Category: महाराष्ट्र

Maharashtra News

 नाशिक महापालिकेची ऐतिहासिक वसुली

 मालमत्ता कर संकलनात २०० कोटींचा टप्पा पार   नाशिक : महापालिकेने डिसेंबर अखेरपर्यंत मालमत्ता कर वसुलीत प्रथमच २०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आजवरच्या इतिहासात नऊ महिन्यांत इतकी वसुली कधीही झालेली नाही. थकीत घरपट्टीच्या वसुलीसाठी महापालिकेने राबविलेल्या अभय योजनेतून ५० कोटींची वसुली झाली. कर संकलन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबरच्या अखेरीस मालमत्ता कर वसुलीत नऊ महिन्यात पहिल्यांदा २०२ कोटींचा गप्पा गाठला गेला. २०२४-२५ या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी २५० कोटींचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात हे लक्ष्य तेवढेच होते. तेव्हा डिसेंबरअखेरपर्यंत १५२ कोटींची वसुली झाली होती. यंदा मात्र आजवरचे सर्व विक्रम मोडून काढत वसुलीत लक्षणीय यश मिळाले. शहरातील सहा विभागात साडेपाच लाखहून अधिक मालमत्ता आहेत. मालमत्ता कराच्या २७२ कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने मध्यंतरी अभय योजना जाहीर केली. पहिल्या टप्प्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात थकबाकी एकरकमी भरणाऱ्यांना दंडातून ९५ टक्के माफी देण्यात आली. या योजनेतून ५० कोटींची वसुली झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. एप्रिल ते डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत मालमत्ता करापोटी २०२ कोटींचे संकलन करण्यात आले. मागील आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत एकूण २०७ कोटींची वसुली झाली होती. गतवर्षी याच काळात संकलित झालेल्या रकमेच्या तुलनेत ही वसुली ५० कोटींनी अधिक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. चालू आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यास तीन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे मालमत्ता कल संकलनाची आकडेवारी आणखी वाढणार आहे. 00000

यजमान सांगली, पुणे ग्रामीण, ठाणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड, रायगड, कोल्हापूर, परभणी यांची कुमार गटात विजयी सलामी

५१वी कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा सांगली: यजमान सांगली, पुणे ग्रामीण, ठाणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड, रायगड, कोल्हापूर, परभणी यांनी ५१व्या कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या…

– विवळवेढे उड्डाणपुलावर भीषण अपघात

– टँकर मधून रसायन गळती डहाणू: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विवळवेढे उड्डाणपुलावर सोमवार ३० डिसेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास रसायन वाहतूक करणाऱ्या टँकर ने सिमेंट पाईप घेऊन जाणाऱ्या ट्रेलरला धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. अपघातात टँकर फुटून मोठ्या प्रमाणत रसायनाची गळती झाली असून चालक टँकर मध्ये अडकला आहे. तर सिमेंट पाईप वाहून नेणाऱ्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातामुळे महामार्गावरील मुंबई वाहिनीवरील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती. दरम्यान स्थानिकांनी टँकर मध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पोलीस यंत्रणेला माहिती मिळाल्यानंतर काही वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चालकाला बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. वाहनांमधून मोठ्या प्रमाणात रसायन गळती झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान रसायन ज्वलनशील नसल्याची खात्री पटल्यानंतर नागरिकांनी वाहनजवळ जाऊन मदतकार्य सुरू केले आहे.

सोमवती अमावस्येनिमित्त गोदावरीच्या रामकुंडावर स्नानासाठी गर्दी

हरिभाऊ लाखे नाशिक : सोमवती अमावास्येला धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्व असून या वर्षाच्या यंदाची शेवटची सोमवती अमावस्या असून ती मार्गशीर्ष महिन्यात आल्याने हा मुहूर्त विशेष मानला जात आहे. ही संधी साधण्यासाठी सोमवारी पहाटेपासून रामकुंडावर भाविकांनी गोदा स्नानासाठी सकाळपासूनच गर्दी केली आहे. भाविक स्नान करून कपालेश्वर व बाणेश्वर महादेव मंदिरात जाऊन मनोभावे शिवपूजन करीत आहेत. महिला भाविकांची संख्या लक्षणीय असून पहाटेपासूनच गोदावरीपूजन व देशदर्शनासाठी भाविकांची रीघ लागलेली पहावयास मिळत आहे. हिंदू धर्मात अमावस्येच्या तिथीला खूप महत्व आहे. पंचांगानुसार प्रत्येक अमावस्येचे वेगळे नाव वैशिष्ट्य आणि महत्व आहे. मात्र, काही अमावस्यांना विशेष महत्व आहे. त्यापैकीच सोमवती अमावस्या एक आहे. जी अमावस्या सोमवारी येते तिला सोमवती अमावस्या म्हटले जाते. सोमवती अमावस्येला अनन्य साधारण महत्त्व हिंदू धर्मात आषाढी ते कार्तिक या चातुर्मासात भगवंत उपासना सांगितली आहे. मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या सोमवती अमावस्येला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. सोमवती अमावस्येला महत्त्व असून, या दिवशी शिव आराधना केली जाते. यादिवशी शिव शंकराचे पंच महाभूतात्मक पंचमुख दर्शन होत असल्याचे, ज्योतिषाचार्य सांगतात. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे सोमवती अमावस्येला दान व स्नान आदींचे महत्व असून, यादिवशी शिव शंकराची मनोभावे पूजा अर्चा केली जाते. सोमवती अमावस्या असल्याने गोदावरी नदीवरील रामकुंडावर भाविक स्नानासाठी हजर होत असून गोदाघाटावर होणारी गर्दी लक्षात घेता पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून होत आहे. काही भाविकांकडून फुले व दीप गोदेच्या प्रवाहात सोडले जात असल्याने निर्माल्य हे अमृतकलशामध्ये टाकण्याचे आवाहन करण्यात येत असून गोदावरीचे पावित्र्य जपण्याचे आवाहन पुरोहित संघ आणि रामतीर्थ गोदावरी सेवा समितीकडून करण्यात आले आहे. विशेषतः महिला भाविक स्नान करून बाणेश्वर व कपालेश्वर महादेव मंदिरात जाऊन पूजा करून दर्शन घेत आहेत. कपालेश्वर मंदिरात यानिमित्ताने भाविकांची दर्शनासाठी गर्दी पहावयास मिळत आहे. भविकांची होणारी गर्दी लक्षात घेता या परिसरात पंचवटी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. ०००००

‘माझ्या हत्येचा कट रचणाऱ्यांना सोडणार नाही’

अंबरनाथ : ‘माझ्या हत्येचा कट रचणाऱ्यांना सोडणार नाही,’ अशी संतप्त प्रतिक्रिया अंबरनाथचे डॉ. बालाजी किणीकर यांनी दिली आहे. किणीकर हे लातूरहून अंबरनाथमध्ये परतल्यानंतर अंबरनाथ पोलिसांनी त्यांची भेट घेतली. किणीकर यांच्या…

जिल्हा परिषद शाळा बोरिवलीच्या विद्यार्थ्यांनी  श्रमदानातून बांधला वनराई  बंधारा

राजीव चंदने मुरबाड :‘केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे’ श्रमदानातून कुठली गोष्ट अशक्य नाही, अशाप्रकारे विद्यार्थ्यांना धडा देणारे जिल्हा परिषद शाळा कन्होल बोरिवलीचे शिक्षक नितीन राणे सर यांनी आपल्या…

ग्रामपंचायतच्या मनमानी कारभारामुळे गावातील स्वच्छतेचा बट्ट्याबोळ

 – ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सोयगाव : सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा ग्रामपंचायतच्या मनमानी कारभारामुळे गावातील स्वच्छतेचा बट्ट्याबोळ झाला असून  नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतने तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी समाजसेवक मुश्ताक शेख यांनी केली आहे. गावात घाणीचे साम्राज्य पसरले असून गटारीची नियमित साफसफाई केली जात नसल्याने  काही ठिकाणी गटारी जाम झाल्यामुळे तुडुंब भरल्या आहे.तर काही ठिकाणी गटारी नागरिकांनी बुजून टाकल्यामुळे गटारीचे पाणी रस्त्यावरुन वाहत असते.नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे गटारीतील सांड पाण्याचे काही ठिकाणी डबके साचल्याने गावात दुर्गंधी पसरली असून  डासांचे प्रमाण वाढले आहे. ग्रामपंचायतच्या हलगर्जी पणामुळे गावात स्वच्छतेचा बट्ट्याबोळ झाला आहे. डासांच्या प्रदूर्भावाने लहान मुलांसह नागरिक, वयोवृद्ध व महिलांचे आरोग्य धोक्यात आले असून थंडीताप, डायरीया, मलेरिया व डेंगू  सारख्या साथीच्या रोगांच्या दाट शक्यता निर्माण झाली आहे. मात्र ग्रामपंचायत अजूनही झोपेतच असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. महिलांची कुचंबणा गावात महिला व पुरुषांसाठी एकही सार्वजनिक शौचालय नसल्याने गावाच्या आजूबाजूला दुर्गधी पसरत आहे. ग्रामपंचायत कडून कोणतीही उपाय योजना केली जात नसल्याने सोयगाव -चाळीसगाव राज्य महामार्ग क्रमांक २४ गावालगत रस्त्याच्या दुतरफा महिला शौच्यास उघड्यावर बसत असल्याने महिलांची कुचंबणा होत आहे. शाळेत पायी जाणाऱ्या विध्यार्थी व नागरिकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत असून आरोग्यावर परिणाम होत आहे. याच रस्त्यावरून लोकप्रतिनिधी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांचा वापर असून कोणीही तसदी घेतली नाही यामुळे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नाशिक महानगरपालिकेचे कामकाज सुधारण्यांसाठी आता ई-कार्यालय

हरिभाऊ लाखे नाशिक : कमीत कमी वेळेत नागरिकांची कामे होण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील. इ कार्यालय सुरू करून काही कामांचे कक्ष कमी केले जातील. ऑनलाईन कामांवर अधिकतम भर देऊन…

१५ लाखांपर्यंतच्या रकमेवर अर्थसंकल्पात कर सवलत ?

नवी दिल्ली : केंद्र सरकार आगामी अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये १५ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावरील आयकरात सवलत मिळण्याची शक्यता असल्याचे सुत्रांनी सांगितले.. रॉयटर्सनं दोन सरकारी सूत्रांच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीकडे मंदावलेल्या आर्थिक…

भारताचे दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पित केली. यावेळी गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते.

मनमोहन सिंगांच्या समाधीसाठी जागा द्या, काँग्रेस अध्यक्षांची पंतप्रधान मोदींना विनंती  नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या शनिवार दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी…