Category: मुंबई

Mumbai news

नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत ऐरोली विभागात तोडक कारवाई

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व…

 ‘सौर कृषिपंपांतून शेतकऱ्यांना वीज विक्रीचे उत्पन्न मिळवून देणार’

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन   मुंबई : कृषिपंपाच्या वीज कनेक्शनसाठी शेतकऱ्यांनी अनेक वर्षे वाट पाहण्यापासून मागणीनुसार तत्काळ कृषिपंप अशी राज्याची वाटचाल ‘मागेल त्याला सौर कृषिपंप योजने’मुळे झाली आहे. आगामी…

 मुंबईत २८५ लिटर भेसळयुक्त दूध जप्त

अन्न व औषध प्रशासनाची मालाडमध्ये कारवाई मुंबई : गणेशोत्सवानिमित्त दूध व दूग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मुंबईत करण्यात आलेल्या कारवाईत २८५ लिटर…

कोस्टल रोड आता सिलींकलाही जोडला

मुंबई : मुंबई कोस्टल रोडला आता वरळी ते वांद्रे सी-लिंकला जोडण्यात आले आहे. त्यामुळे नरिमन पॉईंट ते वांद्रे हे अंतर अवघ्या १०  मिनिटात पार करता येणे शक्य होणार आहे. मुंबईच्या कोस्टल रोड ते वरळी…

राज्यात स्वाइन फ्लू, डेंग्यूचा धोका वाढला

साथीच्या आजारांनी राज्यात वर्षभरात ६८ जणांचे मृत्यू मुंबई : राज्यात विविध आजारांनी या वर्षभरात ६८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये स्वाइन फ्लूने सर्वाधिक ३९ जणांचा मृत्यू झाला असून डेंग्यूने १७ जणांचा मृत्यू झाला…

‘मुख्यमंत्री योजनादूत’साठी अर्जाची आज शेवटची संधी

 मुंबई दि. १२ : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवार दि. १३ सप्टेंबर २०२४ ही शेवटची तारीख…

महाराष्ट्रात निवडणूकीचे पडघम वाजू लागले

ऑक्टोबरमध्ये आचारसंहीता लागू होणार स्वाती घोसाळकर मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणूकीची आचारसंहीता लक्षात घेऊन राजकीय ‘कामां’चा उरक मंत्रालयात वाढू लागलाय. फाईल झपाट्याने हातावेगळ्या केल्या जाऊ लागल्या आहेत. तर दुसरीकडे…

मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरींचे निधन

मुंबई:  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांचे निधन झाले आहे. प्रकृती खालावल्यामुळे मंगळवार, दि. १० सप्टेंबर रोजी त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज अखेर त्यांची…

कृत्रिम हौदात विसर्जन करुन राज्यपालांनी दिला बाप्पाला निरोप

 पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी गणेशमूर्तीचे अशोक गायकवाड मुंबई :गणेशमूर्ती विसर्जन करताना पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी मूर्तीचे समुद्रात विसर्जन न करता ते कृत्रिम हौदात करुन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी बाप्पाला निरोप दिला. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या निवासस्थानी, राजभवन येथे स्थापन केलेल्या गणरायाचे बुधवारी गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी राजभवन येथे कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. राज्यपालांनी कुटुंबातील सदस्य तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांचेसह गणरायाची आरती केल्यानंतर बाप्पाला निरोप दिला. राज्यपालांच्या सूचनेनुसार गणेश मूर्तीचे समुद्रात विसर्जन न करता कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. गणेशमूर्ती विसर्जन करताना पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी मूर्तीचे समुद्रात विसर्जन न करता ते कृत्रिम हौदात करावे अशी सूचना राज्यपालांनी केल्यामुळे मूर्तीचे विसर्जन हौदात करण्यात आले. राज्यपालांच्या निवासस्थानी मांडलेली गणेशाची मूर्ती शाडूची होती व ही मूर्ती नाशिक येथील कारागृहातील कैद्यांनी तयार केली होती. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेनुसार ही मूर्ती राज्यपालांना देण्यात आली होती. विसर्जनाचे वेळी राज्यपालांचे प्रधान सचिव प्रविण दराडे, सहसचिव श्वेता सिंघल, परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत ऐरोली विभागात पाडकामाची कारवाई

नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल…