Category: मुंबई

Mumbai news

मराठा क्रांती मोर्चाचे आबा पाटील राष्ट्रीय मराठा पार्टीत

रमेश औताडे मुंबई :मराठा आरक्षण या प्रश्नावर आझाद मैदान दणाणून सोडणारे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आबा पाटील यांनी बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित जाहीर पत्रकार परिषदेत राष्ट्रीय मराठा पार्टीत प्रवेश केला. महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या हक्काच्या लढ्यातील महत्वाचा टप्पा गाठत, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या नेत्यांनी व आबा पाटील यांनी केलेला हा महत्वाचा मानला जात असल्याचे पार्टीचे अध्यक्ष अंकुशराव पाटील यांनी यावेळी सांगितले. या निर्णयानंतर मराठा समाजाच्या असंतोषाला एक नवीन दिशा मिळाली आहे. मराठा समाजातील विविध संघटना,  मराठा क्रांती ठोक मोर्चा व इतर संघटनांनी आरक्षणाची ही चळवळ लाखो कार्यकर्त्यांना घेऊन रस्त्यावर लढली. मात्र आरक्षण प्रश्न म्हणावा तसा नाही. म्हणून आता समाजाचे प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी पाटील यांच्या प्रवेशाने एक नवी दिशा मिळणार आहे. पार्टी राज्यभारत शंभर ते सव्वाशे उमेदवार उभे करणार आहे.  शेतकरी , शिक्षणात समान संधी, बेरोजगारी आणि सामाजिक न्याय हे  जाहीरनाम्याचे प्रमुख मुद्दे असतील. मराठा समाजाच्या विकासासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी आम्ही कुठलाही त्याग करण्यास तयार आहोत, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

 ओवाळणीत एक रुपयाही नको, आमदारकी पाहिजे!

 शर्मिला ठाकरेंची मनसे उमेदवारांकडे मागणी   मुंबई: शिवतीतर्थ येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) युवा नेते अमित ठाकरे यांचं औक्षण करण्यात आलं. त्यांच्या अभिनंदनासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या वेळी मनसेच्या इतर उमेदवारांचे देखील औक्षण करण्यात आले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांनी खास भूमिका बजावली. त्या औक्षणाच्या वेळी बोलताना म्हणाल्या, “ओवाळणीत एक रुपयाही नको, आता आमदारकी पाहिजे!” त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. माहीम विधानसभेत थेट मुकाबला- माहीम विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोन्ही पक्षांमध्ये थेट मुकाबला होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे या मतदारसंघात तणाव वाढला आहे. अमित ठाकरे यांना त्यांच्या कुटुंबीयांचा आणि कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा आहे, तर सदा सरवणकर यांच्याकडे शिंदे गटाच्या शिवसेनेचा आधार आहे. मनसेच्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी आपली ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत विविध विधानसभांमध्ये मनसेकडून उमेदवार उभे करण्यात आले आहेत. माहीम, वरळी आणि अन्य मतदारसंघांमध्ये मनसेने थेट लढत देण्याची तयारी केली आहे. या निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 000

मिहीर कोटेचा मुलुंड विधानसभेसाठी आज उमेदवारी दाखल करणार

मुंबई : मुलुंडचे आमदार आणि भाजप आणि महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा हे उद्या, गुरुवारी, २४ ऑक्टोबर रोजी गुरुपुष्यामृत योगच्या दिवशी मुलुंड विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी जंगी…

कॉंग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांच्या हाती ‘घड्याळ’…

मुंबई : अमरावती शहरातील कॉँग्रेसच्या विद्यमान आमदार सुलभा खोडके यांनी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.…

ऑलेक्ट्राचा सहामाही आर्थिक अहवाल सकारात्मक

मुंबई : प्रवाशांना प्रदुषण विरहीत गारेगार प्रवासाची संधी एसटी आणि बेस्टच्या इलेक्ट्रिक बस देत आहेत. दिवाळीच्या दरम्यान या पुरवठ्यात वाढही झाल्याचे नुकतेच महामंडळाने सांगीतले. एसटी आणि बेस्टला इलेक्ट्रिक बस पुरवण्यता आघाडीवर असणारी  इलेक्ट्रिक बस उत्पादक कंपनी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (OGL) ने  दुसऱ्या तिमाही आणि पहिल्या सहामाहीचा  एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केला. संचालक मंडळाने आज झालेल्या बैठकीत या उल्लेखनीय बाबींना अधिकृतपणे मान्यता दिली.  या  तिमाहीत, ऑलेक्ट्रा ने 315 इलेक्ट्रिक वाहने वितरित केली, 23-24 या आर्थिक वर्षातील 154 च्या तुलनेत यात  105 टक्क्यांनी वाढ झाली. कंपनीकडे एकूण 10,503  बस ऑर्डर्स आता पर्यत नोंदवण्यात आल्या आहेत. 0000  

मुंब्र्यातून नजीब मुल्ला आव्हांडविरोधात लढणार

मुंबई :  ठाण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आणि आमदार जिंतेंद्र आव्हाडांविरुद्धचा महायुतीचा उमेदवार निश्चित झाला आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघासाठी नजीब मुल्ला यांना तिकीट दिलं आहे. उमेदवार नजीब मुल्ला यांनी अजित…

शिंदेसेनेचे माजी नगरसेवक हाजी बब्बू खान यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश मुंबई : काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते, माजी नगरसेवक हाजी बब्बू खान यांनी आज मुंबई काँग्रेस अधयक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी वर्षा गायकवाड यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भाजपा सरकार अदानीसाठी काम करत असून धारावीकरांना बाहेर हाकलण्याचे षडयंत्र सुरु आहे. धारावीच्या लोकांना मुलुंड, देवनार, कुर्ला, मालवणी आक्सा, मिठागरांच्या जागेवर विस्थापीत केले जात आहे. पण धारावीसाठी आपली लढाई अदानीच्या विरोधात सुरु आहे. विधानसभेच्या निवडणुकीत धारावीतून सर्वात जास्त मताधिक्क्याने आपला उमेदवार विजयी करायचा आहे. विधानसभेची ही निवडणूक लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी महत्वाची आहे. धारावीसाठी, मुंबईसाठी व महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मविआचे सरकार आणायचे आहे, त्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करावे, असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी केले. हाजी बब्बू खान म्हणाले की, काँग्रेस पक्षच सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. काहीवेळेसाठी काँग्रेसमधून बाहेल गेले होते पण मनातून काँग्रेस कधीही गेली नाही. माझे व या सर्व   लोकांचे धारावीवर प्रेम आहे, सर्व लोक स्वतः उमेदवार समजून काम करतात. काँग्रेस पक्ष व खासदार वर्षाताई गायकवाड यांच्यासोबत आम्ही खंबीरपणे उभे राहू. या पक्षप्रवेशावेळी माजी मंत्री अस्लम शेख, आमदार अमिन पटेल, काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, विरेंद्र चौधरी, कचरू यादव, इब्राहिम भाईजान आदी उपस्थित होते.

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा

एसएसटी महाविद्यालयाचा दुहेरी विजय उल्हासनगर : क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद,ठाणे आणि उल्हासनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये एसएसटी महाविद्यालयाने आपला दबदबा सिद्ध करत दुहेरी मुकुट मिळवला आहे. स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलांच्या गटात एसएसटी महाविद्यालयाच्या संघाने अप्रतिम खेळ दाखवत प्रथम क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे, १९ वर्षाखालील मुलींच्या गटातही उत्कृष्ट प्रदर्शन करत एसएसटी महाविद्यालयाच्या मुलींनी प्रथम क्रमांकावर आपली मोहर उमटवली. या दुहेरी विजयामुळे एसएसटी महाविद्यालयाचे सर्वत्र कौतुक होत असून, महाविद्यालयाचे प्रशिक्षक आणि खेळाडूंचे अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच या विजयाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉ.पुरस्वानी,आयक्यूएसी समन्वय डॉ.खुशबू पुरस्वानी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले असून त्यांना विभागीय स्पर्धांसाठी शुभेच्छा ही दिल्या.

मुंबईकरांनो सावधान ! पाणी गाळून, उकळून प्या

मुंबई : राजधानी मुंबईसह उपनगरातील अनेक भागांत गेल्या ४ दिवसांपासून पावासाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या या परतीच्या पावसामुळे धरणक्षेत्र भागातील नद्यांमधून पावसाचे पाणी जलशयात जात आहे. येथील भातसा जलाशयाच्‍या पाणलोट क्षेत्रात मागील ३…

ठाकरेंकडे इनकमिंग सुरुच

भाजपचे कुर्ला विधानसभा महामंत्री स्वप्निल चंद्रकांत येरुणकर आणि ॲड. राणी स्वप्निल येरुणकर ह्यांनी त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांसह आज मातोश्री येथे पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश…