Category: महाराष्ट्र

Maharashtra News

ओबीसी आंदोलक आक्रमक; उपोषणकर्त्यांचा उपचारास नकार

 वडीगोद्री ( जालना) : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज सहावा दिवस असून दोघांनीही वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान सरकार ओबीसी आंदोलकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या ताकदीवर महाराष्ट्रात शक्तीशाली  करायचा आहे – सुनिल तटकरे

अहमदनगर : आजपासून सुरू झालेल्या राज्यव्यापी दौऱ्याची व्यापकता लोकसभेचे अधिवेशन संपल्यानंतर अजून वाढवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या ताकदीवर महाराष्ट्रात शक्तीशाली  करायचा आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अहमदनगर येथील आढावा बैठकीत केले. ‘एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र’ हे ब्रीदवाक्य घेऊन आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात अहमदनगर जिल्हयातून केली. देशाला स्वातंत्र्य मिळाले तिथपासून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा व इतर क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी या अहमदनगर जिल्ह्यातून झाली म्हणून या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात करताना यापूर्वी हा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी राहिला तसाच पुन्हा एकदा अजितदादाला पाठिंबा देईल असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. धार्मिक ध्रुवीकरण करण्याचे काम महाविकास आघाडीने केले. याच आधारावर लोकसभा निवडणूक राज्यात लढली गेली शिवाय ही निवडणूक अक्षरशः ग्रामपातळीवर नेऊन ठेवली गेली. मात्र असे असताना नगर शहराचे तरुण आमदार संग्राम जगताप यांनी महायुतीच्या उमेदवारांना ३२ हजाराचे लीड देत या सगळ्यावर मात करून दाखवले त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी त्यांचे आभार मानले. पक्षाचा कार्यकर्ता हा धोरण समोर ठेऊन आणि नेता जे काम करतो ती भूमिका घेऊन काम करत असतो त्यावेळी नेत्याच्या त्या संवेदना घेऊन लोकांपर्यंत कार्यकर्त्यांनी पोचायचे असते असेही सुनिल तटकरे म्हणाले. यापुढे सर्वांनी जबाबदारीचे भान लक्षात घेऊन काम केले पाहिजे असे सांगतानाच विरोधकांनी ज्यापद्धतीने गैरसमज पसरवले आहे ते कसे चुकीचे आहे हे लोकांना सांगायची गरज आहे असे आवाहन कार्यकर्त्यांना सुनिल तटकरे यांनी केले. अजितदादांचे नेतृत्व व्यापकतेने पुढे न्यायचे असेल तर अजितदादांना ताकद देणे गरजेचे आहे. जनाधार वाढवण्याची ताकद आपल्या कार्यकर्त्यांमध्ये असली पाहिजे असा विश्वास निर्माण करणारे मार्गदर्शन सुनिल तटकरे यांनी यावेळी केले. भाजपकडे जाऊन सत्तेत सहभागी होणार होते त्यांनी आम्हाला शिकवू नये असा टोला सुनिल तटकरे यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता लगावला. यापुढे सर्व घटकांना सोबत घेऊन काम करायचे आहे. त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे. शिव – शाहू – फुले – आंबेडकरांची विचारधारा आम्ही सोडलेली नाही हे आपण सांगत आहोतच परंतु लोकसभा निवडणुकीत जे जे घटक बाजूला गेले आहेत त्या घटकांना सोबत आणण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले. योग्य भूमिका घेऊन लोकांसमोर गेलो तर पक्षाचे व्यापक हित जोपासणारे आणि जो आपल्यासाठी दिवसरात्र काम करतोय त्याला जनमानसात स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करुया असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी केले. निवडणूक विकासावर लढली गेली नाही मात्र यावेळी लोकसभेत आलेले अपयश विसरुन किंवा झालेल्या चूका दुरुस्त करुन विधानसभा निवडणुकीत यशाची पायरी नक्की मिळवू असा विश्वास महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. या आढावा बैठकीत युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, आमदार संग्राम जगताप यांनी आपले विचार मांडले. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी सकाळी अहमदनगर शहर जिल्हा कार्यकारिणी, पदाधिकारी, फ्रंटल सेल व प्रमुख तसेच जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी यांची बैठक पार पडली. त्यानंतर दुपारी अहमदनगर दक्षिण ग्रामीण लोकसभा मतदारसंघातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव, राहूरी  यामधील पदाधिकाऱ्यांची बैठक आणि आढावा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी घेतला. विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीला प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, आमदार संग्राम जगताप, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नहाटा, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर,प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे,महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. 000000

सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे-चव्हाण

कराड – महाविकास आघाडीत कुठेही बिघाडी नाही. आम्ही १८० जागांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करू, सांगलीच्या निकालातून धडा घ्यायला हवा असं विधान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी करून उद्धव ठाकरेंना सल्ला दिला आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, साताऱ्यात महाविकास आघाडीचा धक्कादायक पराभव झाला हे मान्य करावे लागेल. आम्ही यात…

शिंदे सरकारची जनतेला अनोखी आरोग्य विमा भेट !

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विधानसभा निवडणुकांआधी राज्यातील नागरिकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. आता राज्यातील नवी आरोग्य विमा योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सर्वांसाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात…

नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी

नाशिक : लोकसभेत दारूण पराभव पत्करावा लागल्यानंतरही भाजपाप्रणीत महायुतीतील धुसफूस संपता संपत नाहीय. नाशिक शिक्षक मतदार संघात अजित पवार राष्ट्रवादी गट आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आमनेसामने उभी ठाकली असल्यामुळे…

कोकणातून मी शिवसेना संपवली- नारायण राणे

रत्नागिरी- कोकणातून महायुतीला तडीपार करा म्हणणाऱ्या शिवसेनेला मी कोकणातून संपवले असेअसे धक्कादायक विधान माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी केलं आहे. खासदार नारायण राणे यांनी शनिवारी कुडाळ येथे…

मुख्यमंत्री शिवरायांच्या रयतेचे नाही तर केवळ मराठ्यांचे- लक्ष्मण हाके

जालना : मुख्यमंत्री शिवरायांच्या रयतेचे नाही तर केवळ मराठ्यांचे आहेत अशी टीका ओबीसी आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांनी केली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवालीच्या वेशीवर वडीगोद्री इथं ओबीसी नेते  लक्ष्मण हाकेंनी यांचे अमरण उपोषण…

मराठा आंदोलकांचे आता शाहगड येथे कार्यालय

जालना : मराठा आरक्षणासंदर्भात सुसुत्रता यावी यासाठी आता शाहगड येथे मुख्य कार्यालय सुरू करणार असून, कुठे असलो तरी आंदोलन सोडणार नाही, असा एल्गार मनोज जरांगे यांनी केला आहे.  पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, आरक्षण ओबीसीत नाही…

डॉ. संतोष सावर्डेकर यांना राज्यस्तरीय “उत्कृष्ट कृषि संशोधक पुरस्कार” प्रदान

चिपळूण : महाराष्ट्र कृषि शिक्षण आणि संशोधन परिषद पुणे यांचे वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय “उत्कृष्ट कृषि संशोधक पुरस्कार” डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत वनस्पती जैवतंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख…

कोकणात पावसामुळे बळीराजा सुखावला

रत्नागिरी : हवामान खात्याने वर्तवल्यानुसार पावसाने कोकणात जोर धरल्यामुले बळीराजा सुखावला असून पेरणीच्या कामाला वेग आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे. कणकवली, कुडाळ सावंतवाडीसह जिल्ह्याच्या इतरही भागात पाऊस सुरू असून काही…