Category: मुंबई

Mumbai news

मास्टर्स पॉवरलिफ्टिंग राष्ट्रीय स्पर्धेत पेणच्या रमेश खरे यांना सुवर्ण

मुंबई : इंदौर, मध्य प्रदेश येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग इक्विपड आणि अनईक्विपड स्पर्धेत रायगड, पेणच्या 75 वर्षीय रमेश खरे यांनी शानदार कामगिरी करताना सुवर्ण पदकाला गवसणी घातली. पेणच्या…

 उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारा अर्थसंकल्प

चंद्रकांतदादा पाटील यांची केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया     मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला.  यात देशातील उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला ही अत्यंत अभिनंदनीय आणि उल्लेखनीय बाब आहे. अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. यामध्ये देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र  सरकारने  10 लाखांचे कर्ज जाहीर केले आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेता यावे, यासाठी दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांना थेट ई-व्हाऊचरही दिले जाणार आहेत.या कर्जाच्या रकमेच्या ३ टक्के वार्षिक व्याज सवलतीसाठी हे ई-वाउचर दिले जाणार आहेत. या सोबतच मूलभूत संशोधन आणि आदर्श विकासासाठी अनुसंधान राष्ट्रीय संशोधन निधी कार्यान्वित केला जाणार आहे. तसेच  नवोन्मेषाला चालना देण्यासाठी १ लाख कोटी रुपयांच्या वित्तपुरवठ्यासह एक यंत्रणा उभारणे अतिशय कौतुकास्पद आहे. आजचा अर्थसंकल्प शिक्षणव्यवस्था अधिक सक्षम करणारा आणि  उच्च शिक्षणाला नवीन दिशा देणारा आहे असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. 00000

भास्कर कॉलनी नवमतदार नोंदणी शिबिरास कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांची सदिच्छा भेट

मुंबई : भास्कर कॉलनी येथील मा. नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांच्या कार्यालयात ‘नवमतदार नोंदणी’ तसेच ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’  यांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास सन्माननीय कृषिमंत्री दादा साहेब…

शिवस्मारकासाठी आझाद मैदानात जागरण गोंधळ

रमेश औताडे   मुंबई / अरबी समुद्रात होणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक गेल्या १० वर्षांपासून सरकारने दुर्लक्षित ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारला जागे करण्यासाठी बुधवारी आझाद मैदानात जागरण गोंधळ घालण्यात आला. यापुढेही सरकारने जर गांभीर्याने लक्ष दिले नाही तर स्वाक्षरी मोहीम राबवत जनजागृती करणार व त्यानंतर तीव्र बेमुदत आंदोलन करणार असा इशारा जय शिव संग्राम चे मुंबई अध्यक्ष शशिकांत शिरसेकर यांनी आझाद मैदानात दिला. २०१३ मध्ये अरबी समुद्रात श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवस्मारक बांधण्याचा प्रस्ताव आणला होता. त्या नंतर २०१६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरबी समुद्रात स्मारकाचे जलपूजन केले होते. आज १० वर्ष होऊन गेली. आतापर्यंत कामाला सुरुवात झाली नाही. देशांमध्ये इतर करोडो रुपयांचे  प्रकल्प तयार झाले. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय कोणीही घेत नाही असे सरचिटणीस मुख्य प्रवक्ते दिपक कदम यांनी सांगितले. ९० हजार कोटींचे रस्ते होत आहेत. अटल सेतू झाला. मुंबईच्या जमिनीखालून रेल्वे धावण्याच्या मुहूर्तावर आहे. लाडकी बहिण लाडका भाऊ आदी योजनांच्या घोषणा होत आहेत. मात्र श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रात होणाऱ्या स्मारकाबाबत  विरोधक व सत्ताधारी शांत बसले आहेत. त्यामुळे आता स्वर्गीय विनायक मेटे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांची जय शिव संग्राम आझाद मैदानात जागरण गोंधळ घालत आहे असे शिरसेकर यांनी सांगितले. यावेळी अनिल परब, आकाश जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. 00000

‘देश अती तीव्र कुपोषणाच्या समस्येला तोंड देत आहे’

युनीसेफ चे महाराष्ट्र सल्लागार डॉ. खरात यांचे वक्तव्य  रमेश औताडे   मुंबई :कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ५ वर्षां खालील ४३ टक्के बालके खुजी होण्याचा आणि त्यांचा योग्य विकास न होण्याचा धोका असतो. भारतातही ५ वर्षाखालील ३८ टक्के बालके बुटकी आहेत, देश अती तीव्र कुपोषणाच्या समस्येला तोंड देत आहे. निकृष्ट आरोग्य, अपुरे पोषण ताणतणाव आणि वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर प्रोत्साहन अपुरे पडल्याने लाखो बालके अपेक्षित यश संपादन करण्यात आणि मोठे झाल्यावर संपूर्ण सक्षम होण्यात अपयशी ठरतात. अशी माहिती मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत  युनीसेफ चे राज्य सल्लागार डॉ कारभारी खरात यांनी दिली. बाळ जन्माला आल्यापासून पहिली दोन वर्ष खूप महत्त्वाची असतात. कारण त्या दोन वर्षात बाळ खूप शिकत असतं. या काळात त्याच्या मेंदूची 75 टक्के वाढ पूर्ण होते, बाळाच्या वाढीसाठी हे ‘ पहिले हजार दिवस ‘ खूप कळीचे ठरतात. या काळात बाळाला योग्य संगोपन, माया आणि योग्य पोषण मिळाले तरच मेंदूची पूर्ण वाढ होण्याची शक्यता वाढते असे डॉ खरात यांनी सांगितले. ‘साऱ्याजणी महिला उत्कर्ष संस्था’  व ‘युनीसेफ’ या लसीकरण प्रकल्प मुख्य अधिकारी सुजाता शिर्के म्हणाल्या, महिला गरोदर असल्यापासून बाळ मोठे होईपर्यत नेमके काय करावे याची माहिती अपुरी असल्याने विविध आजार होतात. गर्भ अवस्थेत मेंदूतील अनेक केंद्र एकमेकांशी जोडली जातात. यामुळे आकलन शक्ती, सामाजिक कौशल्य तसेच संज्ञात्मक आणि भावनिक विकास होतो. हा विकासाचा अति आवश्यक टप्पा आहे. हा विकास होण्यासाठी बाळाला स्पर्ष, प्रेम, आणि पोषणाची जरूरी असते. आई सुदृढ, निरोगी आणि आनंदी असणे, व मुलाच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी मिळणे हा प्रत्येक बाळाचा मूलभूत अधिकार आहे. जन्मलेल्या प्रत्येक बाळाचे योग्य वयात लसीकरण पूर्ण झाले तर या अधिकाराचं संरक्षण अधिक सुलभ होते. पहिल्या पाच वर्षात सात लसी दिल्याने मुलांचे क्षय, पोलियो, घटसर्प, डांग्या खोकला, गोवर, मेंदूज्वर, रुबेला, कावीळ, अतिसार अशा दहा आजारांपासून संरक्षण होते. सरकारी आरोग्य केंद्रात या सर्व लसी मोफत मिळतात आणि त्यासंबंधी मार्गदर्शन आणि पाठपुरावा केला जातो असे सुजाता शिर्के यांनी सांगितले. देशाच्या लोकसंख्येत महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा लागतो. नीती आयोगाने २०१९ मध्ये जाहीर केलेल्या आरोग्याच्या निर्देशांकानुसार राज्य आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहे. पाच वर्षखालील मुलांचे मृत्यू दर कमी करण्याचे शाश्वत विकासाचे ध्येय महाराष्ट्राने गाठले असले तरी अद्याप राज्यात कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे. सर्वसाधारण एक तृतियांश बालके तीव्र कुपोषित म्हणजे अपेक्षित उंचीपेक्षा बुटकी आहेत आणि प्रत्येक चौथे बालक अपेक्षित वजनाहून कमी, सडपातळ आहे असे डॉ खरात यांनी सांगितले. वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर मुलांना योग्य प्रोत्साहन मिळाल्यास अनेक अल्प आणि दीर्घ मुदतीचे फायदे होतात हे पुराव्या निशी सिद्ध झालेले आहे. पण ज्या बालकांना त्यांच्या चांगले पोषण, प्रोत्साहन व प्रेम मिळत नाही, ते आजच्या स्पर्धेच्या युगात मागे पडतात. वंचित कुटुंबामध्ये सुद्धा जन्मलेल्या बालकांसाठी विकासाच्या संधी लवकर उपलब्ध करून दिल्या तर बालकाचे कमी नुकसान होईल व जास्तीत जास्त संभाव्य क्षमतेपर्यत पोहोचणे शक्य होते. बालविकासात गुंतवणूक हा गरीबी संपवण्याचा आणि असमानतेचे चक्र तोडण्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. आर्थिक वाढीला चालना देऊन समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी बालसंगोपनाच्या धोरणामध्ये सक्रिय प्रतिसाद, योग्य पोषण, विकासाच्या संधी, चांगले आरोग्य आणि सुरक्षित देखभाल, हे पाच महत्त्वपूर्ण घटक ओळखले जातात असे डॉ खरात यांनी सांगितले. ०००००

जोगेश्वरीमधील उच्चभ्रू इमारतीला भीषण आग; चारजण जखमी

मुंबई : जोगेश्वरीमधील एस. व्ही. मार्गावरील दिल्ली दरबार हॉटेलनजीकच्या ‘ई – हाय’ या बहुमजली इमारतीमध्ये बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत चारजण जखमी झाले असून…

बेलापूरमध्ये पावसाळी जल उदंचन केंद्राच्या भूमिपूजनाव्दारे नागरिकांना दिलासा

नवी मुंबई : बेलापूर सेक्टर 12 येथे सिडको कालीन 40 वर्ष जूनी पावसाळी जलउदंचन केंद्राची जीर्ण झालेली इमारत तोडून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधणे तसेच नवीन पंपींग मशीनरी बसविणे या…

उबाठा गटातील दोन माजी नगरसेविकांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

मागाठाणेतील माजी नगरसेविका रिद्धी खुरसुंगे आणि गीता सिंघण यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न     मुंबई :- मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील उबाठा गटाच्या माजी नगरसेविका रिद्धी खुरसुंगे आणि…

राज्य कॅरम स्पर्धेत आकांक्षा – घुफ्रान विजेते

मुंबई : चेंबूर जिमखान्याच्यावतीने आयोजित केलेल्या व उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत महिला एकेरीत रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने बाजी मारली. अंतिम सामन्यात तिने प्रतिस्पर्धी मुंबईच्या रिंकी…

ग्रामीण महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरणासाठी इंडोस्पेस आणि मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन यांचा संयुक्त उपक्रम

चाकण आणि खोपोलीतील ५२ महिलांना व्यवसाय, संवाद आणि नेतृत्व कौशल्यांचे प्रशिक्षण.     मुंबई : मॅजिक बस इंडिया फाउंडेशन आणि भारतातील सर्वात मोठे विकास ‘ए’ ग्रेड प्राप्त औद्योगिक रिअल इस्टेटचे…