Category: मुंबई

Mumbai news

गोरेगाव फिल्म सिटी हत्याकांड प्रकरणात सर्व आठ आरोपींची निर्दोष मुक्तता

गोरेगाव फिल्म सिटी हत्याकांड प्रकरणात सर्व आठ आरोपींची निर्दोष मुक्तता गोरेगाव सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई :   गोरेगाव बहुचर्चित फिल्म सिटी हत्याकांडातील राजू उर्फ श्रीकांत शिंदे खून प्रकरणात दिंडोशी येथील बोरवली विभागाच्या सत्र न्यायालयाने सर्व आठही आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे. ५ जानेवारीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी टी आगलावे यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील इम्रान पी शेख यांनी बाजू मांडली. सदर खटला गोरेगाव येथील आरे पोलीस ठाण्याच्या तपासावर आधारित होता. अभियोजन पक्षानुसार फिल्मसिटी परिसरात सुरक्षा सेवा व्यवसाय करणाऱ्या श्रीकांत उर्फ राजू शिंदे यांच्यावर २२ मे २०१५ रोजी गोरेगाव आरे कॉलनीतील फिल्मसिटी परिसरात कालिया मैदानाजवळ बालाजी टेलिफिल्म्सच्या सेट समोर गळी बार करण्यात आला होता. हेल्मेट घातलेले दोन अज्ञान व्यक्ती मोटरसायकल वरून येऊन त्यांनी राजू शिंदे यांच्यावर गोळी झाडल्याचा प्रत्यक्ष दर्शनी पोलिसांना सांगितले होते. या हल्ल्यात राजू शिंदे यांना तीन गोळ्या लागल्या होत्या. त्यावेळी त्यांना तत्काळ नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुमारे ४५ दिवस उपचार सुरू असताना २ जुलै २०१५ रोजी गोळीबाराच्या जखमेमुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी तपास करून पुन्हा आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत २१ ऑगस्ट २०२५रोजी आरोप पत्र सादर केले. हे प्रकरण सत्र खटला क्रमांक १८९/२०१५ म्हणून नोंदवण्यात आले. न्यायालयाने सर्व आरोपीं विरुद्ध भारतीय दंड संहिताच्या कलम ३०२, १२०ब तसेच शस्त्र कायद्याच्या कलम २५ व २७ अंतर्गत आरोप निश्चित केले होते. या प्रकरणात सुरेश सुभाष गायकवाड यांना मुख्य सूत्रधार म्हणून दर्शविण्यात आले होते. खटल्याच्या सुनावणी दरम्यान अभियोजन पक्षाने एकूण ३८ साक्षीदार तपासले मात्र उलट तपासणी दरम्यान साक्षीदारांच्या जबाबांमध्ये गंभीर विसंगती आढळून आल्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षीत फिर्यादी पक्षाने सांगितलेल्या तीन गोळ्यांच्या जखमान ऐवजी क्षविच्छेदन अहवालात चार गोळ्यांच्या प्रवेश जखमा आढळल्याचे समोर आले. विशेष म्हणजे हल्ल्याच्या दिवसापासून मृत्यू होईपर्यंत राजू शिंदे हे वैद्यकीय देखरेखीखाली होते. तसेच बॅलेस्टिक तज्ञांच्या साक्षीनुसार जप्त करण्यात आलेली शस्त्रे ही कथित गुन्ह्यात वापरलेले शस्त्रांशी जुळत नसल्याचे स्पष्ट झाले. तपास अधिकाऱ्यांच्या साक्षीतून हेही निष्पन्न झाले की पीडिताचा मृत्यूपूर्वी जबाब नोंदवण्यात आला असल्याचा दावा असूनही तो जबाब न्यायालय समोर सदर प्रकरणात आलेला नव्हता. या सर्व त्रुटी आणि संशयस्पद बाबी लक्षात घेता अभियोजन पक्ष आरोप कोणत्याही रास्त शंकेपलीकडे सिद्ध करण्यात अपयशी ठरण्याचे नमूद करत न्यायालयाने सर्व आरोपींना संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त केले या प्रकरणात सुरेश सुभाष गायकवाड यांचे मुख्य प्रतिनिधित्व अ‍ॅड श्रीकांत सुरेशराव शिरसाट यांनी तर जुगल उर्फ पप्पू बाबू दोडिया याचे प्रतिनिधित्व अ‍ॅड सपना दिलीप हजारे यांनी केले तसेच सहकारी वकील म्हणून अ‍ॅड रवींद्र सोपान लिहिणार अ‍ॅड नरेश मुरलीधर गायकवाड अ‍ॅड प्रशांत वसंत जाधव आणि सहकारी आयुष्य राम शंकर पांडे यांनी काम पाहिले.

जय लहुजी दिनदर्शिकेचे प्रकाशन

जय लहुजी दिनदर्शिकेचे प्रकाशन मुंबई: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर मानखुर्द येथील क्रांतीसम्राट डॉ. बाबासाहेब गोपले भवन येथे ४४ व्या मातंग समाज क्रांतीचक्र परिवर्तन दिनानिमित्त क्रांतीज्योती कुसुमताई बाबासाहेब गोपले यांच्या हस्ते जय लहुजी दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. मातंग समाजाचे नेते समाजभूषण सुदाम आवाडे, बी जी गायकवाड, मदन आवाडे, योगेश शिंदे,बंडु चांदणे, तुलसिराम ताटे, नितिन हिवाळे, हरीभाऊ कांबळे, दत्तात्रय आवाडे, रवी थोरात, पार्वती  आवाडे, अश्विनी शिंदे, द्वारकाबाई लोंढे, आदी मान्यवर उपस्थित होते.

सिंधुदुर्गात भाजपांतर्गत वाद उफाळला !

सिंधुदुर्गात भाजपांतर्गत वाद उफाळला ! नारायण राणेंच्या विरोधात रविंद्र चव्हाण समर्थकांचे राजीनामा सत्र जिल्हापरिषद निवडणूकीतील नारायण राणेंच्या निवडणूक फॉर्म्युलावर नाराजी ० राजन चव्हाण सिंधुदुर्ग – सिंधुदुर्गात एकीकडे खासदार नारायण राणे यांनी महायुती मधील…

स्वित्झर्लंडमध्ये फडणविसांचे मराठमोळे स्वागत…

स्वित्झर्लंडमध्ये फडणविसांचे मराठमोळे स्वागत… स्वित्झर्लंडमधिल वर्ल्ड इकोनॉमिक फोरमसाठी दावोसमध्ये दाखल झालेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चक्क स्वित्झर्लंड महाराष्ट्र मंडळाने विमानतळावर मराठ मोळ्या पद्धतीन लेझिमने स्वागत केले.   फडणवीसांनी दावोसही ‘जिंकले’!…

मुंबईच्या महापौरपदावरून राजकारण पेटलं !

मुंबईच्या महापौरपदावरून राजकारण पेटलं ! चेहऱ्यावर हसू आणि पडद्यामागे डावेपच स्वाती घोसाळकर मुंबऊ : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या मतमोजणीही झाली पण अजूनही महापौरपदाचा प्रश्न कायम आहे.  भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या महायुतीला काठावरचे…

नवी मुंबईत नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी

नवी मुंबई : यंदाच्या २९ महानगर पालिकांच्या निवडणूकीत सर्वाधिक वादग्रस्त राहीलेल्या नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीत अखेर भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी चँलेंज दिल्याप्रमाणे भाजपला एकहाती सत्ता मिळवून देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा टांगा पलटी केला. नवी मुंबईत भाजपाने ७२…

गुरुवंदना… ठाण्यात एकहाती सत्ता आणि मुंबईसह राज्यात अनेक नगरपालिकेत भाजपासोबत महायुतीत घवघवीत यश मिळिविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंदआश्रमात उपस्थित राहून गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण…

ठाकरेंनी लालबाग-परळचा किल्ला अभेद्य राखला

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना विजयाकडे घोडदौड करीत असताना लालबाग परळने ठाकरे बंधूंना हात दिला. लालबाग-परळच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंचाच भगवा फडकल्याचं पाहायला मिळाले. गिरणगावचा गड ठाकरे बंधूंनी राखला. गिरण गावातील सातपैकी सहा जागांवर ठाकरे बंधूंचा विजय झाला, तर एका जागेवर समाजवादी पक्षाचा विजय झाला. श्रद्धा जाधव, पेडणेकर,   किरण तावडे यांच्यासह ठाकरे बंधूंच्या युतीच्या सहा उमेदवारांनी विजय मिळवला. मुंबई शिवसेनेची आणि शिवसेना मुंबईची ही बाळासाहेब ठाकरेंची टॅगलाईन असायची. यात उद्धव ठाकरेंनी…

मुंबईत भाजपा तर ठाण्यात शिंदे नंबर १

मुंबईत २५ वर्षानंतर ठाकरेंची सत्ता संपुष्टात मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणावर दुरागामी परिणाम करणाऱ्या या २९ महानगर पालिकेच्या निवडणूकीत भाजपा महायुतीने आपाला विजयी अश्व चौखुर उधळलाच पण मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेसह सत्ताही आणली. तब्बल…

महाराष्ट्रात एकच ब्रँड ! डी फॉर देवेंद्र, डी फॉर डेव्हलपमेंट

स्वाती घोसाळकर  मुंबई : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूकींच्या निकालानंतर महाराष्ट्रात आता फक्त एकच ब्रँड डी फॉर देवेंद्र, डी फॉर डेव्हलपमेंट असल्याचे आज सिध्द झाले. राज्यातील भाजप व महायुतीच्या विजयामागे फडणविसांचा विकासाचा अजेंडा आणि डबल इंजिन सरकारचा विश्वास असल्याचे निकालातून दिसून आले. “डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे डेव्हलपमेंट हाच आज महाराष्ट्राचा ब्रँड बनला आहे,”. केवळ शहरी भागातीलच नव्हे…