Category: मुंबई

Mumbai news

‘लोकराज्य निवडणूक विशेषांक’ माहितीपूर्ण आणि संग्रहणीय – एस.चोक्कलिंगम

मुंबई, : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रकाशित केलेला ‘उत्सव निवडणूकीचा अभिमान देशाचा’ हा  लोकराज्यचा निवडणू्‌क विशेषांक माहितीपूर्ण आणि संग्रहणीय असल्याचे मत, प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी…

प्राणापलीकडे लोकशाही जपण्याची वेळ आली आहे – मधू मंगेश कर्णिक

रमेश औताडे मुंबई : सर्वांनी न चुकता मतदान करा असे आवाहन करत,  प्राणापलीकडे लोकशाही जपण्याची वेळ आली आहे असे  स्पष्ट मत ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी जेष्ठ पत्रकार मधुकर…

ध्यानधारना आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी एकत्र आणणे आज काळाची गरज – डॉ. स्वामी शैलेंद्र सरस्वती

रमेश औताडे मुंबई : आपली भौतिक कार्ये आणि मनःशांती याची सांगड जगाला विविध संभाव्य  संकटापासून वाचवण्यासाठी कामी येणार आहे. त्यामुळे मानवाने विचारपूर्वक वागत जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. असे विचार सद्गुरू…

टी-२० वर्ल्डकपसाठी कॅप्टन रोहीत शर्माच !

स्वाती घोसाळकर मुंबई- मिशन टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या बैठकीनंतर टीमची घोषणा करण्यात आली. भारताच्या मिशन वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची कॅप्टन्सी पुन्हा एकदा रोहीत शर्माकडेच…

महाराष्ट्राची जनता गद्दारांना माफ करणार नाही- वर्षा गायकवाड

इंडिया आघाडीचे नेते व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वर्षा गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल. (छाया-संतोष नागवेकर) मुंबई: भाजपाने मुंबईच्या अस्मितेवर घाला घातला आहे. मुंबईचे महत्व कमी करण्यासाठी मुंबईतील महत्वाचे उद्योग व संस्था दुसरीकडे…

यामिनी जाधव दक्षिण मुंबई तर वायकर वायव्य मुंबईतून लढणार

शिंदे गटाकडून मुंबईतील उमेदवारांची घोषणा मुंबई : दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव तर वायव्य मुंबईतून रविंद्र वायकर यांना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. यामिनी जाधव या दक्षिण मुंबईत…

मुंबईत टॅक्सी चालकाकडून तरुणीची हत्या

किरीट सोमय्यांनी केला ‘लव्ह जिहाद’चा आरोप मुंबई : प्रेयसीचं दुसऱ्या व्यक्तीबरोबर अफेअर असल्याच्या संशयावरून एका टॅक्सी ड्रायव्हरने घरकाम करणाऱ्या तरुणीची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावत नाल्यात फेकून दिले. याप्रकरणी आरोपी नजिम खान याला अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय पूनम क्षीरसागर हिचा मृतदेह २५ एप्रिल रोजी रायगड जिल्ह्यातील उरण येथे सापडला. ती मानखुर्द येथे राहत होती. तसंच, नागपाड्यात ती घरकामासाठी जात होती. १८ एप्रिल रोजी सकाळी ती तिच्या कामासाठी घरातून निघाली, परंतु सायंकाळी घरी परतलीच नाही. नेहमीच्या वेळेत घरी न परतल्याने तिच्या कुटुंबाने तिच्या मालकांना फोन करून याबाबत विचारले असता ती सायंकाळीच निघून गेली असल्याचं कळलं. तिचा काहीच शोध लागत नसल्याने पालकांनी मानखूर्द पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. २५ एप्रिल रोजी उरणच्या एका निर्जन ठिकाणी एक कुजलेला मृतदेह पोलिसांना सापडला. पोत्यात बांधून ठेवलेला हा मृतदेह पूर्णपणे कुजला होता. पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आणि ओळख पटवण्यासाठी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. दरम्यान, मानखुर्द पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंद झाल्याने मानखुर्द पोलिसांनी पूनमच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून मृतदेह ओळखण्यास सांगितले. मृतदेहाच्या हातातील ब्रेसलेट आणि तिच्या कपड्यांवरून तिची ओळख पटवण्यात आली. शवविच्छेदनात पूनमचा गळा दाबून हत्या झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तपासादरम्यान पोलीस अधिकाऱ्यांना आढळून आले की नागपाडा येथील निजाम खान हा पूनमला मानखुर्द येथून दररोज नागपाडा येथे सोडत असे. निजामने पोलिसांना सांगितले की, “१८ एप्रिल रोजी तिची शिफ्ट संपल्यानंतर मी आणि पूनम खडवली येथे गेलो. तिथे ती बुडाली. त्यामुळे मी तिला सरकारी रुग्णालयात नेले. परंतु तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. पूनमचा मृत्यू झाल्यामुळे मी घाबरलो. त्यामुळे तिचा मृतदेह उरणच्या खाडीत फेकून दिला.” याप्रकरणी उरण पोलिसांनी निजाम खानला ताब्यात घेतलं असून त्याची अधिक चौकशी केली. चौकशीअंती त्यानेच तिचा खून केला असल्याचं कबूल केलं. पूनमचे दुसऱ्याबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून त्यांच्यात वाद झाला. या वादातून त्याने तिची हत्या केली. किरीट सोमय्यांकडून लव्ह जिहादचा दावा सोमवारी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पूनमच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि ‘लव्ह जिहाद’मुळे तिची हत्या झाल्याचा दावा केला. “मी पूनम क्षीरसागर हिच्या मानखुर्द येथील निवासस्थानी तिच्या कुटुंबासोबत आहे. तिला निजाम खानने पळवून नेले होते. त्याने तिला फसवले आणि नंतर तिची हत्या केली. ही आणखी एक लव्ह जिहादची घटना आहे आणि तिचे कुटुंब न्याय मागत आहे”, असं किरीट सोमय्या म्हणाले. या घटनेबाबत मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्याशी बोललो असून जो कोणी जबाबदार असेल त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. वारिस पठाण यांनी दावा फेटाळला दरम्यान, AIMIM नेते वारिस पठाण यांनी किरीट सोमय्या यांचा दावा फेटाळून लावला आहे. “गुन्हा कोणी केला असेल त्याला कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे. पण भाजपा हिंदू विरुद्ध मुस्लिम असा मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे”, असं ते म्हणाले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले अभिवादन

नवी मुंबई : आधुनिक काळातील महान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहा. आयुक्त जयंत जावडेकर, लेखाधिकारी मारोती राठोड, प्रशासकीय अधिकारी उत्तम खरात आणि अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आपली गावे स्वयंपूर्ण झाली पाहिजेत हा ध्यास राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जपला. त्या दृष्टीने ग्रामविकासाचे मर्म सांगणारी ‘ग्रामगीता’ लिहून समृध्दीचा मार्ग सांगितला. अंधश्रध्दा निर्मूलनासाठीही त्यांनी भजन, कीर्तनाचा प्रभावी वापर केला. आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेविषयी समाज प्रबोधन केले. अशा थोर राष्ट्रसंतांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

दुर्वेश पाटीलचे ३२ धावात ५ बळी

कांगा क्रिकेट लीग मुंबई : दुर्वेश  पाटीलच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कुर्ला स्पोर्ट्स क्लबने यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशनचा (वायएमसीए) सात विकेट्सनी दणदणीत पराभव करत मुंबई क्रिकेट संघटनेच्या डॉ.एच .डी कांगा क्रिकेट स्पर्धेच्या…

कोटेच्या यांच्या प्रचार फेरीवर दगडफेक

देवनार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मुंबईः ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रथावर दगडफेक केल्याप्रकरणी देवनार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा दगड दोघांना लागल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार मिहीर कोटेचा यांनी सोमवारी प्रचाराला सुरुवात केली आहे. सोमवारी रात्री त्यांचा प्रचार गोवंडी परिसरात सुरू असताना अचानक एक दगड प्रचारातील रथावर येऊन पडला. हा दगड तक्रारदार निहारिका खोदले (५४) यांना लागला. पुढे तोच दगड कलप्पा गुनाळे यांच्या उजव्या गालाला लागला. त्यानुसार खोदले यांच्या तक्रारीवरून भादंवि कलम ३३७, ३३६ अंतर्गत व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात आणल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात देवनार पोलिसांनी सोमवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला. गोवंडी येथील न्यू गौतम नगर परिसरात सोमवारी सव्वाआठच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यानंतर खोदले यांनी तक्रार केल्यानंतर सोमवारी मध्यरात्री याप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसी टीटीव्हीच्या मदतीने याप्रकरणी तपास करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.