Category: मुंबई

Mumbai news

भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभियान

रमेश औताडे मुंबई :आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त भिमा कोरेगाव येथून सुरू होणारे अभियान संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार असून यांची सांगता संभाजी नगर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे १४ जानेवारीला होणार आहे. अशी माहितीआंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी दिली. आंबेडकरी चळवळीतील भीम सैनिक हाच आंबेडकरी चळवळीला योग्य दिशा देऊन संविधानाचे रक्षण करत आंबेडकरी बाणा जिवंत ठेऊ शकतो. त्यासाठी भीम सैनिकांची जनगणना झाली पाहिजे. अशी मागणी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केली आहे. यावेळी महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा कविता घाडगे, मुंबई प्रदेश प्रभारी विकास काटे, शामभाई बागुल आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मोरे माऊलींनी चांगले आदर्श समोर ठेवले त्यांच्या उत्कर्षांचा ठेवा आपण पुढे नेऊया

 भाजपा गटनेते प्रविण दरेकरांचे प्रतिपादन राजेद्र साळसकर मुंबई- वैकुंठवासी प.पू. सदगुरु मोरे माऊली महाराजांनी आपल्या समोर अनेक चांगले आदर्श ठेवले आहेत. आता त्यांचाच वारसा तंतोतंत पुढे नेण्याचे काम दादा महाराज मोरे माऊली करताहेत. आपला हा उत्कर्षांचा ठेवा अशाचप्रकारे आपण पुढे नेऊया. समाजासाठी जे काही चांगले देता येईल ते देण्याचा प्रयत्न करूया. हिंदुत्वाचा, साधूसंतांचा विचार पुढे नेण्यासाठी अशा प्रकारच्या अभियानाची, प्रबोधनाची खऱ्या अर्थाने गरज असल्याचे प्रतिपादन भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केले आहे. लोअर परेल येथील श्रीसंत मोरे माऊली विठ्ठल मंदिर येथे वैकुंठवासी प. पू. मोरे माऊली महाराज यांच्या ५२ व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त सदगुरु दादा महाराज मोरे माऊली यांच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन सप्ताहचे आयोजन करण्यात आले होते. या कीर्तन सोहळ्याला भाजपा आमदार प्रविण दरेकर यांनीही उपस्थिती दर्शवली. यावेळी दरेकर कीर्तनात तल्लीन झालेले दिसून आले. यावेळी उपस्थित वारकरी वर्गाशी संवाद साधताना आ. दरेकर म्हणाले की, मोरे माऊली महाराजांचे  कीर्तन ऐकायची मला संधी मिळाली नाही परंतु त्यांनी वारकरी सांप्रदायात जो काही अनमोल असा ठेवा ठेवलाय त्याची मला निश्चित प्रचिती आहे. कधी मुंबईच्या वारकरी मंडळाचे नेतृत्व केले. पंढरपूरचा पांडुरंग बडव्यांच्या ताब्यातून मुक्त होण्यासाठी जे अभियान चालवले ते यशस्वी केले. असे अनेक चांगले आदर्श आपल्यासमोर मोरे माऊली महाराजांनी ठेवले. आता त्यांचाच वारसा तंतोतंत पुढे नेण्याचे काम दादा महाराज करताहेत. दादा महाराज यांच्याविषयीही वेगळी अशी अपार श्रद्धा आहे. त्यांचा विचार, सध्याच्या परिस्थितीत तरुण पिढीला, आपल्या सर्वांना मार्गदर्शन असते. आपण आपल्या संसारिक, पारिवारिक जीवनात पैसा, संपत्ती, वैभव मिळवतो. परंतु सुख, शांती, समाधान हे परमेश्वराच्या चरणी असते आणि म्हणूनच आपल्याला असे विचार हवे असतात. या वातावरणात आले की ,आमच्यासारख्या कार्यकर्त्यालाही राजकारणात, समाजकारणात काम करण्याची स्फूर्ती मिळते. जिथे- जिथे दादा महाराजांचे विचार ऐकता येतील, दर्शन घेता येईल यासाठी माझा प्रयत्न असतो. आपला हा उत्कर्षांचा ठेवा अशाचप्रकारे आपण पुढे नेऊया. समाजासाठी जे काही चांगले देता येईल ते देण्याचा प्रयत्न करूया. हिंदुत्वाचा, साधूसंतांचा विचार पुढे नेण्यासाठी अशा प्रकारच्या अभियानाची, प्रबोधनाची खऱ्या अर्थाने गरज असल्याचेही दरेकरांनी म्हटले.

राज्यातील अनधिकृत जाहिरात फलक, होर्डिंग, बॅनरवर धडक कारवाई करणार- के.एच.गोविंदराज

अशोक गायकवाड नवी मुंबई : उच्च न्यायालय यांनी जनहित याचिका क्रमांक १५५/२०११ प्रकरणी पारित केलेल्या ३१ जानेवारी २०१७ व १९ डिसेंबर २०२४ रोजीच्या आदेशाच्या अनुषंगाने राज्यातील अनधिकृत जाहिरात फलक, होर्डिंग, बॅनर यांच्यावर करण्यात आलेल्या व करण्यात येत असलेल्या कार्यवाहीच्या अनुषंगाने नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, नवि-२ के.एच.गोविंदराज यांनी सर्व संबधित प्राधिकरणांची बैठक घेऊन मौलिक सूचना केल्या. त्यास अनुसरुन नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आढावा बैठक घेत प्रधान सचिव महोदयांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे स्पष्ट निर्देश दिले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जाहिरात फलक, होर्डिंग, बॅनर लावण्यासाठी महानगरपालिकेने जागा निश्चित केल्या असून त्याच जागांवर, विहित आकारमानात जाहिरात फलक, होर्डिंग, बॅनर प्रदर्शित केले जातील याची खात्री संबधित विभागाचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी यांनी करुन घ्यावी असे आयुक्तांनी निर्देशित केले. या फलकांवर अर्जदाराचे नाव, परवानगी क्रमांक, परवानगीचे ठिकाण, परवानगीचा कालावधी हा फलकाच्या आकारासह व क्यू आर कोडसह नमूद असावा असे आयुक्तांनी स्पष्ट केले. या व्यतिरिक्त आपल्या विभागीय क्षेत्रात कुठेही विनापरवानगी बॅनर लावले जाणार नाहीत याची काटेकोर दक्षता घ्यावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले. विनापरवानगी फलक प्रदर्शित केलेला दिसल्यास त्यावर दंडात्मक व शहर विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात यावी असेही आयुक्तांनी स्पष्टपणे निर्देश, याबाबतच्या सूचना जाहिरात फलक, होर्डिंग, बॅनर छपाई करणा-या प्रिंटींग प्रेस यांनाही देण्यात याव्यात तसेच सर्व राजकीय पक्षांनी याबाबतचे हमीपत्र दाखल केलेले असल्याने नवी मुंबईतील सर्व राजकीय पक्ष प्रमुखांना याबाबत माहिती द्यावी असेही आयुक्तांनी सूचीत केले. या अनुषंगाने विभागनिहाय स्थापित समितीची बैठक घेण्यात यावी तसेच या विषयी नागरिकांना सुलभपणे तक्रार करता यावी याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmconline.com या संकेतस्थळावर तक्रार निवारण प्रणाली (Public Grievance System) कार्यरत असल्याचीही प्रसिध्दी करावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले.तरी ज्या नागरिक / संस्थांना जाहिरात फलक, होर्डिंग, बॅनर लावावयाचे असतील त्यांनी संबधित विभाग कार्यालयाची रितसर परवानगी घेउुन परवानगीत नमूद जागी व आकारात लावावेत असे आवाहन करतानाच याबाबत विनापरवानगी जाहिरात फलक, होर्डिंग, बॅनर लावलेले आढळल्यास त्यावर महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम १९९५ चे कलमान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल याचीही नोंद घ्यावी असे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सूचित करण्यात येत आहे

मुंबईत सकल मराठा समाजाचे आंदोलन

 मृत सरपंच देशमुख, परभणीतील सूर्यवंशींच्या कुटुंबाला न्याय द्या मुंबई : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी व परभणी येथील दलित समाज बांधव सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीतील मृत्यूप्रकरणी दोन्ही…

डोंबिवलीत औषध विक्रेत्याला पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक

डोंबिवली : येथील एका औषध विक्रेत्याला शुक्रवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या दरम्यान पोलिसांनी दुकानातून खेचून रामनगर पोलीस ठाण्यात आणले. औषध दुकान जबरदस्तीने बंद पाडण्यास भाग पाडले. या घटनेचा निषेध म्हणून…

कल्याणमधील मुरबाड रस्त्यावरील प्रेम ऑटो चौकातील लांबलचक खड्ड्यांमुळे प्रवासी त्रस्त

कल्याण : कल्याण शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरबाड-शहाड रस्त्यावर प्रेम ऑटो चौक येथे काही यंत्रणांनी भूमिगत सेवावाहिन्या टाकण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून खोदून ठेवले आहे. खोदाई केलेला भाग…

डोंबिवलीत रिजन्सी, गोळवली, दावडीकडे जाणाऱ्या रिक्षा चालकांची मनमानीने भाडेवाढ

डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाकडून रिजन्सी गृहसंकुल, दावडी, गोळवली, सोनारपाडा दिशेने जाणाऱ्या रिक्षा चालकांना गेल्या काही दिवसांपासून अचानक पाच ते दहा रूपयांची वाढ केली आहे. रिक्षा संघटना, उपप्रादेशिक परिवहन…

भालचंद्र पाटील यांना आगरी समाजभूषण प्रदान

कल्याण : मुंबईत १९३५ साली स्थापन झालेल्या आगरी समाज संघ यांच्या विद्यमाने समाज मोहोत्सव साजरा करण्यात आला. त्या समयी समाजातील विविध क्षेत्रात सामाजिक कार्यकरणाऱ्या अनेक बांधवांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये…

कल्याण परिमंडळ 3 मध्ये नशेखोरांविरोधात कारवाई सुरूच

 रविवारी 108 नशेखोरांवर आणि 92 मोटारसायकलस्वारांवर कारवाई  कल्याण : अल्पवयीन मुलीची हत्या आणि इतर वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांनंतर कल्याणचे पोलिस उपायुक्त अतूल झेंडे यांनी पोलीस प्रशासनाला चांगलेच ॲक्शन मोडमध्ये आणल्याचे दिसत आहे. कल्याणच्या विविध भागांमधील नशेखोरांना ताब्यात घेत डीसीपी अतुल झेंडे यांनी चांगलाच इंगा दाखवला. पोलीसी खाक्या दाखवण्यासह अनेक नशेखोरांना उठाबशा काढायला लावल्या आणि पोलीसांनी त्यांची वरातही काढल्याचे दिसून आले. पोलीस उपायुक्तांच्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असून अशा प्रकारची कारवाई सतत सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. कल्याण परिमंडळ 3 मधील विविध पोलीसस्टेशन अंतर्गत मोकळी मैदानी, निर्जनस्थळे व रोडवरील आस्थापना यांच्यावर पोलिसांतर्फे धडक कारवाई सुरू असून रविवारी रात्री या ठिकाणी एकुण 108 नशेखोरांविरोधात कारवाई करण्यात आली. तसेच रोडवरील अती वेगाने मोटार सायकल चालवणे आणि ट्रिपल सीट वाहन चालवणे अशा एकूण 92 कारवाई कल्याणमध्ये पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत. पोलिसांची धडक कारवाई मोहिम अशीच सुरू राहणार  असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. पोलिसांच्या या कारवाई सत्रामुळे नशेखोरांचे मात्र धाबे दणाणले आहेत.

ठाण्याच्या अतिरिक्त पाण्यासाठी मुंबई महापालिकेच्या हालचाली..

 आमदार संजय केळकर यांची दोन्ही महापालिका अधिकाऱ्यांशी संयुक्त बैठक अनिल ठाणेकर मुंबई महानगरपालिकेच्या कोट्यातून ठाणे महापालिकेला अतिरिक्त ५० एमएलडी पाणी मिळावे यासाठी आमदार संजय केळकर यांनी आज दोन्ही महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची मुंबईत संयुक्त बैठक घेतली. यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अधिकाऱ्यांना तांत्रिक अडचणी दूर करून कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. ठाण्याला विशेषतः घोडबंदर परिसर, बाळकुम, कोलशेत, ढोकाळी आदी भागात पाणीटंचाई भेडसावत आहे. अशात आणखी नवनवीन गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे भविष्यात पाण्याचा तुटवडा आणखी मोठ्या प्रमाणात भासणार आहे. त्यादृष्टीने आमदार संजय केळकर यांनी  अधिवेशनात अनेकवेळा वाचा फोडली असून ठाणे महापालिकेसह मुंबई महापालिकेकडे पाठपुरावा सुरू केला आहे. सोमवारी केळकर यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच पाणी पुरवठा विभागाची जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांचीही भेट घेतली. त्यानंतर  मुंबई महापालिकेचे उपजल अभियंता (प्रचालने) पराग शेठ, कार्यकारी अभियंता जयंत खराडे, प्रकाश खराडे, ठाणे महापालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पवार, श्री.कुलकर्णी यांची संयुक्त बैठक घेऊन चर्चा केली. ठाणे शहराला मुंबईकडून मिळणाऱ्या नियोजित ५० एमएलडी पाण्यापैकी २५ एमएलडी पाणी आधी तातडीने मिळावे याबाबत श्र.केळकर यांनी आग्रह धरला. अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी ठाणे महापालिकेला अतिरिक्त पाणी देता येईल असे सांगितले. याबाबत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करून कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.याबाबत आमदार संजय केळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अतिरिक्त पाण्याबाबत मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी या आधी ठाणे महापलिकेचे आयुक्त म्हणून काम केले असल्याने त्यांना ठाणे शहराच्या पाणी पुरवठ्याची माहिती आहे. त्यांनी ठाण्याला अतिरिक्त पाणी देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले. यावेळी ठाणे महापालिकेला कशा पद्धतीने अतिरिक्त पाणीपुरवठा करायचा यावर चर्चा झाली. मुंबई महापालिकेचे वरळी येथे पाणी पुरवठा विभागाचे नियोजन केंद्र असून तेथील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या ठाण्याला तातडीने २५ एमएलडी पाणी निश्चित मिळेल, असा विश्वास केळकर यांनी सांगितले.