Category: मुंबई

Mumbai news

कंत्राटी पद्धत रद्द करून कामगारांना कायम करा

 सीटूची राज्य सरकारकडे मागणी अनिल ठाणेकर ठाणे-राज्यातील खाजगी उद्योग, सरकारी व निमसरकारी विभाग तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरू असलेली कंत्राटी पद्धत तातडीने रद्द करून त्या जागी कार्यरत असलेल्या सर्व कंत्राटी कामगारांना…

– मुसळधार पावसातील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या पांडुरंग भुवड यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत

ठाणे : मुसळधार पावसादरम्यान आरटीओ परिसरात झाड कोसळून धर्मवीर नगर येथील रहिवासी स्व. पांडुरंग भुवड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे व नगरसेविका नम्रता भोसले-जाधव…

वालधुनी उड्डाणपुलावर पुन्हा मोठी दुर्घटना टळली;

 आठवडाभरात दुसऱ्यांदा हाइट बॅरिकेट्स तुटले,  वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा संताप कल्याण : कल्याणमधील वालधुनी उड्डाणपुलावर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अवघ्या आठवडाभरात दुसऱ्यांदा पुलावरील हाइट बॅरिकेट्स भरधाव वाहनाच्या धडकेत तुटून पडल्याची घटना बुधवारी पहाटे सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने त्या वेळी वाहतूक कमी असल्याने मोठी जीवितहानी टळली. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव टेम्पोने पुलावरील हाइट बॅरिकेट्सना जोरदार धडक दिली. धडकेमुळे बॅरिकेट्स तुटून थेट रस्त्यावर कोसळले. यापूर्वीही १० जुलै रोजी याच ठिकाणी अशीच घटना घडली होती. मात्र, त्या घटनेनंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने पुन्हा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. वालधुनी उड्डाणपुलावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी असतानाही मोठी वाहने सर्रास येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. स्थानिक जागरूक नागरिक रोहित डोळस यांनी प्रशासनावर टीका करताना सांगितले की, “अवजड वाहनांना बंदी असतानाही ती पुलावर येतातच कशी? वाहतूक पोलिसांचा वचक का नाही? एकाच आठवड्यात दोनदा बॅरिकेट्स तुटणे हा प्रशासकीय निष्काळजीपणाचा कळस आहे. प्रशासन नेमके कोणाच्या बळीची वाट पाहत आहे?” यावेळी त्यांनी प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्याही केल्या आहेत. पुलावर केवळ नावापुरते बॅरिकेट्स न बसवता मजबूत हाइट-रिस्ट्रिक्शन स्ट्रक्चर उभारण्यात यावे, संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, रात्रीच्या वेळी वाहतूक पोलिसांची नियमित गस्त ठेवावी आणि अवजड वाहनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे वालधुनी उड्डाणपुलावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.

ठाणे महापालिकेकडून बांधकाम व पाडकाम कचरा व्यवस्थापन पोर्टलचे उद्घाटन

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील बांधकाम व पाडकामातून निर्माण होणाऱ्या (सी अँड डी) कचऱ्याचे निर्मितीपासून अधिकृत प्रक्रिया केंद्रापर्यंत प्रभावी, पारदर्शक आणि शास्त्रोक्त व्यवस्थापन करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या C&D Waste Management…

 शिवभक्त राजू देसाई मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे सन्मानित

शिवचरित्रावर व्याख्यानही उत्साही वातावरणात संपन्न                                              मुंबई,  दि. (प्रतिनिधी): मुंबई बंदर प्राधिकरण स्थानीय लोकाधिकार समितीच्या विद्यमाने शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘स्वराज्याचा अपरिचित इतिहास’…

के.एन.टी. पब्लिक स्कूल प्रकरणी पालकांचे केडीएमसी शिक्षण विभाग विरोधात शुक्रवारी निषेध आंदोलन

कल्याण: टिटवाळा येथील के.एन.टी. पब्लिक स्कूलतर्फे शालेय साहित्य खरेदी सक्ती केल्या प्रकरणी पालकांचे केडीएमसी शिक्षण विभागाविरोधात शुक्रवारी निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. के.एन.टी. पब्लिक स्कूल, टिटवाळा येथील पीडित व त्रस्त…

 शास्त्रीनगर हॉस्पिटलच्या मेडिकलमध्ये औषधेच उपलब्ध नाहीत

 डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयाचा अजब कारभार कल्याण : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयाच्या कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या हॉस्पिटलमध्ये चाललय तरी काय असा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. दोन वर्षांच्या वेदांश राठोड या चिमुकल्याला त्वचेचा त्रास असल्याने त्याचे वडील जगदीश राठोड उपचारासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात घेऊन आले होते. डॉक्टरांनी तपासणीनंतर वेदांशसाठी तब्बल १२ औषधे लिहून दिली आणि ती रुग्णालयातील मेडिकलमधून घेण्यास सांगितले. मात्र, मेडिकलमध्ये एकही औषध उपलब्ध नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे सर्व औषधे बाहेरून खरेदी करण्यास सांगण्यात आल्याने रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. महापालिकेच्या रुग्णालयात रुग्णांना आवश्यक औषधेच उपलब्ध नसतील, तर सर्वसामान्य नागरिकांनी उपचारासाठी कुठे जावे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकाराबाबत वेदांशचे वडील जगदीश राठोड यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, महापालिका प्रशासनाने रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण

चिकणघर परिसरातील रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी  कल्याण : कल्याण पश्चिमेतील चिकणघर परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडले असून या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे  रस्त्यांवरील हे खड्डे तातडीने बुजवून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी हेल्पिंग हँड सामाजिक संस्थेने केली असून याबाबत संस्थेचे अध्यक्ष सचिन राऊत यांनी केडीएमसी आयुक्तांना पत्र दिले आहे. काही दिवसांपूर्वी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर रस्ते तातडीने दुरुस्त करण्यासाठी महानगरपालिकेकडे निवेदन दिले होते. त्यानंतर काही ठिकाणी रस्त्यांचे काम करण्यात आले. मात्र, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अवघ्या काही दिवसांतच पावसात ते रस्ते पुन्हा वाहून गेले आणि खड्ड्यांची समस्या पूर्वीपेक्षा अधिक गंभीर झाली आहे. याच कारणामुळे पुन्हा महानगरपालिकेकडे निवेदन देऊन संबंधित रस्त्यांची तातडीने, दर्जेदार आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी संस्थेतर्फे करण्यात आली आहे. जेणेकरून नागरिकांना होणारा त्रास आणि अपघातांचा धोका कमी होईल. चिकणघर परिसरातील संदीप हॉटेल ते मधुरीमा स्वीट्स या दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्‌डे पडले असून रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावर तीन ते चार शाळा असून दररोज हजारो शाळकरी वि‌द्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर नागरिक या रस्त्याचा वापर करतात. रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांसाठी हा रस्ता अधिक धोकादायक ठरत आहे. परिसरातील नागरिकांनी यापूर्वीही यासंदर्भात महानगरपालिकेकडे लेखी तक्रारी सादर केल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. तरी या बाबीची तातडीने दखल घेऊन संदीप हॉटेल ते मधुरीमा स्वीट्स या मार्गावरील सर्व खड्डे त्वरित बुजवून रस्त्याची योग्य दुरुस्ती करण्याचे आदेश संबंधित विभागास देण्याची मागणी हेल्पिंग हँड सामाजिक संस्थेने केडीएमसी आयुक्तांकडे केली आहे.

 ३४० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

 अजिंक्यतारा सामाजिक सेवा संस्था व सातारा जिल्हा रहिवासी संघाच्या वतीने दिवा : अजिंक्यतारा सामाजिक सेवा संस्था आणि सातारा जिल्हा रहिवासी संघ (दिवा शहर) यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य…

– अविनाश पाठक लिखित आयुष्यातले सांगाती चे प्रकाशन नागपूरमध्ये

– साहित्य भारती आणि साईज्योती पब्लिकेशन्स चे आयोजन नागपूर: ज्येष्ठ पत्रकार, स्तंभलेखक आणि साहित्यिक अविनाश पाठक लिखित आयुष्यातले सांगाती भाग १ भाग २ आणि भाग ३ चे प्रकाशन गुरुवार दिनांक १६ जुलै  २०२६ रोजी सायंकाळी  ६ वाजता नवदृष्टी सभागृह, अंध विद्यालय परिसर, दक्षिण अंबाझरी मार्ग, नागपूर येथे होणार आहे. अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती, विदर्भ प्रांत, आणि साईज्योती पब्लिकेशन च्या संयुक्त विद्यमाने आयोजित एका समारंभात महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांचे हस्ते हे प्रकाशन होणार असून माजी राज्यपाल आणि भारतीय विद्या भवन चे राष्ट्रीय अध्यक्ष बनवारीलालजी पुरोहित हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक प्रकाश एदलाबादकर पुस्तकांवर भाष्य करणार आहेत. आपल्या ५४ वर्षाच्या पत्रकारिता आणि सामाजिक जीवनाच्या कालखंडात ज्या अनेक मान्यवर व्यक्तींशी अविनाश पाठक यांचे व्यक्तिगत संबंध आले आणि ते उभयपक्षी जपले गेले, अशा एकूण  ५१ मान्यवर व्यक्तींवर अविनाश पाठक यांनी लेख लिहिले असून त्याचे संकलन तीन भागात साईज्योती पब्लिकेशन ने “आयुष्यातले सांगाती” भाग १, २ आणि ३ असे प्रकाशित केले आहेत. या ५१ मान्यवर व्यक्तींमध्ये माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव, माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी, ज्येष्ठ साहित्यिक विद्याधर गोखले, गिरिजा कीर, नाट्य दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योगपती शक्तीकुमार संचेती, पत्रकार मा.गो. वैद्य, संघ प्रचारक लक्ष्मीनारायण भाला, प्राच्यविद्या संशोधक महामहोपाध्याय डॉ वासुदेव विष्णू मिराशी, पत्रकार नीला उपाध्ये, सुरेश द्वादशीवार, श्रीपाद सहस्रभोजने, राम खांडेकर, अनंत तरे, डॉ. तनुजा नाफडे, दत्ता मेघे, डॉ. प्रफुल्ल मोकदम, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत. प्रमिलाताई मेढे, डॉ. नीलम गोऱ्हे, डॉ. विकास महात्मे, अजय संचेती, चैनसुख संचेती, डॉ  विश्वास मेहेंदळे, सुधीर गाडगीळ, डॉ उदय निरगुडकर, हंसराज अहिर, वामनराव चोरघडे, मारोती चितमपल्ली, शुभांगी भडभडे, भगतसिंह कोशियारी, उल्हास पवार, न्या. विकास सिरपुरकर, डॉ वि.भि.कोलते, गोपीनाथ मुंडे, प्रा बी.टी.देशमुख, डॉ श्रीकांत जिचकार, वसंतराव साठे, डॉ मनोहर पिंगळे, अभिनंदन थोरात, गंगाधरराव फडणवीस,दत्ताजी डिडोळकर, कवी अनिल, डॉ मधुकर आष्टीकर, प्रतापदादा सोनवणे,नीतिन केळकर,सद्गुरुदास महाराज, डॉ प्रमोद कोलवाडकर या मान्यवरांचा समावेश आहे. या तीन भागांना डॉ. नीलम गोऱ्हे, डॉ. विकास महात्मे आणि अजय संचेती यांच्या प्रस्तावना आहेत. अविनाश पाठक यांची यापूर्वी एकूण पंधरा पुस्तके प्रकाशित झाली असून त्यात डावपेच, शह काटशह आणि सत्तेच्या सावलीत हे तीन राजकीय कथासंग्रह, गाभाऱ्यातला कवडसा, माझ्या खिडकीतले आकाश, आठवणीतले नेते, थोडं आंबट थोडं गोड आणि हितगुज हे ललित लेखांचे संग्रह, दाहक वास्तव, मागोवा घटितांचा, काल प्रवाहाच्या वळणांवरून आणि दृष्टीक्षेप हे वैचारिक लेखांचे संग्रह, काळ्या कोळशाची काळी  कहाणी हे देशातील गाजलेल्या कोळसा घोटाळ्यावरील पुस्तक, पूर्णांक सुखाचा ही लघु कादंबरी, आणि मराठी वांङमय व्यवहार: चिंतन आणि चिंता हे संपादित पुस्तक यांचा समावेश आहे. यातील काही पुस्तके विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित झालेली आहेत. या समारंभाला नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारतीचे विदर्भ प्रांत अध्यक्ष चंद्रकांत लाखे, कार्याध्यक्ष डॉ शेखर भुसारी, महामंत्री विनय माहुरकर साईज्योती पब्लिकेशन चे ज्योती खापेकर,  गणेश राऊत प्रभृतींनी केले आहे. 0000000000