Category: मुंबई

Mumbai news

भिवंडी ग्रामीणमध्ये स्नेहा पाटील यांचा शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल

भिवंडी : भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काल्हेर येथील माजी सरपंच स्नेहा देवेंद्र पाटील यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. कॉम्प्युटर इंजिनिअर असलेल्या असलेल्या स्नेहा पाटील यांनी भिवंडी…

जागा वाटप निषेधार्थ आठवले गटाचा एल्गार

रमेश औताडे मुंबई :रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाची भाजपा सोबत विधानसभा निवडणूकीत युती असूनही उमेदवारी वाटप संदर्भात सन्मानपूर्वक वाटाघाटी पूर्ण न झाल्याने गुरुवारी मुंबईत पक्षाच्या कार्यालयासमोर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून निषेध एल्गार व्यक्त करण्यात आला. भारतीय जनता पक्षाने शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांच्याशी तिकीट वाटपाच्या सन्मानपूर्वक वाटाघाटी केल्या. परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांना विश्वासात घेतले नाही. रिपाई पक्षाला सन्मानपूर्वक जागा मुंबई व महाराष्ट्रात सोडलेल्या नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. मुंबई प्रदेश कार्यकारणीतील व सर्व जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष, वार्ड अध्यक्ष, युवक आधाडी, महिला आघाडी व विविध आघाडी यांनी संघर्ष नायक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रामदास आठवले यांचे आदेश आल्याशिवाय महायुतीची सन्मानजनक जागा वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व मुंबई प्रदेशचा आदेश आपणांस पारीत झाल्यानंतरच आपण आपल्या मतदार सघात निवडणूकीच्या कामास लागावे, असा आदेश देण्यात येत असल्याची माहिती मुंबई प्रदेश अध्यक्ष  सिध्दार्थ कासारे यांनी दिली. सरचिटणीस मुंबई प्रदेश विवेक गोविंद पवार, मुंबई प्रदेश युवा अध्यक्ष साचीनभाई मोहिते, महाराष्ट्र युवा अध्यक्ष पप्पू कागदे , दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष सोना कांबळे, दक्षिण मुंबई जिल्हा सरचिटणीस शिरीष चिखलकर आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

शाळा, मार्केट, उद्याने अशा विविध ठिकाणी मतदान करण्याविषयी जनजागृती

नवी मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृतीवर विशेष भर देण्यात येत असून निवडणूक कार्यालयांच्या स्वीप पथकांप्रमाणेच महानगरपालिकेच्या विभाग कार्यालय स्तरावरील पथकांमार्फतही विविध समाज घटकांपर्यंत पोहचून 20 नोव्हेंबर रोजी…

 मध्य रेल्वेने मारली बाजी

अखिल भारतीय आंतर रेल्वे खो-खो स्पर्धा रामजीक कश्यपला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मुंबई : १८ वी अखिल भारतीय आंतर रेल्वे खोखो स्पर्धा बिलासपूर, छत्तीसगड येथे संपन्न झाली. या स्पर्धेत सहा संघांनी भाग घेतला होता व हि स्पर्धा तीन दिवस सुरु होती. त्यामध्ये दक्षिण मध्य रेल्वे, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, उत्तर रेल्वे, रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांचा समावेश होता. या स्पर्धेत रेल्वेच्या विविध भागातून १३ अधिकाऱ्यांसह ८८ खेळाडूंनी भाग घेतला होता. तर हि स्पर्धा नीट पार पाडण्यासाठी रेल्वे बोर्डाने १४ पंचांची नियुक्ती केली होती. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी रेल्वे बोर्डाने ४ निरीक्षकांची नियुक्ती केली होती. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान व गतविजेत्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, बिलासपूरचे कडवे आव्हान मध्य रेल्वे, मुंबईला होते. सुरवाती पासूनच अतिशय चुअराशीचा खेळ पाहायला मिळाला परंतु शेवटी मध्य रेल्वे मुंबईने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचा १४-१३ असा जवळ जवळ तीन मिनिटे राखून विजेतेपदाला गवसणी घातली. या सामन्यात क्षणा-क्षणाला दोन्ही संघांची कामगिरी वरचड ठरत होती. मध्यंतरला ७-७ अशी बरोबरी पाहायला मिळाली व प्रत्येक खेळाडू “कांटे कि टक्कर” देत होता व ते आपआपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत होते. दुसऱ्या डावात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूरला प्रथम आक्रमण करताना सहाच खेळाडू बाद करण्यात यश आल्याने मध्य रेल्वे, मुंबईला विजय नजरेच्या टप्प्यात येत असल्याचे लक्षात आले. त्यावेळी मध्य रेल्वेच्या खेळाडूंनी जिंकू किंवा मरू या अविर्भावात संरक्षण करताना दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या खेळाडूंच्या तोंडाला फेस आणला. एक एक गुण मिळवण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या खेळाडूंना झगडावे लागत होते. तर सामन्याच्या शेवटी आक्रमण करताना मध्य रेल्वेच्या खेळाडूंनी कमालीचा खेळ उंचावत ७ खेळाडू जवळ जवळ तीन मिनिटे राखून बाद केले व मध्य रेल्वेने विजयाचा जल्लोष साजरा केला. या सामन्यात मध्य रेल्वेच्या रामजी कश्यप (२, १.१० मि. संरक्षण व ५ गुण), विजय हजारे (१.५०, २ मि. संरक्षण व १ गुण), संकेत कदम (१.३०, १.४० मि. संरक्षण),  दिलीप खांडवी (१.३०, १.३० मि. संरक्षण व १ गुण) व अवधूत पाटील (नाबाद १.१० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी विजेतेपद खेचून आणताना दमदार खेळ केले व मध्य रेल्वेला विजयी केले. तर पराभूत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अरुण गुणकी (१.२०, १ मि. संरक्षण व २ गुण), निलेश (१.४० मि. संरक्षण व १ गुण), आदित्य गणपुले (१.१०, १.१० मि. संरक्षण) व स्वामी (१.१०, १.३० मि. संरक्षण व २ गुण) यांनी दिलेली कडवी लढत गत वर्षीचा इतिहास घडवण्यास अपुरी ठरली. सामना संपल्यावर मध्य रेल्वेचे प्रशिक्षक सुधीर म्हस्के व संघ व्यवस्थापक योगेश मोरे यांनी समाधान व्यक्त करताना खेळाडूंनी विजयश्री खेचून आणल्याचे सांगितले. तृतीय क्रमांकाच्या सामन्यात पश्चिम रेल्वेने दक्षिण मध्ये रेल्वेला हरवत तिसरा कमांक पटकावला. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूचे पारितोषिक रामजी कश्यपला तर उत्कृष्ट आक्रमकाचे पारितोषिक रंजन शेट्टी व उत्कृष्ट संरक्षकाचे पारितोषिक अरुण गुणकीला देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ रेल्वे महाप्रबंधक मीनु इटियेरा यांच्या मुख्य उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी महाप्रबंधकांनी विजेत्या संघाचे व स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांचे अभिनंदन केले. या स्पर्धेत खेळलेले सर्व संघ हे रेल्वे परिवाराचे असून सर्वच संघांनी चंगल्या व उच्च दर्ज्याच्या  खेळाचे प्रदर्शन केल्याचे सांगितले.

आणि जीव भांड्यात पडला रेल्वे पोलिसांच्या तत्परतेने बारा तासात बॅग सापडली

मुंबई : लोअर परळ स्थानकात अज्ञात इसमाने मोहिणी कांबळे यांचा मोबाईल हिसकाविण्याच्या प्रयत्न केला. या घटनेत मोहिनी या चालत्या रेल्वेतून खाली पडल्या. त्यांना किरकोळ मुका मार लागला असून मुंबई सेंट्रल…

नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांची ऐरोली विधानसभा निवडणूक कार्यालयास भेट

नवी मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक 20 नोव्हेंबर 2024 रोजी होत असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 150 ऐरोली व 151 बेलापूर या दोन विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपला…

 रिझवान -मधुराला प्रथम मानांकन

 रोटरी क्लब रॅपीडो कॅरम स्पर्धा मुंबई : रोटरी क्लब ऑफ डोंबिवली आयोजित तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व ठाणे डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने व रोटरी भवन, डोंबिवली येथे आयोजित करण्यात आलेल्या रॅपिडो कॅरम सुपर सिक्स स्पर्धेत पुरुष एकेरी गटात मुंबई उपनगरच्या रिझवान शेख तर महिला एकेरी गटात ठाण्याच्या मधुरा देवळेला प्रथम मानांकन देण्यात आले आहे. स्पर्धेचे उदघाटन शनिवार दिनांक २६ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता करण्यात येईल. यानंतर पुरुष एकेरी गटाने सामन्यांना सुरुवात होईल. तर महिला एकेरी गटाचे सामने २७ ऑक्टोबर २०२४ रोजी खेळविण्यात येतील. महाराष्ट्र कॅरम असोसिशनच्या युट्युब चॅनलवरून या सामान्यांचे थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय विजेत्या खेळाडूंना रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीच्या वतीने १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील मानांकन पुढीलप्रमाणे. पुरुष एकेरी : १) रिझवान शेख (मुंबई उपनगर ), २) योगेश परदेशी ( पुणे ), ३) विकास धारिया ( मुंबई ), ४) सागर वाघमारे (पुणे), ५) झैद अहमद फारुकी ( ठाणे ), ६) संजय मांडे (मुंबई), ७) पंकज पवार ( ठाणे), ८) महम्मद घुफ्रान ( मुंबई ) महिला एकेरी : १) मधुरा देवळे ( ठाणे ) २) समृद्धी घाडीगावकर ( ठाणे ) ३) केशर निर्गुण (सिंधुदुर्ग ), ४) प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर), ५) आकांक्षा कदम ( रत्नागिरी ), ६ ) उर्मिला शेंडगे ( मुंबई ), ७) अनिता कनोजिया ( रायगड ), ८) संगीता चांदोरकर (मुंबई ) ००००

शाश्वत कोकण परिषदेच्या जाहीरनाम्यातील मुद्द्यांची दखल घेणार – उद्धव ठाकरे

अनिल ठाणेकर मुंबई : शाश्वत कोकण परिषदेचा जाहीरनामा करण्यामागची कारणे,  प्रक्रिया  व जाहिरनाम्यातील मुद्दे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना संक्षिप्तपणे माहिती देण्यात आली. उध्दव ठाकरे यांनी, शाश्वत कोकण परिषदेचा जाहीरनामा लक्षपूर्वक पाहिला आणि या जाहीरनाम्याचे सादरीकरण व डिझाईनचे कौतुक केले. तसेच त्यात घेतलेल्या कोकणातील मुद्द्यांची दखल घेतली जाईल असे सांगून जाहिरनाम्याच्या आणखीन प्रती देण्याचे आवाहन केले .शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बारसु- सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेने मंगळवारी भेट घेतली आणि त्यांना शाश्वत कोकण परिषदेचा जाहीरनामा सुपूर्द करण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची धोरणे ठरवताना शाश्वत कोकण परिषदेचा जाहिरनाम्यातील मुद्द्यांचा उद्धव ठाकरे हे नक्कीच विचार करतील असा आशावाद शाश्वत कोकण परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव व आमदार मिलिंद नार्वेकर, सचिव व माजी खासदार विनायक राऊत, राजापूर लांजा विधानसभेचे आमदार राजन साळवी, राजापूर तालुका संपर्क प्रमुख अनिल भुवड, बारसु सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेतर्फे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर, सरचिटणीस नरेंद्र जोशी, आदेश भोवड, सूर्यकांत सोडये, विनायक शिंदे, संतोष तिरलोटकर, स्वप्नील सोगम, गोपीनाथ घाडी, तुळशीदास नवाळे, महेंद्र गुरव, अमित नेवरेकर, शाश्वत कोकण परिषदेचे सत्यजीत चव्हाण, नाणारचे माजी सरपंच ओमकार देसाई, पाळेकर वाडी (नाणार) चे प्रमुख सत्यवान पाळेकर व धनाजी वालम आदी मान्यवर उपस्थित होते. चौकट कोकणातील जनतेच्या, मुंबई, वसई, सावंतवाडी, चिपळूण, चिंचणी (पालघर) व पेण येथील झालेल्या परिषदांच्या विचारमंथनातून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणच्या निसर्ग व संस्कृती यांच्या शाश्वत अस्तित्त्वासाठी कोणती धोरणे अंमलात आणावी, कोणते प्रकल्प हवेत – नकोत याची स्पष्ट दिशा दर्शविणारा कोकण परिषदेचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात प्रदूषणकारी प्रकल्प कोकणात प्रस्तावित न करणे , ग्रीनफिल्ड व शक्तीपीठ महामार्ग रद्द करणे, सिडको व एम एस आर डी सी यांना कोकण किनारपट्टी भागातून नियोजनाचा अधिकार देणारे अध्यादेश रद्द करणे, जंगलतोड बंदी, दोडामार्ग तालुक्याचे संरक्षण, जांभ्याच्या सड्यावरील जैव विविधतेचे संरक्षण, अवैध एल इ डी , परसिनेट मासेमारीवर कृती अशा मागण्यांना धोरणात्मक निर्णयात सामील करण्याचे म्हंटले आहे.प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालय , विद्यापीठ , अंगणवाडी -आशा वर्कर्स  यांना वाढीव अनुदान, कातळशिल्प संरक्षण , बोली भाषेचे जतन, स्वयंरोजगारावर भर, कृषी प्रक्रिया केंद्रे, कोकण रेल्वेचे थांबे वाढवणे आदी मागण्याही करण्यात आल्या आहेत. या जाहीरनाम्यात कोकणी जनतेने अजून भर घालावी अशी अपेक्षा आहेच तरीही हा जाहीरनामा राजकीय पक्ष, उमेदवार, कार्यकर्ते आणि कोकणातील  सर्वच जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा असे आवाहन करण्यात येत आहे. शाश्वत कोकण  परिषदचे समन्वयक सत्यजीत चव्हाण व शशी सोनावणे यांचेद्वारा प्रस्तुतचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे.

उमेदवार, पक्षीय कार्यालयांसमोरील पदाधिकाऱ्यांच्या वाहनांमुळे कल्याण-डोंबिवली शहरे वाहन कोंडीत

कल्याण : कल्याण डोंबिवली शहराच्या विविध भागात विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपली जनसंपर्क, निवडणूक कार्यालये सुरू केली आहेत. अनेक ठिकाणी पक्षीय कार्यालये हीच निवडणूक कार्यालये करण्यात आली आहेत. या कार्यालयांच्या बाहेर दररोज सकाळ, संध्याकाळ पक्षीय नेते, पदाधिकारी सार्वजनिक रस्त्यावरील वाहनांचा विचार न करता कार्यालयासमोरील रस्त्यावर आडवी तिडवी वाहने उभी करत असल्याने शहरातील वाहतूक कोंडीत भर पडली आहे. निवडणूक कार्यालयात आलेल्या नेते, पदाधिकाऱ्याला वाहन बाजुला करून घ्या, असे सांगण्यास जाणाऱ्या वाहतूक पोलिसाला उलटसुलट उत्तरे मिळण्याची शक्यता असल्याने ते आव्हान न स्वीकारता वाहतूक पोलीस, सेवक आहे त्या परिस्थितीत पक्षीय कार्यालयांसमोरील कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. डोंबिवली पूर्वेत सर्वाधिक वर्दळीच्या मानपाडा रस्त्यावर मंगळवारी संध्याकाळी एका पक्षीय कार्यालयात नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक होती. यावेळी बहुतांशी पदाधिकाऱ्यांची वाहने मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर उभी करण्यात आली होती. या वाहनांमुळे बस, ट्रक अशी वाहने त्या भागातून पुढे जाऊ शकत नव्हती. त्यामुळे अर्धा ते एक तास वाहने मानपाडा रस्ता, इंदिरा चौक, फडके रस्ता, रामनगर, टिळक रस्ता, केळकर रस्ता भागात अडकून पडली होती. नोकरदारांची कामावरून घरी परतण्याची वेळ आणि त्याच वेळेत ही कोंडी झाल्याने प्रवासी रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या पदाधिकारी, नेत्यांविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत होते. वरिष्ठ पक्षीय नेत्यांनी नागरिकांना त्रास होणार नाही अशा पध्दतीने पक्षीय कार्यालयापासून दूर अंतरावर किंवा पालिकेच्या, खासगी वाहनतळावर वाहने उभी करून मगच पक्षीय कार्यालयात नेते, पदाधिकाऱ्यांना येण्याच्या सूचना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. अशीच परिस्थिती कल्याणमधील विविध भागात आहे. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील कोंडी झाल्याने ही कोंडी सोडविताना वाहतूक पोलीस, सेवकांची दमछाक झाली होती. पक्षीय नेत्यांना वाहने थोडी बाजुला उभी करा, असे सांगणार कोण, असा प्रश्न वाहतूक पोलिसांना पडला आहे. दिवाळी सणामुळे बाजारपेठा गजबजून जातील. खरेदीसाठी नागरिक अधिक संख्येने बाहेर पडतील. त्याचवेळी निवडणूक बैठकांसाठी नेते, पदाधिकारी आपल्या पक्षीय कार्यालयांमध्ये हजेरी लावणार आहेत. या नेत्यांनी आपली वाहने नागरिकांना त्रास होणार नाहीत अशा पध्दतीने उभी करण्याची नागरिकांची मागणी आहे. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भाग, शिवाजी चौक, सहजानंद चौक, गुरुदेव हाॅटेल चौक भागातील कोंडीने नागरिक हैराण आहेत. 00000  

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे गुरुवारी कल्याण, डोंबिवलीत

कल्याण : शिवसेनेच्या शिंदे गटातील एका प्रभावी गटाने महायुतीच्या कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार सुलभा गायकवाड यांचे काम करण्यास नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वेत महायुतीत बंडाचे वारे वाहत असतानाच, आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुरूवारी सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कल्याणमध्ये येत असल्याने शिवसेनेतील बंडाच्या तयारीत असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना हा सूचक इशारा मानला जात आहे. कल्याण पूर्वेत आपण महायुतीच्या उमेदवार म्हणून सुलभा गायकवाड यांचेच काम करायचे आहे. कोणीही अपक्ष निवडणूक लढवू नये किंवा बंडखोरीचा पवित्रा घेऊ नये, अशी तंबी शिवसेनेच्या वरिष्ठांनी स्थानिकांना दिल्याचे समजते. या तंबीनंतर बंडाच्या पवित्र्यातील काही जण शांत तर काही जण अद्याप अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी करत आहेत. सुलभा गायकवाड यांचे काम न करण्याची भूमिका शिवसेनेतील कल्याण पूर्वेतील काही माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. या पदाधिकाऱ्यांना सुलभा गायकवाड याच महायुतीच्या उमेदवार असतील आणि मोठ्या मताधिक्याने त्या निवडून येतील, असा सूचक इशारा देण्याच्या व्यूहनितीचा भाग म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण पूर्वेत येण्याचा निर्णय घेतला आहे. सुलभा गायकवाड गुरुवारी महायुतीच्या उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरतील. यावेळी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रिपब्लिकन, इतर घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी यावेळी उपस्थित असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. महायुतीचा जनसागर गुरूवारी सुलभा गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज भरताना लोटलेला असेल. तुल्यबळ असा उमेदवार समोर नसल्याने त्यांचा विजय नक्की होईल, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. पती आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्व भागात केलेली विकास कामे. आपण येत्या काळात करणारी विकास कामे हा अजेंडा लोकांसमोर ठेऊन आपण या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असे महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांनी सांगितले. राज ठाकरे डोंबिवलीत मनसेचे कल्याण ग्रामीणचे उमेदवार प्रमोद उर्फ राजू पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान डोंबिवलीत येणार आहेत. मानपाडा चौक येथून उमेदवार राजू पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या मिरवणुकीला सुरूवात होईल. ही मिरवणुक वाजत गाजत डोंबिवली एमआयडीसीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुल येथे जाणार आहे. राज ठाकरे यांनी स्वताहून आपण राजू पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येण्याची घोषणा केली आहे. यानिमित्ताने मनसेतर्फे शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.