सुपर ओव्हरमध्ये स्पोर्ट्स प्रमोशन ग्रुप विजयी
६६वी टी-२० बाळकृष्ण बापट स्मृती ढाल क्रिकेट स्पर्धा मुंबई : कुर्ला स्पोर्ट्स क्लब आयोजित ६६ व्या टी-२० बाळकृष्ण बापट स्मृती ढाल क्रिकेट स्पर्धेत उपउपांत्य फेरीच्या लढतीत सुपर ओव्हरपर्यंत लांबलेल्या सामन्यात…
महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी दिलीप जगदाळे
कल्याण :महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी दिलीप जगदाळे नुकतेच रुजू झाले. ते भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) अधिकारी असून राज्याच्या विविध भागातील प्रशासकीय कामाचा तब्बल ३३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी…
सौर उर्जा क्षेत्रात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची भरीव कामगिरी
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने सौर उर्जा क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 10 प्रभाग क्षेत्र कार्यालयासाठी एकूण…
‘गो ग्रीन’ सेवेचा पर्याय निवडा व वीजबिलात एकरकमी 120 रुपये सूट मिळवा
नवीन वर्षात महावितरणची ग्राहकांना भेट मुंबई : नूतन वर्षांची भेट म्हणून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीज बिलात एकरकमी 120 रुपये सूट देण्याची घोषणा महावितरणने केली आहे. महावितरणकडून ‘कागद वाचवा, पर्यावरण वाचवा’ या संकल्पनेनुसार गो-ग्रीन सेवा राबविण्यात येत आहे. त्यानुसार यापूर्वी या योजनेअंतर्गत ग्राहकांना मासिक वीज बिलात 10 रुपये सूट देण्यात येते. मात्र आता यापुढे पहिल्याच बिलात पुढील बारा महिन्यासाठी तत्काळ 120 रूपये एकरकमी सवलत मिळणार आहे. ‘गो ग्रीन’ सेवेचा पर्याय निवडणाऱ् या ग्राहकांना महावितरणकडून दरमहा छापील कागदी बिला ऐवजी ई – मेल द्वारे वीज बिल पाठविण्यात येते. शिवाय गो ग्रीन ग्राहकांना मासिक वीज बिलात 10 रुपये सूट देण्यात येते. महावितरणने गो ग्रीन ग्राहकांसाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता यापुढे गो ग्रीन सेवा निवडणाऱ्या ग्राहकांना दरमहा ऐवजी पहिल्याच महिन्यातील वीज बिलात एकरकमी 120 रुपये सूट देण्यात येणार आहे. महावितरणच्या 3 कोटी लघुदाब ग्राहकांपैकी अद्यापपर्यंत 4 लाख 62 हजार म्हणजेच 1.15 टक्के ग्राहकांनी गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडला आहे. भविष्यात हे प्रमाण वाढावे, या हेतूने महावितरणने गो ग्रीन पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना वीजबिलात तत्काळपणे 120 रुपये एकरकमी सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व नोंदणीकृत वीज ग्राहकांना महावितरणकडून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडण्यासाठी एसएमएस पाठविण्यात येणार आहे. गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीज बिलात एकरकमी 120 रुपये सूट देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील वर्षभर व सेवेसाठी नोंदणी रद्द करेपर्यंत नोंदणीकृत ई-मेलवर वीज बिल पाठविण्यात येणार असून त्यापुढे दरमहा वीज बिलात 10 रुपये सूट देण्यात येणार आहे. ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे महावितरणने आवाहन केले आहे. गो ग्रीन सुविधेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळाला भेट द्या व गो ग्रीन चा पर्याय निवडा. 000000
५२ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थी व पालकांनी सहभागी व्हावे- रोहन घुगे
ठाणे : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुढ व्हावा व सामाजिक पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेऊन जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने ५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन २ जानेवारी…
सानपाड्यामध्ये आगरी कोळी समाजाला दिशा देणारा एक दिवसीय मोफत लग्न सोहळा संपन्न
नवी मुंबई : नवी मुंबईमधील ठाणे बेलापूर पट्टीतील सानपाडा येथील आगरी कोळी समाजातील लग्न सोहळ्यात होणारा खर्च टाळण्यासाठी सानपाडा येथील ग्रामस्थांनी समाजात जागृती व्हावी म्हणून एक दिवशीय लग्न सोहळा करण्याचे आवाहन…
मुंबई महानगरपालिकेचा अजब कारभार
करोनाबाधितांसाठी घेतलेले ईएसआयसीचे रुग्ण कक्ष तब्बल तीन वर्षांनी केले परत मुंबई : मुंबई महानगरपालिकेने करोनाबाधातांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) कांदिवलीमधील रुग्णालयातील रुग्ण कक्ष ताब्यात घेतला होता. मात्र करोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात येऊन तीन वर्षाचा कालावधी लोटला तरी मुंबई महानगरपालिकेने हा रुग्ण कक्ष ईएसआयसी रुग्णालय प्रशासनाच्या ताब्यात दिला नव्हता. त्यामुळे या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत होती. रुग्णालय प्रशासनाने रुग्ण कक्ष परत मिळविण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला तीन वर्षांनी यश आले असून, सात दिवसांत हा रुग्ण कक्ष रुग्णालयाच्या ताब्यात देण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेने करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी २०२०-२१ दरम्यान ईएसआयसीच्या कांदिवली रुग्णालयातील रुग्ण कक्ष ताब्यात घेतला होता. या रुग्ण कक्षात ६३ खाटा आहेत. या रुग्ण कक्षांमध्ये अनेक रुग्णांवर उपचारही करण्यात आले. मात्र करोना संपुष्टात आल्यानंतर हा रुग्ण कक्ष व त्यातील ६३ खाटा पुन्हा ईएसआयसीच्या ताब्यात देणे अपेक्षित होते. मात्र मुंबई महानगरपालिकेने बंद केलेल्या करोना केंद्रातील साहित्य या रुग्ण कक्षांमध्ये ठेवले. त्यामुळे ईएसआयसी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना या कक्षात दाखल करताना रुग्णालय प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत होती. जागेअभावी अनेक रुग्णांना दाखल करून घेण्यास प्रशासनाला नकार द्यावा लागत होता. त्यामुळे रुग्णांकडून संताप व्यक्त केला जात होता. रुग्ण कक्ष परत मिळावा यासाठी रुग्णालय प्रशासनाने वारंवार मुंबई महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी नुकतीच कांदिवलीतील ईएसआयसी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी रुग्णालय प्रशासनाने ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याची दखल घेत तातडीने कार्यवाही करून हा रुग्ण कक्ष ईएसआयसी रुग्णालयाला हस्तांतरित करण्याच्या सूचना पीयूष गोयल यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिल्या. करोना महामारी संपली असून आपण आपल्या रुग्णालयाच्या नियमित रुग्ण कक्षाचा वापर करू शकता. रुग्ण कक्षामध्ये ठेवण्यात आलेले साहित्य पुढील सात दिवसांत तातडीने हलविण्यात येईल, असे पत्र मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे उप आयुक्त संजय कुऱ्हाडे यांनी केंद्रीय मंत्र्यांची सूचना मिळताच ईएसआयसी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना पाठवले. त्यामुळे तब्बल तीन वर्षांनंतर कांदिवलीतील ईएसआयसी रुग्णालयाला त्यांचा रुग्ण कक्ष परत मिळणार आहे. कोट दोन दिवसात मुंबई महानगरपालिका त्यांची साधनसामग्री घेऊन जाणार आहे. रुग्ण कक्ष ताब्यात आल्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना अधिक चांगल्या आरोग्य सेवा पुरविण्यास मदत होणार आहे. डॉ. केतन छेडा, रुग्णालय प्रमुख, कांदिवली ईएसआयसी रुग्णालय कांदिवली ईएसआयसी रुग्णालयातील रूग्ण कक्षामध्ये ठेवलेले सामान हलविण्यात येईल. -संजय कुऱ्हाडे, उप आयुक्त, आरोग्य विभाग, मुंबई महानगरपालिका
सहभाग आणि सहकार्य हाच नैनाच्या यशस्वीतेचा मंत्र
नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्यान्वयनाची वेळ जवळ येत असताना, त्याच्या आसपासचे नैना क्षेत्र, गुंतवणूकदार आणि भागधारकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. या क्षेत्राच्या नियोजन आणि विकासाची जबाबदारी असलेल्या सिडकोने, विकास प्रक्रियेत जमीनमालकांशी…
माकपच्या छ.संभाजी महाराजनगर जिल्हा सचिवपदी भगवान भोजने यांची फेरनिवड
अनिल ठाणेकर ठाणे : २९ डिसेंबरला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष छत्रपती संभाजी महाराजनगरचे १३ वे जिल्हा अधिवेशन गांधी भवन जवळील मैदानात पार पडले या अधिवेशनात पुढील तीन वर्षासाठी भगवान भोजने यांचे जिल्हा सचिवपदी फेरनिवड करण्यात आली. या अधिवेशनाचे उद्घाटन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य सुनील मालुसरे यांनी केले. यावेळी जेष्ठ कामगार नेते डॉक्टर कॉम्रेड डी .एल. कराड व कॉ. किसन गुजर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी मागील तीन वर्षाच्या कामकाजाचा अहवाल सादर करण्यात आला यावर आलेल्या प्रतिनिधींनी चर्चा केली त्यानंतर महत्त्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले. यामधे, २०२० चे शिक्षणाचे बाजारीकरण करणारे शैक्षणिक धोरण रद्द करा, कामगारांना देशोधडीला लावणारी कामगार संहीता रद्द करा, राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे. सामाजिक न्यायाच्या प्रश्नावर पक्षाने योग्य हस्तक्षेप करून जनतेचा लढा उभारावा, शेतकी मलाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव जाहीर करावा यासाठी शेतकऱ्यांमध्ये पक्षाने व्यापक संघटन उभे करावे या विविध ठराव पारित करण्यात आले. विद्यार्थी युवक कामगार शेतकरी शेतमजूर महिला एकजुटीच्या आधारावर आगामी काळात पक्ष बांधणी करून सामान्य जनतेच्या प्रश्नावर संघर्ष करावा असा निर्धार याबद्दल अधिवेशनात करण्यात आला. ०००००
