Category: मुंबई

Mumbai news

स्‍थायी समिती अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे बिनविरोध

स्‍थायी समिती अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे बिनविरोध मुंबई : बृहन्‍मुंबई महानगरपालिका स्‍थायी समिती अध्यक्षपदी  प्रभाकर शिंदे यांची  बिनविरोध निवड झाली. पीठासीन अधिकारी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी या बिनविरोध निवडीची घोषणा केली.  बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ पार पडल्यानंतर सोमवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या महानगरपालिका विशेष सभेत स्‍थायी समितीवर २६ महानगरपालिका सदस्यांची नामनिर्देशानुसार नियुक्ती करण्यात आली. तर शिक्षण समिती अध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिद्ध सदस्य असतात.  स्थायी समिती या वैधानिक समितीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याकरिता  २० फेब्रुवारी २०२६ला दुपारी २.०० वाजता विशेष सभेचे आयोजन करण्‍यात आले होते. स्‍थायी समिती अध्यक्षपदासाठी श्री. प्रभाकर शिंदे यांचा एकमेव अर्ज प्राप्‍त झाल्‍याने त्‍यांची बिनविरोध निवड झाल्‍याचे पीठासीन अधिकारी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी जाहीर केले.  स्थायी समितीच्या  सर्व सदस्यांसह अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, महानगरपालिका सचिव श्रीमती मंजिरी देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते.

  अबुधाबीमध्ये ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या खेळाडूंचा पराक्रम!

अबुधाबीमध्ये ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या खेळाडूंचा पराक्रम! सूरज पी. एच. यांचे  आंतरराष्ट्रीय रौप्यपदक! दीप रांभिया आणि सोनाली मिलखेलकर यांना सुवर्ण पदक! अबुधाबी येथे ६ ते १५ फेब्रुवारी  दरम्यान अबुधाबी नॅशनल एक्झिबिशन सेंटर येथे पार पडलेल्या प्रतिष्ठित ४८व्या आय.एस.सी अपेक्स यूएइ ओपन बॅडमिंटन एलिट चॅम्पिअनशिप २०२६ या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत भारताचा झेंडा उंचावला. विशेष उल्लेखनीय कामगिरी करत आयकर विभाग, मुंबई येथे कार्यरत असलेले आणि खेलो इंडिया योजनेअंतर्गत मान्यता प्राप्त ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीत प्रशिक्षण घेणारे सूरज पी. एच. यांनी पुरुष दुहेरी ३५+ गटात मोहम्मद रेहान यांच्यासह भारतासाठी रौप्यपदक पटकावले. अंतिम सामन्यात त्यांना माजी जागतिक क्रमांक ९ तसेच विद्यमान ३५+ पुरुष दुहेरी विश्वविजेते डॅनी बावा क्रिस्टनंता (सिंगापूर) आणि फर्नांडो कुर्नियावन (इंडोनेशिया) या जोडीविरुद्ध ११–१५, ९–१५ असा पराभव पत्करावा लागला. मात्र त्यांच्या लढाऊ आणि शिस्तबद्ध खेळामुळे भारताला अभिमानास्पद दुसरे स्थान मिळाले. या स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी एकूण ६ आंतरराष्ट्रीय पदके जिंकत ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा उपक्रमाची ताकद सिद्ध केली. पुरुष दुहेरी गटात दीप रांभिया यांनी उपांत्यपूर्व फेरीत यूएईच्या सरवनन कन्नन व अभीश वल्लाचीरा यांचा २१-१५, २१-१४ असा पराभव केला. उपांत्य फेरीत देव अय्यप्पन व धिरेन अय्यप्पन (यूएई) यांना २१-१३, २१-१९ असे नमवत अंतिम फेरी गाठली; मात्र अंतिम सामन्यात भारताच्या हरिहरन व ध्रुव रावत यांच्याकडून २१-११, २१-१३ असा पराभव स्वीकारावा लागला आणि रौप्यपदक पटकावले. मिश्र दुहेरी प्रकारात दीप रांभिया व सोनाली मिखेलकर यांनी उपांत्यपूर्व फेरीत यूएईच्या धिरेन अय्यप्पन व अलीना काथून यांचा १२-२१, २१-१८, २१-१४ असा पराभव करत शानदार पुनरागमन केले. उपांत्य फेरीत हरिहरन व ताबिया खान यांना २१-१८, २१-१५ असे नमवले. अंतिम सामन्यात यूएईच्या अँडी मारवान हम्झा व नुरानी रुतु अझ्झाह्रा या जोडीवर १८-२१, २१-१६, २१-१२ अशी मात करत सुवर्णपदक पटकावले. महिला दुहेरी प्रकारात सोनाली मिखेलकर व अनघा करंदीकर यांनी कांस्यपदकाची कमाई केली. एकूणच दीप रांभिया व सोनाली मिखेलकर – सुवर्णपदक (मिश्र दुहेरी), दीप रांभिया – रौप्यपदक (पुरुष दुहेरी), सोनाली मिखेलकर व अनघा करंदीकर – कांस्यपदक (महिला दुहेरी) आणि सूरज पी. एच. – रौप्यपदक (पुरुष दुहेरी ३5+) अशी २ सुवर्ण, २ रौप्य व २ कांस्य अशी एकूण ६ आंतरराष्ट्रीय पदके ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खात्यात जमा झाली. या सर्व यशामागे ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीची भक्कम प्रशिक्षण व्यवस्था, प्रमुख प्रशिक्षक  श्रीकांत वाड यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व तसेच प्रशिक्षक मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर, मितेश हाजिरनीस, राजीव गणपुले यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. ठाणे  महानगरपालिकेच्या क्रीडा उपायुक्त श्रीमती. मीनल पालांडे यांनी सदर खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले आहे.  विशेषतः सूरज पी. एच. यांच्या रौप्यपदकामुळे आणि एकूण ६ आंतरराष्ट्रीय पदकांमुळे ठाण्याचा क्रीडा ध्वज जागतिक व्यासपीठावर अभिमानाने फडकला आहे.

 शिवजयंतीनिमित्त गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्टचा सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमात सक्रिय सहभाग

शिवजयंतीनिमित्त गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्टचा सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमात सक्रिय सहभाग मुंबई शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य पदयात्रा व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनात गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्ट यांनी मोलाचा सहभाग नोंदविला. जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर व सांस्कृतिक कार्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या कार्यक्रमात गुरुकुल कृती फाउंडेशनचे संस्थापक  उमेश मूरकर तसेच त्यांच्या स्वयंसेवकांनी संपूर्ण कार्यक्रमात नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्थापन व समन्वयाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. पदयात्रा, सांस्कृतिक सादरीकरणे तसेच विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीत स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग लाभला. सामाजिक जाणीव आणि सांस्कृतिक मूल्यांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्टने शिवजयंतीच्या निमित्ताने तरुण पिढीमध्ये इतिहासाची जाणीव व समाजभान निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे यावेळी दिसून आले. या कार्यक्रमास पद्मश्री पुरस्कार विजेते उदय देशपांडे (मल्लखांब प्रशिक्षक), आंचल गोयल (जिल्हाधिकारी, मुंबई शहर), बप्पासाहेब थोरात (अपर जिल्हाधिकारी, मुंबई शहर) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथील प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई, अनिल घुगे, फुलचंद कराड, नेहा साप्ते, समृद्धी देवळेकर, निलेश गराटे, साहिल उतेकर उपस्थित होते. गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्ट तर्फे आंतरराष्ट्रीय खेळाडू व रेफ्री विघ्नेश मूरकर यांच्यासह विन्स पाटील, आशिष महाडिक, अश्विनी जांभळे, भूपेश वैती, सय्यद मोहमद, श्रेयांक मौर्य, शिवांक मौर्य, अथर्व काळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मोलाचा सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे, नुकत्याच दिल्लीत पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदक पटकावणारे खेळाडू सिद्धत गुप्ता यांची उपस्थिती कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली. गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्टच्या स्वयंसेवकांनी पदयात्रा, मान्यवरांचे स्वागत, शिस्तबद्ध नियोजन व समन्वय यामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली. शिवजयंतीच्या निमित्ताने सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात तरुणाईला प्रेरणा देण्याचे कार्य ट्रस्टच्या माध्यमातून घडल्याचे यावेळी दिसून आले.

आज चारकोप येथे रंगणार ४थी आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धा

आज चारकोप येथे रंगणार ४थी आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धा मुंबई-आरंभ स्पोर्टस आणि मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने   २१ व २२ फेब्रुवारी मोरया मित्र मंडळ मैदान, चारकोप, कांदिवली (पश्चिम), येथे मल्लखांब स्पर्धा  आयोजित करण्यात येणार आहे. या दोन दिवसीय स्पर्धेत…

 ६२ वी ‘संक रॉक ओशन स्विमॅथॉन २०२६’ रविवारी गेटवे ऑफ इंडियावर

६२ वी ‘संक रॉक ओशन स्विमॅथॉन २०२६’ रविवारी गेटवे ऑफ इंडियावर स्पर्धेचे उद्घाटन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते महाराष्ट्रातील जलतरणपटू सज्ज मुंबई (क्री. प्र.) : अथांग अरबी समुद्राच्या निळ्याशार लाटांवर जलतरणपटूंच्या जिद्दीचा आणि साहसाचा थरार अनुभवण्याची वेळ आली असून, प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक ‘६२ वी संक रॉक ओशन स्विमॅथॉन २०२६’ रविवारी, २२ फेब्रुवारी रोजी दिमाखात पार पडणार आहे. मुंबईच्या ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया परिसरात रंगणाऱ्या या महास्पर्धेचे उद्घाटन मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर मा. रितू तावडे यांच्या हस्ते होणार आहे. जलतरणपटूंच्या जिद्दीला आणि समुद्राच्या लाटांना आव्हान देणारी ही स्पर्धा केवळ क्रीडा स्पर्धा नसून धाडस, चिकाटी आणि कौशल्याचा उत्सव ठरणार आहे. गेटवे ऑफ इंडिया परिसरात होणाऱ्या या महास्पर्धेकडे संपूर्ण महाराष्ट्रातील जलतरणप्रेमींचे लक्ष लागले असून, शेकडो खेळाडू समुद्राच्या लाटांवर आपले सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ऐतिहासिक परंपरेचा जलतरण महोत्सव : प्रतिष्ठित संस्थांच्या मान्यतेने स्पर्धेचे आयोजन ‘महाराष्ट्र स्टेट अमेच्युअर ॲक्वेटिक असोसिएशन’ (MSAAA) यांच्या वतीने हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या ऐतिहासिक स्पर्धेचे नियोजन असोसिएशनचे अध्यक्ष आनंद माने आणि सरचिटणीस राजेंद्र पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोरपणे करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी खेळाडूंनी रविवारी सकाळी ७:३० वाजता रिपोर्टिंग करणे आवश्यक असून, प्रत्यक्ष शर्यतीची सुरुवात साधारणपणे १०:३० ते ११:३० या वेळेत होणार आहे. सर्व सहभागी खेळाडूंना सकाळी ९:०० वाजता बोटीने प्रस्थान करणे अनिवार्य आहे. तीन अंतरांच्या आव्हानात्मक शर्यती विविध वयोगटांसाठी १ किमी, २ किमी आणि ५ किमी अंतरांचा थरार या सागरी स्पर्धेत जलतरणपटूंना त्यांच्या क्षमतेनुसार १ किमी, २ किमी आणि ५ किमी अशा तीन अंतरांच्या शर्यतींमध्ये सहभागी होता येणार आहे.…

आशियातील धारावी कोळीवाड्यात शिवजन्मोत्सव उत्साहात

आशियातील धारावी कोळीवाड्यात शिवजन्मोत्सव उत्साहात रमेश औताडे मुंबई : आशिया खंडात नावाजलेल्या धारावीतील कोळीवाडा परिसरात हिंदू धर्म रक्षक युवा हिंदुत्व संघटनेच्या वतीने शिवजन्मोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. कोळीवाडा होळी मैदान येथे कार्यक्रमाची सुरुवात झाली. गड-किल्ले संवर्धन आणि स्वच्छता मोहिमेतील कार्यकर्त्यांचा प्रमुख सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे डबेवाले, शिवसेनेचे धारावी विधानसभा संघटक विठ्ठल पवार, शाखाप्रमुख किरण काळे, नवनिर्वाचित नगरसेवक जोसेफ कोळी, नगरसेविका अर्चना शिंदे, मनसेचे धारावी विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सोनावणे तसेच धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिटकर यांची विशेष उपस्थिती होती. कोळीवाडा येथून सुरू झालेली मिरवणूक संत कक्कया मार्ग, कामराज हायस्कूल ९० फीट रोड, संत रोहिदास मार्ग, धारावी मेन रोड मार्गे पुन्हा होळी मैदान येथे विसर्जित झाली. या कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे अध्यक्ष कौशिक कोळी, समीर भोईटे यांनी केले. “कोणताही पक्ष नाही, एकच झेंडा तोही भगवा” हाच उद्देश होता.

 ‘मुंबई ड्रम डे २०२६’ची रंगीत तालीम; जागतिक दर्जाचे कलाकार एकत्र

‘मुंबई ड्रम डे २०२६’ची रंगीत तालीम; जागतिक दर्जाचे कलाकार एकत्र मुंबई : तालवाद्यप्रेमींसाठी पर्वणी ठरणाऱ्या ‘मुंबई ड्रम डे २०२६’ या विशेष संगीत मैफिलीपूर्वी जागतिक दर्जाचे कलाकार मरीन ड्राइव्ह येथे रंगीत…

भांडुपमधून पोर्ट ट्रस्ट कामगाराचा मुलगा दीपक सावंत झाला नगरसेवक

भांडुपमधून पोर्ट ट्रस्ट कामगाराचा मुलगा दीपक सावंत झाला नगरसेवक अनिल ठाणेकर मुंबई, मुंबई महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भांडुप गावातील प्रभाग क्रमांक  १११ मधून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सीएमई विभागातून जून १९९१ साली सेवानिवृत्त झालेले श्री. राजाराम विष्णू (सावंत ) देसाई, चार्जमन, लोको शेड यांचा मुलगा दीपक सावंत हा शिवसेना ( उबाठा ) पक्षातून नगरसेवक  म्हणून निवडून आला आहे. पोर्ट ट्रस्ट कामगाराचा मुलगा दीपक सावंत नगरसेवक झाला म्हणून त्यांचे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने  हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली साधारण ३२ वर्षांपूर्वी दीपक सावंत यांना शिवाजी नगर, शिवडी, मुंबई पोर्ट ट्रस्ट कॉलनी वडाळा या प्रभागातून शिवसेनेची उमेदवारी नक्की झाली होती. पक्षाचा AB अर्ज मिळाला होता. त्यामुळे पोर्ट ट्रस्ट  वसाहतीमधील रहिवाशांना खूप आनंद झाला.  कॉलनीत मिरवणूक, फटाके, ढोल ताशे वाजू लागले. पोर्ट ट्रस्ट कॉलनी मध्ये आनंद पसरला. पोर्ट ट्रस्ट कर्मचाऱ्याच्या मुलाला उमेदवारी मिळाली म्हणून घराघरात आनंद झाला.घराघरातून ओवाळणी झाली. फुलांच्या अक्षता पडल्या. परंतु हा आनंद रहिवाशांना जास्त मिळाला नाही. पक्षात चक्र फिरली. की फिरवली.  दुसऱ्या दिवशी उमेदवारी फिरवली गेली. संपूर्ण वसाहत शोक सागरात बुडाली. जणू काही सुतक पडले. परंतु दीपक सावंत शांत होता. त्याने सगळ्यांना शांत केले. संधी हुकली. परंतु तो निष्ठेने शिवसेनेचे काम करत राहिला. दीपक  सावंतचे वडील राजाराम सावंत मुंबई पोर्ट ट्रस्ट मधून  १९९१साली निवृत्त झाले. ते वसाहत सोडुन भांडुप गावात स्थायिक झाले. दीपक सावंत नोकरी बघून शाखेचे काम प्रामाणिक पणे आजतागायत करत आला. भांडुप गावचा तो शिवसैनिक झाला. दरम्यान संघटनेवर अनेक संकटे आली. परंतु दीपक सावंत निष्ठेने कम करत होता. आणि एवढ्या वर्षांनी पक्षाने परत संधी दिली आणि मुंबई महानगर पालिका निवडणुकीत भांडुप गावातून पोर्ट ट्रस्ट कामगाराचा  मुलगा दीपक सावंत नगरसेवक झाला.

 वरळीतील झोपडीधारकांचा एसआरए विरोधात एल्गार

वरळीतील झोपडीधारकांचा एसआरए विरोधात एल्गार रहिवाशांच्या मोर्चाची घेतली दखल प्रकल्प रखडविणाऱ्या विकासकावर होणार कारवाई – शैलेंद्र कांबळे अनिल ठाणेकर मुंबई, वरळी नाका परिसरातील प्रेम नगर व सिद्धार्थ नगर येथील इंदिरा झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए) प्रकल्प सुमारे २५ वर्षांपासून रखडला आहे. याविरोधात मार्क्र्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि बहुजन शक्ती संघटनेच्या वतीने  रहिवाशांनी आज एसआरए कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मोर्च्याच्या शिष्टमंडळाला प्रकल्प रखडविणाऱ्या विकासकावर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले, अशी माहिती शैलेंद्र कांबळे यांनी दिली. यावळी मनोज यादव, तृप्ती निकाळजे, प्रविण मांजळकर, अशोक पवार,बहुजन शक्तीचे सुधाकर रणखांबे, संतोषी शिरोडकर, कलप्पा न्हावी,नवाज शेख, विशाल कांबळे, संजय मकासरे आदी उपस्थित होते. मोर्चानंतर शिष्टमंडळाने प्रशासनाकडे निवेदन सादर करत बैठकीत विकासकाच्या निष्क्रियतेबाबत तक्रार नोंदवली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे विशेष अधिकारी मजगे यांनी प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल तसेच प्रकल्प रखडविणाऱ्या विकासकाविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.दरम्यान, ५७ रहिवाशांना विकासकाने भाडे न दिल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. याबाबत सहाय्यक निबंधक चंद्रकांत पवार यांनी सांगितले की, यापूर्वी विकासकाला नोटीस बजावण्यात आली होती. विकासकाने भाडे देण्याचे कबूल करत धनादेश दिला; मात्र तो बाऊन्स झाल्याची माहिती देण्यात आली. तरीही अद्याप ठोस कारवाई न झाल्याने रहिवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.प्रकल्पासाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करून ती सार्वजनिक करावी, तसेच अपयशी विकासकाची नियुक्ती रद्द करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास पुढील तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही रहिवाशांनी दिला.

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मध्य रेल्वेची प्रवासी वाहतूक १३७३ दशलक्षांच्या पार

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मध्य रेल्वेची प्रवासी वाहतूक १३७३ दशलक्षांच्या पार मुंबई : मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२५-२६ (जानेवारी २०२६ पर्यंत) प्रवासी वाहतुकीत उल्लेखनीय वाढ नोंदवली असून उपनगरीय आणि गैर-उपनगरीय दोन्ही…