Category: मुंबई

Mumbai news

– दुर्गाडी किल्ला आणि सभोवतालचा परिसर सुशोभित करण्याची विजय साळवी यांची मागणी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी यांचे केडीएमसी आयुक्तांना पत्र कल्याण : कल्याण मधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला आणि सभोवतालचा परिसर सुशोभित करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे…

मुलांचा भाव विश्वास जाणून ‘वासाची किंमत’ या लघुपटाची निर्मिती – डाएट प्राचार्य संजय वाघ

कल्याण : “इयत्ता तिसरीच्या वर्गातील मराठी विषयातील “वासाची किंमत” या चित्रकथेवर आधारित अजय पाटील यांनी पटकथा, संवाद, कॅमेरा, एडिटिंग, दिग्दर्शन असे पंचरंगी भूमिका सादर करून अत्यंत सुंदर पद्धतीचा लघुपट शाळेतील…

मुंबई महानगर क्षेत्रात केबल कार प्रकल्पासाठी नितीन गडकरींची तत्वतः मान्यता – प्रताप सरनाईक

अनिल ठाणेकर मुंबई महानगर क्षेत्रामध्ये भविष्यात रोप वे च्या माध्यमातून केबल कार प्रकल्प राबवण्यास केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली असून लवकरच या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून विकास आराखडा (D.P.R.) तयार करण्यात येईल. तसे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते, वाहतूक मंत्रालयाचे सचिव  वी. उमाशंकर यांना दिले आहेत, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. नवी दिल्ली येथे  केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व राज्यांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकी दरम्यान   परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी  मंत्री गडकरी यांची विशेष भेट घेऊन मुंबई महानगर क्षेत्रामध्ये ” केबल कार ” प्रकल्प राबवण्यासाठी केंद्र सरकार द्वारे.  “ पर्वतमाला परियोजना ” अंतर्गत *सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) अथवा केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त आर्थिक भागिदारीने* रोप वे विकसित करण्याच्या प्रकल्पाचे सादरीकरण केले. *यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईच्या एकूणच वाहतुकी संदर्भात प्रकल्प अहवाल सादर करताना विमानतळापासून उपनगरांमध्ये कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी कमीत कमी वेळ लागावा, अशा पद्धतीची एकत्रित वाहतूक व्यवस्था विकसित करण्याचा प्रकल्पाचे देखील सर्वेक्षण करावे अशी  सूचना मांडली* याला परिवहन मंत्री, सरनाईक यांनी वेगवेगळ्या उपनगरांमधून कमीत कमी वेळात मुंबई विमानतळाला पोहोचता येईल असा *एकत्रित वाहतूक आराखडा* लवकरच सादर केला जाईल असे आश्वासन दिले.दरम्यान मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या दृष्टीने या प्रकल्पाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पालघर पासून रायगड जिल्ह्यातील उरण-पेण पर्यंत पसरलेल्या एकूण क्षेत्रामध्ये नागरिकरणाचा वेग वाढत आहे. रस्ते वाहतूक, रेल्वे, मेट्रो यासारख्या सार्वजनिक वाहतूक सेवेवर दिवसेंदिवस पडणार ताण लक्षात घेता भविष्यात ” केबल कार ” सारखी हवाई सेवा विकसित होणे आवश्यक आहे. त्यासाठी या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून विकास आराखडा (DPR) तयार करणे गरजेचे असून त्याला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री  म्हणून नितीन गडकरी यांनी विशेष परवानगी देणे आवश्यक होते.या भेटी दरम्यान  केंद्रीय मंत्री गडकरी यांना या प्रकल्पाचे सादरीकरण करुन मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या दृष्टीने या प्रकल्पाचे महत्त्व विशद केले. या प्रकल्पास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री म्हणून नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली आहे.अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुंबई महानगर क्षेत्रातील वाढते नागरीकरण, वाहनांची वाढती संख्या, त्या तुलनेत अपुरी रस्ते व रेल्वे सेवा, वाढते प्रदूषण या कारणामुळे काही धोरणात्मक निर्णय घेऊन आधुनिक तंत्रज्ञान व पाश्च्यात देशात यशस्वीपणे राबवलेल्या प्रकल्पाचा अभ्यास करून नाविन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून  भविष्यात वाहतुक कोंडी चा प्रश्न सोडवण्यासाठी ठोस प्रयत्न केला जाईल. त्यासाठी “केबल कार ” प्रकल्पाचे महत्त्व केंद्रीय रस्ते  वाहतूक व महामार्ग मंत्री, नितीन गडकरी यांना पटवून देऊन या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून विकास आराखडा तयार करण्याची तत्वतः मान्यता घेण्यात आली आहे.अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

 आदिवासी समाजाच्या सदस्यांना विस्थापित करण्याचा भूमाफियांचा घाट

संबंधितांवर कारवाई करण्याची परहित चॅरिटेबल सोसायटीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी   कल्याण : कल्याण तालुक्यातील कांबा येथील एकूण ४६० एकर क्षेत्र असलेल्या आणि अंदाजे रूपये दोन हजार  करोड किंमतीच्या एका जमिनीवरील कब्जेदार आणि वहिवाटदार आदिवासी समाजाच्या सदस्यांना स्थानिक भूमाफिया पैशाच्या, बळाच्या, दहशतीच्या जोरावर विस्थापित करून सामाजिक अन्याय आणि शोषण करीत असून या आदिवासी समाजाच्या सदस्यांना विस्थापित करण्याचा भूमाफियांनी घाट घातला आहे. त्यामुळे आदिवासी समाजाच्या विनंतीनुसार  सबंधितांवर कारवाई करण्याची मागणी परहित चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष विशालकुमार गुप्ता यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. स्वतः शेतकरी नसणाऱ्या शहा कुटुंबीयांनी बेकायदेशीररित्या कांबा येथे जमिनी विकत घेतल्या. या जमिनीच्या काही भूभागावर पूर्वापार पासून आदिवासी समाजाच्या सदस्यांचा कब्जा, वहिवाट आणि कुळ आहे. आदिवासी समाजाचे सदस्य मुळातच दुर्बल, अशिक्षीत, गरीब आणि त्यांच्या अधिकारांची जाणीव नसणारे असल्यामुळे ते न्यायालयीन संघर्ष करण्यास कमी पडत आहेत.  याचा फायदा घेऊन पैशाच्या जोरावर न्याय खेचून आणत असून आदिवासी कटुंबाचे न्याय हक्क मारून त्यांच्यावर अन्याय करत आहेत. आदिवासी सदस्यांवर दहशत निर्माण करण्यासाठी या भूमाफियांनी स्थानिक गुंड टोळीची मदत घेतली असून, त्या गुडांच्या भितीने आदिवासी सदस्य प्रचंड दहशतीखाली असून जिव मुठीत घेवून जिवन जगत आहेत. त्यासाठी आदिवासी कब्जेदार वहिवाटदार यांना पोलीस संरक्षण प्रदान करावे आणि शहा कुटुंबिय आणि त्यांचे स्थानिक गुड यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई आणि उचित पोलीस कारवाई करावी. विषयांकीत वाद जमिनीबाबत दावे उच्च न्यायालयात आणि उपविभागीय अधिकारी कल्याण यांच्या न्यायालयात प्रलंबीत असल्यामुळे मालमत्ता हस्तांतरण अधिनियम कलम ५२ अन्वये शहा कुटुंबियांना मालमत्ता हस्तांतरणास अथवा जमिन खरेदी विक्रीस परवानगी देऊ नये. जमिनीवरील गैर व्यवहाराबाबत चर्चा करण्यासाठी आणि वस्तुस्थिती आणि कागदपत्रे आपणाकडे सादर करण्यासाठी आदिवासी सदस्यांना भेटीची वेळ मिळावी. आदिवासींवरील अन्याय दूर करण्यासाठी त्यांची बाजू आपणाकडून न ऐकली गेल्यास, आदिवासी समाजास आमरण उपोषण, आंदोलन करण्याशिवाय आणि न्यायासाठी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, नवी दिल्ली यांच्याकडे दाद मागण्याशिवाय पर्याय शिल्लक राहणार नाही. त्यामुळे आदिवासी समाजाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून या प्रकरणात तात्काळ न्यायोचित कारवाई करण्याची मागणी परहित चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष विशालकुमार गुप्ता यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. 0000

 सदस्य नोंदणीसाठी भाजपाचे १० जानेवारी रोजी ‘घर चलो अभियान’

 भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती दीड कोटी प्राथमिक सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा विश्वास मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या सुरु असलेल्या संघटन पर्वा अंतर्गत 10  जानेवारी रोजी प्राथमिक सदस्य नोंदणीसाठी  घर चलो अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात पक्षाचे सर्व मंत्री, पंचायती पासून पार्लमेंट पर्यंतचे सर्व लोकप्रतिनिधी, सर्व पदाधिकारी या अभियानात सहभागी होणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते. यावेळी संघटन पर्व प्रभारी आ. रवींद्र चव्हाण, आ. शिवाजी कर्डिले, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. पक्षाचे दीड कोटी प्राथमिक सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट निश्चितच पूर्ण होईल, असा विश्वासही श्री. बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला. बावनकुळे यांनी सांगितले की, पक्षाच्या संघटन पर्व अंतर्गत सदस्य नोंदणी अभियानाला राज्यात प्रारंभ झाला आहे. 5 जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी, पदाधिकाऱ्यांनी बूथ पातळीवर जाऊन या अभियानात सहभाग घेतला.10 जानेवारी रोजी पक्षाचे सर्व प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी प्रत्येक बुथवर किमान 40 -50 घरी जाऊन प्राथमिक सदस्य नोंदणी करणार आहेत. पक्षाने राज्यात दीड कोटी प्राथमिक सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्राथमिक सदस्य नोंदणीनंतर सक्रीय सदस्य नोंदणी अभियान सुरु होईल. एका बुथवर 5 सक्रीय सदस्य नोंदवून राज्यात 5 लाख सक्रीय सदस्य नोंदविले जातील, असेही बावनकुळे यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकसित भारताचा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करण्यासाठी राज्यातील जनता सदस्य नोंदणी अभियानाला प्रतिसाद देईल, असा विश्वासही श्री. बावनकुळे यांनी व्यक्त केला. ०००००

 ‘एचएमपीव्ही’ या विषाणूबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये!

ठाणे महापालिकेचे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे विशेष वॉर्ड तयार ठाणे : सध्या चीनमध्ये एचएमपीव्ही (Human Metapneumo virus) साथीचा उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत. भारतातही काही रुग्ण आढळले आहेत. मात्र, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे. तो श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास (सर्दीसारख्या) कारणीभूत ठरतो. हा एक हंगामी रोग असून तो सामान्यतः फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला सर्तक राहण्याचे निर्देश दिले आहेत. या विषाणूबाबत, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. त्यानुसार, २०२३च्या तुलनेत डिसेंबर-२०२४ मध्ये या आराजाच्या रुग्णात कोणतीही वाढ झालेली नाही. तरीही, खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांना श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करु नये या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. विशेष वॉर्ड तयार दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे १५ खाटांचा आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला आहे. हे करावे… खोकला किंवा शिंका येत असतील तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका. साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने हात वारंवार धुवा. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक अन्न खा. संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायूविजन (व्हेंटीलेशन) राहील, याची दक्षता घ्या. काहीही शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे करु नये हस्तांदोलन करणे टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर आजारी लोकांशी जवळचा संपर्क डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे…

अतिक्रमण विभागामार्फत कोपरखैरणे व वाशी विभागात निष्कासनाची कारवाई

नवी मुंबई : मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (2) डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने कोपरखैरणे व वाशी विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभाग अंतर्गत 1)  वसीम अकबर अली खान, रूम नं. 23, सेक्टर-15, कोपरखैरणे, नवी मुंबई, व 2)  अंकुश नाना जगताप/ योगेश नाना जगताप, एस.एस. टाईप, रूम नं. 678, सेक्टर-15, कोपरखैरणे, नवी मुंबई. यांच्या बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. सदर बांधकामावर  तोडक कार्यवाही करण्यात आली. त्यापैकी  वसीम अकबर अली खान यांचेकडून अनधिकृत बांधकाम हटविणेपोटी दंडात्मक शुल्क रू.10,000/- पावती क्र.248395, दि.06/01/2025 अन्वये वसूल करण्यात आलेले आहे. सदर अनधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाचे सहा.आयुक्त सुनिल काठोळे, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत धोत्रे व  इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. तसेच सदर कारवाईसाठी 7 मजूर, इलेक्ट्रॉनिक हॅमर – 02, गॅस कटर – 01, पिकअप व्हॅन – 01 वापर करण्यात आले. ठाणे बेलापूर रोड कोपरखैरणे ब्रीज खालील 19 बेघर लोकांचे सामान जप्त करून डपिंग येथे जमा करण्यात आले. तसेच सेक्टर-19,20 व कोपरखैरणे गाव येथील शाळा परिसराच्या 100 मीटरच्या आत तंबाखू/पानविक्री/गुटखा विक्री करणा-या 03 टप-यांचे सामान जप्त करून डपिंग येथे जमा करण्यात आलेले आहे. या माहिमेकरीता वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोपरखैरणे, औदूंबर पाटील, त्यांचे विभागाकडील पोलिस उपस्थित होते. नवी  मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सी  विभाग वाशी अंतर्गत  अफताब जाकारीया जानवेकर व परवेज जाकारीया जानवेकर, युनिट क्र. एस.एस/3-227, सेक्टर- 02, वाशी, नवी मुंबई यांचे इमारतीचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु होते. सदर अनधिकृत बांधकामास वाशी  विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 53 1(अ) अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हुन हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले असल्यामुळे दि. 12/12/2024 रोजी सदर अनधिकृत बांधकामावर वाशी विभागामार्फत तोडक मोहिमच आयोजन करुन करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम अंशत: निष्कासित करण्यात आले. तसेच संबंधितांनकडून रु.25,000/- दंड ही वसुल करण्यात आलेला आहे. तदनंतर संबंधितांनी पुन्हा काम सुरु ठेवल्यामुळे दि. 06/01/2025 रोजी सदर अनधिकृत बांधकामावर वाशी विभागामार्फत पुन्ह:श्च तोडक मोहिमच आयोजन करुन करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम अंशत: निष्कासित करण्यात आले. तसेच संबंधितांनकडून रु.10,000/- दंड ही वसुल करण्यात आलेला आहे.  या धडक मोहिमेसाठी सी विभाग कार्यालयाचे सहायक आयुक्त  सागर मोरे तसेच अतिक्रमण विभागाचे अधिकारी/कर्मचारी उपस्थ‍ित होते. या धडक मोहिमेसाठी एकूण 10 मजुर, 1 इलेक्ट्रिकल हॅमर, 1 गॅस कटर व पोकलन यांचा वापर करण्यात आला. यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

शाहरुख खानची ‘मन्नत’ पूर्ण

  दोन मजले वाढवण्यास पर्यावरण विभागाची मंजुरी   मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्यावर आणखी दोन मजले वाढणार आहेत. राज्याच्या पर्यावरण विभागाने नुकतीच याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे बंगल्याच्या विस्तारिकरणाची शाहरुखची ‘मन्नत’ अखेर पूर्ण होणार आहे. बॉलिवूडचा स्टार असलेल्या शाहरुख खानचा वांद्रे येथील बंगला नेहमीच चर्चेत असतो. माउंट मेरी कडे जाणाऱ्या रस्त्यावरचा हा बंगला शाहरुखच्या चाहत्यासाठीही आकर्षणाचा विषय आहे. सध्या सहा मजल्यांचा असलेला हा बंगला आता लवकरच आणखी उंच होणार आहे. या बंगल्याच्या वर आणखी दोन मजले वाढण्यासाठी महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (एमसीझेडएमए) नुकतीच परवानगी दिली आहे. शाहरुखची पत्नी गौरी खान हिने या परवानगीकरिता संबंधित विभागाकडे अर्ज केला होता. वांद्रे पश्चिम येथील पालिकेच्या एच पश्चिम विभागाच्या अखत्यारीत येणारा मन्नत या बंगल्याचे आता आणखी विस्तारिकरण करून त्यात काही बदल करण्यात येणार आहेत. या सहा मजली बंगल्याला २००२ मध्ये आयओडी तसेच २००६ मध्यवं भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले आहे. त्यानंतर बंगल्यामध्ये तळघरात दोन मजले आणि जलतरण तलाव बांधण्यात आला व त्यालाही भोगवटा प्रमाणपत्र व सीआरझेड परवानगी मिळालेली आहे. ०००००

बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथील कै अनंतराव भोसले मैदानावर शिवसेना शाखा क्रमांक १४ तर्फे आणि शिवसेना शाखा क्रमांक १२ व मागाठाणे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात…

२७ गावांसाठी ३५७ कोटींची पाणीपुरवठा योजना;

१०५ दलघमी साठवण क्षमता होणार निर्माण   कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांसाठी अमृत योजनेअंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे कल्याण-डोंबिवली शहरांसह नव्याने समाविष्ट…