Category: मुंबई

Mumbai news

अनंत चतुर्दशीपूर्वी खड्ड्यांचे विघ्न होणार दूर

 पावसाने उसंत घेतल्याने कामाला वेग मुंबई : विसर्जन मार्गात खड्ड्यांचे विघ्न येऊ नये, यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. अनंत चतुर्दशीपूर्वी सर्व खड्डे बुजविण्यात येणार आहेत. सध्या पावसाने उसंत घेतल्यामुळे खड्डे भरणे सोपे झाले आहे, शिवाय भरलेले खड्डे पुन्हा उखडण्याचे प्रमाण कमी झाले आहे, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. ऑगस्टमध्ये पालिकेने खड्डे बुजविण्याचे प्रयत्न केले होते. मात्र, तेव्हा मुसळधार पाऊस झाल्याने खड्डे बुजविण्याची मोहीम यशस्वी ठरली नव्हती, तरीही खड्डे बुजविण्याचे पालिकेचे प्रयत्न सुरूच होते. दरवर्षी सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर ओसरल्यावर खड्डे बुजविण्याचे काम प्राधान्याने हाती घेतले जाते. यंदा मात्र, भर पावसातही खड्डे भरण्याची कामे सुरू होती. त्यामुळे भरलेल्या खड्ड्यांतील मिश्रण टिकत नव्हते. दुसरीकडे पाऊस सुरू असतानाही खड्डे भरावेत, कोणत्या विभागांत खड्डे पडले आहेत, याचा शोध घेण्यासाठी आणि त्यावर तत्काळ कार्यवाही करण्यासाठी यंदा पालिका प्रशासनाने खास दुय्यम अभियंत्यांची नियुक्ती केली होती. या अभियंत्यांवर खड्डे भरणे आणि शोधणे एवढीच जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या कामात कुचराई करणाऱ्या २० पेक्षा जास्त अभियंत्यांना नोटीसही बजावण्यात आली आहे. विसर्जन मार्ग, मुख्य रस्त्यांवर डागडुजी गणेशोत्सावात भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पालिकेने अगोदरच रस्त्यांची डागडुजी हाती घेतली होती. आता गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून, १७ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घरगुती गणपतींचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे विसर्जन मार्गांसह मुख्य रस्त्यांवरील डागडुजी करण्यावर भर दिला जात आहे, असे पालिकेकडून सांगण्यात आले. 0000

 वसीम अहमद खान यांचे गायन

 दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने नाना आणि भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि भरत व शैलेश राजाध्यक्ष तसेच शारदा सबनीस यांच्या सहकार्याने वसीम अहमद खान यांचा गायन कार्यक्रम रसिकांसाठी आयोजित करण्यात आला आहे. त्यांना तबल्यावर अभय दातार तर संवादिनीवर निरंजन लेले साथ देतील. हा कार्यक्रम रविवार दिनांक २२ सप्टेंबर २०२४ या दिवशी सायंकाळी पाच वाजता संस्थेच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात होईल. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिक माहितीसाठी संपर्क २४३०४१५०. वसीम अहमद खान यांची हेवा करणारी वंशावळ आहे. १३ व्या शतकापासून भारतात गायन क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या आग्रा घराण्याचे ते एकमेव थेट वंशज आहेत त्यांच्या गायकीत आग्रा धृपद गायनाचा प्रभाव आहे. धृपद आणि ख्यालच्या आवाजाने आशीर्वादित खान यांनी अनेकांना प्रभावित केले आहे. भारतातील प्रसिद्ध गायक उस्ताद रशीद खान यांनी चालवल्या जाणाऱ्या शाखरी बेगम मेमोरियल ट्रस्ट या अकादमीचे वरिष्ठ प्राध्यापक सदस्य म्हणून पाच वर्षे अध्यापन केले. ख्याल गायनाव्यतिरिक्त, खान यांच्या ठुमरी सादरीकरणांनाही रसिक आणि सामान्य प्रेक्षकांकडून प्रशंसा मिळाली आहे. ००००००

फ्रँक्लिन पॉल या व्यक्तीने त्याच्या घरी राहता घरी सायन इथे गणपतीसाठी युनिक डेकोरेशन तयार केलेले आहे. ००००

जयदीप आपटेच्या पोलिस कोठडीत वाढ

सिंधुदुर्ग : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे व बांधकाम रचना सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना मंगळवारी दुपारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यात आपटेला १३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी तर पाटीलला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली…

मुंबईतील ऱस्ते आता टकाटक होणार

सिमेंट काँक्रिट रस्त्यांच्या परीक्षणासाठी आयआयटी मुंबईची नियुक्‍ती   मुंबई : मुंबईकरांसाठी खुशखबर आहे. मुंबईकरांची खड्यातून मुक्तता करण्यासाठी आणि मुंबईचे रस्ते टकाटक करण्यासाठी बृन्मुंबई महानगर पालिकेनेच स्वागतार्ह पावूल उचलले आहे. सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा…

राहुल गांधींच्या आरक्षणाच्या भुमिकेवर फडणवीसांचा हल्लाबोल

मुंबई : काँग्रेसचे नेते  राहुल गांधीं  यांनी अमेरिकेत आरक्षणावरुन केलेल्या विधानावर भाजपाने जोरदार हल्लाबोल केला आहे.  जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. पण सध्या ती योग्य वेळ नाही, असं राहुल गांधी…

गौराई माझी लाडाची लाडाची गं…

गणपतीच्या आगमनानंतर आलेल्या गौरीचे विधीवत पूजन करण्यात आलं. सात दिवसांच्या  गौरी गणपतीचे आज विसर्जन होणार आहे त्याआधी कोकणात प्रथेप्रमाणे रायगडच्या घोसाळे गावामध्ये गौरीची केलेली सजावट.

राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लावणार ?

स्वाती घोसाळकर मुंबई : मतदार संघाची पुर्नरचना झाल्यापासून महाराष्ट्राची निवडणूक ही हरयाणासोबत गेली तीन टर्म एकत्र झाली आहे.  यंदा पहिल्यांदाच ती एकत्र होत नाहीय. महाराष्ट्रातील राजकारण सत्ताधारांसाठी पोषक नाहीय, आणि म्हणूनच निवडणूक…

किरीट सोमय्यांनी हात जोडले !

मुंबई : महाराष्ट्रातील भाजपाच्या यशात मोलाचा वाटा उचलणाऱ्या किरीट सोमय्यांना सातत्याने डावलण्यात येत असल्यामुळे आज त्यांनी अखेर गांधीगिरी करीत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिलीय. आपले दोन्ही हात जोडत पक्षाने त्यांच्यावर आगामी…

अभिनेत्री मलायकाच्या वडीलांची आत्महत्या

मुंबई : सिनेअभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी ब्रांदा येथील राहत्या घरातून सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. ते ६५ वर्षांचे होते. हा अपघात आहे की आत्महत्या याबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे. प्रथमदर्शनी ही…