Category: मुंबई

Mumbai news

महसूल वाढीवर भर देण्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेचे लोकार्पण झालेले प्रकल्प, इमारती उपयोगात असल्याची खात्री संबधित विभागाने करुन घ्यावी व अद्याप कार्यान्वित न झालेल्या नागरी सुविधा तत्परतेने वापरात येतील याकडे प्राधान्याने लक्ष…

डोंबिवलीत मालमत्ता कर थकबाकीदारांच्या गाळ्यांना टाळे

डोंबिवली : वारंवार नोटिसा पाठवूनही अनेक वर्षाच्या थकीत मालमत्ता कराची ४० लाखाहून अधिक रकमेची थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या चार थकबाकीदारांच्या गा‌ळ्यांना टाळे लावण्याची कारवाई कल्याण डोंबिवली पालिकेच्या ग प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी…

डोंबिवलीत काँक्रीट रस्ते कामांच्या ठिकाणी वाहतूक सेवकांची फौज

कल्याण : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरात एमएमआरडीएतर्फे काँक्रीट रस्ते कामांसाठी रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे. महानगर गॅस कंपनीनेही काही ठिकाणी वाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम केले आहे. या खोदकामांमुळे डोंबिवलीतील वर्दळीच्या…

बदलापूरच्या थकबाकीदार बालाजी हाईट्स सोसायटीचा कांगावा

– दोन लाख ४६ हजार रुपयांची थकबाकी , महावितरणचे स्पष्टीकरण कल्याण: बदलापूर पश्चिमेतील प्राईम बालाजी हाईट्स या सोसायटीकडे वीजबिलाची २ लाख ४६ हजार रुपयांहून अधिकची रक्कम थकीत आहे. रितसर नोटिस देऊन वीजपुरवठा खंडित केल्यानंतर सोसायटीकडून महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून दमदाटी झाल्याचा अपप्रचार झाला. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर सोसायटी पदाधिकाऱ्यानीच टप्प्याटप्प्याने थकबाकी भरण्याची ग्वाही देत दीड लाख रुपयांचा धनादेश दिला. त्यानंतरच सोसायटीचा वीजपुरवठा पुर्ववत करण्यात आला आहे. बदलापूर गाव पश्चिम येथे न्यू डीपी रोड परिसरात प्राईम बालाजी हाइट्स या सोसायटीला सामान्य वापरासाठी (लिफ्ट, अंतर्गत पथदिवे आणि पाणीपंप) महावितरणने मे २०१८ मध्ये वीजपुरवठा दिला आहे. मार्च-२०२४ नंतर सोसायटीने या वीजजोडणीचे बिल भरलेले नाही. थकीत वीजबिलाचा भरणा करण्याबाबत सोसायटी पदाधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. अखेर थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याबाबत लेखी नोटीसही बजावण्यात आली. परंतू सोसायटीने थकबाकीचा भरणा केला नाही. त्यामुळे सोसायटीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यावेळी जमलेल्या सोसायटीधारकांनी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करणाऱ्या शाखा अभियंत्यांच्या कामात अडथळा आणला. उलट महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अरेरावी केल्याचा कांगावा करत अपप्रचार केला. शाखा अभियंत्यांनी यासंदर्भात बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता सोसायटी पदाधिकारी बाबु तांबे व इतरांनी संपर्क साधून थकबाकी भरण्याचे मान्य केले. प्रत्येकी ७५ हजार रुपयांचे दोन धनादेश तातडीने देत उर्वरित थकबाकी लवकर भरण्याची ग्वाही सोसायटी पदाधिकाऱ्यांनी पोलिसांसमक्ष दिली. त्यानंतर सोसायटीचा वीजपुरवठा पुर्ववत करण्यात आला.

सत्तार राठोड नापास, मंत्रिमंडळातून डच्चू ? 

स्वाती घोसाळकर मुंबई: शिवसेनेचे अब्दुल सत्तार आणि संजय राठोड हे दोन्ही मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या प्रगति परिक्षेत नापास झाल्याचे वृत्त आहे. त्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याने त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याचे…

भाजपाचे राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष

  मुंबई  : विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे  आमदार राहुल नार्वेकर यांची निवड होणार आहे. राहुल नार्वेकर यांनी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला.…

आंतरमहाविद्यालयीन सुगम गीत गायन स्पर्धेचे आयोजन

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आंतरमहाविद्यालयीन सुगम गीत गायन स्पर्धा संस्थेच्या सभागृहात आयोजित केली आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी शनिवार दिनांक ४ जानेवारी २०२५ या दिवशी सकाळी ९.३० वाजता…

चेंबूर क्रीडा केंद्र प्रथम श्रेणी गटाच्या चौथ्या, तर उत्कर्ष मंडळ तिसऱ्या फेरीत दाखल

मुंबई : चेंबूर क्रीडा केंद्राने मुंबई उपनगर कबड्डी असो. आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या पूर्व विभाग प्रथम श्रेणी गटात चौथी, तर उत्कर्ष मंडळाने तिसरी फेरी गाठली. मुंबई उपनगरने…

कामगार महर्षी आंबेकर बुध्दिबळ स्पर्धेत अंशुमनला चकवून ध्रुव गटविजेता

मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित ध्रुव…

श्री गणेश आखाडय़ातफे क्रीडाप्रेमी आमदार नरेन्द्र मेहतांचा गौरव…….हेडिंग

मुंबई : लोकप्रिय व कुस्ती प्रेमी आमदार .नरेंद्र मेहता यांचा नुकताच भाईंदर येथील श्री गणेश आखाड्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. शाल , पुष्पगुच्छ व फेटा बांधून मिरा भाईंदर कुस्तीगीर संघाचे…