Category: मुंबई

Mumbai news

– महाराष्ट्र राज्य खुली बॅडमिंटन 2024

महिला एकेरीतील चार टॉप सीडेड खेळाडूंचे आव्हान संपुष्टात मुंबई : महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या (एमबीए) मान्यतेने तसेच ग्रेटर मुंबई बॅडमिंटन असोसिएशन (जीएमबीए) आणि एनएससीआय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राज्य खुली…

– मलबार हिल क्लब राज्य मानांकन स्नूकर स्पर्धा

मुंबईच्या बदामीची पुण्याचे घोडकेवर मात मुंबई, 16 नोव्हेंबर: मुंबईच्या हसन बदामीने सर्वोत्तम खेळ करताना  मलबार हिल क्लब राज्य मानांकन स्नूकर स्पर्धेत बेस्ट ऑफ फाईव्ह फ्रेमच्या ’15-रेड’ स्नूकरच्या राऊंड-रॉबिन सामन्यात पुण्याच्या…

आम्ही केले, तुम्हीही करा

  निवडणुकीमुळे २४ तास आपल्या कर्तव्यावर रुजू असणाऱ्या पोलिसांनी काल पोस्टल मतदान करत ‘आम्ही मतदान केले , तुम्हीही मतदान करा’ असं आव्हान सगळ्या मतदारांना केलं. वांद्राच्या खेरवाडी पोलिस ठाण्यातील पोलिस…

राज्यात महायुतीची सत्ता येणार-नाथाभाऊ शेवाळे

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी राज्यव्यापी दौरा केला. या दौत्यामध्ये त्यांनी १६ जिल्ह्यातील ३५ मतदार संघाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी…

मुरबाड मतदारसंघात परिवर्तन अटळ

 प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विश्वास मुरबाड : मुरबाड व बदलापूरकरांनी आमदार किसन कथोरे यांना अनेक संधी दिली. पण त्यांना मतदारसंघातील प्रश्न सोडविता आले नाहीत. बदलापूरातील `त्या’ घटनेनंतर तेथील मतदारांनीही किसन कथोरेंना बदलल्याशिवाय पर्याय नसल्याचे ठरविले आहे. मुरबाड मतदारसंघात परिवर्तनाची भूमिका असून, आता परिवर्तन अटळ आहे, असे भाकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे केले. मुरबाड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांच्या प्रचारासाठी मुरबाड येथील संतोषी माता मंदिरासमोरील मैदानात भव्य सभा झाली. या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलत होते. या वेळी लोकनेते गोटीराम पवार, कॉंग्रेसचे कर्नाटकातील आमदार इवान डिसोझा, ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आप्पा घुडे, जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर, रश्मी निमसे, कल्याण तालुकाप्रमुख विश्वनाथ जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख, प्रवक्ते महेश चौघुले, जिल्हाध्यक्ष विद्या वेखंडे, तालुकाध्यक्ष दीपक वाघचौडे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार, आरपीआय (सेक्यूलर) पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कविता वारे आदींसह मान्यवर उपस्थित होते. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची पिछेहाट होत आहे. या धोरणामुळेच मुरबाड मतदारसंघातही एमआयडीसीतील अनेक उद्योग बाहेर गेले. तर रोजगारनिर्मिती न झाल्यामुळे बेरोजगारी वाढली. मुरबाडमधील प्रश्न सोडविण्यात किसन कथोरे सपशेल अपयशी ठरले, अशी टीका करीत असतानाच जयंत पाटील यांनी आजच्या सभेच्या गर्दीने महाविकास आघाडीच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे म्हटले. भाजपा हा संकटात आला असून, बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा देऊन महाराष्ट्राला १८ व्या शतकात नेले जात आहे. पण शाहू-फुले-आंबेडकरांच्या या महाराष्ट्रातील पुरोगामी विचारसरणी हे सहन करणार नाही, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. राज्यात ४८ ठिकाणी सभा घेतल्यानंतर राज्यातील जनतेने पक्षफुटीबद्दल भाजपाला शिक्षा करण्याचे ठरविले असल्याचे भाकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांनी घणाघाती भाषणात आमदार किसन कथोरे यांच्यावर अपयशी ठरल्याचा आरोप केला. मुरबाड मतदारसंघातील केळेवाडी येथील रस्त्याचे काम १५ वर्षात झाले नाही. या भागाला हेतुपुरस्सर टार्गेट करण्यात आले. काळू धरणाला विरोध असल्याचे सांगून, त्यांच्या बगलबच्च्यांकडून काळू धरणक्षेत्रातील गावांमध्ये घरपट्टीच्या पावत्या घेतल्या जात आहेत. जोता नसतानाही घर दाखवून लूट केली जात आहे. मुरबाड तालुक्याचा संबंध नसलेला समृद्धी महामार्ग हा अहवालात छापला गेला. वडोदरा एक्सप्रेसवेच्या बोगद्यात जाऊन फोटो काढले गेले. खोटे बोला पण रेटून बोला, अशी त्यांची कार्यपद्धती आहे, असा आरोप सुभाष पवार यांनी केला.मुरबाड मतदारसंघातील १५ वर्षांचा आमदार निधी हा उद्यान सुशोभिकरण व बाकड्यांमध्ये खर्च झाला. १५ वर्षांपासून अरेरावी व दादागिरी सुरू असून, बघून घेण्याची भाषा केली जात आहे. तब्बल १५ वर्ष आमसभा न घेण्याचा पराक्रमही नोंदविला गेला, अशी टीका सुभाष पवार यांनी केली. जनसेवा शिक्षण मंडळाला आपण तीन लाख रुपयांची अनामत रक्कम दिली असताना, माझ्याविरोधात संस्थेकडून पैसे घेतल्याचा खोटा प्रचार केला. त्यांना संस्थेचा कारभार माहिती नाही, असा टोला सुभाष पवार यांनी मारला. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही सेम नावाचा उमेदवार उभा केला गेला. मात्र, आताची निवडणूक जनतेने हाती घेतली आहे. जनतेसह कार्यकर्त्यांनीही परिवर्तनासाठी लढाई सुरू केली आहे. त्यामुळे परिवर्तन नक्कीच होईल, असा विश्वास सुभाष पवार यांनी व्यक्त केला. चौकट `सरकारचे शेवटचे पाच दिवस राहिलेत’ बदलापूर शहरासह मुरबाड मतदारसंघात बड्या माफियांच्या माध्यमातून दमबाजी करण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. या प्रकरणांमध्ये पोलिसांनी निष्पक्ष व समान भूमिका घ्यावी, असे आवाहन करतानाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पोलिसांना आता या सरकारचे पाच दिवस राहिले आहेत, असा हसत हसत इशारा दिला.

मुलुंडमध्ये सर्वाधिक गृहमतदान नोंदणी

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघामध्ये गृहमतदानाला सर्वाधिक पसंती मुलुंड विधानसभा मतदारसंघात मिळाली असून येथे तबल ४९८ अर्ज आले होते. या अर्जांपैकी गुरुवारपर्यंत २३६ मतदारांची गृहमतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यासंदर्भात स्थानिक आमदार आणि मुलुंडचे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा म्हणाले की, दिलेल्या कालावधीत उपनगरामध्ये सर्वाधिक गृहमतदानाचे नोंदणी माझ्या मलुंड या मतदारसंघातून झाली आहे. आमच्या भाजपच्या चमूचे हे सर्वस्वी यश आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी गृहमतदानासंबंधी येथील ज्येष्ठ मतदारांमध्ये जागृती केली होती, त्याचा हा परिणाम आहे, असे कोटेचा म्हणाले. गुरुवारपर्यंत मुलुंडमध्ये २३६ ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांनी गृह मतदान प्रक्रिया पूर्ण केली होती. गृहमतदानाचा कालावधी १३ ते १६ नोव्हेंबर, २०२४ असा आहे. मुलुंडमधील ४९८ गृहमतदारांमध्ये ४७४ ज्येष्ठ मतदार असून २४ दिव्यांग मतदार आहेत. मुलुंडनंतर दुसऱ्या करमांची गृह मतदानाची नोंदणी वांद्रे (पश्चिम) मतदारसंघात झाली असून ती ४९५ आहे. उपगरांमध्ये एकुण ४३४९ नागरिकांनी गृहमतदानाची नोंदणी गेली होती. गुरुवापरपर्यंत ३५३३ गृह मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ८५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे नागरिक, दिव्यांग मतदार कोविड संसर्ग रुग्ण आणि अत्यावश्यक सवेतील कर्मचाऱ्यांना गृह मतदानाचा लाभ घेता येतो. मुलुंडने गृह मतदानासाठीच्या नोंदणीत अव्वल स्थान प्राप्त केले आहेच. गृहमतदानाच्या संख्येतही मुलुंड मतदारसंघ उपनगर जिल्ह्यात अव्वल राहील, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे मुलुंडचे आमदार व भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी‘ रिपाइं महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी सांगितले.

भाजपाच्या बटेंगे-कटेंगेला अजित पवारांचा विरोध

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बटोंगे तो कटेंगेचा नारा दिला होता. योगी आदित्यनाथांच्या या विधानाला आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवारांनी जाहीर विरोध केला…

भर पावसात दोन सभा… पाऊस कुणाला पावणार ?

देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हे दोन महाराष्ट्रातील दिग्गज नेते. या दोघांच्या सभेला पावसांनीही आज हजेरी लावली. इचलकरंजीत शरद पवारात तर साताऱ्यात देवेंद्र फडणवीस यांनी भर पावसात सभा घेतली. या…

 राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे;

 मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया डोंबिवली –भाजपचे कल्याण ग्रामीण उपाध्यक्ष संदीप माळी यांना गुरुवारी मानपाडा पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातून हद्दपार केल्याच्या विषयावरून कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आणि मनसे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील संतप्त…

कल्याण पूर्व शिवसेना शहरप्रमुखपदी नीलेश शिंदे यांची नियुक्ती

कल्याण : कल्याण पूर्व शिंदे शिवसेना शहरप्रमुखपदी नीलेश शिंदे यांची तर, विधानसभा प्रमुखपदी प्रशांत काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्या आदेशावरून शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. कल्याण पूर्व शिंदे शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी बंडखोरी करून महायुतीच्या कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या विरुध्द उमेदवारी दाखल केला. त्यांना समज देऊनही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी नुकतीच शिंदे शिवसेनेच्या शहरप्रमुख पदावरून महेश गायकवाड यांची हकालपट्टी केली होती. विधानसभा निवडणूक सुरू असल्याने स्थानिक पातळीवर पक्ष नेतृत्व करण्यासाठी शहरप्रमुखाची गरज असल्याने जिल्हाप्रमुख लांडगे यांनी नीलेश शिंदे यांना शहरप्रमुख पदी, प्रशांत काळे यांना विधानसभा प्रमुखपदी नियुक्तीची पत्रे दिली. शहरप्रमुख नीलेश शिंदे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत. अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. प्रशांत काळे राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून ते शिवसेनेतून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. पण ही जागा महायुतीमध्ये भाजपच्या वाटयाला गेल्याने त्यांनी शांत राहणे पसंत केले. ‘माजी नगरसेवक असताना शिवसेनेच्या माध्यमातून प्रभागात आपण अनेक विकास कामे केली. या माध्यमातून आपला लोकांशी थेट संपर्क आहे. नवीन जबाबदारी आपल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्याने पक्ष संघटना वाढविणे आणि ती अधिक मजूबत करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत,’ असे शहरप्रमुख नीलेश शिंदे यांनी सांगितले.