Category: महाराष्ट्र

Maharashtra News

Heading – मुलींच्या गटात रायगड, नंदुरबारचे शानदार विजय

सुवर्ण महोत्सवी राज्य कुमार व मुली खो-खो स्पर्धा – नंदुरबारच्या रोहिणी गावितची नाबाद नऊ मिनिटे खेळी धाराशिव : सुवर्ण महोत्सवी ५० वी कुमार व मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेत   मुलींच्या गटात नंदुरबारने छत्रपती संभाजीनगरचा ६-१ असा पाच गुणांनी पराभव केला. महाराष्ट्र खो-खो hअसोसिएशन व उस्मानाबाद जिल्हा खो खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत रोहिणी गावित हिने सलामीचा सायंकाळचा दिवस गाजविला. तिने पहिल्या डावात ८.४०  व दुसऱ्या डावात नाबाद नऊ मिनिटे संरक्षण केले. छत्रपती संभाजी नगरच्या दिशा इंगळे हिनेही २.४० व ७.१० मि. पळती करीत लढत दिली. अन्य एका सामन्यात रायगडने लातूरला १६-१४ असे २ गुणांनी नमविले. मध्यंतराची सहा पाच ही एका गुणाची आघाडीच रायगडला विजय मिळवून दिली.  संजीवनी जगदाळे हिने २. ३० मिनिटे नाबाद पळती करीत आक्रमणात सहा गडी बाद केले. लातूरच्या पायल माने हिची लढत अपुरी पडली. तिने आपल्या धारदार आक्रमणात सात गडी बाद करीत १.१० मिनिटे संरक्षण केले. अन्य सर्व सामने एकतर्फी झाले. मुलांमध्ये धुळ्याने छत्रपती संभाजीनगरला नमविले मुलांच्या गटात धुळ्याने छत्रपती संभाजीनगरला २१-१८ असे तीन गुणांनी नमविले.  मध्यंतराची ११-९ ही ३ गुणांची आघाडीच त्यांना विजय मिळवून दिली. त्यांच्या कुणाल शेटे याने दोन, एक व एक मिनिटे नाबाद पळती करत दोन गडी बाद केले.  अभिषेक गावित याने १.५०, १.२० मिनिटे संरक्षण करीत तीन गडी बाद केले. अन्य एका सामन्यात रायगडने सिंधुदुर्ग १७-१३ अशी चार गुणांनी मात केली. भावेश गोवलीकर त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने पाच गडी बाद करीत एक व १.२० मिनिटे पळती केली. सिंधुदुर्गच्या अथर्व शिंदे (१.५०,१.०० मि. व ४ गुण) याची खेळी अपुरी पडली. अन्य सर्व सामने डावाने झाले. जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी केले उद्घाटन या स्पर्धेचे उद्घाटन धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी केले. अध्यक्षस्थानी लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे होते. सुरुवातीस ध्वजारोहण आणि त्यानंतर क्रीडा ज्योतीचे आगमन झाले. ती ज्योत प्रमुख पाहुण्यांनी प्रज्वलित केली. त्यानंतर  राणी लक्ष्मी आणि जानकी पुरस्कार प्राप्त आश्विनी शिंदे हिने खेळाडूंना शपथ दिली. यावेळी द्वापेट कॉलेजचे प्राचार्य डॉ. दयानंद जटमुरे, शि. प्र. मंडळ प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, अर्जुन पुरस्कार विजेते सारिका काळे, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे खजिनदार ऍड. गोविंद शर्मा, उपाध्यक्ष अश्विनी पाटील, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त  जे. पी. शेळके, सुजाता शानमे, रोहिणी आवारे, सुप्रिया गाढवे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुभाष वाघ, शिवतेज प्रतिष्ठान रेहमान काझी आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजित जाधव यांनी प्रास्ताविक केले. उपस्थितांचे स्वागत उस्मानाबाद खो खो असोसिएशनचे सचिव प्रवीण बागल, अभय इंगळे, प्रदीप होले, प्रभाकर काले, शोभना वाकुरे, विवेक कापसे, वर्षा जचव, निकिता पवार, गौरी शिंदे, संपदा मोरे,आकाश लोखंडे, अभिजित पाटील, रितेश जाधव, सुजित साळुंखे यांनी केले. असोसिएशनच्या स्पर्धा समितीचे अध्यक्ष  संदीप तावडे यांनी आभार मानले. उप उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेले संघ व त्यांचे होणारे सामने कुमार : सोलापूर- बीड, धुळे-अहमदनगर, नाशिक-रत्नागिरी, रायगड-सांगली, धाराशिव- सातारा, नंदुरबार-मुंबई, ठाणे-मुंबई उपनगर, जालना-पुणे. मुली : धाराशिव-नंदुरबार, अहमदनगर- रत्नागिरी, मुंबई उपनगर-पालघर, धुळे-ठाणे, सांगली-जालना, रायगड-पुणे, सोलापूर-मुंबई सातारा-नाशिक. 00000

मिरा भाईंदरमधील 145 या मतदारसंघात युतीचा तिढा कायम

भाईंदर : नरेंद्र मेहता यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी विश्वास प्रकट केला की भाजपाची उमेदवारी त्यांनाच मिळेल. हाच विश्वास दाखवत मा गीता जैन यांनीसुद्धा  उमेदवारी अर्ज…

उमेदवारांचे शक्तीप्रदर्शन आणि दिवाळी खरेदीच्या गर्दीने

  वाहतूक विस्कळीत हरिभाऊ लाखे नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी पक्षीय तसेच अपक्ष उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू राहिली. पक्षीय उमेदवारांनी अर्ज भरण्याच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक विस्कळीत झाली. दिवाळीच्या खरेदीसाठी घरातून बाहेर पडलेल्या अनेक जण वाहतूक कोंडीत अडकले. कोंडी दूर करताना वाहतूक पोलिसांना कसरत करावी लागली. महायुती आणि महाविकास आघाडीच्या वतीने जिल्ह्यातील सर्व उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यापैकी नाशिक मध्य, निफाड मतदारसंघात महायुतीकडून तर, चांदवड मतदारसंघात मविआकडून उमेदवार उशिरा जाहीर करण्यात आले. शहरातील उमेदवारांनी अर्ज दाखल करताना मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन केले. नाशिक मध्य मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार प्रा. देवयानी फरांदे यांनी अशोक स्तंभ ते महात्मा गांधी रोड अशी फेरी काढली. फेरीतील सुशोभित वाहनावर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, माजी खासदार हेमंत गोडसे यांसह इतरही पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसच्या हेमलता पाटील यांनी अपक्ष आणि एक पक्षाकडून असे दोन उमेदवारी अर्ज भरले. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) वसंत गिते, हनिफ बशीर यांनीही अर्ज दाखल केले. नाशिक पश्चिममधून भाजपच्या उमेदवार आमदार सीमा हिरे, शशिकांत जाधव यांनी अपक्ष, मनसेचे दिनकर पाटील, माकपचे डॉ. डी. एल. कराड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. देवळालीतून राष्ट्रवादीच्या (अजित पवार) आमदार सरोज अहिरे यांनी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांमुळे होणारी गर्दी लक्षात घेता अशोकस्तंभ ते सीबीएस हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याने वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती. दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या बहुसंख्य नागरिकांना उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनाची पूर्वकल्पना नसल्याने शालिमार, मेनरोड, वकीलवाडी, रविवार कारंजा, अशोकस्तंभ, गंगापूर रोडसह अन्य रस्त्यांवर ते वाहतूक कोंडीत अडकले. कोंडीमुळे पादचाऱ्यांनाही गर्दीतून वाट काढण्यासाठी वेळ लागत होता. दुचाकी धारकांना अर्धा तास एकाच ठिकाणी थांबावे लागत होते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. इतर ठिकाणाहूनही अधिक कुमक मागविण्यात आली होती. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी अडथळे उभे केले होते. कोट विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी सोमवारचा दिवस निवडला. त्यातच दिवाळीतील खरेदीसाठी नाशिककरांनी गर्दी केल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. यामुळे काही अंशी नियोजन कोलमडले. दुपारनंतर वाहतूक सुरळीत झाली -चंद्रकांत खांडवी (पोलीस उपायुक्त- वाहतूक)

स्थानिक शिवसैनिक विरोधात, मात्र कथोरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला;

चर्चांना उधाण, शिवसैनिक भूमिका बदलणार का याकडे लक्ष बदलापूर: मुरबाड विधानसभा मतदारसंघात बदलापूर शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी आमदार किसन कथोरे यांच्या विरुद्ध बंडाचे निशाण फडकवले असतानाच सोमवारी किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील गुलदस्त्यात आहे. मात्र या भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक शिवसैनिकांचा निर्णय बदलण्यासाठी ही भेट होती का अशीही चर्चा रंगली आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघात कधी नव्हे ते निवडणुकीपूर्वीच विद्यमान आमदार किसन कथोरे यांना मोठे आव्हान निर्माण करण्यात आले आहे. यात स्वपक्षीय भाजपासह महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. बदलापूर शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी आमदार किसन कथोरे यांच्या विरुद्ध बंडाचे निशाण फडकवले. तसेच आपण अपक्ष उमेदवारी दाखल करू असेही संकेत दिले. या घटनेला दोन दिवस उलटत नाही तेच आमदार किसन कथोरे यांनी म्हात्रे यांचे निकटवर्तीय असलेले आणि बदलापूर शहर शिवसेनेचे उपशहर प्रमुख तेजस म्हसकर यांचा भाजपात प्रवेश घडवून आणला. यामुळे शिवसेनेत अस्वस्थता पसरली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आमदार किसन कथोरे यांनी भाजपातर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज दाखल करतेवेळी शिवसेनेचे प्रमुख माजी नगरसेवक अनुपस्थित दिसले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वामन म्हात्रे यांनी माध्यमांशी बोलताना शिवसैनिकांची अस्वस्थता बोलून दाखवली. शिवसेनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना आम्हाला उत्तर द्यावेच लागेल, अशी प्रतिक्रिया वामन म्हात्रे यांनी दिली होती. एकीकडे महायुतीतील शिवसेना हा महत्त्वाचा घटक पक्ष किसन कथोरे यांच्या विरुद्ध उभा राहतो की काय असा प्रश्न आहे. त्यातच शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याला कथोरे यांनी भाजपात प्रवेश दिला. या पार्श्वभूमीवर शहर शिवसेनेत कथोरे यांचा प्रचार करायचा की नाही याबाबत एक वाक्यता नाही. स्थानिक पातळीवर महायुतीत अशी विरोधाभासी परिस्थिती असताना सोमवारी आमदार किसन कथोरे यांनी शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाणे येथे निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आमदार कथोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यात काय चर्चा झाली याचा तपशील कळू शकलेला नाही. मात्र स्वतः किसन कथोरे यांनी आपल्या फेसबुक खात्यावरून या भेटीची माहिती आणि फोटो पोस्ट केला. स्थानिक पातळीवर शिवसैनिकांना महायुतीचा धर्म पाळत प्रचारात सहभागी होण्यासाठी समज देण्याची विनंती मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे आता या भेटीनंतर शिवसेना शहर शाखेचे स्थानिक पदाधिकारी आणि शहरप्रमुख वामन म्हात्रे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भाजपाचे विशाल परब यांची बंडखोरी.?

जोरदार शक्ती प्रदर्शन करत अपक्ष म्हणून दाखल केला अर्ज…! सिंधुदुर्ग :सावंतवाडी विधानसभा मतदार  संघातून भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष  विशाल परब यांनी बंडखोरी करत जोरदार शक्ती प्रदर्शन करत अपक्ष म्हणून कल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघातून भाजपाचे ते इच्छुक उमेदवार होते.मात्र हा मतदार संघ शिंदे गटाच्या वाट्याला आल्याने विद्यमान आमदार,राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची उमेदवारी शिंदे सेनेने जाहीर केली.महायुतीचे उमेदवार म्हणून आता केसरकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.भाजपामधील आणखी एक इच्छुक असलेले माजी आमदार आणि केसरकर यांचे कट्टर विरोधक राजन तेली यांनी अचानकपणे भाजपा मधून बाहेर पडून ऊबाठा सेनेत प्रवेश केला आणि सेनेची उमेदवारीही मिळवली.या मतदार संघात आता केसरकर विरुद्ध तेली ( सेना विरुद्ध सेना) असा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी पवार गटाच्या अर्चना घारे – परब या सुद्धा इच्छुक होत्या.ही जागा राष्ट्रवादी पवार गटाला मिळावी यासाठी त्यांचा व त्यांचा समर्थकांनी जोरदार प्रयत्न चालवले होते मात्र तेलींची उमेदवारी जाहीर झाल्याने नाराज झालेल्या अर्चना घारे – परब यांनी बंडाचे निशाण हाती घेत जोरदार शक्ती प्रदर्शन करत अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज परवा दाखल केला.तेव्हा दोघा बंडखोर अपक्ष उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे न घेतल्यास या मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे. दरम्यान आज विशाल परब यांनी सावंतवाडीतील जगन्नाथराव भोसले उद्यानापासून मिरवणुकीने जात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी ‘आपण लढणार आणि जिंकणारही’ असा विश्वास व्यक्त केला.त्यांच्या समर्थनार्थ दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला या तिन्ही तालुक्यातून त्यांचे समर्थक,ग्रामस्थ मोठ्या संख्येने आले होते.

जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; भाजापाचे नेत वसंत देशमुखांना अटक

अहमदनगर: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मुलगी जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजापाचे नेते वसंत देशमुखांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे. भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी पातळी सोडून जयश्री थोरांतावर टिका केली…

आपलं तिकीटही फुकट, पाठिंबाही फुकट – जरांगे

जालना : मी किंवा माझ्या जवळचे कोणीही इच्छुक उमेदवारांना तिकिटासाठी पैसे मागत नाहीत. आपलं तिकीटही किंवा पाठिंबाही फुकट असल्याचे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील  यांनी व्यक्त केलं आहे. कुणीही पैशाचा व्यवहार करू नये…

 तिरंगी, चौरंगी लढती

जिल्ह्यातील १५ पैकी ११ मतदारसंघांतील लढतींचे चित्र स्पष्ट हरिभाऊ लाखे नाशिक : जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांसाठी बहुतांश उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर जिल्ह्यातील लढतींचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी तिरंगी, चौरंगी लढती पाहायला मिळणार असून, शहरातील ‘नाशिक मध्य’ मध्ये तिरंगी, नाशिक पूर्व, देवळालीत दुरंगी, तर नाशिक पश्चिममध्ये चौरंगी लढत रंगणार आहे. प्रतिष्ठेच्या येवल्यात मंत्री छगन भुजबळांविरोधात शरद पवारांनी माणिकराव शिंदे यांना रिंगणात उतरवल्याने या ठिकाणी दुरंगी लढत रंगणार आहे. पालकमंत्री दादा भुसेंच्या मालेगाव बाह्य मतदारसंघामध्ये सद्यःस्थितीत तिरंगी लढत असेल. नरहरी झिरवाळ यांच्या दिंडोरीतही तिरंगी लढतीची शक्यता आहे. जिल्ह्यात विधानसभेच्या १५ जागा असून, त्यापैकी महायुतीकडून १३, तर महाविकास आघाडीकडून १२ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. नाशिक मध्य मतदारसंघात भाजपकडून देवयानी फरांदे यांना उमेदवारी दिल्याने या ठिकाणी आता फरांदे विरुद्ध उबाठाचे वसंत गिते असा सामना रंगणार आहे. नाशिक पूर्वमध्ये भाजपचे अॅड. राहुल ढिकले विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गणेश गिते अशी दुरंगी लढत होणार आहे. नाशिक पश्चिममध्ये मात्र बहुरंगी लढत होणार आहे. या ठिकाणी भाजपच्या सीमा हिरेंसमोर उबाठाचे सुधाकर बडगुजर, मनसेचे दिनकर पाटील यांच्यासह भाजपमधील बंडखोरांचे आव्हान असेल. देवळालीत आता सरोज अहिरे विरुद्ध योगेश घोलप अशी दुरंगी लढत आहे. मालेगाव बाह्यमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्यासमोर उबाठाचे अद्वय हिरे यांच्यासह अपक्ष बंडूकाका बच्छाव यांचे आव्हान असेल. नांदगावमध्ये तिरंगी, तर दिंडोरीत झिरवाळ यांच्यासमोर उबाठाच्या सुनीता चारोस्कर आणि बंडखोर धनराज महालेंचे आव्हान आहे. जिल्ह्यात अशा आहेत लढती नाशिक मध्य देवयानी फरांदे (भाजप) वसंत गिते (शिवसेना उबाठा) डॉ. हेमलता पाटील (काँग्रेस बंडखोर) नाशिक पूर्व अॅड. राहुल ढिकले (भाजप) गणेश गिते (राष्ट्रवादी शरद पवार गट) नाशिक पश्चिम सीमा हिरे (भाजप) सुधाकर बडगुजर (शिवसेना उबाठा) दिनकर पाटील (मनसे) दशरथ पाटील (स्वराज्य) देवळाली सरोज अहिरे (राष्ट्रवादी अजित पवार गट) योगेश घोलप (शिवसेना उबाठा) मालेगाव बाह्य दादा भुसे (शिवसेना शिंदे गट) अद्वय हिरे (शिवसेना उबाठा) बंडूकाका बच्छाव (अपक्ष) सिन्नर अॅड. माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी अजित पवार गट) उदय सांगळे (राष्ट्रवादी शरद पवार गट) नांदगाव सुहास कांदे (शिवसेना शिंदे गट) गणेश धात्रक (शिवसेना उबाठा)…

चिपी-मुंबई विमानसेवा पूर्ववत सुरू करा..!

 माजी खासदार विनायक राऊत यांची मागणी..! कुडाळ : चिपी( सिंधुदुर्ग) ते मुंबई ही ‘अलायन्स एअर ‘ कंपनीची विमान उड्डाणे नियमितपणे सुरू ठेवण्यात यावी अशी मागणी ऊबाठा शिवसेनेचे सचिव, माजी खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू किजरापू यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. राऊत यांनी निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे.जिल्ह्यात अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. देश-विदेशातील पर्यटक या जिल्ह्याला  मोठ्या संख्येने भेट देतात.जिल्हात आर. सी. एस.(रुरल कनेक्टिव्हिटी सर्व्हिस- उडान योजना )अंतर्गत दोन वर्षांपूर्वी चिपी विमानतळ सुरू झाले.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’.या योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘ चिपी ‘ विमानतळाचा समावेश करण्यात आला, त्यामुळे सिंधुदुर्गातील सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या दरात विमान प्रवास सोपा झाला होता. तत्कालीन नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभु यांच्या कार्यकाळात तत्कालीन  मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे आणि तत्कालीन नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या सहकार्याने ९ ऑक्टोबर २०२१ पासून चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग आणि मुंबई दरम्यान ‘अलायन्स एअर ‘ची उड्डाणे सुरू झाली.याचा पर्यटकांना तसेच स्थानिक आणि व्यावसायिक दोघांनाही मोठा फायदा झाला. मात्र २६ ऑक्टोबर पासून ही विमान सेवा( उड्डाणे) आम्ही बंद करत आहोत असे कंपनीने अलिकडेच जाहीर केले आहे. गेल्या तीन वर्षात पर्यटनाला चालना देणाऱ्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला हातभार लावणाऱ्या या हवाई सेवेला देश-विदेशातील नियमित स्थानिक प्रवासी आणि पर्यटकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.त्यामुळे चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग आणि मुंबई दरम्यानची उड्डाणे बंद करण्याचा ‘अलायन्स एअर’ कंपनीचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे असे निवेदनात म्हटले आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांतील पर्यटन व्यवसायावर याचा विपरीत आणि दूरगामी परिणाम होणार आहे. त्यामुळे या विषयाकडे आपण वैयक्तिकरित्या लक्ष द्यावे आणि सार्वजनिक हितासाठी ‘अलायन्स एअर ‘ ला चिपी ते मुंबई दरम्यान नियमितपणे उड्डाणे सुरू ठेवण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.  

माथेरानमधील गरजवंतांना दिवाळी फराळाची भेट

माथेरान : सर्वांचा आवडती सण दिवाळी लवकरच येते असून हा सण साजरा करताना अनेकांची  आर्थिक परिस्थिती हलाखीची असते. हातावर पोट भरणाऱ्या कष्टकरी तसेच विधवा महिलांना तसेच अपंगांना हा सण साजरा करता यावा यासाठी येथील हॉटेल वे साईडचे मालक अब्बास अल्ली हुसेन पिरभोय यांच्या माध्यमातून त्यांचे चिरंजीव हैदर अब्बास अल्ली पिरभोय यांच्या हस्ते हॉटेल वे साईड इन मध्ये गरजवंतांना दिवाळीच्या फराळाचे साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये साखर, रवा,तेल, डालडा, बेसनपीठ या साहित्याचा समावेश आहे. अनेक गरजवंत विधवा महिलांनी याचा लाभ घेतला. अब्बास अली हुसेन पिरभोय गरजवंतांना साहित्याचे वाटप करत असतात.यावेळी अब्बास अल्ली हुसेन पिरभोय यांच्यासह हॉटेल व्यवस्थापक मेहमूद खान उपस्थित होते. माथेरान साठी काहीना काही सढळ हस्ते मदत करण्यासाठी अब्बास अल्ली यांचा सिंहाचा वाटा असतो. येथील दवाखान्यात पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्याची त्यांची इच्छा असून हे पर्यटनस्थळ पब्लिक प्लेस असल्यामुळे इंग्रजी भाषेवर युवा वर्गाचे प्रभुत्व असावे यासाठी लवकरच आपल्या हॉटेलमध्ये मोफत इंग्रजी स्पिकिंग कोर्स सुरू करणार आहेत.