Category: मुंबई

Mumbai news

 ठाकरे गट, ‘अभाविप’विरोधात अपक्षांची एकजूट

 मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक : मुंबई : मुंबई विद्यापीठाची नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक जिंकण्यासाठी विद्यार्थी संघटनांनी मतांची जुळवाजुळव आणि मोर्चेबांधणीने वेग घेतला आहे. एकूण २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असून युवासेना (ठाकरे गट) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचाद्वारे सर्व १० जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे युवा सेना (ठाकरे गट) आणि अभाविप यांना टक्कर देण्यासाठी छात्रभारती, बहुजन विकास आघाडी (वसई) आणि इतर अपक्षांनी वेगळे एक ‘पॅनल’ करण्याची जुळवाजुळव सुरू केली आहे. नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक ही एकूण १० जागांसाठी २२ सप्टेंबर रोजी होणार आहे. २५ सप्टेंबर रोजी फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. एकूण २८ उमेदवारांपैकी प्रत्येकी १० उमेदवार हे युवा सेना (ठाकरे गट) आणि अभाविप या संघटनांचे आहेत. बहुजन विकास आघाडीचे (वसई) ४, छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे १, मनसेचे १ राज्य सचिव आणि २ जणांनी वैयक्तिकरित्या अर्ज दाखल केला आहे. या दोन्ही संघटनांना टक्कर देण्यासाठी छात्र भारती, बहुजन विकास आघाडी आणि उर्वरित अपक्षांनी कंबर कसलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि युवा सेनेच्या शिंदे गटाकडून एकाही जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे या दोन संघटना नेमका कोणाला पाठिंबा देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘अधिसभा निवडणुकीत पसंतीक्रमाला महत्त्व असते. त्यामुळे सर्व अपक्षांना एकत्र करून एक नवीन ‘पॅनल’ तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत’, असे छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे राज्य अध्यक्ष रोहित ढाले यांनी सांगितले. बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी सनील मोसेकर म्हणाले, ‘छात्र भारती आणि बहुजन विकास आघाडी यांची युती जवळपास निश्चित असून अपक्षांना सोबत घेऊन एक पॅनल तयार करू.’ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सचिव सुधाकर तांबोळी म्हणाले की, ‘अधिसभा निवडणुकीसाठी संपूर्ण तयारी केली आहे आणि सर्व पर्याय खुले आहेत’. ठाकरे गटाच्या युवा सेनेचा प्रचार प्रारंभ; वचननामा प्रसिद्ध ठाकरे गटाच्या युवा सेनेने अधिसभा निवडणुकीत २०१० साली १० पैकी ८ आणि २०१८ साली सर्व १० जागा जिंकल्या होत्या. यंदाही युवा सेनेने सर्व १० जागांवर उमेदवार उभे केले आहेत. युवा सेनेने अधिसभा निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते कार्य अहवाल आणि वचननामाचे प्रकाशन करून प्रचाराला सुरुवात केली.

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

नवी मुंबई : अवजारे व साधने यांचा वापर करुन तसेच हातांनी काम करणाऱ्या पारंपारिक कारागीर आणि हस्तकलेतील लोकांना ओळख प्राप्त करुन देण्यासाठी आणि त्यांना सर्वांगीण आधार देऊन त्यांचा विकास करण्यासाठी…

गणेशोत्सवात काळात अवजड वाहने बंद करण्याची एआयएमआयएमची मागणी

नवी मुंबई : मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीला खोळंबा नको म्हणून गेली अनेक वर्षे गणेशोत्सवादरम्यान अवजड वाहतूक बंद करण्यात येत होती. मात्र यावर्षी गणेशोत्सव दोन दिवसांवर येवून ठेपला असतानाही अवजड वाहतूक…

मुंबईतील मिठागरांची १५०० एकर जमीन अदानीला देण्याचा भाजपा युती सरकारचा कुटील डाव –  वर्षा गायकवाड

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून मोदानी सरकार पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील मिठागरांच्या जमिनी फक्त मोदानी आणि कंपनीच्या फायद्यासाठी देत आहे. कांजूरमार्ग येथील २५६ एकर जमीनच नाही तर मुंबईतील  मिठागराच्या सर्व जमिनी सरकार…

श्री गणेश आखाड्याच्या कुस्तीपटूंचे यश

मुंबई : श्री गणेश आखाड्यामध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तथा जिल्हा क्रीडा परिषद ठाणे व मिरा भाईंदर महानगर पालिका आयोजित २०२४-२५ च्या जिल्हा स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत…

दोन आपटे, दोघेही फरार

हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे ‘बेटा पढाओ, बेटी बचाओ‘ शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अहवालासाठी राज्यस्तीरीय समिती स्वाती घोसाळकर मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या घटना लपवल्याप्रकरणी आरोप ठेवण्यात आलेले शाळेचे सचिव तुषार आपटे आणि मालवणमधिल राजकोट किल्यावरील शिवछत्रपतींचा कोसळलेल्या पुतळ्याचे शिल्पकार…

महाराष्ट्राची विकासयात्रा वेगाने पुढे जात राहील – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मुंबई : महिलांच्या सहभागा शिवाय कोणतेही राष्ट्र, राज्य गतीमान प्रगती करु शकत नाही, या पार्श्वभूमीवर  महाराष्ट्र महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवत आहे, ही अभिनंदनीय बाब आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी)  महाराष्ट्राचं देशात  पहिलं…

गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा घ्या- पटोले

मुंबई : महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस फेल झाले आहेत तर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला  बदलापूर घटनेतील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. बदलापूर…

अदानींकडून शिवपुतळ्याची विटंबना; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

मुंबई : मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जागा नाही. त्यामुळं तो जवळजवळ गोडाऊनमध्ये ठेवण्यात आला आहे. त्या पुतळ्याचा जिरेटोप तुटलेला आहे, या मुंबईत, महाराष्ट्राच्या राजधानीत शिवपुतळ्याची विटंबना, भाजपच्या लाडक्या उद्योगपती अदानीकडून आणि कंत्राटदाराकडून होत असल्याचा आरोप…

एसटी कर्मचाऱ्यांचा संप

मुंबई : एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने आज संप पुकारण्यात आला आहे. प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने आजपासून (३ सप्टेंबर) बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता, त्यानुसार राज्यातील विविध आगारांमध्ये कामबंद…