Category: महाराष्ट्र

Maharashtra News

संविधानामुळे मी मंत्री झालो याची सदैव जाणीव – पालकमंत्री उदय सामंत

अशोक गायकवाड   रत्नागिरी : ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच मी मंत्री झालो, याची सदैव मला जाणीव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्यभिषेक सोहळ्यास रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून…

पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई –  उदय सामंत

अशोक गायकवाड   रत्नागिरी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना महिलांच्या उन्नतीसाठी आणि त्यांना सक्षम करणारी आहे. ७२ तासात प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावीत. पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला…

‘बदलापूरा’चा तपास सीआयडी करणार

स्वाती घोसाळकर मुंबई: बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या वासनांध अक्षय शिंदेचा पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरचा तपास आता सीआयडी करणार आहे. अक्षय शिंदेचे एन्काऊंटर झाल्यावर आज एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी…

बदलापूरचा वासनांध अक्षय शिंदेचा एनकाऊंटर

पोलिसांनी तीन गोळ्या ठोकल्या एनकाऊंटर बोगस असल्याचा विरोधकांचा आरोप ठाणे : बदलापूरच्या शाळेतील चिमुरड्या मुलिंवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या वासनांध अक्षय शिंदेचा पोलिसांनी एनकाऊंटर केला. पोलिस व्हॅनमध्येच पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावर…

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा

नवी दिल्ली, दि. 23 : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे  अधिकारी 26 ते 28 सप्टेंबर  दरम्यान मुंबई  दौ-यावर  येणार आहेत. 27 सप्टेंबर रोजी आयोगाच्या अधिकाऱ्यांची  विविध राजकीय पक्ष, एसपीएनओ, नोडल…

महाराष्ट्र राज्य अॅथलेटिक्स स्पर्धा

ठाण्याच्या शौर्या अंबुरेची विशेष कामगिरी   पुणे- महाराष्ट्र राज्य अॅथलेटिक्स स्पर्धा यावर्षी पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे १९ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान घेण्यात आल्या .  या वर्षीच्या क्रीडा स्पर्धेत ठाण्याच्या शौर्या अंबुरे हिने क्रीडाप्रेमींचं विशेष  लक्ष वेधून घेतलं . शौर्या हिने १६ वर्षाखालील मुलींच्या ६० मी धावणे या शर्यतीमध्ये ७.५८ सेकंदाचा नवीन विक्रम नोंदवून सुवर्णपदक पटकावले . यापूर्वीचा राज्य विक्रम ७.९५ सेकंद असून राष्ट्रीय विक्रम ७.७७ सेकंद इतका आहे.  तसेच ८०मी अडथळा शर्यतीत सुद्धा शौर्या हिने ११.४७ सेकंदाचा नवा राज्य विक्रम नोंदवून सुवर्णपदक पटकावले. यापूर्वीचा राज्य विक्रम ११.७६ सेकंद आहे व राष्ट्रीय विक्रम ११.५ सेकंद इतका आहे .  ठाण्याच्या शौर्याने एकापाठोपाठ एक असे दोन विक्रम नोंदवल्याने सर्व क्रीडाजगतामध्ये  तिचे कौतुक होत आहे . शौर्या ही ठाण्याच्या universal high शाळेची विद्यार्थिनी असून ती ज्येष्ठ क्रिडा प्रशिक्षक अजित कुलकर्णी सरांकडून त्यांच्या Aim Sports and Fitness अकॅडमी मध्ये गेली ८ वर्ष प्रशिक्षण घेत आहे.  प्रशिक्षक अजित कुलकर्णी सरांनी आतापर्यंत अनेक जागतिक स्तरावरचे खेळाडू घडवले आहेत व त्यांच्या Aim Sports foundation च्या माध्यमातून ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी विविध क्रीडा उपक्रम राबवत असतात.

प्लास्टिक मुक्त माथेरान केव्हा होणार ?

 स्थानिकांसमोर यक्षप्रश्न ! माथेरान : माथेरान मध्ये बहुतेक ठिकाणी प्लास्टिकजन्य कचरा इतस्ततः विखुरलेल्या अवस्थेत दिसत असून स्वच्छ माथेरान, हरित माथेरान,सुंदर माथेरान ही बिरुदावली हळूहळू लोप पावत चाललेली असल्याने या नयनरम्य पर्यटनस्थळाची प्रतिमा काही वर्षांपासून इथे वाढत चाललेल्या वस्तीमुळे त्याचप्रमाणे जिकडेतिकडे पॉईंट तसेच रस्त्याच्या बाजूला नजर जाईल तिकडे टपऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत त्यामुळे प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या तसेच रॅपेर्स पाकीट जंगलात कुठेही टाकली जात आहेत.यामुळे या गावाच्या भविष्यातील पर्यटनाबाबत स्थानिकांना यक्षप्रश्न पडलेला दिसत आहे.अनेक ठिकाणी कचराकुंड्या नसल्याने जंगलात आणि नागरी वस्तीत सुध्दा मोठया प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन कामी दरवर्षी जवळपास एक करोड रुपयांपेक्षाही अधिक खर्च केला जात आहे. परंतु या व्यवस्थापन ठेकेदाराचे कामगार खरोखरच आत्मीयतेने आपल्या कामाला न्याय देतात का हा सुद्धा प्रश्न स्थानिकांना सतावतो आहे. प्लास्टिक जन्य कचऱ्यामुळे अनेक झाडे दगावत असून याचा पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. झाडी हळुहळु लोप पावत असल्याने इथला हवेतील गारवा पूर्णपणे संपुष्टात आल्याने याठिकाणी बाराही महिने पंखा लावल्याशिवाय राहणे कठीण बाब बनली आहे.इथल्या पर्यटन वाढीच्या विकास कामाला आडकाठी आणणाऱ्या पर्यावरण वाद्यांना या बाबी निदर्शनास येत नाहीत परंतु भूमिपुत्रांच्या न्याय हक्कावर, त्यांच्या स्वातंत्र्यावर, मूलभूत सेवासुविधा तसेच अत्यावश्यक गरजेच्या सोयींवर गदा आणण्यासाठी मुंबई स्थित पर्यावरण वाद्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे का ? असाही प्रश्न युवा वर्गातून उपस्थित केला जात आहे.घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराचे कामगार नियोजित कामे पूर्ण करीत नसतील तर अशा ठेक्यासाठी करोडो रुपये नाहक खर्च का केला जात आहे. यापेक्षा येथील जे कुणी सुशिक्षित बेरोजगार युवक आहेत ज्यांना खरोखरच या गावाविषयी तळमळ आहे आपले गाव कायमस्वरूपी हरित सुंदर आणि स्वच्छ असावे ही मनोवृत्ती ज्या होतकरू युवकांमध्ये आहे अशाना हा ठेका सुपूर्द करण्यात यावा जेणेकरून नगरपरिषदेची आर्थिक बचत आणि हा सर्व पैसा गावात राहू शकतो असेही स्थानिकांमधून बोलले जात आहे. घनकचरा व्यवस्थापन कामे असोत किंवा नगरपरिषदेच्या कायम असणाऱ्या कामगार वर्गाची स्वच्छता बाबतीत कामे असोत ही सर्व नियोजन पद्धतीने केली जात आहेत की नाही त्याचप्रमाणे हे सर्वच कामगार स्वेच्छेने कामात पुढाकार घेत आहेत की फक्त पगारापूरता कामे करत आहेत यावर अंकुश राहण्यासाठी कार्यक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक शासनाने करणे गरजेचे आहे अन्यथा ह्या स्थळावर भविष्यात कुणीही फिरकणार नाही याचा फटका स्थानिकांनाच सोसावा लागणार आहे. स्वच्छतेच्या बाबतीत नगरपरिषदेप्रमाणे वनखात्याची, वन संरक्षण समितीची सुध्दा जबाबदारी आहे. ही वनसंपदा टिकून राहण्यासाठी या खात्यानी बारकाईने लक्ष केंद्रित करून माथेरान मधील विविध ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा तारेचे कंपाउंड केल्यास खऱ्या अर्थाने वृक्ष जतन केले जाऊ शकते अन्यथा हे स्थळ कायम हरित राहील याची शाश्वती देता येणार नाही असा जेष्ठ नागरिकांमधून सूर ऐकावयास मिळत आहे.

स्वच्छता सायक्लॉथॉनमध्ये 500 हून अधिक सायकलपटूंचा सहभाग

नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनीही सायकल चालवित घेतला प्रत्यक्ष सहभाग स्वच्छतेप्रमाणेच पर्यावरणहिताय उपक्रमांवरही ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भर देण्यात येत असून ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ अभियानांतर्गत नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आयोजित करण्यात आलेली ‘स्वच्छता सायक्लोथॉन’ 500 हून अधिक सायकलपटूंच्या सहभागाने यशस्वीरित्या संपन्न झाली. विशेष म्हणजे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी स्वत: सायकल चालवित या उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी होऊन स्वच्छता व पर्यावरणाचा संदेश प्रसारित केला. नमुंमपा मुख्यालयाच्या आयकॉनिक इमारतीपासून सुरू झालेली ही स्वच्छता सायक्लोथॉन मुख्यालयासमोरील सर्व्हिस रोडवरून पामबीच मार्गाने टीएसचाणक्य चौकापर्यंत गेली व तिथून वळून पुन्हा पामबीच रस्त्याने मुख्यालयासमोर सायक्लोथॉनची सांगता झाली. या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश प्रसारित करण्यात आला तसेच सायकलसारख्या इंधनविरहित वाहनाचा वापर वाढवून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचे तसेच स्वआरोग्य जपणुकीचे महत्वही प्रसारित करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, माजी आमदार संदीप नाईक, प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व डॉ.संतोष वारूळे, सहा.आयुक्त डॉ.अमोल पालवे व शशिकांत तांडेल, कार्यकारी अभियंता राजेश पवार व इतर मान्यवर आणि सायकलपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयुक्त महोदयांसमवेत उपस्थितांनी स्वच्छतेची सामुहिक शपथ घेऊन प्रारंभ झालेल्या या स्वच्छता सायक्लोथॉनमध्ये सहभागी सायकलपटूंना सहभाग पदके देऊन सन्मानीत करण्यात आले. 7 वर्षांच्या लहानग्या सायकलपटूपासून 68 वर्षांपर्यंतचे 500 हून अधिक सायकलपटू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये सहभागी महिला सायकलपटूंची संख्याही लक्षवेधी होती. लेट्स सेलिब्रेट फिटनेस आणि द लर्नयार्ड या संस्थांच्या सहयोगाने आयोजित या सायक्लोथॉनव्दारे स्वच्छता व पर्यावरण संरक्षणाचा संदेश प्रसारित करण्यासोबतच सायकल सारखे वाहन चालवून प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी असाही संदेश देण्यात आला. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत सोमवार, दि. 23 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7 वा. महापालिका क्षेत्रातील रेल्वे स्टेशन्सची सखोल स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली असून मंगळवार, 4 सप्टेंबरला सकाळी 8 वाजल्यापासून मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती अर्थात एपीएमसीच्या सर्व मार्केट्समध्ये सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी याप्रसंगी उपस्थित राहून सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कपिल पाटील यांचे शहापूरला जादा पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे शहापूर : नागरीकरण वेगाने होणाऱ्या शहापूर शहराला जादा पाणीपुरवठा होण्यासाठी भातसा नदीतून वाढीव आरक्षण मंजूर करण्यासाठी माजी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांच्याकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले असून, शहापूरवासियांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शहापूरमधील वाढत्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी नगरपंचायतीमार्फत नवी पाणीयोजना साकारण्यात आली आहे. मात्र, भातसा नदीवरुन शहापूर शहरासाठी पाणी आरक्षण कमी असल्यामुळे नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा गायत्री भांगरे, उपनगराध्यक्ष विजय भगत, भाजपाचे शहराध्यक्ष विवेक नार्वेकर, मुख्याधिकारी शिवराज गायकवाड यांच्यासह नगरसेवकांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची काल शुक्रवारी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी शहरासाठी वाढीव पाणीआरक्षण मंजूर करण्याची विनंती केली. सध्या शहापूर नगरपंचायत क्षेत्रासाठी भातसा धरणातून १.१८६ दशलक्ष घन मीटर पाणी आरक्षण मंजूर केलेले आहे. शहरात प्रती माणशी दैनंदिन १३५ लिटर वापर गृहीत धरला आहे. तर वाढत्या लोकसंख्येनुसार भातसा नदीवरुन ३.१२५ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षण देण्याचा प्रस्ताव नगरपंचायतीमार्फत जलसंपदा विभागाकडे सादर करण्यात आला आहे. भातसा नदीच्या क्षेत्रातील पाणी स्थानिक नागरिकांसाठी उपलब्ध करण्याची तरतूद आहे. त्यानुसार वाढीव पाणी आरक्षणासाठी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केला जात आहे. शहापूरमधील नागरिकांची पाण्याची गरज भागविण्यासाठी कटीबद्ध असून, आपण या विषयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करू. तसेच शहापूरवासियांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शहापूर नगरपंचायतीच्या शिष्टमंडळाला दिले. राज्यातील महायुती सरकारने सुरू केलेल्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत शहापूरमधील वाढत्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी नगर पंचायतीमार्फत नवी पाणीयोजना साकारण्यात आली. मात्र, भातसा नदीवरुन शहापूर शहरासाठी पाणी आरक्षण कमी असल्यामुळे नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा गायत्री भांगरे, उपनगराध्यक्ष विजय भगत, भाजपाचे शहराध्यक्ष विवेक नार्वेकर, मुख्याधिकारी  शिवराज गायकवाड यांच्यासह नगरसेवकांनी माझी काल शहापूर येथे भेट घेतली. तसेच शहरासाठी वाढीव पाणीआरक्षण मंजूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री व जलसंपदामंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे प्रयत्न करण्याची विनंती केली. या मागणीसंदर्भात फडणवीस जी यांच्याबरोबर संपर्क साधला असून, लवकरच हा प्रश्न सुटेल. तसेच शहापुरातील प्रत्येक घरात पुरेसे पाणी उपलब्ध होईल.  

बुधवारी जिल्हा परिषद शाळा बंद

 शिक्षक संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा बदलापूर: शासनाच्या प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील चुकीच्या धोरणात विरोधात राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी शासनाविरोधात आंदोलनाचा निर्णय घेतला असून ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षक येत्या बुधवार, २५ सप्टेंबरला सामूहिक रजा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. त्यामुळे या दिवशी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद राहणार आहेत. १५ मार्च रोजी शिक्षक संच मान्यता आणि ५ सप्टेंबरच्या कंत्राटीत शिक्षक भरती संदर्भातल्या शासन निर्णयामुळे २० पट असलेल्या शाळेमध्ये एक कायम तर एक कंत्राटी शिक्षक नेमला जाणार आहे. आधारवर संचमान्यता होत असल्याने दुर्गम भागात विद्यार्थी अधिक आहे. मात्र आधार नोंदणी नसल्याने अनेक शिक्षकांची पदे कमी होणार आहे. त्यामुळे शासनाचे हे धोरण डोंगरी दुर्गम भागातील तसेच वाडी- वस्तीवर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहेत. शासनाच्या या निर्णयाविरोधात विद्यार्थी, शिक्षक पालकांमध्ये असंतोष आहे. तसेच शिक्षकांच्या अनेक मागण्या देखील आहेत. या मागण्यांचा पाठपुरावा आणि शासकीय धोरणांचा विरोध करण्यासाठी सर्व शिक्षक संघटनांनी त्रिस्तरीय असहकार आंदोलन पुकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या बुधवारी ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद राहणार आहेत, अशी माहिती शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष संजय घागस यांनी दिली आहे. 000000