Category: महाराष्ट्र

Maharashtra News

राज्यात महायुती कर्माची फळं भोगतेय- मनोज जरांगे

जालना : लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल नुसार राज्यातक भाजपाप्रणित महायुतीच्या जागा कमी होताना दिसत आहेत. मराठा आंदोलकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ते आपल्या कर्माची फळे भोगत आहेत अशा शब्दात मनोज जरांगे यांनी एक्झिट…

तंबाखूच्या दुष्परिणामाविषयी जागृतीची गरज-न्या. डॉ. सुधीर देशपांडे

अशोक गायकवाड रत्नागिरी : तंबाखूचे दुष्परिणामाविषयी ज्येष्ठांनी तरूण पिढीस जागृत करणे काळाची गरज आहे, असे आवाहन तालुका विधी सेवा समिती, खेडचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी केले आहे. खेड तालुका विधी सेवा समितीतर्फे येथील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहामध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिन विषयावर शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा न्यायाधीश १ डॉ. देशपांडे म्हणाले, तंबाखूमुळे कर्करोगासारखे गंभीर आजार होतात.माणसाच्या शरीरातील सर्व क्रियांवर तंबाखूचे दुष्परिणाम होत असतात, सिगरेटचे सेवन केल्याने फुफ्फुसामध्ये अनेक विष द्रव्य साचून फुप्फुसाची क्षमता कमी होते तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ यांच्या व्यसनावर माणसे प्रचंड पैसा खर्च करतात. त्यामुळे त्यांच्या घराची आर्थिक गणित बिघडते. मन कमकुवत बनते शरीर खंगून जाते. तरुणांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यांच्यामध्ये वैफल्य निर्माण होते. वैफल्य आणि व्यसनाधीनता या चक्रामध्ये तरुण अडकतो. त्यामुळे नागरिकांनी आजूबाजूच्या सर्व व्यसनाधीन लोकांचे तरुणांचे याबाबतीत प्रबोधन करणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक बाबी डॉक्टर देशपांडे यांनी विशद करून सांगितल्या. व्यसनाधीनतेच्या विरोधात जनजागृती करण्यात येईल, अशी ग्वाही आणि भावना ज्येष्ठ नागरिकांनी याप्रसंगी व्यक्त केली. या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिकवृंद मोठ्या संख्यने उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ, खेडचे अध्यक्ष आबा निकम व सदस्य ओमप्रकाश लठ्ठा तसेच तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी एस. के. जोशी व सहदेव अंधारे यांनी परिश्रम घेतले.

मोदी स्टंटबाज, य़ंदा पंतप्रधान होणार नाहीत : प्रकाश आंबेडकर

बुलढाणा : मोदी स्टंटबाज आहेत, यावेळी मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. निवडणुकांच्या निकालावर सध्या कुणीही बोलू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. मतदाराने काय केलं आहे, ते मतदार बोलायलाच तयार नाही. पण,यावेळी मोदी हे…

४ जूनला राज्यात उलथा पालथ ?

स्वाती घोसाळकर मुंबई : येत्या ४ जूनला लोकसभेच्या निवडणूकीचा निकाल काहीही लागला तरी राज्यात उलथापालथ होणार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. भाजपाप्रणित महायुतीने राज्यात बाजी मारली तर महविकास आघाडीत बंड अटळ…

अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी केले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

रत्नागिरी : अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला अपर जिल्हाधिकारी शंकर…

राहुल गांधींना पुणे कोर्टाचे समन्स

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुढील तारखेला पुणेन्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी गुरुवारी दिले आहेत. राहुल यांच्या आक्षेपार्ह…

रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरांसह  शिपायाला ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी

पुणे कार अपघात प्रकरण पुणे : पुण्यात दारूच्या नशेत अल्पवयीन मुलाने आपल्या पाॅर्शे  कारने दोघांना चिरडल्यानंतर त्याला निर्दोष ठरवणिसाठी मुलाच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयाचे डॉ अजय तावरे, डॉ…

पुणे अपघात चौकशी अहवाल ; डॉ. तावरे, डॉ. हाळनोर निलंबित

ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना सक्तीची रजा मुंबई : पुणे येथील पोर्शे कार अपघात प्रकरणी महाराष्ट्र शासनाने ससून रुग्णालयातील गैरप्रकाराबाबत नेमलेल्या चौकशी समितीने आपला अहवाल शासनास सादर केला आहे. या अहवालानुसार…

सिनेमा निघाल्याने महात्मा गांधींना सारे जग ओळखायला लागले- मोदी

    महात्मा गांधींना कोणीही ओळखत नव्हतं. त्यांच्यावर चित्रपट बनला त्यानंतर त्यांना जगभरात ओळख मिळाली”- पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली : महात्मा गांधींना कोणीही ओळखत नव्हतं. त्यांच्यावर चित्रपट बनला त्यानंतर त्यांना जगभरात…

गेल्या शंभर वर्षात असे घडले नाही

 दिल्लीत पारा ५२.३ अंशावर नवी दिल्ली : वातावरणातील बदलामुळे अवघं जग चिंतेत असताना आता सुर्यानेही आपला हिसका दाखवायला सुरुवात केली आहे. गेल्या शंभर वर्षातील तापामानाचा विक्रम मोडीत काढत दिल्लीत आज पारा ५२.३ अंशावर…