Category: मुंबई

Mumbai news

‘जेल का जवाब वोट से’

महाविकास आघाडीच्या रॅलीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचीही हजेरी मुंबई : आम आदमी पक्षाचे प्रमुख (आप) आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधातला संताप आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उमटत आहे. दक्षिण मुंबई व दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. या शक्तिप्रदर्शनामध्ये ‘आप’चे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सामील झाले होते. ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा व ‘जेल का जवाब वोट से’ असा मजकूर लिहिलेले फलक हाती घेत मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या रॅलीत महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. रखरखत्या उन्हातही कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल हे सध्या तुरुंगात असल्यामुळे ‘आप’च्या कार्यकर्त्यांमध्ये काहीसे निराशेचे वातावरण आहे, परंतु ‘आप’च्या कार्यकर्त्यांची गळ्यात पक्षाचा शेला, डोक्यावर टोपी व हाती झेंडे घेत भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु होती. ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी हाती घेतलेले ‘जेल का जवाब वोट से’ अशा आशयाच्या फलकांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. जेल का जवाब वोट से, अरविंद केजरीवाल जिंदाबाद, भारत माता की जय, पहले लढे थे गोरो से – अब लडेंगे चोरोसे, गली गली में शोर है भाजपा सरकार चोर है आदी घोषणा करीत ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील फोर्ट परिसर दणाणून सोडला. ‘आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून ऐन निवडणुकीच्या काळात तुरुंगात टाकले आहे. या हुकूमशाही वृत्तीचा आम्ही तीव्र निषेध करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला जो धक्का दिला आहे, त्याचे उत्तर आम्ही मतदानातून देणार आहोत. त्यामुळे ‘जेल का जवाब वोट से’ ही आमची नवीन घोषणा आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या सूचनांनुसार आम्ही जागोजागी ही घोषणा व प्रचार करीत आहोत. सध्या मोदी सरकारबद्दल सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रचंड चीड आहे, त्यामुळे बहुसंख्य मतदार हे महाविकास आघाडी – इंडिया आघाडीच्या उमेदवारांना मतदान करतील’, असे आम आदमी पक्षाचे मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष धनराज वंजारी यांनी बोलताना सांगितले.

बिल्डरने लावला घर खरेदीदारांना चुना, घरखरेदीदार रस्त्यावर

केतन खेडेकर मुंबई : सुप्रिम सिव्हील कन्स्ट्रक्शन इंडिया प्रा.लि. या कंपनीचे डायरेक्टर अब्बास कुरेशी यांनी त्यांच्या  कंपनीच्या माध्यमातून चेंबूर येथे इमारतीचे बांधकाम करण्याचे काम घेतले. त्यानंतर त्यांनी एका व्यावसायिक ओळखीतून  कुर्ला (पूर्व) येथील वत्सलाताईनगर, नेहरूनगर मधील, ‘ग्रेस अर्बन डेव्हलपमेंट कार्पोरेशन’ या बांधकाम व्यावसायिक (बिल्डर) कंपनीच्या ‘मास मेट्रोपोलिसीस या प्रकल्पाचे काम मिळाले. ह्या कामाची पाहणी करण्याकरिता व प्राथमिक बोलणी करण्याकरिता  तसेच आमचे प्रोजेक्ट डायरेक्टर श्री. निकेश इंदरलाल रावल गेलो असता. या मास मेट्रोपॉलिसीस साईट साठी ‘ग्रेस अर्बन डेव्हलपमेंट कार्पोरेशन’ या कंपनीस बार्टर सिस्टम (पैशाच्या बदल्यात फ्लॅट अथवा बांधकाम एरिया देणे) नुसार काम द्यायचे ठरले. त्यानुसार ‘ग्रेस अर्बन डेव्हलपमेंट कार्पोरेशन’ चे मालक अत्ताउल्ला अन्सारी, दानिश अन्सारी, निशांत अन्सारी यांच्या विरोधात मी दिनांक २६/०७/२०२२ रोजी गुन्हेगारी, कट, फसवणूक, विश्वासभंग आणि धमकी देत असल्याच्या गुन्ह्याबद्दल मा. पोलिस सहआयुक्त (गुन्हे) यांचे कडे तक्रार केली होती. आमच्या सोबत खरेदीदारांची ही फसवणूक केली आहे. ११ फ्लॅट पैकी ०२ फ्लॅट चे रजिस्ट्रेशन करून दिले आणि उर्वरित ०९ फ्लॅट च्या ‘अलॉटमेंट लेटर’ आणि ‘डीड ऑफ कॅन्शलेशन’ यामध्ये फ्लॅट एरिया, फ्लॅट नंबर यांमध्ये तफावत आहे. तसेच अलॉटमेंट लेटर दिल्यानंतर फ्लॅट हे दुसऱ्याच व्यक्तीना रजिस्ट्रेशन करून विक्री केले. त्यानुसार सतत 2 वर्षांपासून आम्ही आमची तक्रार गुन्हे शाखेने नोंदवली नाही, आरोपीच्या चुकीच्या तक्रारीवर आमचा धक्का आणि आश्चर्य व्यक्त करत संयुक्त सीपी गुन्ह्याने प्रकरण 6 वरून युनिट 7 कडे वर्ग केले. तसेच घर खरेदीदार यांनी रिट याचिका क्र. 4218आणि अशोका बिल्डकॉन यांनी अनेक रिट याचिका क्र. 5779 ऑफ 2024 आणि आम्ही रिट याचिका क्र. 4691ऑफ 2024 केल्यानंतरच पोलिसांनी आमची प्रकरणे घेतली आणि एफआयआर नोंदविला गेला नाही तोपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही, या सर्व विकासानंतरही आणि माननीय उच्च न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशानुसार आरोपींना अटक केली जात नाही आणि कायद्याची भीती न बाळगता आरोपी मुक्तपणे फिरत आहे. एकूण रु. 12 करोडची आमची फसवणूक करूनही पोलीस त्यांना अटक करत नाहीत किंवा कोणतीही कारवाई करत नाहीत. एक आरोपी केवळ श्रीमंत आणि उच्च संपर्कातील लोक असल्यामुळे आमचे संरक्षण कसे होते, या प्रकरणात निष्पक्षता का नाही, पोलिसांच्या या दृष्टिकोनाने आम्ही हैराण झालेल्या सर्व उच्च अधिकाऱ्यांकडे जाऊन देखील आम्हाला कोणतेही यश मिळालेले नाही किंबहुना आमची रक्कम किंवा घर देखील आम्हाला परत मिळालेले नाहीत. तरी आम्ही संपूर्णपणे हवालदिलं झाले असून या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही प्रसारमाध्यमांना आवाहन करत आहोत की आम्हाला आमचे हक्काचे घर मिळवून द्यावे अशी माहिती बांधकाम व्यवसायिक निकेश रावल आणि अब्बास कुरेशी यांनी पत्रकार परिषद घेऊन  दिली.

कोंकणातील तापमानात वाढ झाल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी– विभागीय आयुक्त डॉ. कल्याणकर

नवी मुंबई : कोंकण विभागातील तापमानात वाढ झाल्याने  उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी  नागरिकांनी  दुपारी 12 ते 3च्या वेळी अनावश्यक घराबाहेर पडू नये. आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी असे आवाहन कोंकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे. वातावरणातील तापमान प्रमाणाबाहेर वाढले की शरीरातील तापमान नियंत्रित करण्याची यंत्रणा कोलमडते. उष्माघात झाल्यावर चक्कर येणे, मळमळ, उलट्या होणे, डोकेदुखी, दरदरून घाम फुटणे, थकवा येणे  स्नायूंना आकडी येणे अशी लक्षणे दिसू लागताच जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क करावा. उष्माघात  होऊ नये म्हणून  तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी पिण्यात प्यावे,  हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत, बाहेर जातांना गॉगल्स, छत्री/ टोपी, बूट व चपलांचा वापर करण्यात यावा, प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी. कोंकणातील जनतेने काळजी घ्यावी . उन्हाळ्यात त्रास होऊ लागल्यास जवळच्या शासकीय जिल्हा रुग्णालय अथवा तालुका किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करावा. अनेक आरोग्य केंद्रात उष्णतेचा त्रास होणाऱ्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्षाची सोय करण्यात आली आहे.

मुंबई उत्तर मतदासंघाकरीता

दीपेंद्रकुमार निवडणूक खर्च निरीक्षक मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 26- मुंबई उत्तर मतदासंघांकरीता भारतीय राजस्व सेवेचे अधिकारी दीपेंद्रकुमार यांची खर्च विभागाच्या निवडणूक निरीक्षक म्हणून भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे…

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाकरीता

राजकुमार चंदन, किरण छत्रपती खर्च निरीक्षक मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाकरीता भारत निवडणूक आयोगाने भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी राजकुमार चंदन आणि किरण के. छत्रपती यांची नियुक्ती केली आहे.…

कृत्रिम प्रज्ञेमुळे रोगनिदान व उपचार खर्च कमी व्हावा-राज्यपाल रमेश बैस

अशोक गायकवाड नवी मुंबई : कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानामुळे रोगनिदान व उपचार यामध्ये क्रांतिकारी बदल होत आहेत. विशेषतः विविध प्रकारचे कर्करोग, हृदयविकार, त्वचा रोग, दंत चिकित्सा या क्षेत्रात कृत्रिम प्रज्ञेमुळे परिवर्तनकारी बदल होत आहेत. या तंत्रज्ञानामुळे जनसामान्यांचा रोगनिदान व उपचाराचा खर्च कमी झाला पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी रविवार येथे केले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस व बॉम्बे हॉस्पिटल यांनी आयोजित केलेल्या ‘आरोग्यसेवा व वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावरील एक दिवसाच्या चर्चासत्राचे उदघाटन राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी  बॉम्बे हॉस्पिटल मुंबई येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. गेल्या दोन शतकांमध्ये लसीकरण, बधिरीकरण, मेडिकल इमेजिंग, प्रतिजैविके, अवयव प्रत्यारोपण, स्टेम सेल थेरपी इत्यादी महत्वपूर्ण स्थित्यंतरे झाली आहेत . कृत्रिम प्रज्ञा हे क्रांतिकारी तंत्रज्ञान देखील वैद्यकीय क्षेत्रातील एकूणच परिदृश्य बदलवणारे असेल असे सांगून कृत्रिम प्रज्ञेच्या मदतीने मधुमेह व इतर जीवनशैली संबंधी समस्यांचे ओझे कसे कमी करता येईल या संबंधी संशोधन झाले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. डॉक्टर व विशेषज्ञांनी आधुनिक तंत्रज्ञान अंगीकारताना रुग्णांसोबत सुसंवाद व सहानुभूती कमी होऊ देऊ नये तसेच गरीब रुग्णांच्या सेवेबाबत विशेष तत्पर राहावे, असे राज्यपालांनी सांगितले. कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीने व्हावा तसेच रुग्णाच्या आजाराबाबत योग्य ती गोपनीयता जपली जावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्यपालांच्या हस्ते नॅशनल अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेस माजी फेलो दिवंगत डॉ बी के गोयल व डॉ एल एच हिरानंदानी यांना मरणोपरांत सन्मानित करण्यात आले. अकादमीचे माजी अध्यक्ष डॉ केवल तलवार, डॉ पी व्ही देसाई, डॉ बी एस सिंघल, डॉ सरोज गोपाल, डॉ अशोक गुप्ता डॉ देवेन तनेजा, डॉ नादीर भरुचा, डॉ सुनील पंड्या, डॉ सतीश खाडिलकर डॉ अरुण जामकर डॉ अनिल शर्मा आदींना देखील सन्मानित करण्यात आले. चर्चासत्राला नॅशनल अकॅडेमी ऑफ मेडिकल सायन्सेसचे अध्यक्ष डॉ शिव कुमार सरीन, नियोजित अध्यक्ष डॉ दिगंबर बेहरा, चर्चासत्र आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ सतीश खाडिलकर, सहाध्यक्ष डॉ अशोक गुप्ता, बॉम्बे हॉस्पिटल ट्रस्टचे वैद्यकीय सेवा संचालक डॉ राजकुमार पाटील, हृदयविकार विभाग प्रमुख डॉ अनिल शर्मा, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स व तज्ज्ञ उपस्थित होते.

रेल्वे स्थानकातील प्रवासी पाणपोई कोरड्या….

मुंबई : उन्हाळ्याचे महिने सुरू झाले आहेत. घामाच्या घटने शरीर ओलेचिंब होत आहे असा उन्हाचा पारा चढला आहे. सूर्य आग ओकत असताना रेल्वे प्रवासी  स्थानकातील प्रवासी पाणपोई कोरड्या असल्याने खिष्याला चाट देत बिसलेरी पाणी बाटली घेऊन पित आहे. काही रेलवेस्तोल वर थंड पाणी बाटली मिळत नाही तर काही ठिकाणी बोगस कंपनी ची बाटली मिळत आहे. सरकारने एक रुपयात बिसलेरी पाणी बॉटल भरून देण्याचे स्वयंचलित मशीन स्टॉल सुरू केले होते. कंत्राट दराचे खिसे भरल्यानंतर हे पाणी गायब झाले व कालांतराने स्टॉल ही गायब झाले. त्या ठिकाणी नवीन कंत्राटदार नेमणूक करून टेंडर घोटाळा झाल्यानंतर तेही बंद झाले. पूर्वी गुजराती जैन समाज देणगी म्हणून रेल्वे स्टेशन वर संगमरवरी लाद्या बसवत साखळी लावलेले ग्लास बांधून पाण्याची सोय मोफत करत होते. चाकरमानी घामाच्या घरा तोंड धुवत ओंजळीने पाणी पिऊन तृप्त ढेकर देत असत. आता खिशात हात घातल्याशिवाय बिसलेरी ची तहान भागत नाही व ढेकर ही येत नाही. सरकार कोणाचेही असो सामान्य जनता आजही त्रस्त आहे. अच्छा दिन चे कमळ किंव्हा गरिबो के साथ वाला हात कोणीही गरिबांना मोफत पाणी पाजणार नाही असे प्रवासी बोलत आहेत.

‘प्रिय मतदार’ म्हणून मतदारांची  झोपमोड….

मतांचा जोगव्यासाठी उमेदवार कोणत्याही थराला… रमेश औताडे मुंबई : पूर्वी भिंतीवर चुना घेऊन कार्यकर्ते भिंती रंगवायचे. ” ताई माई आक्का … चिन्हावर मारा शिक्का ”  ,  ” बोटावर शाई लावली का आज्जी ” , ” घरातला हक्काचा माणूस ” अशी वाक्य लिहिलेल्या भिंती असायच्या.आता उमेदवारांनी मतदारांची झोप उडवली आहे. आता व्हॉटसअप , इंस्ट्रा, फेसबुक , चिमणी एक्स , आणि सर्वात म्हणजे मोबाईल फोन वरून रात्री अपरात्री झोपमोड करणारे फोन त्रास देऊ लागले आहेत. कोणी दवाखान्यात असतो, कोणी स्मशान भूमीत असतो तर कोणी तणावात असतो. धावपळीच्या जमान्यात नोकरी करत असताना साहेबांचा फोन आला की काय असे म्हणून सेव्ह नसलेला फोन उचलला तर .. प्रिय मतदार म्हणत डोक्याची ऐसी तैसी करणारे फोन त्रास देऊ लागले आहेत. मोदी सरकारने काही दिवसापूर्वी सोशल मध्यम सुधारण्यासाठी कडक नियमावली केली आहे. मोदी सरकारबद्दल काही आक्षेप घेणारे लिखाण कुणी प्रसिद्ध केले तर त्यांचे काही खरे नाही. काही टिव्ही वाहिन्या व वृत्तपत्र या कारवाईचे शिकार झाले आहेत. मग आम्हा मतदारांच्या झोपेचे काय ? असा सवाल मतदार करत आहेत. मतदार राजा नाही तर मतदार त्रासलेले राजा झाला असून यावर काहीतरी उपाय करणे गरजेचे आहे. मोबाईल कंपन्या व दूरसंचार विभाग यांनी याबाबत कठोर कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.

सरकारी बाबूंचा मनमानी कारभार …..

मुख्यमंत्री कार्यालयाने दिले कारवाईचे आदेश…. इर्शाळवाडी भूस्खलनसारख्या दुर्घटनेची भीती…. रमेश औताडे मुंबई : गेल्या नऊ वर्षांपासून तक्रार करूनही टेकडीवरील अतिक्रमणांकडे सिडको अधिका-यांच्या दुर्लक्षितपणामुळे शेकडो मानवी जीव व वन्य जीव यांची मृत्यूची वेळ आली आहे. इर्शाळवाडी भूस्खलन सारख्या दुर्घटनेतून कोणताही धडा हे सिडको सरकारी बाबू घेत नसल्याने मुख्यमंत्री कार्यालयाने गंभीर दखल घेत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सिडको अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाविरोधात स्थानिक रहिवासी,विद्यार्थी आणि पर्यावरण प्रेमींनी जेव्हा मूक मानवी साखळी तयार केली तेव्हा सरकारने दखल घ्यावी यासारखे दुर्दैवी बाब कुठेच नसेल अशी चिंता पर्यावरण, डोंगर, वन्यजीव वाचवा या आंतरराष्ट्रीय दखल प्राप्त सामाजिक संस्थेचे ” नॅटकनेक्ट फाऊंडेशन ” चे संचालक बी एन कुमार यांनी चिंता व्यक्त केली. ‘सेव्ह बेलापूर हिल्स’ आणि ‘स्टॉप मर्डर ऑफ ट्रीज’ अशा घोषणा देणारे बॅनर घेऊन रहिवासी, विद्यार्थ्यांनी, जेष्ठ नागरिकांना भर उन्हात मानवी साखळी केली व सरकारी बाबूंच्या मनमानी विरोधात मुक निदर्शने केली. यावेळी नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी एन कुमार म्हणाले की, टेकडीवर अनेक बेकायदेशीर मंदिरे उभी राहिली आहेत आणि रहिवाशांनी नऊ वर्षां पूर्वी पत्रव्यवहार करून  इशारा देऊनही  कोणतीही कारवाई झालेली नसल्याने  नॅटकनेक्टने माहिती अधिकार अस्त्राचा वापर केला असता,   मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाला या समस्येची चौकशी करण्यास सांगितले आहे.  कुमार म्हणाले की इमारतींमुळे टेकडी कमकुवत होऊ शकते आणि आगामी पावसाळ्यात भूस्खलन होऊ शकते, परंतु सिडकोने अद्याप निर्णायकपणे कार्यवाही केलेली नाही. नॅटकनेक्टने आरटीआय अंतर्गत अर्ज दाखल करून टेकडी वाचवण्यासाठी कोणती पावले उचलली याची माहिती मागितली असता नऊ वर्षानंतर मुख्यमंत्री कार्यालय जागे झाले आहे. कुमार यांनी सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकाऱ्यालाही याबाबत माहिती अधिकारात माहिती मागितला आहे. यापूर्वी एक समिती या गंभीर समस्येकडे लक्ष देत असल्याचे थातुर मातुर माहिती दिली मात्र अद्यापही कारवाई सुरू केली नाही. सिडकोकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत असल्याची खंत स्थानिक रहिवासी कपिल कुलकर्णी यांनी व्यक्त केली. सर्व टेकडी  वनजमीन सिडकोच्या ताब्यात आहे. गोरगरीब जनतेला एक न्याय व श्रीमंत नागरिकांना वेगळा न्याय हे योग्य नाही असे स्थानिक रहिवासी कपिल कुलकर्णी यांनी सांगितले. हिमांशू काटकर म्हणाले, “बेकायदेशीर बांधकामांना पाणी आणि वीज जोडणी मिळते हे धक्कादायक आहे. हिल व्ह्यू रो-हाऊस सोसायटीतील दशरथ भुजबळ म्हणाले की, टेकडीच्या चौफेर अतिक्रमणांमुळे वन्य जीवांचे प्रचंड नुकसान होत आहे आणि  दरडी कोसळण्याची भीती तर आहेच. अनेक गृहिणी आणि मुले या सिडको अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारविरोधात  मूक आवाज देण्यासाठी वेळ काढत आहेत हे कौतुकास्पद आहे. हे संकट २०१५ चे आहे तेव्हा सिडकोचे तत्कालीन एमडी संजय भाटिया यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते. जेव्हा मंदिराचे बांधकाम नुकतेच सुरू झाले होते. मात्र अद्याप काही कारवाई झाली नाही असे कुलकर्णी म्हणाले. आता आपण टेकडीवर किमान 20 मंदिरे पाहू शकतो. या प्रकरणी उच्च अधिकारी सतत दुर्लक्ष्य करत आहेत.  इर्शाळवाडी भूस्खलनासारख्या दुर्घटनेतून कोणताही धडा हे अधिकारी घेत नाहीत अशी खंत खारघर टेकडी आणि वेटलँड समूहाच्या ज्योती नाडकर्णी यांनी व्यक्त केली.

जगदगुरू शंकराचार्यांच्याहस्ते ‘शंकरालयम’येथे महाकुंभाभिषेकम सोहळ्याचे आयोजन

मुंबई : चेंबुरच्या  हरिहरपुत्र भजन समाज (रजि) संचलित ‘शंकरालयम’ येथे येत्या १ मे रोजी तृतीय जीर्णोद्वार महाकुंभाभिषेकम सोहळा आयोजित केला आहे. हा महाकुंभाभिषेकम आद्य जगद्‌गुरु बदरी शंकराचार्य श्री विद्याभिनव श्री श्री…