Category: मुंबई

Mumbai news

कोंकण भवनात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतनिमित्त अभिवादन

नवी मुंबई : थोर  संत व समाजसुधारक संत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कोंकण भवनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. संत तुकडोजी महाराजांनी अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर करून जनप्रबोधन केले. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. मराठी व हिंदी भाषांमध्ये तुकडोजी महाराजांनी काव्यरचना केली. स्वातंत्र्य लढ्यात आणि राष्ट्रकार्यात हिरीरिने सहभागी झाले. त्यांच्या या कार्यामुळे ते राष्ट्रसंत बनले. तुकडोजी महाराजांनी सन 1935 मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे मुख्य वैशिष्ट्य होते. तुकडोजी महाराजांनी सुमारे 50 पेक्षा अधिक ग्रंथांची निर्मिती केली.

आजच्या पत्रकारितेचा विकास झाला की दृष्टीला तडा गेला – विजय कुवळेकर

रमेश औताडे मुंबई : खिळे जुळविण्याच्या पत्रकारितेच्या पूर्वीच्या काळात वृत्तपत्रात फोटो स्पष्ट दिसू नये म्हणून शाई जास्त टाका असे सांगणारे  व आजची पत्रकारिता पाहता , ज्या दोन व्यक्ती भेटल्याच नाहीत त्यांची दृश्ये एकत्रित करण्याची कला पाहता आजच्या पत्रकारितेचा विकास झाला की दृष्टीला तडा गेला. ‘तंत्रज्ञान’  कोणतेही असूद्या मात्र ‘मंत्र’ तोच आहे. असे जेष्ठ पत्रकार व्यासंगी व्यक्ते विजय कुवळेकर यांनी जेष्ठ छायाचित्रकार घन:श्याम भडेकर यांच्या ‘शूट आऊट’  या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्या वेळी सांगितले. यावेळी माजी पोलीस अधिकारी मधुकर झेंडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाभळे, पत्रकार संघाच्या विश्वस्त वैजयंती कुलकर्णी आपटे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यवाह संदीप चव्हाण म्हणाले,  लेखणी हि तलवार असते. मात्र घन:श्याम भडेकर यांच्या कॅमेऱ्याची लेन्स ही बुलेट ठरली आहे. त्यांनी काढलेला एक फोटो लाखो शब्दापेक्षा मोलाचा आहे. जीवनात काही  प्रसंग असे येतात त्यावेळी आपल्याला राग येतो. मात्र घन:श्याम भडेकर यांना मी कधीही रागावलेले पाहिले नाही. आज त्यांच्या १९१ पानी शूट आऊट या पुस्तकाच्या   प्रकाशन समारंभास सर्व क्षेत्रातील मान्यवरांची गुंफण घन:श्याम यांनी केली आहे. त्यांची अशी अजून शंभर पुस्तके निघोत हिच सदिच्छा असे संदीप चव्हाण म्हणाले. यावेळी संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाभळे यांनी चारोळ्याच्या माध्यमातून घन:श्याम भडेकर यांच्या पुस्तकाचे व त्यांचे कौतुक केले. तर संघाच्या विश्वस्त वैजयंती कुलकर्णी आपटे यांनी घन:श्याम भडेकर यांच्या सोबत सुरू केलेली कारकीर्द कशी होती याबद्दल सांगितले. माजी पोलीस अधिकारी मधुकर झेंडे म्हणाले, १६ वर्षा खालील व महिलांना जबानी घेण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या घरी जावे असा कायदा आहे.मात्र त्याचे पालन कोणी करत नाही. घनश्याम यांनी त्यांच्या काळातील फोटोग्राफी बद्दल जे काही सांगितले तेव्हा सर्व आठवणी डोळ्यासमोर आल्या.असे अनेक किस्से सांगत त्यांनी घनश्याम यांचे कौतुक केले.

पी. वेलरासू यांनी कोंकण विभागीय महसूल आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला

अशोक गायकवाड नवी मुंबई :कोकण विभागात विकासाच्या दृष्टीने काम करण्यास भरपूर संधी आहे. कोकणातील नागरिकांना महसूल विभागातर्फे सूलभ सेवा देण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. कोकण विभागातील अनुभवी अष्टपैलू अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने नागरिकांना सेवा पुरवण्यावर भर देणार असल्याचे नवनिर्वाचित आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले. पी. वेलरासू यांनी आज कोंकण विभागीय महसूल आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांची नवी मुंबई मधील एस आर ए विभागात बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलारसू यांची कोकण आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली. श्री. वेलरासू हे २००२ च्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी आहेत. पी. वेलरासू यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नाशिक व ठाणे जिल्हाधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधीकरणात सदस्य सचिव अशा महत्त्वाच्या पदांवर काम करण्याचा अनुभव आहे. कोकण विभागीय आयुक्त म्हणून काम करण्याचा हा पहिलाच अनुभव आहे. पी. वेलरासू यांचे मास्टार्स इन पब्लिक अफेअर पब्लिक पॉलीसी ॲनालीसीचे शिक्षण कॅलीफोरनीया विद्यापीठातून झाले आहे. त्यांनी अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण केले आहे. यावेळी आयुक्त पी. वेलरासू यांनी कोकण विभागीय कार्यालयासह महसूलच्या विविध विभागांची पाहणी केली. आणि कोकण भवन मधील महत्त्वाच्या विभागांच्या विभाग प्रमुखांशी चर्चा केली.

ईटीसी केंद्रातील विशेष विद्यार्थी व व्यक्तींनी रॅलीव्दारे केली मतदान जनजागृती

नवी मुंबई : सध्या संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुका होत असून भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करून या लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे याकरिता ठिकठिकाणी जनजागृती मोहीमा राबवल्या जात आहेत. याकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून विविध माध्यमांतून अनेक लोकप्रिय व्यक्तीही प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावावा असे आवाहन करीत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या ईटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्रानेही महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार या मतदार जनजागृती मोहीमेत सक्रिय सहभाग घेतला असून विशेष विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच दिव्यांग व्यक्ती आणि शिक्षक यांनी जनजागृतीपर रॅलीत सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. अतिरिक्त आयुक्त श्री. शिरीष आरदवाड तसेच ईटीसी केंद्र संचालक तथा उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली ईटीसी केंद्र इमारतीपासून वाशी रेल्वे स्टेशन परिसरात मतदानाचे आवाहन करणारी रॅली काढण्यात आली. यामध्ये ईटीसी केंद्रातील सर्व शिक्षक व कर्मचारी तसेच विशेष विद्यार्थी व त्यांचे पालक आणि प्रौढ विशेष विद्यार्थी व व्यक्ती सहभागी झाले होते. यावेळी ईटीसी केंद्रातील सहशालेय शिक्षकांनी तयार केलेले मतदान जनजागृतीचे फलक घेऊन मतदानाचा हक्क बजावण्याकरिता घोषणा देण्यात आल्या आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेत त्यांना 20 मे रोजीच्या लोकसभा निवडणूकीत मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. ईटीसी केंद्राचे शैक्षणिक व्यवस्थापक व अधिक्षक यांच्या नियंत्रणाखाली या रॅलीचे सुव्यवस्थित नियोजन करण्यात आले होते. विशेष विद्यार्थी व व्यक्तींनी आपल्या पालकांसह रॅलीव्दारे केलेल्या मतदानाविषयक जनजागृती उपक्रमाची नागरिकांकडून प्रशंसा करण्यात आली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मंत्रालयात अभिवादन

मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेटकर यांनी यावेळी पुष्पहार अर्पण केला. कक्ष अधिकारी घनश्याम जाधव, सहायक कक्ष अधिकारी रवींद्र बच्छाव, नितीन राणे  आदींसह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

वाढत्या तापमानावरील उपाययोजनांसाठी आरोग्य विभाग सरसावले

मुंबई : मे महिना सुरू होण्यापूर्वीच राज्यात उन्हाचा तडाखा भयंकर वाढला आहे.  ग्रामीण भागासह शहरी भागातही उष्णतेची लाट धडकली आहे.  गेले काही दिवस  मुंबईच्या तापमानाने रविवारी पुन्हा उच्चांकी पातळी गाठली आहे. पुढील  काहा दिवस तापमानात…

महाविकास आघाडीची मंगळवारी रिपब्लिकन फ्रंटसोबत बैठक

मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पुढील तीन टप्प्यांतील मतदानासाठी महाविकास आघाडी आणि प्रागतिक रिपब्लिकन आघाडी यांची एक संयुक्त समन्वय बैठक उद्या मंगळवारी ३० एप्रिल रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे.…

महायुतीत जागावाटपाचा संस्पेस कायम

मुंबई :  मुंबई, ठाण्यात आणि नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार वाजतगाजत उमेदवारांनी अर्ज दाखल करीत असताना त्याच जागावर महायुतीतमात्र सन्नाटा आहे. नक्की जागा कोण लढविणार याबाबतच अजून संस्पेस कायम आहे. त्यामुळे महायुतीच्या…

निजामने केली पुनमची निघृण हत्या!

श्रद्धा वालकर घटनेची मुंबईत पुनरावृत्ती! मुंबई,  : मानखुर्द येथील साठेनगर परिसरात राहणाऱ्या पूनम क्षीरसागर नामक मातंग समाजातील तरुणीचा मृतदेह तुकडे करून एका सुटकेसमध्ये भरून निर्जनस्थळी ठेऊन देण्यात आला होता. निजाम…

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची रंगीत तालीम आज घेण्यात आली. यावेळी अवर सचिव मिलिंद हरदास यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) निखिल गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) डॉ.आरती सिंह यांच्यासह वरिष्ठ शासकीय तसेच पोलीस अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. आज झालेल्या रंगीत तालीम मध्ये राज्य राखीव पोलीस बल, बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र बल, बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, महाराष्ट्र पोलीस ध्वज, मुंबई पोलीस ध्वज, राज्य राखीव पोलीस बल ध्वज, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय ध्वज, मुंबई अग्निशमन दल ध्वज, बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, बृहन्मुंबई पोलीस आणि मुंबई लोहमार्ग पोलीस ब्रास बॅण्ड पथक, राज्य राखीव पोलीस बलाचे पाईप बॅण्ड पथक, बृहन्मुंबई पोलीस विभागाचे निर्भया वाहन पथक, मुंबई अग्निशमन दलाचे हाय राईज फायर फायटिंग वाहन, हायड्रोलिक प्लॅटफॉर्म आणि 64 मीटर टर्न टेबल लॅडर आदी पथकांनी सहभाग घेतला. उत्कृष्ट संचलन पुरस्कार भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट संचलन केलेल्या पथकांना रंगीत तालीम दरम्यान मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये शासकीय सेवेतील सहभागी पथकांच्या गटात गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याच्या सी-60 पथकाने प्रथम, राज्य राखीव पोलीस बलाने द्वितीय तर बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथकाने तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला. शालेय सहभागी पथकांमध्ये रोड सेफ्टी पेट्रोल (मुले), डॉ.अँटोनियो डा सिल्वा हायस्कूल, दादर च्या पथकाने प्रथम तर रोड सेफ्टी पेट्रोल (मुली), एमसीएम मुलींचे हायस्कूल, काळाचौकी च्या पथकाने द्वितीय क्रमांक पटकावला. स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम गटात नायगाव/ परेल भोईवाडा म्युनिसिपल सेकंडरी स्कूलने प्रथम, ग्लोब मिल पॅसेज म्युनिसिपल सेकंडरी स्कूलने द्वितीय तर सांताक्रुझ पूर्व मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूलने तृतीय क्रमांचा पुरस्कार मिळविला. या समारंभात किरण सुरेश शिंदे, अरुण सुरेश शिंदे, विवेक विनोद शिंदे यांनी सनई चौघडा वादन केले. तर शिबानी जोशी आणि पल्लवी मुजुमदार यांनी सूत्रसंचलन केले.