एमए शिकलेल्या युवकाचा ईव्हीएमवर कुऱ्हाडीचा घाव
नांदेड : नांदेडच्या बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील मतदान केंद्रात एमए शिकलेल्या एका युवकाने एन मतदान सुरु असताना व्हीव्ही पॅट आणि ईव्हीएम मशीन कुऱ्हाडीने फोडल्या. भानुदास एडके असे या व्यक्तीचे नाव…
Maharashtra News
नांदेड : नांदेडच्या बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील मतदान केंद्रात एमए शिकलेल्या एका युवकाने एन मतदान सुरु असताना व्हीव्ही पॅट आणि ईव्हीएम मशीन कुऱ्हाडीने फोडल्या. भानुदास एडके असे या व्यक्तीचे नाव…
सोयगांव : शेतकऱ्यांची हक्काची बॅक म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके ची ओळख असून हीच बॅक आता शेतकरीवर्ग ला शाप ठरत आहे.सोयगांव शहरातील बॅके च्या शाखेत आपले हक्काचे पैसे पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरीवर्ग ला चार ते पाच दिवसाचा कालावधी लागत आहे. त्यामुळे शेतकरीवर्गा ला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. राज्य सरकार ने सोयगांव तालुका दुष्काळग्रस्त घोषित केला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून शासनाने एक कोटी ७३ लाख रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळग्रस्त अनुदान जमा केले तसेच श्रावण बाळ योजनेंतर्गत असलेल्या निराधारांच्या बॅक खात्यात एक कोटी ८० लाख रुपये अनुदान वाटप करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँके च्या सोयगांव शाखेत गेल्या पंधरा दिवसांपासून शासनाने जमा केले आहेत. परंतु बॅकेत पैशांचा ठणठणाट असल्यामुळे पंच्याहत्तर टक्के शेतकरी , निराधार लाभार्थी ना दिवसभर बॅकेत पैशे काढण्या साठी नंबर लावून घरी रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. त्या मुळे शेतकरी , निराधाराना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. बॅके च्या वतीने शेतकरी , निराधारांसाठी व्यवस्था नाही — सोयगांव शहराचे तापमान सध्या , ४२ डिग्री सेल्सिअस तापमान आहे. दुष्काळग्रस्त शेतकरीवर्ग व निराधार जेष्ठ नागरिक शासनाकडून आलेले अनुदान काढण्या साठी सकाळ पासूनच सोयगांव जिल्हा बॅक शाखेत नंबर लावून दिवसभर बसत आहे. बॅके च्या वतीने कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे उच्च तापमानात शाखे च्या बाहेर बसावे लागत आहे. त्यामुळे चक्कर येऊन पडणे अशा घटना घडत आहे. व त्यातच चार ते पाच दिवस बॅकेत पैसे मिळत नसल्यामुळे शेतकरी व निराधार जेष्ठ नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.एकंदरीतच शेतकऱ्यांची बॅक म्हणून ओळख असलेली जिल्हा मध्यवर्ती बँक आता शेतकरीवर्गाला शाप ठरत आहे. मुख्यालया कडूनच पैशांचा पुरवठा कमी सोयगांव शाखे साठी आम्ही दररोज संभाजीनगर मुख्यालया कडे एक कोटी रुपयांची मागणी करतो. जेणेकरून शेतकरीवर्ग व निराधार जेष्ठ नागरिकांना वेळेवर अनुदान वाटप होईल. परंतु मुख्यालया कडून कमी प्रमाणात कॅश उपलब्ध होत असल्यामुळेच बॅकेत व ए.टी.एम मशीन वर पैशांची टंचाई जाणवत आहे. असे जिल्हा बॅक सोयगांव शाखेचे व्यवस्थापक अनिल पाटील सोयगाव
पुणे : पुण्याचे निवृत्त साखर आयुक्त श्री. अरविंद रेड्डी यांचे आज पुणे येथे दुःखद निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्यामागे आनंद आणि अमर ही दोन मुले आहेत. त्यांनी ठाणे आणि धुळे येथे जिल्हाधिकारी म्हणून उल्लेखनीय काम केले. पुण्यातील भव्य साखर आयुक्तालय उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. ते उत्तम खेळाडू होते. सेवानिवृत्तीनंतर ‘मुंबई मॅरेथॉन’च्या आयोजनाचे काम त्यांनी दोन दशके केले. उद्या त्यांच्यावर कोरेगाव पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.
बुलढाणा : चीनने मोठ्या प्रमाणावर निवडणूक रोखे खेरदी करून भाजपाला लाभ करून दिला आहे म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनविरुध्द ब्रही काढायला तयार नाहीत, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी…
जळगाव : इंजिनमधे केवळ चालक बसतो. शरद पवार यांच्याकडे सुप्रिया सुळे यांना जागा आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त आदित्य ठाकरे यांच्यासाठी जागा आहे. यांच्या इंजिनमध्ये फक्त यांच्या परिवारासाठी जागा आहे, सामान्य माणसासाठी नाही. यांच्यासाठी यांचा परिवार दुनिया…
पुणे : उद्धव ठाकरेंच्या संजोग वाघेरेंना राजकीय शह देण्यासाठी नाशिकच्या संजय वाघेरे नावाच्या व्यक्तीने मावळमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अपक्ष अर्ज भरलेले संजय वाघेरेंचे मूळ गाव नाशिक असताना त्यांनी मावळ लोकसभेतून…
छ. संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असतानच आज माजी मंत्री सुरेश नवले यांनी पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला. एकनाथ शिंदेच्या शिवसेनाला हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना नेते माजी मंत्री…
रत्नागिरी : ३२- रायगड लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणुकीसाठी संजीवकुमार झा यांची नियुक्ती झाली आहे. झा यांचे येथील शासकीय विश्रामगृहात आगमन झाले. जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्ह्यातील २६३- दापोली व २६४- गुहागर या दोन विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या पूर्व तयारीबाबत सिंह यांनी त्यांना माहिती दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड यांनीही यावेळी पुष्पगुच्छ देऊन झा यांचे स्वागत केले.
अकोला : २०१४ व २०१९ मध्ये मोठ्या प्रमाणात भाजपकडे वळलेल्या मतदारांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घसरली, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे केली. संविधान बदलण्याच्या दृष्टीनेच…
पेट्रोल-गॅस महागला, १०० पैकी ८७ बेकार माढा: १० वर्षांपुर्वी सत्तेत येताना नरेंद्र मोदींनी अनेक आश्वासनं दिली होती. २०१४ साली पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या ५० दिवसांमध्ये महागाई कमी करु, असे आश्वासन नरेंद्र मोदींनी दिले…