मेघना साने यांची हॅटट्रिक
मुंबई : मेघना साने यांना ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’चा विशेष पुरस्कार त्यांच्या ‘मराठी सातासमुद्रापार’ या पुस्तकासाठी घोषित झाला आहे. मालगुंड येथील कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वार्षिक सोहळ्यात हा पुरस्कार त्यांनी…
Mumbai news
मुंबई : मेघना साने यांना ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’चा विशेष पुरस्कार त्यांच्या ‘मराठी सातासमुद्रापार’ या पुस्तकासाठी घोषित झाला आहे. मालगुंड येथील कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वार्षिक सोहळ्यात हा पुरस्कार त्यांनी…
मुंबई : लोकसभेच्या निवडणुकप्रमाणेच विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्रावर मतदारांना मोबाइल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. मतदारांना मतदान केंद्रावर मोबाइल नेता येणार नाही किंवा मोबाइल नेला तरी तो बाहेर ठेवण्याची…
मुंबई : बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (पोस्को) २०१२ जनजागृती सप्ताहाला सोमवारपासून सुरुवात झाली असून पोस्को जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने या कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी, मुलांच्या सुरक्षिततेसाठी महामुंबई मेट्रो संचलन महामंडळ लिमिटेड…
मुंबई : बटेंगे तो कटेंगे घोषणा देणारेच समाजात फूट पाडून विभाजन करण्याचे काम करत आहेत. प्रचार संपताच सत्ताधारी भाजपा युतीकडून फेक नेरेटीव्ह पसरवले जात आहे. धारावीतील एका मंदिरासंदर्भात खोटे सांप्रदायिक…
सरस्वती मंदिरच्या अमृत मोहत्सवी वर्षानिमित्त मुंबई: सरस्वती मंदिर, माहीम आयोजित आंतरशालेय खो-खो व लंगडी स्पर्धा सरस्वती मंदिर शाळेच्या अमृत मोहत्सवी वर्षानिमित्त मोठ्या उत्साहात सुरु होत आहेत. या स्पर्धेत ५ वी ते १० वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. स्पर्धा फेडरेशनच्या नियमांनुसार खेळवली जाईल. स्पर्धा विभाग: मुंबई शहरातील शाळांमधील खो-खो व लंगडी या दोन खेळांसाठी ५ वी ते १० वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील, लंगडीसाठी अधिकतम ३५ किलो वजन असलेले विद्यार्थीच भाग घेऊ शकतील याची नोंद घावी. या स्पर्धेसाठी प्रथम प्रवेशका देणाऱ्या पहिल्या १२ शाळांचाच समावेश केला जाईल. स्पर्धेची तारीख व वेळ: प्रवेशका देण्याची अंतिम तारीख २२ नोव्हेंबर २०२४ आहे. शाळांच्या क्रीडा प्रमुखांनी प्रवेशकाचे फॉर्म सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत द्यावेत. प्रवेशकासोबत शाळेच्या मुख्याध्यापकांचा शक्का व सही असलेली खेळाडूंची यादी संबंधित जमा करावी. यादीमध्ये खेळाडूंचे नाव, जन्मतारीख, इयत्ता ही माहिती शाळेच्या जी-आर नुसार बिनचुक भरावी. सामन्याची वेळ: दररोज सकाळी ८.०० वाजता सरस्वती मंदिर शाळेच्या पटांगणावर स्पर्धा होतील. संपर्क: अधिक माहितीसाठी स्पर्धा प्रमुख श्री. सिरिल सर (९९२२९३३६४७) किंवा श्री. बंडगर सर (९९६९०३३०६२) यांच्याशी संपर्क साधा.
पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीला राजकीय रंग देऊ नका, उच्च न्यायालयाची टिप्पणी मुंबई: विरोधी पक्षाच्या आक्षेपानंतर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. मात्र, त्यांच्या जागी सरकारने संजय कुमार यांची नियुक्ती करताना ती केवळ निवडणूक कालावधीपुरती मर्यादित ठेवण्याचे स्पष्ट केल्याने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. मात्र, न्यायालयाने सोमवारी या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला. तसेच, याचिका करण्याच्या याचिककर्त्याच्या हेतुवर प्रश्न उपस्थित केला. सरकारने निवडणूक आयोगाच्या आदेशाचे पालन केले आहे. शिवाय, आयपीएस अधिकाऱ्याच्या नियुक्तीला जनहित याचिकेद्वारे आव्हान कसे काय दिले जाऊ शकते ? या नियुक्तीने जनहित धोक्यात कसे आले आहे ? अशी विचारणा मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने याचिककर्त्यांच्या वकिलाला केली. त्याचप्रमाणे, पोलीस महासंचालकपदी तात्पुरती नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्याने सरकारच्या निर्णयाला आव्हान द्यायला हवे. तुम्ही का आव्हान देत आहात ? एखाद्या अधिकाऱ्याची तात्पुरती नियुक्ती केली जात असेल तर याचिककर्त्यांचे त्याने काय नुकसान होणार आहे ? असा प्रश्नही न्यायालयाने केला. त्यावर, याचिकाकर्ते हे लोकसेवक असल्याचे सांगण्यात आल्यानंतर या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नका, असे न्यायालयाने सुनावले. तसेच, पोलीस महासंचालकपदाच्या नियुक्तीच्या निर्णयाला जनहित याचिकेद्वारे आव्हान दिल्याबाबत नाराजी व्यक्त केली. शुक्ला यांची महासंचालकपदी फेब्रुवारीमध्ये नियुक्ती करण्यात आली होती, मग त्यावेळी त्यांच्या नियुक्तीला आव्हान का देण्यात आले नाही, असा प्रश्नही न्यायालयाने यावेळी याचिकाकर्त्यांना केला व याचिकेवर तातडीच्या सुनावणीची गरज नसल्याचे नमूद करून प्रकरण तातडीने ऐकण्यास नकार दिला. दरम्यान, पोलीस महासंचालकांना निवडणुकीच्या काळात तटस्थ आणि निष्पक्षपणे काम करण्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो म्हणून निवडणूक आयोगाने शुक्ला यांची बदली करून पोलीस महासंचालकपदी संजय कुमार वर्मा यांच्या नियुक्तीचे स्पष्ट आदेश दिले होते. परंतु, निवडणूक आयोगाच्या या आदेशांचे उल्लंघन करून राज्य सरकारने वर्मा यांची नियुक्ती आचारसंहितेपर्यंत राहील, असे स्पष्ट करणारा आदेश काढला. निवडणूक आयोगाच्या आदेशात असा फेरफार करणे हे आयोगाच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन आहे, असा आरोप करून त्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला या निवृत्त झाल्या असून त्यांना पुन्हा महासंचालकपदावर नियुक्त करणे नियबाह्य आहे. त्याचप्रमाणे, तात्पुरत्या पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीमुळे महासंचालकांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होईल. राज्य सरकारच्या या कृतीमुळे घटनात्मक संतुलनाला बाधा पोहचून कायदेशीर अनिश्चितता उद््भवू शकते. त्यामुळे, सरकारची ही कार्यवाही नियमबाह्य जाहीर करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. ०००
नवी मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध माध्यमांचा प्रभावी वापर करून महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती करण्यात आली आहे. सुट्टीच्या दिवशी नागरिक मोठ्या प्रमाणात कुटुंबियांसमवेत फिरायला बाहेर पडतात किंवा मॉलमध्ये खरेदीसाठी जातात हे लक्षात घेत वर्दळीच्या ठिकाणी पथनाट्यांसोबतच मॉल्समध्ये फ्लॅश मॉब सारख्या आधुनिक नृत्य प्रकारचाही प्रभावीपणे उपयोग करण्यात आला. यामध्ये सीवूड येथील नेक्सस मॉल तसेच वाशी येथील इनॉर्बिट मॉल याठिकाणी फ्लॅश मॉबचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांना आकर्षित करून घेणारी गाणी अचानक सुरू होऊन त्या तालावर मॉलच्या मध्यभागी युवक-युवतींचा समूह नृत्य सुरू करतो. मग आपसूकच त्यांच्याकडे सगळे लोक खेचले जातात आणि नृत्य पाहण्यासाठी भोवताली गर्दी जमू लागते. विविध लोकप्रिय गाण्यांच्या माध्यमातून 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन नृत्य समुहाव्दारे नागरिकांना करण्यात आले, त्याला नागरिकांचा उत्साही प्रतिसाद मिळाला. अशाच प्रकारे पथनाट्यासारख्या पारंपारिक प्रचार माध्यमांतूनही महापालिका क्षेत्रात बस डेपो, रेल्वे स्टेशन, मार्केट, वाणिज्य क्षेत्रे, मोठे चौक, नाके अशा वर्दळीच्या ठिकाणी सर्व आठही विभागांमध्ये मागील आठवडाभरात 60 हून अधिक ठिकाणी मतदान जनजागृतीपर पथनाट्ये करण्यात आली. त्यालाही नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. याशिवाय मतदान यंत्राचे मॅस्कॉट (शुभंकर) तयार करण्यात आले होते. या मतदान यंत्ररूपी 2 मॅस्कॉटनेही नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ठिकठिकाणी फिरून मतदान करा असा संदेश प्रसारित केला. या मॅस्कॉटसोबत अनेकांनी हौसेने सेल्फी छायाचित्रे काढली. मतदानाचा संदेश जनमानसात प्रसारित करण्यासाठी सायकलवर मतदानाचे आवाहन करणारे फलक लावून त्या सायकलीही नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अंतर्गत छोट्या रस्त्यांवर फिरविण्यात आल्या व गल्लोगल्लीतील मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा विविध माध्यमांतून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कलात्मक रितीने विधानसभा निवडणूकीत मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले असून नागरिकांनी 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायं. 6 या वेळेत मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे. ००००
ई -ऑफिस प्रणालीअंतर्गत सर्व सेवांचे संगणकीकरण होणार मुंबई : म्हाडाचा संपूर्ण कारभार संगणकीय, कागदविरहित (पेपरलेस) करण्याचा निर्णय यापूर्वीच म्हाडाने घेतला होता. आता या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानुसार ई ऑफिस प्रणालीअंतर्गत म्हाडातील सर्व सेवांचे लवकरच संगणकीकरण केले जाणार आहे. टप्प्याटप्प्याने हे संगणकीकरण केले जाणार असून पहिल्या टप्प्यात जुन्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकास प्रस्तावास मुदतवाढ देण्याची वा ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया संगणकीय पद्धतीने राबविली जाणार आहे. तर मुंबई मंडळातील भूखंडांच्या भाडेपट्टा करारनाम्यांचे नूतनीकरण संगणकीय पद्धतीने केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील सेवांचे संगणकीकरण करण्याच्या कामाला लवकरच म्हाडाच्या संबंधित विभागाकडून सुरुवात केली जाणार आहे. एकूणच या संगणकीकरणामुळे लवकरच म्हाडाचा कारभार कागदविरहीत होणार आहे. म्हाडाकडून गृहप्रकल्प राबविण्यासह सोडतीद्वारे सर्वसामान्यांना घरांचे वितरण केले जाते. तर जुन्या इमारतींचा, म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास केला जातो. तर इतर अनेक सेवा पुरविल्या जातात. या सर्व कामांसाठी म्हाडा लाभार्थ्यांसह इतर नागरिकांना म्हाडा भवनासह राज्यभरातील विविध विभागीय मंडळामध्ये यावे लागते. काळानुरूप कारभार संगणकीय करण्याचा निर्णय यापूर्वीच म्हाडाने घेतला होता. त्यानुसार आधी सोडतपूर्व आणि सोडत प्रक्रिया संगणकीय करण्यात आली, तर दीड वर्षांपूर्वीच सोडतीनंतरची संपूर्ण प्रक्रियाही संगणकीय करण्यात आली आहे. संपूर्ण सोडत प्रक्रिया संगणकीय झाल्याने मानवी हस्तक्षेप दूर झाला असून सोडतीत पारदर्शकता आल्याचे म्हटले जात आहे. सर्वसाधारण सोडतीसह बृहतसूचीवरील घरांची सोडतही आता संगणकीय करण्यात आली आहे. आता म्हाडातील सर्व सेवांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने सेवांचे संगणकीकरण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील सेवांच्या संगणकीकरणाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाअंतर्गत जुन्या इमारतींच्या पुनर्विकास प्रस्तावांना मुदतवाढ देण्याची, तसेच प्रस्तावांना ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. तर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रस्तावांनाही यापुढे संगणकीय पद्धतीनेच मान्यता दिली जाणार आहे. तसेच भूखंड भाडेपट्टा करारनामा, काररानाम्यांचे नूतनीकरणही ई ऑफिस प्रणालीद्वारे केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात इतर सेवांचे संगणकीकरण केले जाणार आहे. एकूण येत्या काही महिन्यात म्हाडाचा कारभार कागदविरहीत आणि संगणकीय होणार आहे. 0000 000
मुंबई : सोडून गेलेले गद्दार नाही, तर खरा गद्दार उद्धव ठाकरे आहे, असा घणाघात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला. एका माणसाने सगळ्या पक्षाची वाट लावली. अनेकजण पक्ष सोडून गेले, त्यांना ते गद्दार बोलताय. खरा गद्दार तर…
प्रचाराच्या तोफा थंडावल्या, ‘गांधी’जींच्या दर्शनाकडे कार्यकर्त्यांचे डोळे स्वाती घोसाळकर मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी सगळ्याच पक्षांनी दणकून प्रचार केला. सभा, प्रचार फेरी, रॅलींच्या मैदानातून गेले महीनाभर सुरु असलेली मैदानावरची लढाई…