Category: मुंबई

Mumbai news

‘शिवतिर्था’वरून ठाकरेंची महाराष्ट्राला साद आता चुकलात तर कायमचे संपलात…

स्वाती घोसाळकर मुंबई : मराठी मनाचा हुंकार म्हणून ओळख असणाऱ्या शिवाजीपार्कवर म्हणजेच शिवतिर्थावरून आज तब्बल २० वर्षांनी उद्धव ठाकरें आणि राज ठाकरे यां ठाकरें बंधूनी अवघ्या महाराष्ट्राला साद घातलीय. आता चुकलात तर…

अमर हिंद मैदानावर ‘खो-खो’चा महायज्ञ

अमर हिंद मैदानावर ‘खो-खो’चा महायज्ञ थरार, चपळाई आणि इतिहासनिर्मितीचा संगम! मुलींच्या गटात रा. फ. नाईकची सरशी, मुलांच्या गटात ज्ञानविकास विद्यालयाची ऐतिहासिक बाजी मुंबई . दादरच्या अमर हिंद मातीत च्या उसळले खो-खोचे रण. धुळीचे लोट उडवत, श्वास रोखून धरायला लावणाऱ्या पकडी, सेकंदाच्या फरकाने दिलेल्या हुलकावण्या आणि प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढवणारा खेळ दादरच्या ऐतिहासिक अमर हिंद मंडळाच्या मैदानावर आंतरशालेय खो-खो स्पर्धेने अक्षरशः क्रीडाप्रेमींना वेड लावले! कै. उमेश शेणॉय यांच्या स्मरणार्थ आयोजित या स्पर्धेत मुंबई, उपनगर व ठाण्यातील २७ शाळांनी सहभाग नोंदवत खो-खोची परंपरा, वेग आणि डावपेच यांचा अप्रतिम संगम सादर केला. प्रत्येक सामना म्हणजे जिद्दीची चाचणी आणि कौशल्याची कसोटी ठरली. उद्घाटनाचा मंगल शंखनाद. प्रेरणेची स्फूर्ती स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन अमर हिंद मंडळाचे माजी राज्यस्तरीय व विद्यापीठीय खेळाडू तसेच सध्या ॲक्सिस बँकेत कार्यरत असलेले अमित चिखलकर यांच्या हस्ते झाले. त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी खेळाडूंमध्ये नवी ऊर्जा संचारली. स्पर्धेत १२ मुलींचे व १५ मुलांचे संघ विजयाच्या ध्यासाने मैदानात उतरले. मुलींचा अंतिम रणसंग्राम , रा. फ. नाईकचे वर्चस्व मुलींच्या अंतिम सामन्यात रा. फ. नाईक विद्यालय, कोपरखैरणे विरुद्ध ज्ञानविकास विद्यालय, ठाणे यांच्यात चुरशीची लढत झाली. रा. फ. नाईकने ९–५ असा १ डाव राखून ४ गुणांनी दणदणीत विजय मिळवला. श्रुती चोरमारे (४ मि. संरक्षण व ३ गुण) वैष्णवी जाधव (४ मि. संरक्षण व ३ गुण), प्रणिती जगदाळे (२.३० मि. संरक्षण १ गुण) अशी सलग व ठोस कामगिरी नोंदली. पराभूत ज्ञानविकासकडून समृद्धी कदम (१.३० मि. संरक्षण व १ गुण), प्रांजल पाटे (१.३० मि. संरक्षण व १ गुण), श्रावणी मोरे (१.३० मि. संरक्षण व २ गुण) यांनी झुंज दिली; मात्र रा. फ. नाईकच्या आक्रमणापुढे त्यांचा निभाव लागला नाही. मुलांचा थरार . ज्ञानविकासची ‘किंगमेकर’ बाजी मुलांच्या अंतिम सामन्यात ज्ञानविकास विद्यालय, ठाणे संघाने महात्मा गांधी विद्यामंदिर, वांद्रे संघावर १०–७ असा १ डाव राखून ३ गुणांनी विजय मिळवला. ज्ञानविकासच्या साहिल शिंदे (२.२० मि. संरक्षण व २ गुण), विनायक भणगे (३.५० मि. संरक्षण व १ गुण), साईराज बैकर (२.१० मि. संरक्षण व २ गुण), सार्थक वांगडे (३.५० मि. संरक्षण व १ गुण) अशी निर्णायक कामगिरी नोंदवली. तर पराभूत महात्मा गांधी विद्यामंदिरच्या तन्मय पूजारे (१ मि. संरक्षण व २ गुण), बाळकृष्ण हरळे (१.४० व १.१० मि. संरक्षण), संदेश गोमणी (१.३० मि. संरक्षण व १ गुण) यांनी दिलेला लढा कौतुकास्पद ठरला. सन्मानाचा क्षण . विजेत्यांचा गौरव…

डंपरच्या धडकेत मुलुंड रहिवाशाचा मृत्यू

डंपरच्या धडकेत मुलुंड रहिवाशाचा मृत्यू आमदार मिहिर कोटेचा यांची बीएमसीच्या उपमुख्य अभियंता नवनाथ घाडगे यांच्या निलंबनाची मागणी मुंबई: मुलुंडमध्ये डंपरच्या धडकेत एका रहिवाशाचा मृत्यू झाल्यानंतर भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी…

मराठा समाजाचा वधु-वर  मेळावा

मराठा समाजाचा वधु-वर  मेळावा आज सानपाडा येथे करण्यात आले आहे आयोजन मुंबई, दि. (प्रतिनिधी ) : नवी मुंबईत सानपाडा येथे मराठा विकास प्रतिष्ठानच्या वतीने   १०  जानेवारी  २०२६ रोजी  दुपारी २ ते  सायंकाळी ७ या दरम्यान केमिस्ट भवन, सेक्टर ८,  सानपाडा, नवी मुंबई येथे  १६ वा मराठा समाज वधू-वर परिचय मेळावा आयोजित  करण्यात आला आहे.  मराठा विकास प्रतिष्ठान  ही संस्था २००६  पासून सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात गेली २०  वर्षे सातत्याने कार्यरत आहे. सध्याच्या काळात समाजामध्ये विवाहासाठी योग्य वधू-वर जुळवणे ही एक गंभीर सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. ही गरज लक्षात घेऊन संस्थेमार्फत वधू-वर सूचक केंद्र चालविले जाते. या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक विवाह जुळविण्यात  संस्थेला यश आले आहे, अशी माहिती मारुती विश्वासराव यांनी दिली.

कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी मुंबईत रंगणार

कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी मुंबईत रंगणार महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने  २९ व ३० जानेवारी २०२६ रोजी ३ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी २०२५-२०२६ चे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. श्री हालारी ओसवाल समाज, दादासाहेब फाळके रोड, रणजीत स्टुडिओ समोर, दादर (पूर्व ), मुंबई – ४०००१४ येथील भव्य वातानुकूलित हॉलमध्ये हि स्पर्धा रंगणार आहे. पुरुष आणि महिला खेळाडूंसाठी खुला गट ठेवण्यात आला असून स्पर्धेतील विजेत्यांना तब्बल ८ लाखांची रोख पारितोषिके जाहिर करण्यात आली आहेत. विजेत्याला रोख रुपये १ लाख पन्नास हजार, उपविजेत्याला रोख रुपये १ लाख व चषक, तिसऱ्या क्रमांकासाठी ७५ हजार व चषक, चौथ्या क्रमांकासाठी ५० हजार शिवाय उपउपांत्य फेरीसाठी प्रत्येकी २५ हजार, उपउपांत्य पूर्व फेरीसाठी प्रत्येकी १० हजार व उपउपांत्यपूर्व फेरी अगोदरच्या फेरीत हरणाऱ्या खेळाडूस प्रत्येकी रुपये ५ हजारांचे ईनाम जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेच्या पहिल्या फेरीपासून व्हाईट स्लॅम व ब्लॅक स्लॅम करणाऱ्या खेळाडूस रोख रुपये १ हजारांचे बक्षीस तर उपउपांत्य फेरीपासून हे बक्षीस रुपये २ हजार ठेवण्यात आले. आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या महिला खेळाडूंना विशेष उत्तेजन देण्यासाठी सामना खेळून दुसऱ्या फेरीत प्रवेश करणाऱ्या महिलेस रोख रुपये १ हजार, तिसऱ्या फेरीत प्रवेश करणाऱ्या महिलेस रोख रुपये २ हजार, चौथ्या फेरीत प्रवेश करणाऱ्या महिलेस ४ हजार, पांचव्या फेरीत प्रवेश करणाऱ्या महिलेस रुपये ८ हजार तर सहाव्या फेरीत प्रवेश करणाऱ्या महिलेस रोख रुपये १५ हजारांचे अतिरिक्त ईनाम जाहिर करण्यात आले आहे. सिस्का कंपनीच्या शुअर स्लॅम कॅरम बोर्ड व बुलेट शॉट सोंगट्या वर हे सामने खेळविण्यात येणार आहेत. गेली दोन वर्षे या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे या स्पर्धेला वाढता प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंना महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने गणवेश देण्यात येणार असून खेळाडूंच्या चहा-नाश्ता व दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. स्पर्धा जरी सर्वांसाठी खुली असली तरीही स्पर्धेत मर्यादित खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार असून भाग घेणाऱ्या राज्यातील इच्छुक खेळाडूंनी आपल्या जिल्हा संघटनेमार्फत आपली नावे नोंदवावीत असे आवाहन करण्यात येत आहे. या स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिशनच्या www.maharashtrcarromassociation.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. नावे नोंदविण्यासाठी खेळाडूंनी दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ ते ८ दरम्यान महाराष्ट्र कॅरम असोसिएशन. पारेख महल बिल्डिंग, सखाराम कीर मार्ग, आश्रय हॉटेलच्या मागे, राजा राणी  चौकजवळ, शिवाजी पार्क, दादर येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९९८७०४५४२९ वर संपर्क साधावा.

 महिला लीगच्या उद्घाटनीय सामन्यास ७५० शिक्षकांची  उपस्थिती

महिला लीगच्या उद्घाटनीय सामन्यास ७५० शिक्षकांची  उपस्थिती डॉ विशाल कडणे यांच्या माध्यमातून क्रीडा प्रेमी शिक्षकांसाठी ७५० तिकिटांची मोफत भेट मुंबई : मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ आणि मंडळाचे प्रमुख डॉ. विशाल कडणे यांच्या पुढाकाराने खरेदी केलेल्या तिकिटामधून, मुंबईतील क्रिकेटप्रेमी शिक्षकांसाठी महिला प्रीमिअर लीग २०२६ मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या बहुचर्चित उद्घाटन सामन्याची मोफत तिकिटे देण्यासाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्यमातून निवड झालेल्या ७५० क्रीडा प्रेमी शिक्षकांना सदर सामन्यास मोफत उपस्थिती लावण्याचे भाग्य प्राप्त होणार आहे या उपक्रमास मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमित साटम यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे शिक्षकांसाठी हा अनोखा क्रीडा अनुभव साकारता आला.  लकी ड्रॉचा निकाल ५ जानेवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला होता, निवड झालेल्या ७५० भाग्यवान शिक्षकांना कळविण्यात आले आहे. या ५७ व्या उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक किरण शेलार व आचार्य पवन त्रिपाठी यांनीही शिक्षकांच्या सहभागाला प्रोत्साहन दिले. विजेत्या शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, मंडळाच्या वतीने अशा प्रेरणादायी उपक्रमांची परंपरा पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

 काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेशचंद्र राजहंस यांची प्रचारात आघाडी

काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेशचंद्र राजहंस यांची प्रचारात आघाडी विजयी झाल्यास वार्डातील विकास कामे करण्याचे सुरेशचंद्र राजहंस यांचे आश्वासन मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात रंगत आली असून काँग्रेस पक्षाने प्रचारात आघाडी…

घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना मुंबईकरांच्या खऱ्या व्यथा कधीच समजणार नाहीत – एकनाथ शिंदे

घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना मुंबईकरांच्या खऱ्या व्यथा कधीच समजणार नाहीत – एकनाथ शिंदे अनिल ठाणेकर मुंबई, बाहेरून आलेल्यांना मुंबई कळणार नाही, अशी ओरड काहीजण करत आहेत मात्र घरात बसून…

महाराष्ट्राचे ‘डेथ वॉरंट’ काढलंय राज ठाकरेंचा भाजपावर घणाघात

महाराष्ट्राचे ‘डेथ वॉरंट’ काढलंय राज ठाकरेंचा भाजपावर घणाघात मुंबई : भाजपाकडून महाराष्ट्राचे डेथ वॉरंट काढण्यात आले आहे. मराठी माणसाच्या सहीनं मराठी माणसाचं डेथ वॉरंट काढलं जातंय, असा घणाघाती आरोप राज ठाकरे यांनी भाजपावर केलाय. ‘दैनिक सामना‘साठी…

डॉ. माधव गाडगीळ पर्यावरणात विलीन पर्यावरणासाठी झटणारा शास्त्रज्ञ हरपला

डॉ. माधव गाडगीळ पर्यावरणात विलीन पर्यावरणासाठी झटणारा शास्त्रज्ञ हरपला मुंबई : भारताचे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ, पश्चिम घाट तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष, नामवंत विचारवंत आणि निसर्गप्रेमी डॉ. माधव गाडगीळ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या…