर्धेत ‘एमआयटी एडीटी’च्या भाग्यश्री घुलेची सुवर्ण कमाई आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या राष्ट्रीय सराव शिबिरासाठी निवड पुणे : आर्मी रोइंग नोड येथे नुकत्याच झालेल्या ४३व्या वरिष्ठ राष्ट्रीय रोईंग अजिंक्यपद स्पर्धेत…

 “सुनेत्रा पवार यांना काम समजून घेऊ द्या, मग काय करायचे ते…”

“सुनेत्रा पवार यांना काम समजून घेऊ द्या, मग काय करायचे ते…” छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया चर्चेत… हरिभाऊ लाखे नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनानंतर अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाची दररोज चर्चा सुरु आहे. अखेर शनिवारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी यापुढे विलिनीकरणाचा विषय आमच्याकडून बंद, असे सांगण्याची वेळ आली. परंतु, त्याच दिवशी नाशिकमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनीही दोन्ही राष्ट्रवदींच्या विलिनीकरणाविषयीच भाष्य केले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयीही त्यांनी मत व्यक्त केले. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण आणि सुनेत्रा पवार हे दोन विषय यापुढेही चर्चेत राहणार आहेत. महायुतीत सत्तेत असलेले राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्युनंतर अजित पवार गटाची धुरा आता कोणाकडे, असा प्रश्न प्रथम उपस्थित करण्यात येऊ लागला होता. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाशिवाय आता पर्याय नसल्याचा एक विचार पुढे आला. त्याविषयी दोन्ही बाजूकडील एकेका नेत्याच्या दररोज प्रतिक्रिया पुढे येऊ लागल्या. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून अजितदादा विलिनीकरणाविषयी आग्रही होते, असे सांगण्यात येऊ लागले. तर, अजित पवार गटाच्या नेत्यांकडून विलिनीकरणाविषयी अजितदादांनी कोणतीच चर्चा केली नव्हती, असा दावा करण्यात येऊ लागला. त्यामुळे या प्रकरणात नेमकी कोणाची बाजू खरी, हे सामान्य कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना समजेनासे झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या मुखपत्रात एक लेख लिहिला. त्यात दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण झाल्यानंतर पक्षाचे नेतृत्व अजितदादांकडेच जाणार होते, असा दावा केला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी, अजित पवार हे स्वत: विलिनीकरणाची अधिकृत घोषणा १२ फेब्रुवारीला करणार होते, असा दावा याआधीच केला होता. दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया दररोज पुढे येत असल्याचे दिसते. विलिनीकरणाच्या चर्चेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनीही उडी घेतली आहे. नाशिक येथे शनिवारी माध्यमांशी छगन भुजबळ यांनी विलिनीकरणाच्या विषयावर प्रतिक्रिया दिली. रोज विलिनीकरणाची चर्चा का होत आहे, हे आपणास कळत नसल्याचे त्यांनी सांगितले. विलिनीकरण आजही करता येईल. एक महिन्याने, दोन महिन्यांनी करता येईल. त्यासाठी घाई करण्याचे कारण काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विलिनीकरणाच्या विषयावर कोण काय म्हणाले, याविषयी मोघमपणे बोलण्यात काही अर्थ नाही. आता नवीन कॅप्टन त्यासंदर्भात काय ते बघतील. आमदारांची बैठक घेतील. हा म्हणतो, तो म्हणतो म्हणून घाई का करत आहात ? पक्ष संघटना सगळे मिळून तयार होते, पक्ष बनतो. पक्ष म्हणजे बोर्ड आहे का, ऑफिस आहे का, असे प्रश्न उपस्थित करीत भुजबळ यांनी काम करणारे कार्यकर्ते मिळून संघटना, पक्ष तयार होतो. ते सगळे बसून विचार करतील, असे सांगितले. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्यानंतर आता लवकरच आम्ही त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करणार आहोत. यानंतर पक्षातील प्रमुख लोक विलीनीकरणाबाबत चर्चा करण्यासाठी ज्या नेत्यांना बोलावतील त्यांच्याशी चर्चा होईल. आता नवीन कॅप्टन आल्या आहेत. त्यांना बसू द्या, काम समजून घेऊ द्या. मग काय करायचे ते बघू, असे मंत्री भुजबळ यांनी नमूद केले.

 माणिकराव कोकाटेंनंतर आता नरहरी झिरवळ अडचणीत;

माणिकराव कोकाटेंनंतर आता नरहरी झिरवळ अडचणीत; लाचखोरीच्या आरोपावर मंत्र्यांचं मोठं विधान! हरिभाऊ लाखे नाशिक : बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेतल्याच्या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्यानंतर नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित…

आंबा पीक धोक्यात : नुकसान भरपाईसाठी देवगडचे आंबा बागायतदार एकवटले…!

आंबा पीक धोक्यात : नुकसान भरपाईसाठी देवगडचे आंबा बागायतदार एकवटले…! 18 फेब्रुवारीला जामसंडे येथे मेळावा…! देवगड (प्रतिनिधी )– बदलते हवामान हवामान आणि कीड- रोगांचा अनियंत्रित प्रादुर्भाव त्यामुळे यंदा हापूस आंबा…

परभणी महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचा मुस्लीम महापौर

परभणी महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचा मुस्लीम महापौर परभणी : परभणी महानगरपालिकेच्या महापौरपदी अखेर काँग्रेसच्या मदतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मुस्लिम महापौर विराजमान झाला. आज पार पडलेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सय्यद इकबाल सय्यद…

आता प्रत्येकी पाच कोटी रुपये खर्चून बाल, युवा, महिला साहित्य संमेलन

आता प्रत्येकी पाच कोटी रुपये खर्चून बाल, युवा, महिला साहित्य संमेलन मुंबई : मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम व योजना राबवण्यास सुरुवात केली…