Category: मुंबई

Mumbai news

डोंबिवली, कल्याणमध्ये आदेशाविरुद्ध वृक्ष प्रदूषित रोषणाई

 पालिकेच्या उद्यान विभागाकडून कारवाईचा इशारा   कल्याण : नववर्षानिमित्त अनेक दुकानदार, खासगी आस्थापनांनी आपल्या दुकान, आस्थापनांसमोरील झाडांवर विद्युत रोषणाई केली आहे. झाडांवर विद्युत रोषणाई करू नये, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. तरीही काही व्यावसायिक त्या आदेशाचे उल्लंघन करत आहेत. अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्याचा इशारा कल्याण डोंबिवली पालिकेचे उपायुक्त आणि उद्यान विभागाचे मुख्य अधीक्षक संजय जाधव यांनी दिला आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कल्याण, डोंबिवली शहरातील अनेक दुकानदारांनी आपली दुकाने सजवली आहेत. ही दुकाने सजविताना दुकान समोरील झाडांवर, झाडाच्या खोडावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अशाप्रकारे झाडांवर विद्युत रोषणाई केल्याने झाडांवरील जैवविविधतेला धोका पोहचतो. या झाडांवर अधिवास करणाऱ्या पक्षी, इतर जीवांच्या निवाऱ्यावर त्याचा परिणाम होतो. मुंबई उच्च न्यायालयाने अशाच एका प्रकरणाशी निगडित एका जनहित याचिकेवर निर्णय देताना झाडांना विद्युत रोषणाई करण्यास प्रतिबंध केला आहे. न्यायालयाच्या निर्णयावरून कल्याण डोंबिवली पालिकेने गेल्या आठ महिन्याच्या काळात एक हजारहून अधिक दुकानांसमोरील झाडांना केलेली विद्युत रोषणाई काढून टाकली आहे. ज्या दुकानदार, आस्थापनांना न्यायालयाच्या निर्णयाची माहिती नाही ते अनभिज्ञपणे झाडांना रोषणाई करत आहेत. याविषयी पालिकेकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर उद्यान विभागाकडून संबंधित व्यावसायिकाला ती रोषणाई काढून टाकण्याची तंबी दिली जाते. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील अनेक हाॅटेल्स, ढाबा मालक, मद्यविक्री दुकाने, कपडे विक्री दुकाने, केशकर्तनालय, शोभेच्या वस्तू विक्री करणाऱ्यांनी दुकानसमोरील झाडांवर विद्युत रोषणाई केली आहे. याविषयी पर्यावरणप्रेमींनी काही व्यावसायिकांना ही कृती करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सूचनेला कोणीही दाद दिली नाही. व्यावसायिकांनी दुकानाला विद्युत रोषणाई केली की ती वर्षभर झाडावरून काढली जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. नववर्षानिमित्त पालिका हद्दीत अनेक व्यावसायिकांनी झाडांना विद्युत रोषणाई करून वृक्ष प्रदूषित केले आहेत. अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी पालिकेच्या उद्यान विभागाने मोहीम हाती घेण्याची मागणी पर्यावरणप्रेमी, जागरूक नागरिकांकडून केली जात आहे. झाडांवर विद्युत रोषणाई करू नये यासाठी उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत. ज्या व्यावसायिकांना या आदेशाची माहिती आहे ते अशाप्रकारची विद्युत रोषणाई करण्यास पुढाकार घेत नाहीत. मात्र ज्यांना माहिती नाही ते अशाप्रकारची रोषणाई करतात. त्यांची तक्रार आली तर तात्काळ त्यांना रोषणाई काढण्यास सांगितले जाते. जे हेतुपुरस्सर रोषणाई करत आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. त्यामुळे झाडांवर कोणी विद्युत रोषणाई केली असेल त्यांनी ती तात्काळ काढून टाकावी. – संजय जाधव उपायुक्त, उद्यान विभाग. 00000

 ‘नितेश राणेंनी सर्वच मर्यादा ओलांडल्या’

बाळासाहेब थोरातांची खरमरीत टीका  मुंबई : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मंत्री नितेश राणे यांनी केरळ राज्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन टीका केली आहे. नितेश राणे यांनी काल सासवडमध्ये बोलताना केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान असल्याचं…

वाल्मिक कराडला कोणत्याही क्षणी अटक होणार ?

स्वाती घोसाळकर मुंबई_: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा आका असणा-या वाल्मिक कराडला कोणत्याही क्षणी अटक होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. या हत्या प्रकरणातील तीन आरोपी अजूनही फरार असून…

अखिलेश शुक्लासह सात जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

कल्याण : येथील पश्चिमेतील योगीधाम आजमेरा हाईट्स गृहसंकुलातील मराठी कुटुंबीयांना मारहाण केल्याचा गुन्हा दाखल प्रकरणातील शासकीय सेवेतील पर्यटन अधिकारी (निलंबित) अखिलेश शुक्ला यांच्यासह सात जणांना रविवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयातील सुट्टीकालीन न्यायाधीशांनी चौदा दिवसांची पोलीस…

छतावरील सौरऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राची ‘पॉवरफुल’ कामगिरी 

केंद्राकडून मिळाली २६० कोटींची प्रोत्साहनपर रक्कम मुंबई : राज्यात आतापर्यंत २,३७,६५६ वीज ग्राहकांनी छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविले असून त्यांची एकूण क्षमता २,७३८ मेगावॅट आहे. घरांच्या छतावर सौर पॅनेल बसवून वीजनिर्मिती करण्यात उत्तम…

नवीन वर्षाच्या स्वागताच्या वेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त

सुरक्षेसाठी 12 हजार पोलीस तैनात मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागतवेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. 8 अप्पर पोलिस आयुक्त, 29 पोलिस उपायुक्त, 53 सहाय्यक पोलिस आयुक्त, 2184 पोलिस अधिकारी आणि 12 हजार 48 पोलिस अंमलदार गस्तीवर असणार आहेत, अशी माहिती…

मालेगावत बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा कारखाना

किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा मुंबई : मालेगाव हे व्होट जिहाद, लँड जिहाद केंद्र असल्याचा आरोप भाजप नेते व माजी खासदार  किरीट सोमय्या यांनी केला. त्यामुळे सर्व तपास यंत्रणांच्या रडारवर मालेगाव शहर आले…

वातावरण निवळणार, थंडी वाढणार

मुंबई : राज्यात थंडीचा जोर कमी झालाय असं वाटत असताना आता पुन्हा एकदा राज्यात थंडी वाढणार असल्याची माहिती समोर आली आहे. हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपासून पुढील 3 दिवस म्हणजे…

पोलिसांच्या दहशतीच्या विरोधात डोंबिवलीतील शेकडो केमिस्ट बांधवांचा पोलीस स्टेशनवर हल्लाबोल

– आमदार राजेश मोरे, आप्पासाहेब जगन्नाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पोलीस प्रशासनाला निवेदन सादर  संघटनेच्या सर्व मागण्या मान्य डोंबिवली -औषध विक्रेत्यास पोलिसांकडून जबरदस्ती दुकानातून बाहेर काढत दुकान बंद करण्याच्या निषेधार्थ शेकडो…

महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर सेना मुंबई विद्यापीठ संघटक प्रमुख पदी अमित साळुंखे नियुक्ती

रमेश औताडे मुंबई :विद्यार्थी चळवळी पासून सामाजिक कार्यात मागासवर्गीय शोषित वंचित दुर्बल गरीब घटकांच्या न्याय हक्कासाठी आदोंलन मोर्चे काढून या समाजाला सहकार्य करणारे अमित साळुंखे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मूळ शिवसेनेत प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर त्यांना मूळ शिवसेना असलेल्या  शिवसेना शिक्षकेतर कर्मचारी सेना मुंबई विद्यापीठ संघटक प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे उपनेते व महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचारी सेनेचे महाराष्ट्र संघटक अध्यक्ष अनिल पडवळ यांनी पक्षीय कार्यकारणीतील  महत्वाचे असणारे असे शिवसेना शिक्षकेतर कर्मचारी सेना मुंबई विद्यापीठ संघटक प्रमुख पदी अमित साळुंखे  ( बी ए, बी एड) यांची नियुक्ती केली आल्याने  त्यांचे सर्व थरातून कौतुक होत आहे. साळुंखे यांचे सहकारी अजय बरूचा, हर्षल पाटील, राजेश शर्मा, अरूणकुमार गुप्ता, अश्विन पाटणे, कपिल गौड, विजय गौड, कुणाल साळुंके, वसंत साळुंखे, विजय गौड  तसेच अनेक पदाधिकारी यांनीही  शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले आहे.Photo-6 महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर सेना मुंबई विद्यापीठ संघटक प्रमुख पदी अमित साळुंखे नियुक्ती रमेश औताडे मुंबई :विद्यार्थी चळवळी पासून सामाजिक कार्यात मागासवर्गीय शोषित वंचित दुर्बल गरीब घटकांच्या न्याय हक्कासाठी आदोंलन मोर्चे काढून या समाजाला सहकार्य करणारे अमित साळुंखे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मूळ शिवसेनेत प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर त्यांना मूळ शिवसेना असलेल्या  शिवसेना शिक्षकेतर कर्मचारी सेना मुंबई विद्यापीठ संघटक प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे उपनेते व महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचारी सेनेचे महाराष्ट्र संघटक अध्यक्ष अनिल पडवळ यांनी पक्षीय कार्यकारणीतील  महत्वाचे असणारे असे शिवसेना शिक्षकेतर कर्मचारी सेना मुंबई विद्यापीठ संघटक प्रमुख पदी अमित साळुंखे  ( बी ए, बी एड) यांची नियुक्ती केली आल्याने  त्यांचे सर्व थरातून कौतुक होत आहे. साळुंखे यांचे सहकारी अजय बरूचा, हर्षल पाटील, राजेश शर्मा, अरूणकुमार गुप्ता, अश्विन पाटणे, कपिल गौड, विजय गौड, कुणाल साळुंके, वसंत साळुंखे, विजय गौड  तसेच अनेक पदाधिकारी यांनीही  शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले आहे.