Category: मुंबई

Mumbai news

‘बदलापूरा’चा तपास सीआयडी करणार

स्वाती घोसाळकर मुंबई: बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या वासनांध अक्षय शिंदेचा पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरचा तपास आता सीआयडी करणार आहे. अक्षय शिंदेचे एन्काऊंटर झाल्यावर आज एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी…

‘स्वच्छता ही सेवा’ मोहीमेत तंबाखूमुक्त शिबीराचे आयोजन

नवी मुंबई : ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्यामध्ये सखोल स्वच्छता मोहीमा राबविण्याप्रमाणेच नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज शहर स्वच्छ ठेवणा-या स्वच्छतामित्रांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जात आहे. या अंतर्गत…

विजय सिंघल यांनी केली सिडकोच्या विविध पाणी पुरवठा प्रकल्पांची पाहणी

नवी मुंबई: सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, विजय सिंघल यांनी सिडकोच्या विविध पाणी पुरवठा योजनांच्या प्रकल्पस्थळांना भेट देऊन, सिडकोतर्फे राबवण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा घेतला व संबंधित अधिकारी व…

गुडघ्याचे ऑपरेशन आता डॉक्टर ऐवजी रोबोट करणार

रमेश औताडे   मुंबई : म्हातारपणात गुडघ्याची दुखणी वाढतात. त्यासाठी अनेक जण डॉक्टरची खात्री व न परवडणारा खर्च पाहता ऑपरेशन करायला घाबरतात. मात्र आता गुडघ्याचे ऑपरेशन डॉक्टर ऐवजी रोबोट करणार आहे. बैठी जीवनशैली, शारीरिक हालचालींचा अभाव, लठ्ठपणा, वाढते वय, गुडघ्याचा संधिवात आणि दुखापत यामुळे देशभरातील कित्येक लोकांना सांध्यांच्या समस्या सतावत आहेत. या पार्श्वभूमीवर अपोलो स्पेक्ट्रा या नामांकित हॉस्पिटल ने मंगळवारी मुंबईत ” गुडघा ऑपरेशन रोबोट ” चे अनावरण प्रसिद्ध अभिनेता अरबाज खान यांच्या हस्ते केले. यावेळी डॉ अलोक पांडे उपस्थित होते. तंत्रज्ञानाने आपली जगण्याची पद्धत बदलली आहे आणि आरोग्य सेवेने खूप मोठा पल्ला गाठला आहे. अपोलो स्पेक्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण आरोग्य क्षेत्रासाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे ठरले आहे. असे अरबाज खान म्हणाले. देशातील दुसरी सर्वात मोठी समस्या संधिवाताची आहे. भारतातील सुमारे २३.४६ दशलक्ष लोकांना ही समस्या असून दैनंदिन हालचाली सहजतेने करता येत नसल्याने ऑपरेशन करावे लागते. असे डॉ सफिउद्दिन नदवी व रुपिंदर कौर यांनी सांगितले. यावेळी हॉस्पिटलचे श्रीराम अय्यर व इतर डॉक्टर उपस्थित होते. 0000

निमंत्रितांचे हास्य कविसंमेलन उत्साहात

मुंबई : ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ आणि ‘सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, पनवेल’ यांच्या संयुक्त विद्यमाने २१सप्टेंबरला गिरगाव येथे हास्य कविसंमेलन संपन्न झाले. यावेळी कवी नितीन वरणकार यांच्या ‘माया कोरा रायला…

 महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीचे आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू,

आजपासून जेल भरो आंदोलना इशारा ! अनिल ठाणेकर मुंबई : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आझाद मैदानावर, जोरदार पावसाला न जुमानता सोमवारपासून अंगणवाडी कर्मचारी व संघटक हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. २४ तासांच्या साखळी उपोषणात सुमारे ५० कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी सुमारे एक हजार अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे एम ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे, जयश्री पाटील यांनी दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्याशी झालेल्या भेटीनंतर शिष्टमंडळ मैदानावर परतल्यावर त्यांनी या भेटीबद्दल असमाधान व्यक्त करुन बेमुदत उपोषण, मानधन वाढ, ग्रॅच्युइटी व मासिक पेन्शनचा शासकीय आदेश निघेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच २५ सप्टेंबरच्या जेल भरो आंदोलनात राज्यभरातून हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अंगणवाड्या बंद ठेवून सहभागी होण्याचे आवाहन केले. शासनाने अनेक घटकांना मानधनात वाढ देण्याची घोषणा केली आहे. मग शासनाच्या सर्व योजना यशस्वी होण्यासाठी दिवस रात्र कष्ट करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष का? असा प्रश्न अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पडला आहे. शासनाने जीआर काढेपर्यंत हे आंदोलन व उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे, असे मत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे एम ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे, जयश्री पाटील या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. 000

 ऐरोली विभागात तोडक कारवाई

 नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने ऐरोली विभागात पाडकामाची कारवाई करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली अंतर्गत सागरनाथ रामा मढवी, घर नं – 30 ,मच्छी मार्केटच्या मागे, दिवा गाव ,सेक्टर – 9 , ऐरोली येथील आरसीसी इमारतीचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु केले होते. सदर अनधिकृत बांधकामास ऐरोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते. मा.उच्च न्यायालयाने रिट याचिका क्र.1591/2023 च्या आदेशानुसार आज रोजी पाचव्या मजल्याचे बांधकाम अंशत: निष्कासीत करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. सदर ठिकाणी पोकलेन, जेसीबी सारखी मशनरी जावु शकत नसल्याने या मोहिमेसाठी 06 हॅमर, 04 ब्रेकर व 15 मजूर यांचा वापर करण्यात आलेला असून मोहिमेकरीता जी विभाग ऐरोली येथील अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते. यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे. ०००००

 मणक्याच्या दुर्धर, महागड्या शस्त्रक्रीया होणार मोफत,

उपमुख्यमंत्री विशेष वैद्यकीय मदत कक्षाचा पुढाकार मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्ताने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राज्यभर “मोदी सेवा महिना” राबविण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत राज्यभर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरे राबविण्यास सुरुवात झाली आहे. या शिबिरांच्या तपासणी दरम्यान मणक्यांशी संबंधित आरांवर शस्त्रक्रीया करण्यासाठी स्पाईन फाऊंडेशनकडून पुढाकार घेण्यात आले आहे. विविध जिल्ह्यात मणक्याशी संबंधित निदान झालेल्या रुग्णांवर त्या-त्या जिल्ह्यात जावून रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रीया करण्यात येणार असल्याचे स्पाईन फाऊंडेशनचे विश्वस्त व मणक्यांच्या आजारावरील विशेषज्ञ डॉ शेखर भोजराज यांनी सांगितले आहे. उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक हे सामुदायिक आरोग्य शिबिराचे मुख्य समन्वयक आहेत. या शस्त्रक्रीयेंना प्रायोगिक तत्वावर सुरुवात झाली असून जळगाव जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक आरोग्य शिबिरामध्ये निदान झालेल्या 6 रुग्णांवर स्पाईन शस्त्रक्रीया डॉ.शेखर भोजराज यांचे मार्गदर्शनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. मणक्याच्या आजारावरील शस्त्रक्रीया या महागड्या असून त्याचा खर्च 3 लक्ष ते 5 लक्ष रूपये ऐवढा असतो. हा खर्च सर्वसामान्य गोर-गरीब रुग्णांच्या आवाक्याबाहेरचा आहे. त्यामुळे त्यांना या शस्त्रक्रीया करता येत नाहीत. सामुदायिक आरोग्य शिबिराच्या माध्यमातून या शस्त्रक्रीया मोफत होणार असल्याने गोर-गरीब रुग्णांना याचा फायदा होणार आहे. स्पाईन फाऊंडेशनाच्या माध्यमातून शिबिराशी संबंधित आरोग्य कर्मचारी यांना फाऊंडेशनमार्फत प्रशिक्षणही देण्यात येणार असून मणक्यांच्या आजाराबाबत संशोधनही करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ शेखर भोजराज यांनी दिली. डॉ.भोजराज हे मुंबईतील मणक्याच्या आजारावरील विशेषज्ञ असून त्यांनी स्पाईनच्या दुर्मिळ अशा हजारो सर्जरी केल्या आहेत. त्यांनी जळगाव येथे आयोजित सामुदायिक आरोग्य शिबिरांना भेटी दिल्या व तेथील उपस्थित रुग्ण व डॉक्टर्स, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले. 00000

 सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थळाला दिली भेट

 प्रकल्पाच्या गतिमान अंमलबजावणीकरिता अधिकाऱ्यांना दिले निर्देश नवी मुंबई : सिडको अध्यक्ष,  संजय शिरसाट, यांनी २४ सप्टेंबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प स्थळाला भेट देऊन प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. या प्रसंगी  विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संतालक,  शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, दिलीप ढोले, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको,  गीता पिल्लई, मुख्य महाव्यवस्थापक (परिवहन व विमानतळ), सिडको,  शीला करुणाकरन, मुख्य अभियंता (नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्प व विशेष प्रकल्प) सिडको आणि विमानतळ प्रकल्पाशी संबंधित सिडकोचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सिडकोतर्फे 1160 हेक्टर क्षेत्रावर, दोन टप्प्यांमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील सर्वांत मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ साकारण्यात येत आहे. सदर विमानतळ हे प्रती वर्ष 90 दशलक्ष प्रवासी आणि 2.5 टन मालवाहतुकीकरिता नियोजित आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे विमानांच्या स्वतंत्र प्रवर्तानाकरिता दोन समांतर धावपट्ट्या आणि पूर्ण लांबीचे दोन समांतर टॅक्सी वे असणार आहेत. सार्वजनिक खासगी भागीदारीतून विकसित करण्यात येत असलेल्या विमानतळाच्या विकासाची जबाबदारी सवलतधारक कंपनी एनएमआयएएल यांच्यावर आहे. विकासपूर्व कामे पूर्ण होऊन प्रत्यक्ष विमानतळाच्या कामाला सुरुवात झाली आहे. नुकतीच विमानतळ प्रकल्प स्थळी भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे घेण्यात आलेली सिग्नल चाचणी व इन्स्ट्रूमेंट लॅंडिंग सिस्टीम चाचणी यशस्वीरीत्या पार पडली. या भेटीदरम्यान मा. अध्यक्ष यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत सिडकोचे अधिकारी व सवलतधारक एनएमआयएएलच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. तसेच प्रकल्पाची अंमलबजावणी नियोजित वेळेत पूर्ण व्हावी याकरिता संबंधितांना निर्देश दिले. कोट “सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प हा राष्ट्रीय दृष्टीकोनातून महत्त्वाचा प्रकल्प आहे. नवी मुंबईसह राज्याच्या आणि देशाच्या विकासाकरिता हा प्रकल्प योगदान देणार आहे. प्रकल्पाच्या कामाची प्रगती समाधानाकारक आहे. प्रकल्पाच्या गतिमान अंमलबजावणीकरिता कालमर्यादेमध्ये कामे पूर्ण करण्याचे संबंधितांना निर्देशही देण्यात आले आहेत. यामुळे लवकरच येथून विमानाचे उड्डाण होणार आहे.” संजय शिरसाट, अध्यक्ष, सिडको

नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पूर्वतयारीचा अजित पवार यांच्याकडून आढावा

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 26 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येत असून त्यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या अनुषंगाने  प्रशासनाने करावयाच्या कार्यवाहीच्या पूर्वतयारीचा आढावा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज…