Category: मुंबई

Mumbai news

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी अनिल ठाणेकर मुंबई : मुंबई विभागीय केंद्रांतर्गत मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड भागातील विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे!!! माननीय कुलगुरू महोदयांच्या आदेशानुसार ८ फेब्रुवारीला श्री बापूसाहेब विसपुते बी.एड. कॉलेज, पनवेल येथेयुवा शक्ती फाउंडेशन आणि श्री डी. डी. विसपुते कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी वरील लिंकवर आपली नोंदणी करून या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे व उत्कृष्ट रोजगाराची संधी मिळवावी, असे आवाहन मुंबई विभागीय केंद्राचे विभागीय संचालक डॉ. वामन नाखले यांनी केले आहे.सर्व केंद्रप्रतिनिधींना विनंती करण्यात येते की, कृपया ही माहिती सर्वत्र पोहोचवावी. या रोजगार मेळाव्यास केवळ मुक्त विद्यापीठाचेच नव्हे, तर इतर विद्यापीठांतील विद्यार्थीही नोंदणी करू शकतात.जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या रोजगार मेळाव्यास नोंदणी करावी, असे आवाहन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक(YCMOU) तर्फे करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी ९७०७९६५७४२,८८७९33८८33

 ‘भारतोत्सव – द सोल ऑफ इंडिया’त शौर्याला नतमस्तक अभिवादन

‘भारतोत्सव – द सोल ऑफ इंडिया’त शौर्याला नतमस्तक अभिवादन पराक्रम दिनाला प्रचंड प्रतिसाद मुंबई, दि. (प्रतिनिधी) “स्वातंत्र्य मागून मिळत नाही… ते हिसकावून घ्यावे लागते!” या तेजस्वी विचारांचे मूर्त रूप असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या पराक्रम दिनी, भारतीय शौर्य, त्याग आणि बलिदानाचा जिवंत इतिहास अनुभवायला मिळाला तो ‘भारतोत्सव – द सोल ऑफ इंडिया’ या भव्य, भावनांनी ओथंबलेल्या कार्यक्रमातून. प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशन व नृतनाट्य प्रॉडक्शन्स यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीवली पश्चिम येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात साकारलेला हा ध्वजांकित उपक्रम म्हणजे केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नव्हता तर तो होता सीमेवर लढणाऱ्या प्रत्येक जवानाच्या श्वासाचा, त्यागाच्या प्रत्येक थेंबाचा आणि मातृभूमीसाठी धडधडणाऱ्या प्रत्येक हृदयाचा जयघोष! या राष्ट्रभक्तीने भारलेल्या संध्याकाळी शौर्यचक्र विजेते सेवानिवृत्त हवालदार मधुसूदन सुर्वे (२१ पॅरा एस.एफ.) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रणांगणावर प्राणांची पर्वा न करता देशासाठी उभे राहणाऱ्या या वीराच्या उपस्थितीने संपूर्ण सभागृह भारावून गेले. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून लाभलेल्या ‘ऑक्सिजन लेडी’ सुमेधा ताई चिथडे यांच्या कार्यकथनाने प्रत्येकाच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. सियाचेनसारख्या दुर्गम प्रदेशात सैनिकांसाठी उभारलेल्या ऑक्सिजन प्रकल्पांमागची त्यांची निःस्वार्थ भावना म्हणजे आधुनिक भारतातील देशसेवेचा तेजस्वी अध्याय ठरला.यावेळी सेवानिवृत्त लष्करी अधिकारी ओंकार मुळ्ये, भारतीय हवाई दलाचे सेवानिवृत्त ज्युनियर वॉरंट ऑफिसर नारायण वाडकर, तसेच राष्ट्रपती शौर्य पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त उपनिरीक्षक  मंगेश नाईक यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला गौरवाची झळाळी दिली. या सन्मानसोहळ्याला सांस्कृतिक अभिव्यक्तीची भावस्पर्शी जोड देताना युवकांनी सादर केलेल्या पारंपारिक नृत्य-संगीत सादरीकरणांनी भारताचा आत्मा प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर उभा केला. प्रत्येक ताल, प्रत्येक सूर आणि प्रत्येक भावात “जय हिंद” गुंजत होते. याच मंचावर ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटाचे दिग्दर्शक  विजय कलमकर तसेच ज्येष्ठ मॅरेथॉन धावपटू व सुवर्णपदक विजेते  महादेव समजीस्कर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या गौरवशाली पराक्रम दिन सोहळ्याला पितांबरी प्रॉडक्ट्स व इंडियन ऑइल यांचे मोलाचे प्रायोजन लाभले, तर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि., सुनील दळवी एमएफ इन्व्हेस्टमेंट्स, जाधव फूड्स, अद्वैता वास्तु, बीऑ.न स्टोअर, रुचिसूत्र यांनी सहप्रायोजक म्हणून भक्कम साथ दिली.  ‘भारतोत्सव – द सोल ऑफ इंडिया’ हा कार्यक्रम म्हणजे एक संकल्प — देशासाठी जगण्याचा, एक श्रद्धांजली बलिदानाला आणि एक जागरण, प्रत्येक भारतीयाच्या मनातील पराक्रमाला!

महाराष्ट्र पोस्ट, पश्चिम रेल्वे आणि ओम साईश्वर सेवा मंडळाची विजयी गर्जना!

विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित ६२ वी खो-खो स्पर्धा – महाराष्ट्र पोस्ट, पश्चिम रेल्वे आणि ओम साईश्वर सेवा मंडळाची विजयी गर्जना! पुरुष व्यवसायिक विभागात मध्य रेल्वे वि. रचना नोटरी व पश्चिम…

 बाळासाहेबांना जन्मशताब्दीनिमित्त स्वरपंखचा अनोखा नजराणा                                         

श्रीकांत ठाकरे आणि महंमद रफी यांच्या गाण्यांनी दिव्यांग गायकांची हिंदुहृदयसम्राट यांना मानवंदना बाळासाहेबांना जन्मशताब्दीनिमित्त स्वरपंखचा अनोखा नजराणा मुंबई, दि. (प्रतिनिधी) : बोरीवली पश्चिम येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात स्वररंग प्रतिष्ठान आयोजित स्वरपंख या संपूर्ण दिव्यांग बांधवांच्या वाद्यवृंदाने मराठी गाणी आणि लावण्यांच्या खुमासदार सादरीकरणाने अतीशय कमाल केली. रंगमंचावरील कुणी प्रज्ञा चक्षु तर कुणाचे हात, कुणाचे पाय नाहीत परंतु केवळ जगण्याची जिद्द नाही तर सूर, स्वर, संगीत, वाद्य अशा कशातही आम्ही कमी नाही किंबहुना धडधाकट कलाकारांपेक्षा आम्ही काकणभर सरस ठरु, अशा प्रकारे सभागृहात आपापल्या अदाकारीने दाखवून दिले. एका बाजूला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष सुरु होत असतांना बाळासाहेब ठाकरे यांचे त्यांच्या पाठीशी सावलीसारखे उभे राहणारे बंधूराज ज्येष्ठ संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि केवळ श्रीकांतजींसाठीच मराठी गाणी गाणाऱ्या महंमद रफी यांच्या आवाजाची जादू दिव्यांग गायकांनी रसिक प्रेक्षकांसमोर सादर केली आणि एका अर्थाने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्वररंग प्रतिष्ठान आयोजित स्वरपंखचा अनोखा नजराणा पेश केला. बिपिन वर्तक, मकरंद भोसले, विनोद गावंडे, सुधीर पालांडे, सारिका शिंदे, श्रद्धा घुगे या गायक कलाकारांनी विविध प्रकारच्या गाण्यांनी उपस्थित रसिक प्रेक्षकांना मराठी चित्रपट गीतांचा नजराणा पेश केला. नृत्यांगना ज्योती मस्तेकर यांनी  ढोलकीच्या तालावर, अप्सरा आली अशा लावण्यांच्या नृत्यावर उपस्थित रसिक प्रेक्षकांना थिरकायला लावले. संतोष मोहिते, नागेश कांबळे, दीपक कांबळे, हर्षवर्धन वर्तक, डोनाल्ड कोळी, महेश नाईक, शिवाजी बनसोडे या वादक कलाकारांनी स्वरपंखच्या कार्यक्रमास उत्साहाचे, भरारीचे पंख लावल्याने कार्यक्रमाची नजाकत वाखाणण्याजोगी होती. स्वतः प्रज्ञा चक्षु असलेल्या बिपीन वर्तक यांनी केलेले सूत्रसंचालन व्यावसायिक मराठी वाद्यवृंदातील प्रख्यात निवेदकांची आठवण करून देत होती. स्वररंग प्रतिष्ठान आयोजित स्वरपंख या संपूर्ण दिव्यांग कलाकारांच्या अनोख्या वाद्यवृंदाची संकल्पना आणि निर्मिती कनक क्रिएशनचे अतुल साटम यांची होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बोरीवली नाट्य परिषदेचे झुंजार पदाधिकारी विजय तारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. महाजनको, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बॅंक, घारे ज्वेलर्स, गिरगांव कट्टा, लायन्स क्लब ऑफ मुंबई प्लॅटिनम, फार्मा प्रोफेशनल संदीप मानकामे यांनी प्रायोजकत्व स्वीकारले होते. सामाजिक,  शैक्षणिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आयोजकांच्या ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे ‘ अशा स्वामी समर्थ महाराजांच्या प्रेरणेने सदैव पाठीशी उभे राहणारे गिरगांव कट्टा चे सर्वेसर्वा प्रदीप मालंडकर, आयोजक संजय देसाई, श्रीकृष्ण कुलकर्णी यांच्या शुभहस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

लीना र. प्रभू यांना ‘सायकोलॉजिस्ट ऑफ द इयर २०२५’ पुरस्कार

लीना र. प्रभू यांना ‘सायकोलॉजिस्ट ऑफ द इयर २०२५’ पुरस्कार मुंबई : मुंबई येथे आयोजित ‘ग्लोऱ्या आंतरराष्ट्रीय एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड्स २०२५’ सोहळ्यात नामवंत मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक लीना र. प्रभू…

 ‘आरसीबी–आयटीआय इनोव्हेशन लॅब’चे भव्य उद्घाटन

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे’तर्फे ‘आयटीआय मुंबई १’ येथे ‘आरसीबी–आयटीआय इनोव्हेशन लॅब’चे भव्य उद्घाटन मुंबई : ‘रोटरी क्लब ऑफ बॉम्बे’ (आरसीबी) तर्फे शनिवारी, २४ जानेवारीला ‘आयटीआय मुंबई १’ येथे इंडस्ट्री ४.० सुसज्ज…

 राज्यातील शेतकऱ्यांना एक न्याय, अंबानीला एक न्याय!

राज्यातील शेतकऱ्यांना एक न्याय, अंबानीला एक न्याय! शेतकऱ्यांसाठी न्यायाचा तराजू कायमच हलका का रमेश औताडे मुंबई : राज्यातील शेतकरी आजही निसर्गाच्या लहरीपणाशी, बाजारभावाच्या अस्थिरतेशी आणि कर्जाच्या ओझ्याशी झुंज देत आहे. अवकाळी पाऊस, दुष्काळ, कीड आणि उत्पादन खर्च वाढूनही हमीभावाची हमी नाही. पीक विमा वेळेवर मिळत नाही,कर्जमाफीची आश्वासने हवेत विरतात. अशा स्थितीत शेतकऱ्यांसाठी न्यायाचा तराजू कायमच हलका का ठरतो, असा सवाल शेतकरी करत आहेत. याच राज्यात आणि देशात मोठ्या उद्योगसमूहांसाठी मात्र धोरणे वेगळी भासतात. जमीन, वीज, पाणी, करसवलती, कर्जपुनर्रचना सगळे काही वेगाने मंजूर होते. प्रकल्प रखडले तरी दंड नाही; तोटा झाला तरी सवलत. मग शेतकऱ्यांच्या बाबतीतच नियम कठोर का? शेतकऱ्यांचे कर्ज थकले की नोटीस, जप्ती आणि मानसिक ताण; पण उद्योगपतींच्या कर्जावर पुनर्गठन आणि सवलती मिळतात हा दुहेरी न्याय का? विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत शेतकरी कर्जाच्या चक्रातून बाहेर पडू शकलेले नाहीत. आत्महत्यांची आकडेवारी धोक्याची घंटा वाजवत असताना, सरकारी योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप शेतकरी संघटना करत आहेत. “आम्हाला दया नको, समान न्याय हवा,” अशी आर्त हाक शेतकरी वर्गातून उठते आहे. शेती हा उद्योग मान्य करूनही त्याला उद्योगासारख्या सवलती का नाहीत? उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव, वेळेत पीक विमा, सरळ आणि पारदर्शक कर्जमाफी, वीज-पाणी सवलती या मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. दुसरीकडे, मोठ्या उद्योगांसाठी धोरणांची लालफीत क्षणार्धात कापली जाते. हा फरकच शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा असे एका शेतकऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सरकारला प्रश्न केला. राज्यातील जनमत आज स्पष्ट आहे. कायद्याचे निकष समान हवेत. शेतकऱ्यांना न्याय देताना तसूभरही कमीपणा नको. देश अन्नदाता शेतकऱ्यांवर उभा आहे; त्याच अन्नदात्याच्या जगण्याचा प्रश्न दुर्लक्षित ठेवून विकासाची गाडी पुढे जाऊ शकत नाही. शेतकऱ्यांना एक न्याय आणि उद्योगपतींना दुसरा—हा अन्याय आता थांबायलाच हवा, अशी ठाम मागणी राज्यभरातून शेतकरी करत आहेत.

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत यांचा सत्कार

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत यांचा सत्कार अनिल ठाणेकर मुंबई: न्यायप्रिय व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदावर असतील, तोपर्यंत आपल्या संविधानाला आणि लोकशाहीला कोणताही धोका नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या सन्मानार्थ मुंबई उच्च न्यायालयात आयोजित भव्य सत्कार सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. आधी अवघा ९ टक्के असलेला महाराष्ट्राचा दोषसिद्धी दर आज ४५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे आणि तो ६० टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे,” सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी पायाभूत सुविधांवर भर देण्यात येत आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.याचवेळी, कोल्हापूरच्या बहुप्रतीक्षित सर्किट बेंचला त्यांच्या कार्यकाळातच पूर्ण बेंचचा दर्जा देण्याची विनंती त्यांनी सरन्यायाधीशांकडे केली. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना न्याय अधिक जलद आणि सुलभपणे मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मुंबई उच्च न्यायालयाच्यावतीने आयोजित या ऐतिहासिक कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी न्याय, संविधान आणि सामाजिक समतेच्या मूल्यांवर आधारित भारताच्या न्यायव्यवस्थेचा गौरव केला. “न्यायमूर्ती सूर्यकांत यांचे कार्य सूर्याप्रमाणे प्रकाशमान असून सामान्य नागरिकांना न्यायाची ऊर्जा देणारे आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांच्या शौर्यपरंपरेचा उल्लेख करत शिंदे यांनी दोन्ही भूमींच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशावर भाष्य केले. “देश आज सुरक्षित आहे, कारण आपल्या सीमांवर जवान डटून उभे आहेत आणि शेतकऱ्यांच्या श्रमातून समृद्धी निर्माण होत आहे,” असे त्यांनी सांगितले.हरियाणातील मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि न्यायनिष्ठेच्या बळावर देशाच्या सर्वोच्च न्यायपीठापर्यंत मजल मारल्याचे नमूद करत, शिंदे यांनी त्यांच्या जीवनप्रवासाला प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी ठरवले. धारा ३७० रद्द करण्याचा निर्णय, वन रँक वन पेन्शन योजना, मतदार याद्यांशी संबंधित महत्त्वाचे आदेश, महिलांसाठी आरक्षणासंदर्भातील निर्देश तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत दिलेले ठाम निर्णय यांचा उल्लेख करत त्यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या न्यायनिष्ठेचे कौतुक केले. “आपल्या निर्णयांमुळे जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे,” असे ते म्हणाले.पर्यावरणपूरक विकासावर भर देताना शिंदे यांनी चारधाम प्रकल्पासारख्या निर्णयांचे उदाहरण दिले. “विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखणे हीच आजची खरी गरज आहे. पर्यावरण संवेदनशील विकासाची दिशा आपल्या निर्णयांतून स्पष्टपणे दिसते,” असे शिंदे यांनी नमूद केले.राज्यातील न्यायव्यवस्थेच्या पायाभूत सुविधांबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, २०२२ पासून राज्यात ३२ नवीन न्यायालयांची स्थापना करण्यात आली असून त्यात १४ अतिरिक्त सत्र न्यायालयांचा समावेश आहे. मुंबई उच्च न्यायालयासाठी नव्या भव्य इमारतीच्या उभारणीसाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.दोषसिद्धी दराबाबत बोलताना शिंदे म्हणाले, “या आधी महाराष्ट्राचा कन्विक्शन रेट केवळ ९ टक्के होता. आज तो ४५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. मात्र, येथेच न थांबता तो ६० टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ वाढवण्यावर सरकार भर देत आहे.” लोकशाहीतील न्यायपालिकेच्या महत्त्वावर भाष्य करत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानाबाबतचे विचार उद्धृत केले. “संविधान कितीही चांगले असले तरी ते अंमलात आणणारे लोक न्यायप्रिय असतील, तरच लोकशाही अधिक बळकट होते,” असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या शेवटी शिंदे यांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या उत्तम आरोग्य आणि यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि मुंबई उच्च न्यायालयातील इतर न्यायाधीश आणि वकील संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हायकोर्टाने नवी मुंबई आयुक्तांचा पगार रोखला!

मुंबई : मुंबईसह एमएमआर विभागातील ढासळत्या हवेच्या गुणवत्तेवरून मुंबई उच्च न्यायालय संताप व्यक्त करीत थेट नवी मुंबई महापालिका आयुक्तांचा पगार रोखण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्तांना वैयक्तिक प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे स्पष्ट निर्देश असताना आयुक्तांनी…

सत्तेसाठी कुणासमोरही लाचार होणार नाही – संजय राऊत

मुंबई : उद्धव ठाकरे शिवसेना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे  शिवसेना यांच्यात संभाव्य युतीच्या चर्चांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. आम्ही कोणासमोरही लाचार होणार नाही,असे ठणकावून…