नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत 8 ही विभागात अनधिकृत बॅनर्स विरुध्द कारवाई नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अनधिकृत बॅनर्स विरुध्द नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने 8 ही विभागात कारवाई करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 8 ही विभागात दि.18/09/2024 व दि.19/09/2024 रोजी या दोन दिवसात छोटे बॅनर 1893 व मोठे बॅनर 623 असे एकुण 2516 बॅनर्स हटविण्याची कारवाई करण्यात आली. तसेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जाहिरातीचे बॅनर प्रिंट करुन देणारे एकुण 22 प्रिंटींग करणाऱ्या व्यवसायीकांना विभाग कार्यालयामार्फत लेखी सुचना देण्यात आल्या. त्यात नवी मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयाची परवानगी असल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे जाहिरात/बॅनर्स/पोस्टर्स छापु नये व तसे केल्यास त्यांना महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्याकरीता अधिनियम 1995 चे कलम 3 नुसार कारवाई करण्यात येईल अश्याही सुचना देण्यात आल्या. यापुढे अनधिकृत बॅनर्स/होर्डींग्ज विरुध्द कारवाई तीव्र करण्यात येणार आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
पोलिसांचा राजकीय हत्यार म्हणून वापर – डॉ.जितेंद्र आव्हाड
अनिल ठाणेकर भिवंडी येथे धार्मिक दंगल माजविण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र, हा प्रयत्न पोलीस उपायुक्तांनी हानून पडला. त्यामुळेच त्यांची बदली करण्यात आली आहे, असा आरोप करून पोलिसांचा सत्ताधाऱ्यांकडून राजकीय हत्यार म्हणून वापर केला जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा आ. डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली. भिवंडीतील घुंघटनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी जात असताना धार्मिक विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळेस पोलिसांनी हस्तक्षेप करीत लाठीचार्ज केला. या घटनेनंतर पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या संदर्भात डॉ.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आपणाला दोन्ही समाजातील सुजाण नागरिकांनी माहिती दिली की, जर या पोलीस उपायुक्तांनी मध्ये उडी घेतली नसती तर भिवंडीत दंगल झाली असती; दंगल रोखणार्या अधिकाऱ्याला असे बक्षिस दिले जात असेल तर संपूर्ण पोलीस दलाचे मनोबल खच्चीकरण होणार नाही तर काय होईल? आपणाला अंतर्गत माहिती अशी मिळत आहे की, या बदलीला पोलीस दलातील अनेकअधिकाऱ्यांनी प्रचंड विरोध केला आहे. तेथील बीजेपीचा एक राजकीय नेता ही दंगल घडवू इच्छित होता. दंगल झाली नाही आणि त्याचे परिणाम म्हणून पोलीस उपायुक्तांची बदली करण्यात आली. याचा अर्थ स्पष्ट आहे की या सरकारला आगामी निवडणुकीत पराभव पत्करावा लागणार असल्याचे सर्वे आले आहेत. त्यामुळेच धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी काहीही करून सत्ताधारी वर्गाला दंगल भडकवायची आहे. पोलिसांना हत्यार म्हणून पुढे पाठवायचे आणि दंगल घडवायची, हे तत्व सरकारचे आहे . मी पोलिसांनाच विनंती करेन की, तुम्ही राजकीय हत्यार बनू नका. या सरकारला दंगल घडवूनच निवडणूक जिंकायची आहे. त्यांच्या हातचे बाहुले बनू नका. आपल्या देशातील हिंदूंना कधीच आक्रमक हिंसा आवडत नाही. त्यामुळे येथे शांततेत जनजीवन चालू आहे. एकदा दंगल झाली की दंगलीनंतर जी सामाजिक द्वेषाची भिंत उभी राहते; ती पडायला नंतर 20 – 25 वर्षे लागतात, समाजामध्ये जेव्हा विद्वेष पसरतो तेव्हा समाजामध्ये जो आपलेपणा असतो, तो गायब होतो. याचे भान ठेवण्याऐवजी निवडणुका जिंकण्यासाठी दंगली माजवल्या जात आहेत. काल बिहारमधील नेवाडा गावात 80 दलितांच्या झोपड्या जाळण्यात आल्या. एनिहिलेशन ऑफ कास्ट या ग्रंथातून डॉ. बाबासाहेबांनी जातिव्यवस्थेचे निर्मूलन ही संकल्पना मांडली होती. पण, आताची परिस्थिती पाहता, जाती व्यवस्थेचे उच्चाटन तर होताना दिसत नाहीच; किंबहुना, जातीयवाद अधिकच वाढताना दिसतोय आणि त्याला खतपाणी घातले जातेय. आज जर भाजप 400 पार झाली असती तर काय झालं असतं, याचा विचार करा ! दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लीम यांच्या मदतीला संविधानही आले नसते. सगळेच उघड्यावर आले असते. कमीत कमी आज आमच्यासारखी माणसे बोलतात तरी! बिहारच्या बेलछीमध्ये 27 मे 1977 रोजी अकरा दलितांना जीवंत जाळण्यात आले होते. त्यावेळेस विरोधात असणाऱ्या इंदिरा गांधी यांना गावात जाण्यापासून रोखण्यात आले होते. मात्र, इंदिरा गांधी हत्तीवर बसून बेलछी गावात गेल्या होत्या. त्यावेळी लाखो आदिवासी आणि मागासवर्गीय त्यांच्या स्वागताला उभे होते. पण, आज एकटा तेजस्वी यादव बोलत आहे. सत्तेत असलेले शांत बसले आहेत. आज आपण एवढा प्रवास केला; देश एवढा पुढे गेला आणि आज आपण काय बघतोय तर दलितांचे गावच जाळून टाकले जातेय. दलितांनी भारतात राहूच नये का? काय परिस्थिती आहे दलितांची? आजही आपण त्यांना गावाच्या बाहेर बघतो. म्हणजे, ज्यांचे जीवन उद्ध्वस्त आहे : त्यांना तुम्ही जगूही देत नाहीत? खरंतर इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांनी नेवाड्याचा दौरा करून अत्याचारग्रस्त दलितांच्या सोबत आम्ही आहोत, हे सांगायला हवे आहे. त्यांना आता आधाराची गरज आहे. आपली मागणी आहे की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवाय. ते स्वतः मागासवर्गीय आहेत. त्यांच्या राज्यात जर दलित, आदिवासी, मागासवर्गीयांवर अत्याचार होत असेल तर ते शोभनीय नाहीच. नितीशकुमार हे जर लोहिया, कर्पूरी ठाकूर यांचा वारसा सांगून समाजवादी विचारधारेवर चालत असतील तर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारायलाच हवी. अशा घटनांकडे पाहून दलित, मागासवर्गीयांनी काय विचार करावा, हा देश आमचा राहिला आहे की नाही?, असा सवालही डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. चौकट वन नेशन… वन इलेक्शन बाबत पत्रकारांनी विचारले असता, हे फक्त वन नेशन… वन इलेक्शन हा प्रकार नाही. तर वन लीडर आणण्याचा प्रकार आहे. या देशातील संविधान आणि लोकशाही संपवण्याची ही सुरूवात झाली आहे. या निर्णयाने सरळ सरळ लोकशाहीची हत्या होईल. भारतीय संविधानाने दिलेला संसदीय लोकशाहीचा ढाचा उद्ध्वस्त करण्याची आणि त्यातून संविधान संपवण्याची ही तयारी सुरू झाली आहे. पण, आम्ही जीव देऊ पण संविधान बदलू देणार नाही, असा इशाराही डॉ. आव्हाड यांनी यावेळेस दिला. 00000
मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे निवासी पंच प्रशिक्षण शिबिर
मुंबई : येत्या २१ व २२ सप्टेंबर रोजी मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या वतीने पंचांचे निवासी प्रशिक्षण शिबिर राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे श्रमसाफल्य निवास, खंडाळा येथे आयोजित करण्यात आले आहे. असोसिएशनचे…
राष्ट्रीय सब ज्युनियर जंप रोप स्पर्धा
मुंबई उपनगरची १९ पदकांची कमाई मुंबई : नांदेड येथे नुकत्याच झालेल्या २१ व्या राष्ट्रीय सब ज्युनियर जंप रोप स्पर्धेत मुंबई उपनगरच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करताना ४ सुवर्ण, २ रौप्य, १३ कांस्य अशी एकूण १९ पदकांची कमाई केली. या स्पर्धेत विविध राज्यांतून ३०० पेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नरेंद्रदादा चव्हाण यांनी केले. क्रीडा संकुल, यशवंत महाविद्यालय येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरच्या १२ खेळाडूंचा सहभाग होता. या स्पर्धेत मुंबई उपनगरच्या युग पटेल, आरोही कांबळे, हर्ष कांबळे, आशनी नितीन काळे, मन पटेल, उत्कर्ष शाह, मन मारू, नम्र वासानी, नैती वासानी यांनी पदके जिंकली. नम्र वासानी ने १ सुवर्ण, ३ कांस्य पदके पटकावली. तर आरोही कांबळे, नैती वासानी ने प्रत्येकी १ सुवर्ण, १ रौप्य, १ कांस्य पदक जिंकले. मन पटेलने १ सुवर्ण, २ कांस्य पदकांची कमाई केली. युग पटेलला १ सुवर्ण, १ कांस्य पदक मिळाले. प्रशिक्षक विद्धेश मोरे यांचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभले. पदक विजेत्या खेळाडूंचे खास अभिनंदन मुंबई सब अर्बन जंप रोप संघटनेचे अध्यक्ष, स्वप्नील पहुरकर, सचिव, सौ. वर्षा काळे, खजिनदार, योगेश सांगळे यांनी केले.
राडोने दोन नवीन घड्याळे सादर केली
मुंबई : अत्यंत आनंदाच्या प्रसंगाची एखादी अविस्मरणीय आठवण आपल्याला हवी असते. स्विस घड्याळे बनवणारी आणि मास्टर ऑफ मटेरियल्स म्हणून प्रख्यात असलेली राडो कंपनी राडो कॅप्टन कूक हाय-टेक सिरॅमिक स्केलेटन आणि…
कल्याण-डोंबिवलीत वाहन चोरींच्या घटनांमध्ये वाढ
कल्याण : कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक रस्त्यावर, इमारतीच्या तळमजल्यावरील वाहनतळावर उभ्या करून ठेवण्यात आलेल्या दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. या वाहन चोरींमुळे वाहन मालकांमध्ये भीतीचे…
मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनची आयआयटी मुंबईला १३० कोटींची देणगी
जागतिक दर्जाचं नॉलेज सेंटर उभारणार मुंबई : मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनने आयआयटी मुंबईला तब्बल १३० कोटी रुपयांची देणगी दिली आहे. मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनच्या या ऐतिहासिक सहकार्यामुळे आता आयआयटी मुंबई या ठिकाणी जागतिक दर्जाच्या शैक्षणिक पायाभूत सुविधा स्थापना होण्यास मदत होणार आहे. राष्ट्र उभारणी आणि आर्थिक क्षेत्रात शैक्षणिक उत्कृष्टतेचा पाठपुरावा करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल समजलं जात आहे. मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनने १३० कोटींची ही देणगी प्रतिज्ञाद्वारे दिली आहे. ‘एमओएफएसएल’चे सह-संस्थापक मोतीलाल ओस्वाल आणि रामदेव अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या फाउंडेशनकडून ही आतापर्यंतची सर्वात मोठी देणगी असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये मोतीलाल ओस्वाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या १० टक्के इक्विटी, ज्याचे मूल्य सध्या चार हजार कोटी आहे. भारतीय शैक्षणिक संस्थेसाठी हे मोठे योगदान समजलं जात आहे. मोतीलाल ओस्वाल फाऊंडेशन आणि आयआयटी बॉम्बे यांच्या या सामंजस्य करारांतर्गत मोतीलाल ओस्वाल नॉलेज सेंटर आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये तबब्ल १ लाख १.२ लाख चौरस फूट क्षेत्रफळात स्थापन करण्यात येणार आहे. हा अत्याधुनिक शैक्षणिक प्रोजेक्ट नावीन्य आणि संशोधनाचे केंद्र म्हणून काम करणार आहे आणि शैक्षणिक उत्कृष्टता, प्रगत प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे या माध्यमातून मोतीलाल ओस्वाल नॉलेज सेंटर आयआयटी मुंबईला जागतिक दर्जाची प्रतिभा तयार करण्यासाठी आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानात आणखी सक्षम बनविण्यास सक्षण करेल. दरम्यान, भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबई येथील मोतीलाल ओस्वाल सेंटर फॉर कॅपिटल मार्केट्सची कल्पना भारतीय वित्तीय क्षेत्राचा विकास आणि वाढ सक्षम करण्यासाठी उच्च-स्तरीय क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेली आहे. हे बहुविद्याशाखीय अर्थशास्त्र, व्यवस्थापन, ऑपरेशन्स रिसर्च, कॉम्प्युटर सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि गणित यासारख्या क्षेत्रांतून कौशल्य प्राप्त करेल. एमओसीएमची योजना अंडरग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट स्तरांवर अनेक शैक्षणिक कार्यक्रमची आहे. केंद्राने ऑनलाइन पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमाची कल्पना देखील केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना वास्तविक-जगातील डेटासह व्यावहारिक प्रशिक्षण आणि आर्थिक क्षेत्राचे भविष्य घडविण्याची संधी प्रदान करते. दरम्यान, आयआयटी मुंबईचे संचालक प्राध्यापक शिरीष केदारे यांनी या महत्त्वाच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “मोतीलाल ओस्वाल नॉलेज सेंटर हे जागतिक उत्कृष्टतेच्या आणि एक नवे ध्येय गाठण्यासाठी आयआयटी मुंबईच्या प्रयत्नांमध्ये एक महत्वापूर्ण निर्णय ठरेल. ही देणगी आम्हाला आमच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि प्रगती करण्यास मदत करेल. तसेच जी ग्राउंडब्रेकिंग संशोधनाला चालना देण्यासाठी आवश्यक आहे. भांडवली बाजारासाठी मोतीलाल ओस्वाल केंद्राची स्थापना हा आयआयटी बॉम्बेसाठी महत्त्वाचा क्षण आहे. हा उपक्रम केवळ आर्थिक शिक्षणात संस्थेचा दर्जा वाढवेल, असे नाही तर आर्थिक बाजारपेठेतील पुढच्या पिढीचे पालनपोषण करण्यासाठी एक प्रमुख केंद्र म्हणून तिचे स्थान मजबूत करेल. जागतिक स्तरावर भारताच्या नेतृत्वात योगदान देण्याच्या आणि जागतिक उत्कृष्टतेची नवीन उंची गाठण्याच्या आमच्या व्यापक दृष्टीकोनाशी हे महत्वाचं पाऊल ठरेल. मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनच्या दूरदर्शी योगदानाबद्दल आम्ही आभारी आहोत.” ०००००
नवीन पनवेलमध्ये गौरा गणपती सार्वजनिक उत्सवाचे आयोजन
पनवेल : नवीन पनवेल येथील अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ आणि प्रियदर्शनी महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी “गौरा गणपती सार्वजनिक उत्सव” आयोजित करण्यात आला…
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सुयोग्य व्यवस्थेत अनंत चतुर्दशीदिनी 8435 श्रीमूर्तींना भावपूर्ण निरोप
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेने सर्व विसर्जनस्थळी केलेल्या सुयोग्य व्यवस्थेमध्ये अनंतचतुर्दशीदिनी मोठ्या प्रमाणात होणारा श्रीगणेशमूर्ती विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. 22 नैसर्गिक व 137 कृत्रिम विसर्जनस्थळी उत्सवाच्या दहाव्या दिवशी…
नागरिकांनी जागृतेश्वर तलाव परिसर स्वच्छ करीत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा केला शुभारंभ
नवी मुंबई : स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट असून स्वच्छतेमध्ये सातत्य राखणे गरजेचे आहे. यादृष्टीने ‘स्वच्छ भारत मिशन’च्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा (SHS) पंधरवडा’ जाहीर करण्यात आला असून या अंतर्गत…
