Category: मुंबई

Mumbai news

दहावी-बारावीचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावी परीक्षेच्या लेखी व प्रात्यक्ष‍िक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीच्या लेखी परीक्षा ११ फेब्रुवारीपासून १८ मार्चपर्यंत होणार आहे. तर, दहावीची लेखी…

सिगारेटवरून झालेल्या वादातून तरूणावर तलवारीने हल्ला

मुंबई : सिगारेट देण्यास नकार दिल्याने २९ वर्षीय तरुणावर तलवारीने हल्ला केल्याची घटना चेंबूर परिसरात घडली. उशेल रामलु निली असे जखमी तरूणाचे नाव असून या हल्ल्यात उशेल गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर शताब्दी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले. याप्रकरणी चेंबूरमधील आरसीएफ पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून हल्ल्यानंतर पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना अटक केली. सचिन ऊर्फ राहुल कनोजिया आणि अजय दीपक बनसोडे अशी या दोघांची नावे आहेत. ते दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. चेंबूरमधील चेंबूर कॅम्प, गुरू सिंह सभा गुरुद्वारासमोर ही घटना घडली. उशेल निली हा रामटेकडी, नानक भोजवाणी गार्डन परिसरात वास्तव्यास असून तिथेच तो भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. तो दोन्ही आरोपीना ओळखत असून या परिसरात त्यांची प्रचंड दहशत होती. या दोघांनी मंगळवारी उशेलकडे सिगारेटची मागणी केली, त्याने सिगारेट देण्यास नकार दिला. याच कारणावरून त्यांनी त्याला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला ठार मारण्याची धमकी देत सचिनने त्याच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला. यावेळी उशेलने आरडाओरड केल्यानंतर तेथे नागरिक जमले. या घटनेनंतर सचिन आणि राहुल पळून गेले. स्थानिक रहिवाशांनी जखमी उशेलला शताब्दी रुग्णालयात दाखल केले. घटनेचे वृत्त समजताच आरसीएफ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उशेलच्या जबाबावरून पोलिसांनी सचिन कनोजिया आणि अजय बनसोडे या दोघांविरूद्ध हत्येच्या प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. सचिन आणि अजय हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. सचिनविरूद्ध मारामारीसह खंडणी, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, हत्येचा प्रयत्न, अपहरणासह आठ गुन्ह्यांची नोंद असून त्याच्यावर एक वर्षासाठी तडीपारची कारवाई करण्यात आली होती. अजयविरूद्ध हत्येच्या प्रयत्नासह अपहरण, लैगिंक अत्याचार व विनयभंगाच्या तीन गुन्ह्यांची नोंद आहे. अजयने दोन अल्पवयीन मुलीचा विनयभंगासह लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आरसीएफ पोलीस अधिक तपास करीत आहेत. 0000

नवी मुंबईत अनधिकृत बॅनर्स / होर्डींग हटविण्याची विशेष मोहीम

25 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीमध्ये मुंबई : मा. न्यायालयाने दि. 9 ऑक्टोबर रोजीच्या जनहित याचिका क्र. 155/20211 बाबत दिलेल्या आदेशान्वये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बॅनर्स / होर्डींग्ज हटविण्याची विशेष मोहीम 25 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. ही मोहीम सर्वच आठही विभागांच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार असून यामध्ये परवानगी न घेतलेले तसेच परवानगी संपुष्टात आलेले अनधिकृत बॅनर्स / होर्डिंग्ज हटविण्यात येणार आहेत. या मोहीमेंतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील परवानगी न घेतलेले तसेच परवानगी संपुष्टात आलेले अनधिकृत बॅनर्स / होर्डिंग्ज हटविण्यात येणार असून निष्कासन खर्चासाठी आलेली दंडात्मक रक्कम संबंधितांकडून वसूल करण्यात येणार आहे. महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम 1995 अन्वये अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी विनापरवागी अनधिकृतरित्या होर्डींग / बॅनर लावणे हे शहर सौंदर्यीकरणाला बाधा पोहचविणारे असून या मोहीमेनंतरच्या कालावधीत विनापरवानगी होर्डींग / बॅनर लावण्यात येऊ नयेत असे सूचित करण्यात येत आहे. अन्यथा सदर अधिनियमाव्दारे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल यांची नोंद घेण्यात यावी. याविषयी कोणत्याही नागरिकास सूचना / तक्रार करावयाची असल्यास संबंधित विभाग कार्यालयात अथवा महानगरपालिकेच्या वेबसाईटवरील ग्रिव्हेन्स रिड्रेसल पोर्टलवर अथवा My NMMC या नवी मुंबई महानगरपालिकेच्या ॲपवर अथवा 8422955912 या व्हॉट्स ॲप क्रमांकावर नागरिक आपली तक्रार / सूचना नोंदवू शकतात. तरी नवी मुंबईकर नागरिकांनी आपल्या शहराचा स्वच्छ व सुंदर शहर हा नावलौकिक टिकविण्यासाठी व वृध्दींगत करण्यासाठी शहर विद्रुपीकरणाला प्रतिबंध घालण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र परिसरात ‘कॅमेरा ट्रॅपिंग’ संवर्धन आणि अभ्यासासाठी विशेष उपक्रम

मुंबई : काही दिवसांपूर्वी भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र आणि आसपासच्या परिसरात जखमी अवस्थेत आढळलेल्या कोल्ह्यांचा रेबीजची लागण झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. मुंबईमध्ये आतापर्यंत रेबीजची लागण होऊन दोन वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर वन विभागाने बीएआरसी, तसेच आसपासच्या परिसरात मंगळवारपासून ‘कॅमेरा ट्रॅपिंग’ला सुरुवात केली. बीएआरसी परिसरात काही दिवसांपूर्वी जखमी कोल्हा आढळला होता. या कोल्ह्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कोल्ह्याच्या हालचालींमधील फरक लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्याची रेबीज चाचणी केली होती. चाचणीचा अहवाल प्राप्त होताच सदर कोल्ह्याला रेबीज झाल्याचे निष्पन्न झाले. यापूर्वी चेंबूर परिसरातही जखमी कोल्हा आढळला होता. त्यालादेखील रेबीज झाल्याचे निष्पन्न झाले होते. दरम्यान, मुंबईत लागोपाठ दोन कोल्ह्यांचा रेबीजमुळे मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे वनविभागाने भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र आणि आसपासच्या परिसरात ‘कॅमेरा ट्रॅपिंग’, तसेच सर्वेक्षण करण्यासाठी संशोधन केंद्राची परवानगी मागितली होती. संशोधन केंद्राने परवानगी वनविभागाला संशोधन करण्याची परवानगी दिली असून मगंळवारपासून या भागात कॅमेरा ट्रॅपिंग सुरू करण्यात आले. याचबरोबर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या परिसरातही ‘कॅमेरा ट्रॅपिंग’ करण्याचा वनविभागाचा मानस आहे. त्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेला वनविभागाने पत्र पाठवले आहे. मात्र त्याचे उत्तर अद्याप आलेले नाही. ‘कॅमेरा ट्रॅप’च्या माध्यमातून परिसरातील कोल्ह्यांची संख्या , भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र आणि आसपासच्या परिसराच्या हद्दीत कोल्ह्यांचे अस्तित्व असल्याचा शास्त्रीय पुरावा वनविभागाला मिळण्यास मदत होईल, असे उप वनसंरक्षक, ठाणे वनविभागाचे अक्षय गजभिये यांनी सांगितले. शिवाय या माहितीमुळे कोल्ह्याच्या संवर्धनासाठी उपाययोजना करणे सोपो होईल, असेही ते म्हणाले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मालमत्ता जप्तीची नोटीस

मालमत्ता कर न भरणऱ्या मोठ्या थकबाकीदारांना मुंबई : निर्धारित कालावधीमध्ये कर भरणा करण्यास टाळाटाळ करणा-या तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ताकर न भरणा या मोठ्या थकबाकीदारांना बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कलम २०३ अन्वये…

मतदान प्रक्रियेत विद्यार्थ्यांचे योगदान

मुंबई : मुंबईतील मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, यासाठी मतदाराच्या मदतीसाठी सात हजार ११५ स्वयंसेवक मुंबईतील विविध मतदान केंद्रांवर कार्यरत होते. यामध्ये ९८ महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेत (एनएसएस) सहभागी दोन…

३० वर्षांनंतर पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान

१९९५ मध्ये कोणाचं सरकार आलेलं? मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीच मतदान २० नोव्हेंबरला पार पडलं. राज्यात विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान झालं. यावेळी मतदानादिवशी नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा महाराष्ट्रात ६५.११ टक्के मतदान झाले, जे गेल्या ३० वर्षांतील सर्वाधिक मतदान आहे. यापूर्वी ११९५ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ७१.६९ टक्के मतदान झाले होते. या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ६१.३९ टक्के मतदान झाले. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ६१.४ टक्के मतदान झाले होते. महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी वाढल्याचे श्रेय मुख्यकरुन सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी (एमव्हीए) यांच्या प्रचाराला दिली जात आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला एकूण ४२.७१ टक्के मते मिळाली, तर महाविकास आघाडीला ४३.९१ टक्के मते मिळाली होती. यंदा मतदानाच्या टक्केवारीत किमान ३.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. या वेळी महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार यासाठी मतदानाची वाढलेली टक्केवारी निर्णायक ठरु शकते. २०१९ मध्ये महाराष्ट्रात ८.८५ कोटी मतदार होते, जे २०२४ मध्ये वाढून ९.६९ कोटी झाले आहेत. त्यापैकी ५ कोटी पुरुष आणि ४.६९ महिला मतदार आहेत. यंदा ४१३६ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये ३७७१ पुरुष तर ३६३ महिला उमेदवार आहेत. अधिक मतदानाचा फायदा सत्ताधारी महायुतीला होऊ शकतो, असं बोललं जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्या ज्यावेळी मतदानाचा टक्का वाढला आहे, त्याचा फायदा भाजपला झाला…

‘धारावी प्रोजेक्ट’मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता- शरद पवार

मुंबई – महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत प्रामुख्याने काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून अदानींच्या नावाचा उल्लेख करून भाजपा महायुतीवर निशाणा साधला गेला. प्रचारात उद्धव ठाकरेंकडून वारंवार धारावी प्रकल्पाचा उल्लेख करून, मुंबई अदानींना विकायला काढल्याचा आरोप करण्यात आला. परंतु अदानींना धारावी प्रकल्पात इंटरेस्टच नव्हता, असा दावा शरद पवारांनी एका मुलाखतीत…

‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा : देवेंद्र फडणवीस

मुंबई : भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी बिटकॉइन स्कॅमचा पर्दापाश करताना सादर केलेल्या ऑडिओ क्लिपमधिल आवाज हा सुप्रीया सुळेंचाच असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी बोलताना बिटकॉइन स्कॅमबाबत ही…

नाना पटोले, सुप्रीया सुळेंवर बिटकॉईन स्कॅमचा आरोप

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी भाजपाने काँग्रेस नेते नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर बिटकॉइन स्कॅम केल्याचा तसेच परदेशी चलन निवडणुकीत वापरल्याचा मोठा आरोप केला आहे. मतदान सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला माजी…