Heading – एस.टी.महामंडळ नफ्याच्या उंबरठ्यावर…!
३१ पैकी १८ विभागांनी कमावला नफा… मुंबई – पाचसहा वर्षापासून अनेक आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला भविष्यात सुगीचे दिवस येतील अशा रितीने एसटीची आर्थिक घोडदौड चालू आहे. जुलै महिन्यात ३१…
Mumbai news
३१ पैकी १८ विभागांनी कमावला नफा… मुंबई – पाचसहा वर्षापासून अनेक आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला भविष्यात सुगीचे दिवस येतील अशा रितीने एसटीची आर्थिक घोडदौड चालू आहे. जुलै महिन्यात ३१…
संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना टोला मुंबई : काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे, असं वक्तव्य केलं होतं. दरम्यान प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे…
महिलांच्या बँक खात्यात एकत्र जमा होणार दोन हफ्ते स्वाती घोसाळकर मुंबई : विधानसभा निवडणुकीच्याआधी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येकी 1500 रुपये देण्यात असल्याची घोषणा करण्यात आली…
नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल…
मुंबई : आज भारताचा ७७ वा स्वातंत्र्यदिन समारंभ साजरा करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यात एकाच वेळी सकाळी ९.०५ वाजता आयोजित करण्यात येणार असून सकाळी साडे…
नागरिकांना तिरंगा फडकविण्याचे केले आवाहन नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियान…
नवी मुंबई : संपूर्ण देशभरात 9 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत राबविण्यात येणा-या ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन महापालिका आयुक्त…
मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित बीओबी कप विविध ८ वयोगटातील बुध्दिबळ स्पर्धेमध्ये अनाहिता महाजनने ६ वर्षाखालील गटात सर्व सामने जिंकले आणि समाजरत्न स्व. सुरेश आचरेकर स्मृती चषक…
अखेर कंत्राटदाराला एक कोटी रुपये दंड मुंबई : अटलबिहारी वाजपेयी शिवडी – न्हावाशेवा सागरी सेतूच्या (अटल सेतू) जोडरस्त्यावर तडे पडल्याचे जूनमध्ये निदर्शनास आले होते. ही बाब निदर्शनास येताच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) तात्काळ जोडरस्त्याची दुरुस्ती केली. मात्र या प्रकरणी संबंधित कंत्राटदाराविरोधात कोणतीही कारवाई झाली नव्हती. आता कंत्राटदारावर कारवाई करून एक कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. नवी मुंबई आणि मुंबईतील अंतर १५ मिनिटांत पार करता यावे यासाठी एमएमआरडीएने १८ हजार कोटी रुपये खर्च करून २२ किमी लांबीचा अटल सेतू बांधला. या अटल सेतूचे लोकार्पण जानेवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र अटल सेतूवरून उलवे येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जोडरस्त्यावर तडे पडल्याची बाब निदर्शनास आली होती. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी जूनमध्ये ही बाब प्रसारमाध्यमांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर यावरून एमएमआरडीए आणि एकूणच कामाच्या दर्जावर टीका झाली होती. दरम्यान, तडे पडल्याचे वृत्त पसरताच एमएमआरडीएने तात्काळ जोरस्त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले आणि काही तासातच ते पूर्ण केले. अटल सेतूला कुठेही धोका नाही, २२ किमी लांबीच्या सेतूवर तडे पडलेले नाहीत, सेतूला जोडलेल्या जोडरस्त्यावर तडे पडल्याचे स्पष्टीकरण यावेळी एमएमआरडीएकडून देण्यात आले होते. एमएमआरडीएने रस्त्याची दुरूस्ती करून घेतली. मात्र कंत्राटदाराविरोधात केलेल्या कारवाईची माहिती उपलब्ध झाली नव्हती. आता मात्र संबंधित कंत्राटदाराविरोधात एमएमआरडीएने दंडात्मक कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहिती अधिकाराखाली उपलब्ध झालेल्या माहितीनुसार जोडरस्त्यावरील तडेप्रकरणी कंत्राटदार कंपनी स्ट्रॉबॅगवर त्याचवेळी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली होती. सदर रस्त्याचे ५ जानेवारीला काम पूर्ण करण्यात आले असून कामाची गुणवत्ता राखली नसल्याचे या नोटीसमध्ये नमुद करण्यात आले होते. त्यानंतर अटल सेतूचे सल्लागार के. आर. शिवानंद यांनी कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई संबंधी नोटीस बजावली. तसेच एक कोटी रुपये दंड ठोठावला. तसेच आवश्यक ती सर्व दुरूस्ती करण्याचेही निर्देश या नोटीसमध्ये कंत्राटदाराला देण्यात आले होते. दरम्यान, अटल सेतू महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून दर सहा महिन्यांनी अटल सेतूचे आवश्यक ते परीक्षण करण्याची मागणी गलगली यांनी केली आहे. त्याचबरोबर संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.
प्रा. नयना रेगे यांनी व्यक्त केला निर्धार मुंबई : आजच्या तारखेला श्रीलंकेसारखा आपल्यापेक्षा कितीतरी लहान असलेला देश भारतासारख्या महासत्तेकडे झेपावणाऱ्या देशाला नेत्रांची निर्यात करतो. आपल्या देशात अवयवदानाचे महत्त्व सर्वांना पटवून देत ही चळवळ इतक्या जोमाने फोफावली पाहिजे की भविष्यात भारतातून नेत्रांची निर्यात करता आली पाहिजे, अशी ‘नेत्र’दीपक कामगिरी करण्याचा निर्धार या चळवळीतील क्रीयाशील कार्यकर्त्या प्रा. सौ. नयना रेगे यांनी बोलून दाखविला. जागतिक अवयवदान दिनाच्या निमित्ताने पर्व शैक्षणिक धर्मादाय संस्थेच्या वतीने अवयव दान सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहाचा शुभारंभ प्रा. सौ. नयना रेगे यांनी अवयव दानाचे महत्त्व कथन करून करण्यात आला. त्यांनी लोकांचा गैरसमज दूर करणारी काही उदाहरणे सुद्धा सांगितली. या सप्ताहात महाराष्ट्राच्या विविध भागांत १८ ठिकाणी अवयवदान माहिती प्रचार आणि प्रसार ऑनलाईन केंद्र नागरिकांकरीता खुली होणार आहेत. या अवयव दानाच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ROTTO, SOTTO या महाराष्ट्र राज्याच्या मुख्य समुपदेशक सुजाता अष्टेकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. संस्थेचे मुख्य सल्लागार विजय वैद्य आणि विश्वस्त सौ. वैशाली वैद्य, प्रविण वराडकर यांच्या समवेत पर्व संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या माध्यमातून महाराष्ट्र व्यापी अवयवदानचळवळ होणार असल्याचे विजय वैद्य आणि प्रवीण वराडकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. 0000