Category: मुंबई

Mumbai news

मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाटांचे क्रमांक बदलले

मुंबई : उपनगरीय रेल्वे सेवा आणि मेल-एक्स्प्रेसची सेवा व्यवस्थित करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयी-सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने दादर स्थानकाच्या फलाट क्रमांकात बदल केल्याची घोषणा केली. बुधवार, २७ नोव्हेंबरपासून…

 ठाण्यातील १३०० घरांसाठी ५ हजारांहून अधिक अर्ज

 PM आवास योजनेतील घरांना प्रतिसाद नाही   मुंबई – म्हाडाच्या कोकण मंडळाच्या वतीने सुमारे ११ हजार घरे विक्रीसाठी काढण्यात आली आहेत. यामधील १५ आणि २० टक्के योजनेंतर्गत १३०० घरे होती. ठाण्यात असलेल्या  १३०० घरांना १०० टक्के प्रतिसाद असून, या घरांसाठी सुमारे पाच हजारांहून अधिक अर्ज आले होते. ही सगळी घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या गटातील आहेत. मात्र, पंतप्रधान आवास योजनेमधील १० ते ११ हजार घरांना अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद लाभलेला नाही, अशी माहिती म्हाडातील सूत्रांनी दिली. त्यामुळे आता या घरांची विक्री व्हावी म्हाडाकडून सोशल मीडियाचा वापर केला जाणार आहे. पंतप्रधान आवास योजनेमधील १० ते ११ हजार घरांना प्रतिसाद मिळालेला नाही. विरार, बोळींज, शिरढोण येथे असलेली घरे दूर आहेत. मात्र, याची माहिती लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. आता ही घरे विकली जावीत म्हणून या घरांची अधिकाधिक जाहिरात केली जाणार आहे. लोकांपर्यंत या घरांची माहिती पोहोचविली जाणार आहे. सोशल मीडियाचा यासाठी वापर केला जाणार आहे. दुसरीकडे कोकण मंडळाची २२०० घरे लॉटरीसाठी आहेत. या घरांनाही कमी प्रतिसाद आहे. निवडणुका संपल्या असून, लोकांपर्यंत या घरांची माहिती पोहोचविली जाणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेत अर्जदार अपात्र ठरण्याचे प्रमाण कमी असते. कारण यात अटी-शर्ती नाहीत. त्यामुळे अर्जदाराने मुदतीत पैसे भरले नाही तरच तो अपात्र ठरतो. अशावेळी प्रतीक्षा यादीवरील अर्जदाराला प्राधान्य दिले जाते. पहिला कोण ? एका घराला चार अर्ज आले असतील तर त्यातील पहिल्या अर्जदाराला संबंधित घर दिले जाते. यात दिवस, वेळ पाहिला जातो. उदा. सोमवारी तीन लोकांनी अर्ज केला. मंगळवारी एकाने अर्ज केला तर सोमवारचा अर्ज गृहीत धरला जातो. यातही कोणी किती वाजता अर्ज केला हे पाहिले जाते. हे सगळे पाहून यामध्ये सगळ्या अर्थाने जो पहिला असेल त्याला घरासाठी प्राधान्य दिले जाईल. २५ टक्के रक्कम भरा संबंधित अर्जदाराला पात्र असल्याचे कळविले जाईल. त्याने घराचे पैसे भरल्यानंतर म्हाडाकडून घराचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू होईल. एकूण घराच्या किमतीपैकी २५ टक्के रक्कम संबंधिताने भरणे अपेक्षित असते. सर्व प्रक्रिया ऑनलाइन आता स्वीकृती पत्र देण्याची पद्धत नाही. म्हाडाकडून आता संबंधितांना पात्र ठरल्याचे मेसेज पाठविले जातात. आता कोणतीच प्रक्रिया ऑफलाइन नाही. सगळ्या प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लोकांनी दलालांची मदत घेऊ नये, असे आवाहन म्हाडाने केले आहे. 0000

मुंबई पोर्टच्या रुग्णालयात आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार निर्मूलन दिन साजरा

मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने  २५  नोव्हेंबर २०२४ रोजी  वडाळा येथील मुंबई पोर्ट  प्राधिकरण रुग्णालयाच्या सॅनिटरी सेक्शनमध्ये ” आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार निर्मुलन दिन “.साजरा करण्यात आला अशी माहिती…

ईव्हीएमविरोधात ‘इंडियाचा’ एल्गार

व्हीव्हीपॅट मोजणीसाठी अर्ज करा ० पवार, ठाकरेंचे पराभूत उमेदवारांना आदेश   मुंबई: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात अभुतपुर्व पराभवानंतर आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने देशातील इंडिया आघाडीसह ईव्हिएमविरोधात एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला…

मुंबईवर २६ नोव्हंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या पोलीस आणि सैन्यातील वीरांना पोलीस आयुक्तालय येथील हुतात्मा स्मारकावर पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या शौर्याला अभिवादन करताना भाजपा नेते…

एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री !

 मुदत संपल्यामुळे राज्यपालांना सोपवला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा ० मुख्यमंत्रीपदाचा तिढा कायम ० दिल्लीत वाटाघाटींना वेग स्वाती घोसाळकर मुंबई: विधानसभेची मुदत संपत असल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि…

 मराठी माणसाची गळचेपी थांबणार तरी कधी?

 मराठी बोलल्याने रेल्वे कर्मचाऱ्याने नाकारले तिकीट     मुंबई : केंद्र सरकारने अलीकडेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. मात्र ज्या महाराष्ट्रात अन् मुंबईत मराठी भाषा रुजली, त्याच ठिकाणी मराठी…

मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे गुरुवार-शुक्रवारी लोअर परळ, दादर, प्रभादेवीत पाणीपुरवठा बंद

    मुंबई : लोअर परळ परिसरातील १,४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम गुरुवार, २८ नोव्हेंबर रात्री १० वाजता हाती घेणार असून हे कामपासून शुक्रवार, २९ नोव्हेंबर, रात्री…

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी मागवले अर्ज

अर्ज करण्याची ३० नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत   ठाणे : शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील जे विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू…

कोटक म्युच्यूअलतर्फे कोटक ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक फंडाचा शुभारंभ

  मुंबई : कोटक महिंद्रा ॲसेट मॅनेजमेंट कंपनीने कोटक ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक फंड हा नवीन फंड गुंतवणूकीसाठी आणत असल्याची घोषणा केली. हा फंड परिवहन आणि मालवाहतूक ( लॉजिस्टिक) या क्षेत्राशी…