येत्या रविवारी 6 वी साकीब रिजवी मेमोरियल कॅन्सर जनजागृती मॅरेथॉन
मुंबई : येत्या रविवारी 1 डिसेंबर 2024 रोजी रिजवी ग्रुपच्या हेल्प युवरसेल्फ फाऊंडेशन द्वारे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्य (एम एम आर डी ए) ग्राउंड, बीकेसी येथे 6 वी साकीब…
Mumbai news
मुंबई : येत्या रविवारी 1 डिसेंबर 2024 रोजी रिजवी ग्रुपच्या हेल्प युवरसेल्फ फाऊंडेशन द्वारे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्य (एम एम आर डी ए) ग्राउंड, बीकेसी येथे 6 वी साकीब…
जीव चंदने मुरबाड : शहरातील ब्रिटिश कालीन भाऊ गणपत वाचनालय गेली अनेक वर्षे नव्याने उभारणीच्या प्रतीक्षेत असून मुरबाड नगरपंचायत प्रशासनाचे स्थापने पासूनच याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले आहे. भारतीय स्वातंत्र्य…
विरार : श्रमजीवी संघटनेचे मुख्यालय असलेल्या उसगाव डोंगरीत मंगळवारी सायंकाळी अभिनव पद्धतीने संविधानचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी शहीद स्मारकाचे तसेच संविधानात अंतर्भूत असलेले ‘राज्य’ अत्यंत सोप्या पद्धतीने समजून घेता यावे, यासाठी विवेक पंडित यांच्या संकल्पनेतून बैलगाडीच्या माध्यमातून उभारलेले स्मारकाचेही उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर वीरपत्नी स्मिता साळसकर यांच्या हस्ते अविरत तेवत राहणाऱ्या “अमर ज्योतीचे” प्रज्वलन करत शहीद जवानांना अनोखी आदरांजली वाहण्यात आली. भारतीय संविधानास ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त उसगाव येथे श्रमजीवी संघटना आयोजित संविधान अमृत महोत्सव सोहळा झाला. यावेळी २६/११ हल्ल्यात वीरमरण असलेले विजय साळसकर यांच्या वीरपत्नी स्मिता साळसकर यांनी उपस्थितांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. सोबत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, वसई विरार महापालिका आयुक्त डॉ. अनिल पवार आणि आमदार स्नेहा दुबे पंडित यांनीही संवाद साधला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हुतात्मा झालेल्या आणि देशाचे रक्षण करताना सीमेवर हुतात्मा झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहणारी अखंड तेवणारी अमरज्योत वीर पत्नी स्मिता साळगावकर यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली. २६/११ मुंबईवर झालेल्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलिस, जवान आणि नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. अमर ज्योतीसाठी योगदान देणाऱ्या कैलास बिश्नोई यांचा या वेळी सन्मान जिल्हाधिकारी आणि विवेक पंडित यांनी केला. तसेच वसईच्या एकाधिकारशाहीला टक्कर देत विजयश्री मिळवलेल्या श्रमजीवी कन्या आणि भाजपच्या नवनिर्वाचित आमदार ॲड. स्नेहा दुबे पंडित यांचाही जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष श्रामभाऊ वारणा, मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, वसईचे तहसीलदार अविनाश कोष्टी, पोलिस उपायुक्त जयंत भजबले, शरद पाटील व श्रमजीवी संघटनेचे इतर प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लाख 60 हजार दंड तसेच 62 किलो प्लास्टिक जप्त नवी मुंबई : ‘प्लास्टिकमुक्त नवी मुंबई’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नागरिकांपर्यंत पोहचून एकल वापर प्लास्टिकचा वापर टाळावा यासाठी व्यापक जनजागृती करण्यात येत असून दुस-या बाजुला प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाई करुन प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार दिवाळीच्या आधीपासूनच प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात करण्यात आली असून नोव्हेंबर महिन्यात 25 दुकाने / आस्थापना यांच्यावर कारवाई करीत 1 लाख 60 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. तसेच 62 किलो 100 ग्रॅम एकल वापर प्लास्टिक जप्त करण्यात आलेले आहे. यामध्ये बेलापूर विभागात 18 दुकाने / आस्थापना यांच्यावर कारवाई करत 1 लाख 25 हजार दंडात्मक रक्कम वसूल केली आहे, तसेच 42 किलो एकल वापर प्लास्टिक जप्त केले आहे. अशाचप्रकारे नेरुळमध्ये एका दुकानावर कारवाई करत 5 हजार दंडात्मक रक्कम वसूली व 1.5 किलो एकल वापर प्लास्टिक जप्त केले आहे. वाशी विभागातही 1 दुकानदाराकडून 1 किलो एकल वापर प्लास्टिक जप्ती तसेच 5 हजार दंडात्मक रक्कम वसूली करण्यात आली आहे. कोपरखैरणे विभागातही 1 दुकानदाराकडून 500 ग्रॅम प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्ती तसेच 5 हजार दंड वसूली करण्यात आली आहे. याशिवाय परिमंडळ 1 मधील भरारी पथकाने 15 किलो प्लास्टिक जप्ती व 5 हजार दंड वसूली आणि परिमंडळ 2 मधील भरारी पथकाने 3 दुकानदारांवर कारवाई करुन 2 किलो 100 ग्रॅम प्लास्टिक साठा जप्ती तसेच 15 हजार दंडात्मक रक्कम वसूल केली आहे. अशाप्रकारे नोव्हेंबर महिन्यात नमुंमपा क्षेत्रात 1 लाख 60 हजार दंडात्मक रक्कम वसूली व 62 किलो 100 ग्रॅम प्रतिबंधात्मक प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले आहे. प्लास्टिकमुळे निर्सगाला व मानवी जीवनाला होणारी हानी लक्षात घेऊन नागरिकांनी प्लास्टिक पिशव्या व एकल वापर प्लास्टिकला दैनंदिन वापरातून पूर्णपणे हद्दपार करावे व स्वच्छ सुंदर पर्यावरणशील शहर हा नवी मुंबईचा नावलौकिक वृध्दींगत करत रहावा असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
मुंबई : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर त्याचबरोबर मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना आणि बिमानगर एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा उद्या पासुन २८, २९ नोव्हेंबर २०२४ रोजी बिमानगर एज्युकेशन सोसायटी शाळा, एलआयसी कॉलनी, शांती आश्रम बस डेपो समोर, बोरीवली (पश्चिम), मुंबई ४००१०३ येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर, लातूर, अमरावती, नागपूर या ८ विभागातील १९२ खेळाडू, १६ मार्गदर्शक, व्यवस्थापक, ३० पंच व अधिकारी, २५ स्वयंसेवक असा एकूण २६३ जणांचा सहभाग असणार आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्पर्धेची पूर्व तयारी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना यांच्या मार्फत मा. जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर आणि मा. उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, मुंबई विभाग, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन प्रथमच मुंबई उपनगर जिल्ह्यात करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागातून या स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंचे कौशल्य, कसब पाहण्याची संधी मुंबईतील क्रीडा प्रेमींना मिळणार आहे. या स्पर्धेतील खेळाडूंचा खेळ बघण्यासाठी मोठ्या संख्येने खेळाडू, पालक, प्रशिक्षक आणि क्रीडा प्रेमी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना यांनी केले आहे. 0000
सरस्वती मंदिर हायस्कूलसच्या अमृत मोहत्सवी वर्षानिमित्त आंतरशालेय लंगडी स्पर्धा मुंबई : सरस्वती मंदिर हायस्कूलसच्या अमृत मोहत्सवी वर्षानिमित्त आंतरशालेय लंगडी व खो-खो स्पर्धांचे आयोजन केले आहे. दुसऱ्या दिवशी मुलांचे सामने झाले. स्पर्धेतील दोन्ही उपांत्यफेरीत उत्कंठावर्धक लढती पाहायला मिळाल्या. या सामन्यांमधून सरस्वती मंदिर हायस्कूल आणि श्री गणेश विद्यालय यांनी आपापले सामने जिंकून अंतिम फेरीत स्थान मिळवले. पहिला उपांत्य फेरी सामना: पहिल्या सामन्यात सरस्वती मंदिर हायस्कूलने अहिल्या विद्या मंदिरचा ३०-११ असा एक डाव व १९ गुणांनी पराभव केला. सरस्वती कडून प्रभावी खेळ: या सामन्यात सरस्वतीकडून हर्ष प्रजापती (१ मिनिटे संरक्षण व आक्रमणात ४ गडी), शिवम झा (आक्रमणात ४ गडी) व श्रेयस जावळे (आक्रमणात ३ गुण) यांनी केलेल्या खेळामुळे सरस्वती मंदिर हायस्कूलचा संघ अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. तर पराभूत अहिल्या विद्या मंदिरच्या विश्वेश गुलगुले (आक्रमणात ५ गुण), मुझम्मील शाह (आक्रमणात ३ गुण) यांनी केलेली खेळी त्यांना पराभवापासून वाचवू शकली नाही. दुसरा उपांत्य फेरी सामना: दुसऱ्या सामन्यात श्री गणेश विद्यालयाने वाडीबंदर मुंबई पब्लिक स्कूलचा ३३-२२ असा एक डाव व ११ गुणांनी पराभव केला. श्री गणेश कडून उत्कृष्ट खेळ: या सामन्यात श्री गणेश विद्यालयाच्या मानस पोस्टरे (२:३० मिनिटे संरक्षण व आक्रमणात १ गुण), संयम धाडवे (आक्रमणात ७ गुण), अमेय मोहिते (आक्रमणात ६ गुण) यांनी विजयात मोठी कामगिरी करत श्री गणेश विद्यालयाला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले तर पराभूत वाडीबंदर मुंबई पब्लिक स्कूलच्या प्रविण गुप्ता (आक्रमणात ३ गुण), ऋषी ठाकूर (आक्रमणात २ गुण) यांनी चांगला खेळ केला पण त्यांना इतरांची साथ लाभली नाही त्यामुळे त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. ०००००
मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात मुंबई – दुर्गंधीमुळे कांजूर मार्ग येथील डंपिंग ग्राऊंड बंद करण्याची मागणी विक्रोळी आणि कांजूरमार्ग परिसरातून सातत्याने होत आहे. मात्र, नव्या डम्पिंग ग्राऊंडसाठी जागेचा पर्याय मिळत नाही तोपर्यंत हे डम्पिंग ग्राऊंड बंद करणे तूर्तास अशक्य असल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांनी सांगितले. या डम्पिंग ग्राऊंडचा करार २०२७ मध्ये संपत आहे. त्यामुळे हा करार संपण्यापूर्वी नव्या जागेचा शोध घ्यावा लागणार आहे. गोराई भागातील डम्पिंग ग्राऊंड काही वर्षांपूर्वीच बंद झाले आहे. देवनार डम्पिंग ग्राऊंडची क्षमता संपली असून तेही लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. सध्या त्या ठिकाणी कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प राबवण्याचा मुंबई महापालिकेचा मानस आहे. मात्र, हा प्रकल्प अजून कागदावरच आहे. याच डम्पिंग ग्राऊंडच्या एका भागात धारावीतील प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी फक्त कांजूर डम्पिंग ग्राऊंडवर पालिकेची भिस्त आहे. त्याव्यतिरिक्त विविध भागात कचरा संकलन केंद्रे सुरू करण्यात आली असून, त्या-त्या भागातील कचऱ्यावर या केंद्रांवर प्रक्रिया केली जात आहे. या सगळ्या भागातील कचरा डम्पिंग ग्राऊंडवर जाऊ नये, स्थानिक स्तरावरच कचऱ्याची विल्हेवाट लागावी असा पालिकेच्या घनकचरा विभागाचा प्रयत्न आहे. त्यामुळे आगामी काळात कचरा संकलन केंद्रांची संख्या वाढवली जाणार आहे, असे पालिकेकडून सांगण्यात आले. बंदीसाठी न्यायालयात धाव कांजूर डम्पिंग ग्राऊंडविषयी स्थानिक पातळीवर प्रचंड असंतोष आहे. हे डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याची मागणी कायम आहे. डम्पिंग ग्राऊंड बंद व्हावे यासाठी विक्रोळी विकास मंच न्यायालयात गेला आहे. डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याचे आश्वासन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी दिले होते. मात्र, या डम्पिंग ग्राऊंडच्या कराराची मुदत २०२७ सालापर्यंत आहे. तत्पूर्वी ते बंद होण्याची शक्यता नाही. कराराचे नूतनीकरण करून दिले जाणार नाही, असेही आश्वासन राजकीय पक्षांनी दिले आहे. जागेची चाचपणी सुरू डम्पिंग ग्राऊंडसाठी पालिका नव्या जागेचा शोध घेत आहे. तळोजा येथील जागेचा पर्याय निवडण्यात आला होता. मात्र मुंबईतील कचरा तेथे आणण्यास स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळे हा पर्याय जवळपास बारगळला आहे. आता अंबरनाथ येथील जागेच्या पर्यायाची चाचपणी केली जात आहे.
नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत बांधकामांस नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे त्या अनधिकृत बांधकामांविरोधात अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल…
स्मारकाला संविधान दिनानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई नवी मुंबई : ऐरोली येथील नवी मुंबई महानगरपालिकेचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे ज्ञान हिच शक्ती या बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित स्मारक म्हणून देशभरात ज्ञान केंद्र म्हणून नावाजले जात आहे. लक्षावधी देशी परदेशी पर्यटकांनी या ठिकाणी भेट देत येथील अद्ययावत समृध्द ग्रंथालय तसेच बाबासाहेबांचे जीवनचरित्र उलगडणारे छायाचित्र दालन व इतर सुविधांची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. या वर्षीचा संविधान दिन हा अमृत महोत्सवी विशेष असल्याने भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त स्मारकास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच स्मारकातील सभागृहात संविधान उद्देशिकेच्या एकत्रित समुह वाचनाचा विशेष उपक्रम सेक्टर 15 ऐरोली येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील 280 विद्यार्थी व 10 शिक्षक यांच्या समवेत राबविण्यात आला. या प्रसंगी उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांच्या समवेत शालेय विद्यार्थी, शिक्षक तसेच स्मारकातील नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांनी संविधानातील उद्देशिकेचे समुह वाचन केले. स्मारकातील ऑडिओ व्हिज्युअल ग्रंथालयात विशेष संविधान कक्ष निर्मिती करण्यात आली असून त्याठिकाणी संविधानाच्या मूळ प्रतिची प्रतिकृती ठेवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे त्या कक्षामध्ये संविधानाशी संबधीत पुस्तके उपलब्ध् करुन देण्यात आली आहेत. जेणे करुन संविधान अभ्यासकांना संविधानाविषयी सखोल अभ्यास करता येईल तसेच संविधान जाणून घेण्याची इच्छा असणा-या वाचकांना संविधान विषयक सांगोपांग माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध् होउु शकेल. संविधान दिनी 1200 हून अधिक पर्यटकांनी स्मारकाला भेट दिलेली असून ग्रंथालयातील स्वतंत्र संविधान कक्ष पाहून व्यवस्थापनाचे कौतुक केले आहे. त्याचप्रमाणे स्मारकातील विविध सुविधांचीही प्रशंसा केली आहे. ००००
पवई पोलिसांनी केली मित्राला अटक मुंबई : दिल्लीतील रहिवासी असलेल्या २५ वर्षीय वैमानिक तरूणीच्या आत्महत्या प्रकरणी पवई पोलिसांनी २७ वर्षीय मित्राला अटक केली आहे. अंधेरीमधील मरोळ येथील राहत्या घरात सृष्टी विशाल तुली (२५) या तरूणीने आत्महत्या केली होती. आरोपीने मृत तरूणीचा मानसिक छळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, मृत तरूणीच्या कुटुंबियांनी तिची हत्या करून ती आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. अंधेरी (पूर्व) येथील मरोळ पोलीस कॅम्पमागील कानाकिया रेन फॉरेस्ट येथील भाड्याच्या घरात राहणाऱ्या या तरूणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचा मित्र आदित्य पंडितनेही वैमानिक बनण्यासाठी परीक्षा दिली होती. पण तो अपयशी ठरला होता. प्राथमिक तपासानुसार, तुली रविवारी गोरखपूरहून परतल्यावर तिचे पंडितसोबत भांडण झाले. पंडित रात्री १ वाजता दिल्लीला निघून गेला. तुलीने त्याला दूरध्वनी करून आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे पंडित परत तिच्या घरी आला, पण दार आतून बंद होते. त्याने किल्लीवाल्याला बोलवून दरवाजा उघडला तेव्हा तुलीने गळफास लावल्याचे निदर्शनास आले. पंडितने तिला मरोळमधील सेवन हिल्स रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे घोषित केले. कुटुंबीयांचे आरोप तुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनुसार, पंडित तिच्यासोबत सर्वांसोबत भांडण करायचा. त्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती. तसेच तिच्या खाजगी आयुष्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत होता. तसेच तो तिच्यावर मानसिक दबाव आणत होता. पंडितने तुलीला औषध देऊन मारले असावे आणि नंतर आत्महत्येचा बनाव केला असावा, असा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी पंडीतला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी तुलीचे काका विवेककुमार यांच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०८ अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तुली गोरखपूरमधली पहिली महिला वैमानिक होती. त्यामुळे सर्व कुटुंब आनंदात होते. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनीही तिला सन्मानित केले होते. तिच्या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. तुलीच्या कुटुंबाचा लष्करी वारसा होता; त्यांचे आजोबा नरेंद्रकुमार तूली १९७१ च्या भारत-पाक युद्धात शहीद झाले होते.