Category: मुंबई

Mumbai news

नरिमन पॉईंट ते हाजीअली १० मिनिटात

अशोक गायकवाड मुंबई : ‘धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गा’वरील मरीन ड्राईव्ह परिसर ते हाजी अली परिसरापर्यंत उत्तर वाहिनी आजपासून खुली करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र…

ठाण्याला ऑरेंज, मुंबईला यलो अलर्ट; 

  मुंबई : मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पुढील पाच दिवसात मुसळधार पाऊस पडणार असल्यामुळे ठाणे जिल्ह्यात ऑरेंज तर मुंबईला यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावलीआहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशीही पावसाचाजोर पाहायला मिळत आहे. आजपासून पुढील पाच दिवसमुंबई, ठाणेसह राज्यात पावसाचा जोर असाच कायमराहणार असल्याचं आयएमडीने सांगितलं आहे. येत्या पाच दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज मुंबईत मान्सून दाखल झाला असून मुंबईकरांना पावसानंचांगलंच झोडपलं आहे. मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघरमध्येयेत्या पाच दिवसात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाजहवामान खात्याने वर्तवला आहे. तसंच येत्या आठवड्याभरातमान्सून महाराष्ट्र व्यापणार आहे.हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघरसह विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांतसाधारणपणे  ढगाळ आकाश आणि शहर आणि उपनगरातगडगडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. कुठे ऑरेंज, तर कुठे यलो अलर्ट ठाणे, रायगड, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यांतजोरदार पावसाची शक्यता असून आज 10 जून रोजी ऑरेंजअलर्ट देण्यात आला आहे. आज आणि उद्या कोकणासहदक्षिण आणि मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र तसेचमराठवाड्यातील काही ठिकाणी पाऊस तसेच मेघगर्जनेसहपाऊस पडण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्येतुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, 50-60 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि मुसळधार तेअति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तरमध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्येतुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणिसोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यताआहे.

शरद पवारांप्रती पक्ष फुटीनंतर अजित पवार पहील्यांदाच कृतज्ञ

मुंबई : “सर्वांनी खांद्याला खांदा लावून हा पक्ष पुढे आणला. काही नेते आपल्यात नाहीत. ⁠शरद पवार यांचंही पक्ष स्थापनेतमोठ काम आहे. मी त्यांना ही कृतज्ञता व्यक्त करतो. पक्षस्थापनेवेळी सोनिया गांधी यांचा परदेशी मुद्दा काढला, मात्रत्यावेळी आपल्याला कमी वेळ निवडणुकीत मिळाला. ⁠सर्वांनीप्रयत्न केला त्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो. 33 टक्केजागा महिलांना होत्या, त्या आपण 50 टक्के करण्याचानिर्णय घेतला. ⁠डांन्सबार बंदी आणि गुटखा बंदीचा निर्णयआपण घेतला होता”, असे उपमुख्यमंत्री अजित पवारम्हणाले. मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा25 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी अजितपवार बोलत होते. अजित पवार म्हणाले, संबंध नसताना गैरसमज पसरवण्याचकाम काहीजण करत होते. दोन दिवस दिल्लीत होतो. आम्हीएकत्र जेवण केलं.  ⁠काहीही वाद नव्हता. तरीही चुकीच्याबातम्या लावल्या. देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्टीकरण दिलं. तुमची लोकसभेची एकच जागा आली आहे. तुम्हाला एकमंत्रीपद द्यायचं आहे, असं म्हणाले होते. ⁠राज्यसभा देऊनस्वतंत्र कार्यभार दिला जाणार होता. आता दोन खासदारआहेत. जुलैपर्यंत आणखी एक खासदार वाढणार हे तुम्हालामी आताच सांगतो, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, पक्षाच्या कार्यालयातठराविक लोक बसली पाहिजेत. ⁠बाकी इतर लोकांनी सातदिवसात काय दौरा केला याची माहिती घ्या. ⁠मंत्र्यांनाही याचसूचना आहेत. आपण जरी महायुतीत असलो तरी आपणफुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा सोडलेली नाही. महायुतीच्या नेत्यांनाही हे आपण सांगितलं आहे. ⁠जोपर्यंत चंद्रसुर्य आहे, तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधानकोणीच मायचा लाल बदलू शकत नाही.  ⁠नरेटीव्ह सेटकरण्याचा प्रयत्न आपले विरोधक करतील. हे अधिवेशनझाल की जातील असं ही सांगितलं की, हे 75 वे संविधान वर्षसाजरे करण्याचे एनडीएने सांगितलं आहे. यावेळी जे अपयशमिळालं याची जबाबदारी मी घेतो, असंही अजित पवार म्हणाले.

मुंबई क्रिकेटवर शोककळा

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे हृदयविकरच्या झटक्याने काल न्यूयॉर्क, अमेरिका येथे निधन झालं. रविवारी रात्री एमसीएच्या पदाधीकाऱ्यांसाह न्यूयॉर्कमध्ये भारत आणि पाकिस्तान…

शिंदेंच्या शिवसेनेत मंत्रीपदावरून नाराजीनाट्य

“1 खासदार असलेल्या मांझींना कॅबिनेट, 7 खासदारअसलेल्या शिवसेनेला एकही का नाही?” – श्रीरंग बारणें मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ७ खासदार जिंकून आले  असतानाही कॅबिनेट मंत्रिपद न देता केवळ एका राज्यमंत्रीपदावर बोळवण केल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत  नाराजीनाट्य उद्भवले आहे. मावळचे खासदार श्रीरंगबारणे यांनी आज यावरून भजपावर जाहीर टीका केलीय. चिराग पासवान यांचे पाच खासदार असताना कॅबिनेटमंत्रिपद मिळाले, एक खासदार असणाऱ्या मांझी यांनाहीकॅबिनेटमंत्रिपद मिळाले, कुमारस्वामी यांना दोन खासदारअसताना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले, आम्हालाही कॅबिनेटमंत्रिपद मिळायला हवं होतं, असे मावळचे खासदार श्रीरंगबारणे यांनी सांगितले. ते एबीपी माझाशी बोलत होते. यावेळीत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 7 खासदारआले असतानाही कॅबिनेट मंत्रिपद न दिल्यामुळे दुजाभावझाल्याचं सांगितलं. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सात खासदार आहेत. भाजप, जेदयु, टीडीपी यांच्यानंतर एनडीएमधील शिवसेनेलासर्वाधिक खासदार आहेत. पण तरीही कॅबिनेट मंत्रिपदमिळाले नाही. त्यामुळे शिवसेनेत नाराजी असल्याचं समोरआलेय. खासदार श्रीरंग बारणे यांनी याबाबत उघडपणे भाष्यकेलेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला केंद्रीय राज्यमंत्रिपद देऊन, दुजाभाव करण्यात आला. आमच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेटपाहता, आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद द्यायला हवं होतं, असंम्हणत शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंनी उघडपणे नाराजीव्यक्त केली आहे. एनडीएमधील इतर घटक पक्षांचे एक-एकखासदार निवडून आलेत, मात्र त्यांना कॅबिनेट मंत्री पद दिलंगेलं. मग शिंदे गटाबाबत भाजपने हा दुजाभाव का केला? असंहोतं तर मग कुटुंबाविरोधात जाऊन महायुतीत आलेल्याअजित पवारांनाही एक मंत्री पद द्यायला हवं होतं. तसेचभाजपने साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंनाही मंत्रिपदद्यायला हवं होतं. असं म्हणत बारणेंनी खदखद बोलूनदाखवली. शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद मिळायला हवं होतं – देशामध्ये पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांचं मंत्रिमंडळस्थापित झाले आहे. या निवडणुकीचा जर विचार करताशिवसेना पक्ष जुना साथी आहे. एनडीएचा जुना साथी म्हणूनशिवसेना पक्षाला कॅबिनेट मंत्री मिळावे ही माफक आपेक्षाहोती.  चंद्राबाबू नायडू यांचे सोळा खासदार निवडून आले, त्याचबरोबर नितेश कुमार यांचे 12 खासदार निवडून आले. त्या खालोखाल शिवसेना पक्षाचे सात खासदार निवडूनआले. चिराग पासवान यांचे पाच खासदार निवडून आले, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं. कुमारस्वामी यांचे दोन खासदारकर्नाटकातून निवडून आले, त्यांना एक कॅबिनेट मंत्रिपद दिले. त्याचबरोबर बिहार मधून जितन मांझी एकटे निवडून आले, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले. तर शिवसेना पक्षाला एककॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री मिळावे, अशी आमचीअपेक्षा होती. कॅनिबेनट मंत्रिपदाची शपथ आमच्याखासदाराने घेतली असती तर आम्हाला समाधान मिळालेअसते, असे श्रीरंग बारणे म्हणाले.

महायुतीत भुजबळांनी ठिणगी टाकली

विधानसभेत शिंदें इतक्याच जागा राष्ट्रवादीला हव्यात मुंबई : लोकसभा निवडणूकीत पराभवाचा दणका बसल्यानंतर आता भाजपाप्रणीत महायुतीत पुन्हा धुसफूस सुरू झाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्रीछगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा ठिणगी टाकली आहे. “आम्ही मागच्या वेळेस म्हटलं की ८० जागा आम्हाला कमीत कमी मिळाल्या पाहिजेत. तर हे ताबोडतोब माझ्या विरोधात बोलू लागले. मी म्हटलं बर बबा नाही बोलत. जागा वाटपाचे गुऱ्हाळ शेवटपर्यंत चालवून तुमचा फायदा होणार नाही. याचा लवकर निपटारा करायला पाहिजे. उमेदवार काय करायचे नंतर ठरवा. भाजप मोठा पक्ष आहे, मोठा भाऊ आहे, मान्य आहे. पण आम्ही सुद्धा सांगितलं की, आमचे जेवढे आमदार आहेत, तेवढेच शिंदेंचे आहेत. त्यामुळेत्यांना जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच आम्हाला मिळायलाहव्यात” असे छगन भुजबळ म्हणाले. मुंबईत अजित पवारांच्याराष्ट्रवादीचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळीछगन भुजबळ बोलत होते. आता विधानसभेची निवडणूक आहे, म्हणजे संविधानाचा प्रश्न नाही छगन भुजबळ म्हणाले, आता विधानसभेची निवडणूक आहे, म्हणजे संविधानाचा प्रश्न नाही. संविधान बदलाचे कामहोणार नाही. तो लोकसभेचा मुद्दा होता, आता विधानसभेलाचालणार नाही. आपले मतदार दलित, ओबीसी, मराठा हेआपले मतदार आपल्याला परत मिळवावे लागतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून या गोष्टी आपल्याला कराव्याचलागतील. त्यांना विश्वास द्यावा लागेल. युपीमध्येहीसंविधानाबाबत प्रचार झाला, त्यामुळे महायुतीच्या जागाकमी आल्या. महायुतीला ठेच लागली आहे, हे नाकारुनचालणार नाही. लोकभा निवडणूकीत महायुतीला ठेच लागलीहे नाकारुन चालत नाही. दगडधोंडे बाजूला करावे लागतील. मुंबईत प्रत्येक ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. ⁠विकासविकास आणि विकास मात्र मुंबईत किती निवडून आलेआहेत. लाखो कोटी खर्च केले, मात्र आपले उमेदवार निवडूनआले नाहीत, असंही भुजबळ यांनी सांगितलं. मुस्लीम समाज, दलित समाज आपल्याला सोडून बाजूला झाले पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, मुस्लीम समाज, दलितसमाज आपल्याला सोडून बाजूला झाले. 400 पार म्हणालो, त्याचा प्रचार असा झाला की, संविधान बदललं जाणार आहे. मोदींनी खुलासा केला, पण तोपर्यंत लोकांना वाटलं 400 पारम्हणजे आपला बेडा पार झाला. दलित, मुस्लीम समाजआपल्यापासून गेला तर आपलं काय? संविधान बदलणारम्हणजे आपलं आरक्षण जाणार असंही लोकांच्या डोक्यातआलं. आपलं नुकसान करण्यासाठी विरोधी पक्ष प्रचारकरणार आहे. आपण त्यामध्ये सुधारणा करु शकलो नाही, हेसत्य आहे.

खातेवाटप जाहीर

अमित शाह पुन्हा गृहमंत्री, गडकरींकडे रस्ते  विकास नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळाचे आज खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. अमित शाहयांच्याकडे पुन्हा एकदागृहमंत्रीपद  सोपवण्यात आले आहे. नितीन गडकरींकडे रस्ते  विकास कायम ठेवण्यात आले आहे. राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाचीजबाबदारी देण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालय एस. जयशंकर यांच्याकडे देण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी यांनीरविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह72 मंत्र्यांनी पद आणि गोपिनीयतेची शपथ घेतली होती. त्यानंतर आता खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. मोदी कॅबिनेटचं खातेवाटप जाहीर! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 72 जणांनी रविवारी 9 जूनला  कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलीहोती. महाराष्ट्रातील 6 जणांचा यामध्ये समावेश होता. शपथघेतल्यानंतर या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार याकडेसर्वांचं लक्ष होतं. अखेर आज हे खातेवाटप जाहीर करण्यातआलं. त्यानुसार नितीन गडकरी यांना पुन्हा त्यांचं रस्ते आणिपरिवहन वाहतूक मंत्रालय, अमित शाह यांना गृह, एसजयशंकर यांना परराष्ट्र, राजनाथ सिंह यांना संरक्षण आणिअश्विनी वैष्णव यांना रेल्वे मंत्रालय मिळालं आहे. बिहारने केली होती रेल्वे मंत्रालयाची मागणी बिहारमधील घटकपक्ष असलेल्या नितीश कुमार यांनी रेल्वेमंत्रालयाची मागणी केली असल्याची माहिती होती. पण हेखातं भाजपच्या अश्विनी वैष्णव यांच्याकडेच राहणारअसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाला कोणतं मंत्रालय? अमित शाह- गृहमंत्रालय राजनाथ सिंह- संरक्षण मंत्रालय एस जयशंकर – परराष्ट्र नितीन गडकरी- रस्ते आणि वाहतूक निर्मला सीतारमन – अर्थमंत्रालय शिवराज सिंह चौहान- कृषी मंत्रालय…

पश्चिम रेल्वे पावसाळ्यात सुपरफास्ट !

मान्सूनपूर्व बहुतांशी कामे पूर्ण, प्रशासनाचा दावा मुंबई : ऐन पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचून किंवा तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा बंद पडू नये, यासाठी बहुतांशी मान्सूनपूर्व कामे पूर्ण झाली आहेत, असा दावा पश्चिम रेल्वेने केला आहे. विशेषत: रुळांच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी गस्त घालण्यात येणार असून, हवामानाशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी हवामान विभागासह मुंबई महापालिकेच्या यंत्रणांशी समन्वय राखला जाईल, असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. ड्रोनद्वारे सर्वेक्षण कल्व्हर्ट आणि नाल्यांमधील चोक पॉइंट्सचे निरीक्षण, स्वच्छता आणि ओळखण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण केले जात आहे. बोरीवली, विरार विभागातील नाल्यांच्या सफाईसाठी ड्रोन सर्वेक्षण आणि देखरेखीचे काम सुरू असून, ते लवकरच पूर्ण होईल. कल्व्हर्ट, नाल्यांची साफसफाई आणि गाळ काढणे, रुळांच्या बाजूने घाण काढणे, कचरा साफ करणे, अतिरिक्त जलमार्ग बांधणे, उच्च क्षमतेच्या पंपांची तरतूद करणे, झाडांची छाटणी करणे इत्यादी कामे मिशन मोडवर पूर्ण होत आहेत. नालेसफाई वेगात १) १.५० लाख घनमीटर राडारोडा हटवण्याचे काम पूर्ण झाले आहे. हे काम विशेष अशा डेब्रिज स्पेशल गाड्या, बीआरएन, जेसीबी, पोकलेनच्या मदतीने करण्यात आले. २) कल्व्हर्ट आणि नाल्यांच्या साफसफाईचे काम वेगाने पूर्ण होत आहे. यार्डातील पाण्याच्या प्रवाहाच्या पद्धतीचा अभ्यास करून पाण्याचा सुरळीत निचरा होण्यासाठी नवीन नाले बांधण्यात येत आहेत. ३) वांद्रे आणि बोरीवली येथील कल्व्हर्टची स्वच्छता करण्यासाठी डी-स्लडिंग मशीनचा वापर करण्यात आला. ४) प्रभादेवी-दादर सेक्शन, दादर-माटुंगा रोड सेक्शन, वांद्रे टर्मिनस यार्ड, गोरेगाव-मालाड सेक्शन, बोरीवलीत पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी १२०० किंवा १८०० मिमी व्यासाचे १५ पाइप बसवण्यात आले. ५) पाण्याचा सुरळीत निचरा होण्यासाठी ११ ठिकाणी नाले बांधले जात आहेत.

राज्य कॅरम –  माजी राष्ट्रीय विजेत्या संजय मांडेची उपांत्य फेरीत धडक

मुंबई : श्री दत्तराज चारिटेबल ट्रस्टच्यावतीने हॉटेल मंगलम, नरसोबावाडी, कोल्हापूर येथे सुरु असलेल्या कै. अशोक पुजारी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या ८ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उप…

अजित पवार यांनी सर्व विभागीय आयुक्तांकडून घेतला आढावा

राज्यातील पाऊस, खते, बी-बियाणे, टँकर, पीक कर्ज, पाणीसाठ्याचा मुंबई : हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात समाधानकारक पाऊस अपेक्षित आहे. पावसाच्या आगमनानंतर शेतकरी खरीप पिकांच्या पेरणीच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे खते-बियाण्यांच्या अभावी कुठेही पेरण्यांना विलंब होता कामा नये. त्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात बियाणे, खतांचा पुरवठा करावा. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज मिळण्याची दक्षता घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व विभागीय आयुक्तांना दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या मंत्रालयीन दालनात आज राज्यातील पाऊसमान, खते, बी-बियाणे पुरवठा, पीक कर्ज वितरण, टँकरची स्थिती, धरणांतील पाणीसाठा व विसर्गाचे नियोजन, पूर नियंत्रण, चारा उपलब्धता याबाबत दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून आढावा घेतला. बैठकीला महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, आपत्ती व्यवस्थापनचे संचालक लहूराज माळी, कृषी विभागाचे उपसचिव श्री. चांदवले आदी उपस्थित होते. पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, अमरावती विभागीय आयुक्त निधी पांडे, नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना-बिदरी, छत्रपती संभाजीनगर विभागाचे उपायुक्त जगदीश मणियार, नाशिक विभागाच्या उपायुक्त राणी ताटे, कोकण विभागाचे उपायुक्त संजीव पलांडे, कृषी आयुक्त रावसाहेब भागडे यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आपल्या विभागाने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, पहिल्याच पावसात पुणे शहरातील विविध भागात पाणी साचल्याचे दिसून आले. महापालिकेने याबाबत त्वरित आवश्यक उपाययोजना कराव्यात. मोठ्या पावसात पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात यावे. राज्यात काही भागात १०० मिलिमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडला आहे. अशा परिस्थितीत वापसा आल्यानंतरच पेरण्यांचे नियोजन करावे. तसेच पुरेसा पाऊस पडला नसलेल्या ठिकाणी चांगला पाऊस पडल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, यासाठी कृषी विभागाच्या समन्वयाने जनजागृती करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडणार असल्यामुळे धरणांमधील पाणी सोडण्याचे काटेकोर नियोजन करावे. आंतरराज्यीय धरणांवर जलसंपदा विभागाने आपला समन्वय अधिकारी नियुक्त करावा, त्याच्या माध्यमातून योग्य वेळी पाण्याच्या विसर्गाबाबत नियोजन करावे. पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन शहरे, गावांत पाणी येणार नाही याची काळजी घ्यावी. आलमट्टी धरणाच्या पाण्यामुळे कोल्हापूर शहरात पुराची समस्या येऊ नये, यासाठी आतापासून नियोजन करावे. तसेच मेडिगट्टा, गोसीखुर्द धरणाबाबतही सतर्क राहून गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होणार नाही, याबाबत काळजी घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. पाऊसमान चांगले असल्यामुळे पाणी तुंबणे, अनियंत्रित विसर्गामुळे पूर येणे आदींबाबत यंत्रणांनी काळजी घ्यावी. पूरस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पूर्वसूचना देऊन सतर्क करावे. अशा परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्याचा, वेळेवर मदत व पुनर्वसनाचे सर्व उपाय योजण्याचा प्रयत्न करावा. जलसंपदा विभागाने धरणांमधील पाणी सोडण्याबाबत योग्य ते नियोजन करावे. याबाबत अन्य यंत्रणांशी समन्वय ठेवावा. शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर उपलब्ध होईल याबाबत बँकांना सूचना द्याव्यात, असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले. विभागीय आयुक्तांनी आपआपल्या विभागातील पाऊस, धरणातील जलसाठा, खरीप हंगामाचे नियोजन, तर पुणे विभागीय आयुक्त श्री. पुलकुंडवार यांनी यासोबतच आषाढी वारीच्या नियोजनाबबात माहिती दिली. आषाढी वारीसाठी मंजूर निधी ताबडतोब वितरित करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी दिले.