Category: मुंबई

Mumbai news

शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबात आज सुप्रीम सुनावणी

शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबात आज सुप्रीम सुनावणी नवी दिल्ली : अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचे याबाबतची अंतिम सुनावणी आजपासून सुप्रीम कोर्टात सुरु होणार आहे. शिवसेनेसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाची सुनावणीही यावेळी होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरु आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण…

उद्यान गणेश शालेय कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळे विजेता     

उद्यान गणेश शालेय कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळे विजेता मुंबई:  श्री उद्यानगणेश मंदिर चषक राज्य स्तरीय विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेत राष्ट्रीय ख्यातीचा सबज्युनियर कॅरमपटू प्रसन्न गोळे विजेता ठरला. श्री उद्यानगणेश मंदिर…

राज्यात कुपोषित बालकांचे मृत्यू रोखण्यात शासन अपयशी

राज्यात कुपोषित बालकांचे मृत्यू रोखण्यात शासन अपयशी रमेश औताडे मुंबई : महाराष्ट्रात कुपोषणामुळे बालक, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांचे मृत्यू अद्याप थांबले नसल्याने राज्यातील परिस्थिती गंभीर असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. कुपोषण रोखण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांमध्ये सातत्य आणि प्रभावी अंमलबजावणीचा अभाव दिसून येत असल्याबद्दल न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले. राज्यातील आदिवासी, दुर्गम आणि ग्रामीण भागांमध्ये आरोग्य व पोषण सुविधा पुरेशा प्रमाणात पोहोचत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. केवळ कागदोपत्री योजना जाहीर करून प्रश्न सुटणार नसून, प्रत्यक्ष जमिनीवर परिणाम दिसला पाहिजे, असे स्पष्ट मत न्यायालयाने व्यक्त केले. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत राज्यात सुमारे १९५ बालकांचा मृत्यू कुपोषणाशी संबंधित कारणांमुळे झाला आहे. मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये माता व बाल आरोग्याची अचूक आकडेवारी उपलब्ध नसल्याने नियोजनावर परिणाम होत असल्याची बाब समोर आली. राज्य स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, अजूनही मोठ्या लोकसंख्येला मूलभूत पोषण, स्वच्छ पाणी आणि प्राथमिक आरोग्य सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याची खंत न्यायालयाने व्यक्त केली.  आदिवासी व दुर्गम भागांमध्ये आरोग्य यंत्रणा मजबूत करणे, पोषण आहार योजना प्रभावीपणे राबवणे आणि त्याचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे ही शासनाची जबाबदारी असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.कुपोषणामुळे होणारे मृत्यू ही प्रशासनाच्या अपयशाची बाब असून, या प्रश्नावर राज्य सरकारने तातडीने ठोस आणि कालबद्ध उपाययोजना राबवाव्यात, असा स्पष्ट इशाराही उच्च न्यायालयाने दिला आहे.

काँग्रेसची जिल्हा परिषदेसाठी ओबीसी बहुजन पक्षाशी युती

  मुंबई : प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी बहुजन आघाडी व काँग्रेस पक्षाची जिल्हा परिषदेसाठी युती झाली आहे. ही एक वैचारिक युती असून आगामी जिल्हा परिषद निवडणुका एकत्रित लढू असा निर्णय यावेळी…

मुंबईत ‘मराठी भवन’चा पत्ता नाही, ३० मजली ‘बिहार भवन’ उभारणार

मुंबई : मुंबईत मराठी भवन उभारण्याचा अजून पत्ता नसताना दुसरीकडे बिहार सरकारने मुंबईत अत्याधुनिक आणि भव्य ३० मजली ‘बिहार भवन’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारचा हा महत्त्वाकांक्षी…

२९ महापालिकेतील महापौरपद आरक्षण सोडत २२ जानेवारीला

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत २२ जानेवारी रोजी काढली जाणार आहे. २२ जानेवारीला सकाळी ११ वाजता सर्व महापालिकांसाठी महापौरपदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे कोणत्या प्रवर्गाचा महापौर कोणत्या नगरपालिकेमध्ये बसणार हे २२ जानेवारीला निश्चित होईल. नगरविकास…

मुंबईत ‘ठाकरे’ महापौर होणार ?

मुंबई : मुंबई महानगर पालिकेत सगळी गणित जुळली आणि नशिबाने साथ दिली तर मुंबईच्या  महापौरपदावर ठाकरे विराजमान होऊ शकातात… मुंबई महानगरपालिका निवडणूकीचा निकाल असा लागला आहे की कोणत्याच पक्षाला स्वबळावर…

मुंबई महानगरपालिकेत महापौर महायुतीचाच होणार– एकनाथ शिंदे

मुंबई : शिवसेना आणि भाजप हे मुंबई महानगरपालिकेत महायुती एकत्र निवडणूक लढले असून  मुंबईत महायुतीचा महापौर होईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर यासह महायुती म्हणून जिथे जिथे एकत्र निवडणूक…

मुंबईतील काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा खासदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते सत्कार.

मुंबईतील काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा खासदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते सत्कार. मुबई : महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे २४ नगरसेवक विजयी झाले आहेत. या नवनिर्वाचित नगरसेवकांचा मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री आमदार अस्लम शेख, आमदार अमिन पटेल, मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस व मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकाबाजूला धनशक्ती होती, प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसे वाटण्यात आले, विरोधी पक्षाला धमक्या देण्यात आल्या. सर्व यंत्रणा सत्ताधारी पक्षासाठी काम करत होती तर दुसऱ्या बाजूला जनशक्ती होती. जनतेने काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवत २४ नगरसेवक निवडून दिले आहेत. अत्यंत विपरित परिस्थितीत काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या निर्धाराने लढले आहेत. आमची संख्या कमी असली तरी मुंबईकरांच्या प्रश्नावर महापालिकेत आवाज उठवतील व जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतील. मुंबईकरांना चांगले रस्ते, स्वच्छ पिण्याचे पाणी, वाहतुक कोंडीतून सुटका, बेस्ट बसची चांगली सुविधा, प्रदुषणमुक्त मुंबई करायची आहे. महापालिकांच्या विविध संस्थांमध्ये खाजगीकरणाचा सपाटचा सुरु आहे त्यावर बारीक लक्ष ठेवण्याचे काम केले जाईल. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावही अंकुश ठेवण्याचे कामही या नगरसेवकांच्या माध्यमातून केले जाईल, असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या. एका प्रश्नाला उत्तर देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भाजपात हुकूमशाही आहे तर काँग्रेसमध्ये लोकशाही आहे, आमच्या पक्षात प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. कोणी टिका केली असेल तर पक्ष त्यावर निर्णय घेईल. पक्षाने मला मुंबईच्या अध्यक्षपदाची संधी दिली आहे, माझ्या कार्यकर्त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. येणाऱ्या काळात मुंबईत काँग्रेस पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचे काम आम्ही करणार आहोत असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. “आमच्या नगरसेवकांवर आमचा पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे त्यांना कोणत्या हाॅटेलमध्ये ठेवण्याची गरज वाटत नाही”, असा टोलाही खासदार वर्षा गायकवाड यांनी लगावला.

मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर होणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर होणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई : शिवसेना आणि भाजप हे मुंबई महानगरपालिकेत महायुती एकत्र निवडणूक लढले असून  मुंबईत महायुतीचा महापौर होईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर यासह महायुती म्हणून जिथे जिथे एकत्र निवडणूक लढलो त्याठिकाणी महायुतीचाच महापौर बनवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. मुंबईमध्ये महानगर निवडणूक मध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने, आणि शिवसेनेने आपले नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवल्याने याबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते. मात्र या सर्व शंकाकुशंकांना पूर्णविराम देत मुंबित महायुतीचाच महापौर होईल असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईकर नागरिकांनी मोठ्या विश्वासाने महायुती म्हणून सेना – भाजपला मतदान केले असून त्यांच्या मतांशी प्रतारणा करून कोणताही वेगळा निर्णय शिवसेना घेणार नाही. नागरिकांनी याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असेही ते म्हणाले. यासोबतच ज्या ज्या मनपामध्ये शिवसेना भाजप हे महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढले आहेत तिथेही महायुतीचाच महापौर बसविण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात अन्य काही राजकीय समीकरणे तयार होत असल्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांमध्ये अजिबात तथ्य नसून मुंबईत शिवसेना भाजप रिपाइं महायुतीचा महापौर होईल असे त्यांनी सांगितले.