Category: मुंबई

Mumbai news

एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी संप आता मागे घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा काढण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या संदर्भात बुधवारी संध्याकाळी सात वाजता सह्याद्री अतिथीगृहावर…

मदर तेरेसा फाउंडेशनची नशा मुक्ती जनजागृती

 रमेश औताडे   मुंबई : शिक्षण, सदभावना आणि राष्ट्रप्रेम विकसित करण्यासाठी मदर तेरेसा फाउंडेशन चे देशभर कार्य सुरू आहे. समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी आत्तापर्यंत फाउंडेशन ने ४२ ” नशा मुक्ती केंद्र ”  सुरू केली आहेत व अजून त्यांची संख्या वाढत असून त्यामार्फत जनजागृती करण्यात येत आहे. अशी माहिती फाउंडेशन चे राष्ट्रीय संयोजक व माजी आमदार समाजवादी पार्टी चे राष्ट्रीय सचिव मोहम्मद अरशद खान मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. फाउंडेशनच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा उपासना वैश्य यांनी सांगितले की, महिला सक्षमीकरण कार्यशाळा व कुटुंब सल्ला केंद्र फाउंडेशन ने सुरू केले आहे. तर प्रदेश अध्यक्ष अल्ताफ सनाउल्लाह अंसारी म्हणाले, तरुण वर्गात उद्योग व्यवसाय वाढावा यासाठीही फाउंडेशन कार्य करत आहे. राष्ट्रीय मानवाधिकार व न्याय प्राधिकरण चे अध्यक्ष अहमद कुरैशी हे न्याय दान विभागाच्या माध्यमातून कायदेविषयक मार्गदर्शन करत आहेत. यावेळी काशिराम विचार मंचचे प्रदेश अध्यक्ष रहमतुल्लाह खान, अब्दुल रहमान तारिक उपस्थित होते. 00000

हेराल्ड ग्लोबल या जागतिक संस्थेद्वारे खासदार अरविंद सावंत यांना ‘प्राइड ऑफ इंडिया – आयकॉन २०२४’ पुरस्कार

राजेंद्र साळसकर   मुंबई : हेराल्ड ग्लोबल आणि  ईआरटीसी मीडिया द्वारे “प्राइड ऑफ इंडिया – आयकॉन २०२४” हा पुरस्कार भारताच्या अभिमानाला मूर्त रूप देणाऱ्या प्रतिष्ठित नेत्यांचा सन्मान करण्यासाठी देण्यात येतो. देशास अभिमानास्पद कामगिरी, कर्तव्याप्रति वचनबद्धता, दूरदर्शी नेतृत्व, महत्त्वपूर्ण योगदान, भारताच्या समृद्ध वारसाचे प्रतिबिंब आणि अर्थव्यवस्थेवरील परिवर्तनात्मक प्रभाव अशा विविध बाबींची दखल घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार अरविंद सावंत यांना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आयटीसी मराठा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ‘गोलफेस्ट कॉन्क्लेव्ह २०२४’ या भव्य सोहळ्यामध्ये खासदार अरविंद सावंत यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर सोहळ्यास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर अध्यक्ष श्री. ललित गांधी, बॉम्बे बार असोसिएशन अध्यक्ष श्री. नितीन ठक्कर यांनाही सन्मानित करण्यात आले. यावेळी चित्रपट , उद्योग ,संगीत क्षेत्रातील  यशस्वी,प्रतिभावंतांचा  सत्कार करण्यात आला .हेराल्ड ग्लोबल चे  मुख्य संपादक सैमिक सेन यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .यावेळी ईआरटीसी मीडियाचे प्रतिनिधी, समाजातील विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावणारे गुणवंत उपस्थित होते. हेराल्ड ग्लोबल संस्थेने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतास थायलंड, दुबई, मलेशिया, सिंगापूर, लंडन आदी देशांत अनेक यशस्वी कार्यक्रम यापूर्वी केले आहेत. आज संपन्न झालेल्या सोहळ्यात भारतातील यशस्वी ब्रँड्स आणि विविध क्षेत्रातील यशस्वी नेत्यांची ओळख करून देणार्‍या कॉफी टेबल बुकच्या 16 व्या आवृत्तीचे प्रकाशन देखील याप्रसंगी करण्यात आले. ०००००

‘किड्स स्पोर्ट्स कार्निवल’ बोरीवलीत उत्साहात संपन्न

मुंबई : प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशन आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘किड्स स्पोर्ट्स कार्निवल’ या आगळ्यावेगळ्या   आंतरशालेय उपक्रमाला  विद्यार्थी व पालकांचा छान प्रतिसाद मिळाला. सुविद्या स्पोर्ट्स अकॅडमी गोराई, बोरीवली…

गणेशोत्सवात यंत्रणांनी सजग राहावे

पालिका आयुक्तांचे संबंधितांना आदेश   मुंबई : गणेशोत्सवकाळात सार्वजनिक स्वच्छता आणि सुस्थितीतील रस्ते या दोन्ही बाबींवर सर्वाधिक प्राधान्याने लक्ष द्यावे. उत्सव कालावधीत महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी व कामगारांनी अधिक कार्यतप्तर आणि सजग रहावे. भाविक, नागरिकांना कोणतीही असुविधा होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी संबंधितांना दिले. गणेशमूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य कलशाची व्यवस्था, वैद्यकीय चमू, जीवरक्षकांची नेमणूक, सार्वजनिक स्वच्छता याकडेही यंत्रणांनी लक्ष द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली. यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरी सेवा – सुविधांबाबतच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भूषण गगराणी यांनी मंगळवारी जुहू चौपाटी आणि वेसावे चौपाटी आदी ठिकाणी पाहणी केली. गणेशोत्सवानिमित्त विविध स्तरावर पूर्वतयारी करण्यात आली आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, स्वच्छता, विसर्जन मार्गावरील वृक्षछाटणी आदी कामे हाती घेण्यात आली आहेत, असे गगराणी यांनी सांगितले. दरम्यान, महापालिकेने धोकादायक पुलांची नावे यापूर्वी जाहीर केली आहेत. त्या ठिकाणी पोलिसांबरोबर समन्वय साधून रहदारी सुरळीत ठेवावी. मुख्य रस्त्यांसह लहान रस्ते, गल्ली बोळ, झोपडपट्टी आणि तत्सम वस्ती आदी ठिकाणी स्वच्छता ठेऊन कचरा संकलन आणि वाहतूक फेऱ्यांची वारंवारता वाढवावी, असे आदेश गगराणी यांनी अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, कृत्रिम तलाव, वाहन आधारित फिरते कृत्रिम तलाव, निर्माल्य वाहक फिरते वाहन, विसर्जन स्थळावरील कार्यरत स्वयंसेवक, पेयजल, प्रसाधनगृह, वाहनतळ, जर्मन तराफे, निर्माल्य कलश आदींचा गगराणी यांनी आढावा घेऊन पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी केले चैत्यभूमीवर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन

अशोक गायकवाड   मुंबई :राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांचे मंगळवारी मुंबईत आगमन झाल्यानंतर त्यांनी चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, भीमराव आंबेडकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे आदी उपस्थित होते. 000

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते विधान परिषदेतील २०१८-१९ मधील उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे सन्मानित करण्यात आले. या वेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,…

‘संविधान जागर यात्रा’ ६ सप्टेंबरला मुंबईत दाखल

रमेश औताडे   मुंबई :संविधान जागर समिती महाराष्ट्र आयोजित ” संविधान जागर यात्रा ” ९ ऑगस्ट २०२४ रोजी सत्याग्रह भूमी चवदार तळे महाड येथे भारतरत्न संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तसेच रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून क्रांती दिनाच्या दिवशी सुरुवात करण्यात आली होती. ती संविधान जागर यात्रा ६ सप्टेंबर ला मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती संविधान जागर समितीचे  संयोजक नितिनभाऊ मोरे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. संविधान जागर यात्रा आजपर्यंत महाड, रायगड, खेड. रत्नागिरी, पतीत पावन मंदिर, सिंधुदुर्ग, कणकवली, कोल्हापूर शाहू समाधी दर्शन, हातकणंगले, सांगली पेठ नाका. सातारा, पिंपरी चिंचवड, पुणे कॅन्टोन्मेंट, महात्मा फुले वाडा, वस्ताद लहुजी साळवे समाधी, अहमदनगर, माळशिरस, सोलापूर, तुळजापूर, उमरगा, लातूर, उदगीर, देगलूर, नांदेड, हिंगोली, परभणी, केज, बीड, संभाजीनगर, बदनापूर, जालना, चिखली, मेहकर, वाशिम, उमरखेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अर्जुनी मोरगाव, गोंदिया, भंडारा, उमरेड, दीक्षाभूमी, नागपूर, वर्धा, अमरावती, दर्यापूर, मुर्तीजापुर, अकोला, भुसावळ या जिल्ह्यामध्ये प्रवास करत सभा बैठका घेत जळगाव मध्ये दखल झाली. जळगाव वरून धुळे नाशिक कल्याण अंबरनाथ उल्हासनगर ठाणे करत संविधान जागर यात्रा ६ सप्टेंबर रोजी सहा हजार किलोमीटर चा प्रवास करून मुंबईत दाखल होणार आहे. संविधानाबद्दल निर्माण झालेला गैरसमज दूर करण्याच्या दृष्टिकोनातून यात्रा जवळ जवळ यशस्वी झाली आहे असे मोरे यांनी सांगितले. समारोप साठी केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू व केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 0000

श्री समर्थ व्यायाम मंदिराचे अॅथलेट चमकले

मुंबई :  मुंबई शहर जिल्हा जूनियरआणि २३ वर्षांखालील वार्षिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२४ या स्पर्धेत दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिराच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. त्यांच्या खेळाडूंनी ४ सुवर्ण, २ रौप्य, १ कांस्य…

म्हाडाच्या ७९१ घरांवर बिल्डरांचा दरोडा

नवी मुंबईत फ्लॅट घोटाळा हस्तांतर न करता घरे हडपली महापालिका अधिकाऱ्यांशी संगनमत मुंबई : नवी मुंबईमध्ये म्हाडाच्या तब्बल ७९१ घरांवर बिल्डरांनी दरोडा टाकला आहे. सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून ही घरे म्हाडाला हस्तांतरीत…