भाजपचे संकटमोचकच यंदा संकटात
– गिरीश महाजन विरुद्ध दिलीप खोडपे यांच्यात रंगणार सामना हरिभाऊ लाखे जामनेर : मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी राहिलेले दिलीप खोडपे यांनाच आपल्याकडे खेचत राष्ट्रवादी शरद पवार गटाने संकटमोचक गिरीश महाजन…
Maharashtra News
– गिरीश महाजन विरुद्ध दिलीप खोडपे यांच्यात रंगणार सामना हरिभाऊ लाखे जामनेर : मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी राहिलेले दिलीप खोडपे यांनाच आपल्याकडे खेचत राष्ट्रवादी शरद पवार गटाने संकटमोचक गिरीश महाजन…
– महाविकास आघाडीचा विजय निश्चित कणकवली :विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सिंधुदुर्गात धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे. गद्दारी विरुद्ध खुद्दारी असा सामना असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता गद्दारांना जागा दाखवतील आणि महाविकास आघाडीचे…
सातारा : २०१९ च्या लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तत्कालीन शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेल्या सभेमुळे मोदी लाट असतानाही उदयनराजे भोसले यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या सभेची आजही राज्यात चवीने चर्चा केली जाते. दरम्यान, आज शरद…
मंत्री महाजन, भुसे, भुजबळ, पाटील अडकले मतदारसंघात हरिभाऊ लाखे नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील ३५ जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीत अटीतटीच्या लढती रंगत असून, महायुती सरकारमधील सहा मंत्र्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. या मंत्र्यांवर ३५ जागांची जबाबदारी असतानाच यंदाच्या निवडणुकीत बदलत्या राजकीय वातावरणामुळे बड्या नेत्यांच्या मतदारसंघांत महाविकास आघाडीकडून तगडे उमेदवार रिंगणात उतरविण्यात आले आहेत. त्यामुळे ‘बिग फाइट’ रंगणाऱ्या या नेत्यांच्या मतदारसंघांतील वातावरण ‘टाइट’ झाले आहे. लोकसभेला उत्तर महाराष्ट्रातील वातावरण ‘मविआ’च्या बाजूने फिरल्याने हे नेते स्वतःच्याच मतदारसंघात अडकून पडले आहेत. मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, छगन भुजबळ, डॉ. विजयकुमार गावित, गुलाबराव पाटील आणि अनिल पाटील यांना स्वतःच्या जागा सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. उत्तर महाराष्ट्र भाजप आणि शिवसेनेचा गड राहिला आहे. गेल्या वेळेस विधानसभेतील ३५ पैकी २८ जागा महायुतीकडे होत्या. परंतु, लोकसभा निवडणुकीत येथील सहापैकी चार जागांवर महायुतीचा पराभव झाला. राज्यातील बदललेल्या राजकारणाचा, तसेच घटनाबदलाच्या मुद्याने महायुतीची दाणादाण झाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील ३५ जागांकडे राज्याचे लक्ष लागले आहे. उत्तर महाराष्ट्रात महायुती सरकारमधील सहा मंत्री असून, त्यात नाशिकमधून छगन भुजबळ, दादा भुसे, नंदुरबारमधून डॉ. विजयकुमार गावित, तर जळगावमधून गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, अनिल पाटील यांचा समावेश आहे. या सहा मंत्र्यांची प्रतिष्ठा सध्या पणाला लागली आहे. परंतु, हे सर्व मंत्री सध्या आपापल्या मतदारसंघातच अडकून पडले आहेत. महाविकास आघाडीचे तगडे उमेदवार, तसेच बंडखोर रिंगणात आल्याने सत्ताधारीविरोधात नकारात्मक वातावरण तयार होण्याची भीती लक्षात घेऊन सर्वजण कामाला लागले आहेत. महाविकास आघाडीचे मातब्बर नेते असलेले अक्राणीचे माजी मंत्री के. सी. पाडवी, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्यासमोरही यंदा मतदारसंघात कडवे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे या आजी-माजी मंत्र्यांना आपल्या जागा टिकविताना मोठी कसरत करावी लागत आहे. नंदुरबारमध्ये अटीतटी भाजपचे नेते तथा आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित १९९४ पासून सलग सहा वेळा नंदुरबार मतदारसंघातून निवडून येत आहेत. आता सातव्यांदा विधानसभेत जाण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असले, तरी त्यांना यंदा प्रथमच काँग्रेसच्या किरण तडवींकडून कडवे आव्हान मिळाले आहे. लोकसभेत कन्येचा पराभव झाल्यानंतर, तसेच चारही मतदारसंघांत गावित कुटुंबातील व्यक्ती उभ्या असल्यामुळे त्यांच् विरोधात नकारात्मक वातावरण तयार झाले आहे. काँग्रेसला शिवसेना शिंदे गटानेही बळ पुरविल्याने नंदुरबारची लढाई आता अटीतटीची बनली आहे. ०००००
नंदुरबार : महायुतीने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पाठविले, पण महाविकास आघाडी सरकार आले तर महाराषट्रातूनही एकही उद्योग बाहेर जाऊ देणार नाही असा शब्द राहुल गांधी यांनी दिला. काँग्रेस मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी लोकसभेतील विरोधी…
जिंतूर : महाराष्ट्रातील सर्व विभागात जाऊन आलो. येत्या २३ तारखेला महाराष्ट्रात मोदींच्या नेतृत्वात पुन्हा महायुतीचे सरकार बनणार आहे”, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. ते परभणीत भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलत होते. अमित…
कणकवली : महाराजांचा पुतळा पडल्यानंतर आणखी काहीतरी चांगलं होईल, असं इथला दिवटा म्हणाला. यांना जोडे नाही मारायचे तर काय करायचं? महाराजांचा पुतळा पडल्यानंतर त्यातून काही चांगलं होईल म्हणतोस तू? महाराजांचा पुतळा पडला म्हणून चांगलं होणार नाही. केसरकर…
गुहागर : “शिवसेनेच्या नेत्यांनी रामदास कदम यांना नजरकैदेत ठेवावे किंवा मनोरुग्णालयात ठेवावे”, अशी मागणी भाजपच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांकडे केली आहे. ऐन निवडणूक काळात गुहागरमध्ये महायुतीमध्ये पुन्हा एकदा नाराजी नाट्य बघायला मिळत आहे.…
नाशिकचे अकरा माजी नगरसेवक उतरले रिंगणात हरिभाऊ लाखे नाशिक : राज्याच्या जाण्यासाठी विधिमंडळात महापालिकेतील नगरसेवकपद ही पहिली पायरी समजली जाते. त्यामुळे ही पायरी उत्तीर्ण झालेले अनेक नगरसेवक सध्या आमदारकीच्या रिंगणात उतरले आहेत. महापालिका हद्दीत चार विधानसभा मतदारसंघ येत असल्यामुळे महापालिका क्षेत्रातील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह माजी नगरसेवकांमध्येही आमदार होण्यासाठी स्पर्धा आहे. शहरातील चारही मतदारसंघाचे विधिमंडळात नेतृत्व करणाऱ्या आमदारांचा राजकीय प्रवास ‘व्हाया नगरसेवक आमदार असा राहिला आहे. त्यामुळे आताही चार मतदारसंघांत तब्बल अकरा माजी नगरसेवक आमदारकीसाठी आपले नशीब आजमावत आहेत. नाशिक महापालिका क्षेत्रात नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम या तीन विधानसभा मतदारसंघांसह देवळाली मतदारसंघाचा अर्धा भाग येतो. त्यामुळे या तीनही मतदारसंघांवर शहरी प्रभाव आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातून रोजगारासाठी स्थायिक झालेल्यांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे या तीन मतदारसंघांसाठी होणाऱ्या बहुतांश आमदारांचा प्रवास हा व्हाया नगरपालिका, महापालिका असा झालेला आहे. नगरसेवक म्हणून राजकीय कारकीर्द गाजवल्यानंतर आणि लोकांशी संपर्क वाढल्यानंतर थेट आमदारकीवरच दावा केला जातो. महापालिकेचा प्रभाग मोठा असल्यामुळे येथून जनसंपर्क वाढवून पदाधिकारी आमदारकीसाठी निवडणुकीच्या रिंगणात पोहचतात. चार सदस्यीय प्रभाग हा मिनी विधानसभेचाच मतदारसंघ होतो. त्यामुळे विधानसभेत जाण्यासाठी नगरसेवक ही आता पहिली पायरी बनली आहे. विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून, प्रचाराला जोर आला आहे. येत्या २० तारखेला मतदान होत असून, त्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यंदा या चार मतदारसंघांमध्ये पालिकेत काम केलेले नगरसेवकच प्रचारात दिसत आहेत. शहरातील चारही मतदारसंघांमध्ये दहा माजी नगरसेवक आमदार होण्यासाठी प्रचारात फिरत आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील लढती चुरशीच्या बनल्या आहेत. वावरे, काठे, ढिकले, बच्छावही होते नगरसेवक नाशिक महापालिकेत नगरसेवक, पदाधिकारी म्हणून काम केलेल्या अनेक दिग्गजांनीही नगरसेवकांनंतर आमदारकी, खासदारकी आणि मंत्रीपदावर काम केलेले आहे. चांदवडचे विद्यमान आमदार व उमेदवार डॉ. राहूल आहेर यांनीदेखील नाशिक महापालिकेत नगरसेवक म्हणून उमेद्वारी केल्यानंतरच ते आमदार झाले. शांतारामबापू वावरे, अॅड. उत्तमराव ढिकले, गणपतराव काठे, डॉ. शोभा बच्छाव यांनीही नगरसेवक पदापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. शांताराम बापू वावरे यांनी तर नगरपालिकेत नगरसेवक झाल्यानंतर प्रथम आमदार व नंतर महापौरपदही भूषविले. गणपतराव काठेदेखील नगरसेवक झाल्यानंतर आमदार अन् पुन्हा महापालिकेत नगरसेवक झाले. अड. उत्तमराव ढिकलेची राजकीय कारकिर्द तर लक्षवेधक ठरली आहे. भूतपूर्व नाशिक नगरपालिकेचे नगराध्यक्ष, महापालिकेत नगरसेवक, महापौरपद भूषविल्यानंतर थेट लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर आमदारकीसाठी नशीच आजमावत निवडूनही आले. धुळ्याच्या विद्यमान खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा राजकीय प्रवासदेखील नगरसेवक, महापौर, आमदार आणि त्यानंतर राज्यमंत्रिपदापर्यंत राहिला आहे. बाळासाहेब सानप यांनी नगरसेवक, उपमहापौर व महापौर व आमदार अशी चढत्या भाजणीची पदे भूषविली आहेत. डॉ. हेमलता पाटील, रामदास उर्फ बाबा सदाफुले, शशी जाधव, अशोक दिवे, शाहू खैरे, अजय बोरस्ते, विनायक खैरे, पंडितराव खैरे आदी अनेक नगरसेवकांनीही प्रसंगोपात आमदार व्हायचे स्वप्न बघितले; परंतु त्यांना यशाने हुलकावणी दिली. पैकी अशोक दिवे व पंडितराव खैरे यांनी तर महापौरपदही भूषविलेले आहे. मतदारसंघनिहाय उमेदवार… नाशिक पश्चिम: सवांधिक चार माजी नगरसेवक शिवसेना ठाकरे गट: सुधाकर बडगुजर (माजी सभागृहनेते) भाजप: सीमा हिरे (विद्यमान आमदार, माजी नगरसेविका) मनसे: दिनकर पाटील (माजी सभागृहनेते) स्वराज्य पक्ष: दशरथ पाटील (माजी महापौर) नाशिक मध्य मतदारसंघ एक महापौर आणि उपमहापौर समोरासमोर भाजप: प्रा. देवयानी फरांदे (विद्यमान आमदार, माजी उपमहापौर) ठाकरे गट: वसंत गिते (नगरसेवक, माजी महापौर व माजी आमदार) समाजवादी पक्ष मुशीर सैय्यद (माजी नगरसेवक) नाशिक पूर्व नगरसेवक, स्थायी समिती सभापतीत सामना भाजप: अॅड. राहुल ढिकले (विद्यमान आमदार, माजी नगरसेवक, माजी सभापती) राशप: गणेश गिते (स्थायी समिती माजी सभापती) देवळाली: राष्ट्रवादी अजित पवार सरोज अहिरे (विद्यमान आमदार, माजी नगरसेवक) ०००००
उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला धाराशिव : आज सलग दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंची बॅग औसा येथे हेलिपॅडवर तपासणी करण्यात आली. याचा संताप उद्धव ठाकरेंनी लोहारा येथील प्रचार सभेत एकनाथ शिंदेंवर जहरी टीका करीत…